Submitted by अनन्त्_यात्री on 1 June, 2018 - 02:09
अनोळखी वाट घनदाट वनी बोलाविते
निब्बरल्या तनामना नितळ गारवा देते
हिरव्या रंगाच्या छटा पानोपानी अगणित
सळसळ लहरते वार्यासंगे अविरत
विजनात दूरवर घुमतसे घुघुत्कार
पसरती अंधाराचे पडसाद रानभर
पाखरांनो घरट्यात पिले हळूच जोजवा
लखलख काजव्यांचा झाडाझाडावर दिवा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
लखलख काजव्यांचा झाडाझाडावर
लखलख काजव्यांचा झाडाझाडावर दिवा >>>> भारीये..
सुंदर रचना...
धन्यवाद, शशांकजी!
धन्यवाद, शशांकजी!
सुंदर रचना
सुंदर रचना
धन्यवाद, Nilesh Patil
धन्यवाद, Nilesh Patil
सुंदर !
सुंदर !