स्फुट - जातीअंत
मांगीरबाबासाठी केलेला शिरा मातंगांसोबत
आणि झबरनाथाला कापलेला बोकड 'दगड वडारांसोबत' खाऊनही
माझे ब्राह्मण्य जाता जात नाही आणि जातीयवादी असल्याचा शिक्काही पुसला जात नाही
मोलकरणीने घासलेली भांडी,
पाणी ओतून घरात घ्यायची माझी आजी!
मराठयांच्या मुलांसोबत तर खेळत नाहीस ना, विचारायची माझी आई
पण, शिंपी, सोनार, न्हावी मित्रांनी माझे बालपण शिवले, सोनेरी केले आणि सेटही केले
मुंजीचे वर्ष सोडले, तर कार्य आणि आईचे चौदा दिवस सोडून अंगात जानवे घातले नाही
पंचवीस वर्षे देश फिरलो, कोणाच्याही खांद्याला खांदा लावून, कुठेही, काहीही खात
पहिला बॉस ब्राह्मण, पहिला कस्टमर चांभार, पहिला असिस्टंट महार, पहिला महाविद्यालयीन मित्र धनगर!!
माळी बाईच्या हातचा रस्सा भुरकला, भारती जातीत बसून नाश्ता केला, गुरव विद्यार्थिनीकडे पोटभर जेवलो, कोळी मुलीची फी भरली
पण ब्राह्मण्य आणि जातीयवादी असण्याचा शिक्का, दोन्ही जात नाही
बारमध्ये पेग घेतो तेव्हा माझ्याकडे बघत कोणीतरी म्हणतो
'गोडसेची औलाद आहे ती'
बहुधा काही गोष्टी राहून गेल्या
त्या केल्या की सगळे सुरळीत होईल
भाषा बदलायला हवी
वाक्यागणिक चार शिव्या हव्यात
बायकोला थोबाडायला हवे
म्हातारा मरत नाही ही तक्रार करायला हवी
फक्त दोन वेळा जेवणासाठी घरात जाऊन बाकी वेळ गप्पा हाणायला हव्यात
जातीमुळे मागे पडलो असे म्हणत राहायला हवे
कदाचित,
तरीही जाणार नाही हा शिक्का
कारण, बहुधा जात हे जगण्याचे एक कारण बनलेले आहे
प्रत्येकाचा अंत म्हणजेच त्याच्या त्याच्यापुरता जाती अंत बहुधा
========
-'बेफिकीर'
अब आयेगा मझा!!
अब आयेगा मझा!!
total different stroke!
total different stroke!
वाक्यागणिक चार शिव्या हव्यात
वाक्यागणिक चार शिव्या हव्यात
बायकोला थोबाडायला हवे
म्हातारा मरत नाही ही तक्रार करायला हवी
फक्त दोन वेळा जेवणासाठी घरात जाऊन बाकी वेळ गप्पा हाणायला हव्यात
जातीमुळे मागे पडलो असे म्हणत राहायला हवे
>> असे करणारे ब्राह्मण तुम्ही बघितले नसणार किंवा आपल्या जातीच्या माजामुळे जाणूनबुजून लपवत आहात. कितीही आव आणला तरी आपल्या जातीचा माज आणि दुसर्याला तुच्छ लेखणे, स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणे हे काही जात नाही हेच खरे. हाच तर जातीयवाद आहे. हाच ब्राह्मणवाद आहे.
बहुधा काही गोष्टी राहून
बहुधा काही गोष्टी राहून गेल्या
त्या केल्या की सगळे सुरळीत होईल >> यापुढील सगळे स्फुट जजमेंटल वाटले
लग्न केलेत काय आंतरजातीय ?
लग्न केलेत काय आंतरजातीय ? नाही ना? नसू द्या नसू द्या, सावरकरांच्या घरात तरी कुठे झालीत तशी? रोटीच म्हनाल तर हाटेलात आणि दारू गृहात कोण जाती तपासतय .... घराच्या बाहेर लैच फुरोगामी असतो आपुन
बेफी ,
बेफी ,
जात मनात असते. कुणाबरोबर जेवताना, काम करताना, कुणाला मदत करताना त्या व्यक्तीची जात आठवणार असेल तर काय उपयोग? आणि 'त्या केल्या की सगळे सुरळीत होईल' यापुढले सार्वत्रीकरण , एक प्रकारचे चौकटीत बसवणे नाही आवडले.
कुणी 'गोडसेची अवलाद' म्हणत असेल तर तो त्या व्यक्तीचा दृष्टीकोन, मी तशी नाही हे मला माहितेय तर अंगाला लावून का घ्यावे? मी समोरच्या व्यक्तीकडे फक्त माणूस म्हणून बघते हे माझ्यापुरते पुरेसे. दुसर्याकडून 'जातीयवादी नाही' या शिक्क्याची अपेक्षा का करावी? समोरची व्यक्ती आपली जात विसरायला तयार नसेल तर तो त्या व्यक्तीचा चॉईस. माझे सर्वांशी माणूसकीने वागणे हे , तसे वर्तन नैतिकदृष्ट्या योग्य आहे म्हणून आहे तर मग इतरांकडून प्रशस्तीपत्रकाची मला गरजच नाही.
वाक्यागणिक चार शिव्या हव्यात
वाक्यागणिक चार शिव्या हव्यात
बायकोला थोबाडायला हवे
म्हातारा मरत नाही ही तक्रार करायला हवी
फक्त दोन वेळा जेवणासाठी घरात जाऊन बाकी वेळ गप्पा हाणायला हव्यात
जातीमुळे मागे पडलो असे म्हणत राहायला हवे>>>>हे तर अजिबातच आवडल नाही,, पटल नाही.
दुसर म्हणजे तुम्ही जाती मानता/ मानत नाही ह्यासाठी दुसर्यांच्या सर्टीफिकेट ची का आवश्यकता वाटते ??????
स्वाती २ यांचा पुर्ण प्रतिसाद
स्वाती २ यांचा पुर्ण प्रतिसाद पटला.
स्वाती२ ह्यांचा प्रतिसाद पटला
स्वाती२ ह्यांचा प्रतिसाद पटला.
स्वाती 2,
स्वाती 2,
टीका अवश्य करा, उपदेश नको
बेफी, मी माझ्या मनातले विचार
बेफी, मी माझ्या मनातले विचार मांडले. इथे कुणाला उपदेश करावा एवढी माझी पात्रताही नाही. मी काही साहित्यिक वगैरे नाही, 'तुम्ही' हा शब्द मी एक जनरल शब्द म्हणून वापरला. तुम्ही' शब्द खटकलाय , तो चुकीचा असेल, उपदेश केलाय असे वाटतेय तर तो बदलून प्रतिसाद संपादित करते.
बेफिकीर सर, वैताग पोहोचला.
बेफिकीर सर, वैताग पोहोचला. जाऊ द्या हो, कोणी कितीही (आणि कोणत्याही
) जातीवरून कमी किंवा तुच्छ लेखायचा प्रयत्न केला तर समजून घ्यायचं की तो माणूस कच्चं मडकं आहे म्हणून. Forget and forgive. We are all humans at the end of the day. Prone to err.
डॉक्टरची जात पाहून उपचार
डॉक्टरची जात पाहून उपचार घेणे तुम्ही बंद कराल तेव्हा जातिअंतास सुरुवात होइल बघा..
येवढ्या लोकांच्या जाती कशा
येवढ्या लोकांच्या जाती कशा समजतात? तुम्ही विचारता का तेच सांगतात?
मनातून जात नाही ती जात.
मनातून जात नाही ती जात.
यावर जेव्हा मात होईल तेव्हा जातीअंत होईल.
शाळेत जात लावण बंद केल पाहिजे
शाळेत जात लावण बंद केल पाहिजे.. तिथूनच खरी सुरुवात होते
अरे धागा पुरेसा पेटला कसा
अरे धागा पुरेसा पेटला कसा नाही अजुन?
नेहमीचे यशस्वी कलाकार कुठे गेले? का बेफींच्या धाग्याचा टीआरपी वाढू नये म्हणून अनुल्लेखाने मारायचे ठरवलेय या धाग्याला?
सगळे सुरळीत होईल>>> पर्यंत
सगळे सुरळीत होईल>>> पर्यंत तुम्ही माणूस होतात,
वाक्यागणिक चार शिव्या हव्यात
बायकोला थोबाडायला हवे
म्हातारा मरत नाही ही तक्रार करायला हवी
फक्त दोन वेळा जेवणासाठी घरात जाऊन बाकी वेळ गप्पा हाणायला हव्यात
जातीमुळे मागे पडलो असे म्हणत राहायला हवे>>> इथे तुम्ही ब्राम्हण झालात.
तुमच्या लिखाणाचा पंखा मी, पण जनरलायझेशन आवडत नाही.
वाक्यागणिक ८ शिव्या देणारे, बायकोलाच काय बापाला देखील लाकूड फेकून मारणारा, गप्पा हाणणारा, स्नान संध्या करून वेगळी संध्या करणारा आणि लग्ने, मुंजी, सत्यनारायण करून गुजराण करणारा बामन देखील पाहिलाय. पुन्हा आपल्या बामन असण्याचा अभिमाज असतो यांना.
बेफी आपण संवेदनशील व
बेफी आपण संवेदनशील व प्रतिभाशाली असल्याने आपल्यातील उद्विग्नता बाहेर पडली. आतुन आलेली खदखद आहे. पण तरीहि शांत रहायला हव.
मी काय म्हणतो, ते तेवढं बार
मी काय म्हणतो, ते तेवढं बार मधे जाऊन पेग घेणं बंद केलं तर.....
म्हणजे पुढचं सगळंच टळेल
हर्पेन
हर्पेन
एक ही मारा, लेकीन क्या मारा ...
बार मधे जाऊन पेग घेणं
बार मधे जाऊन पेग घेणं
>> अहो ते संध्याकर्मामध्ये अंतर्भूत असेल तर?
{{{ कितीही आव आणला तरी आपल्या
{{{ कितीही आव आणला तरी आपल्या जातीचा माज आणि दुसर्याला तुच्छ लेखणे, स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणे हे काही जात नाही हेच खरे. हाच तर जातीयवाद आहे. हाच ब्राह्मणवाद आहे.
Submitted by मेघपाल on 31 May, 2018 - 14:13 }}}
मग हे काय आहे?
https://www.facebook.com/fakt.raje/posts/736035979742650
(फेसबुक लॉगिन केल्यावरच वाचता येईल)
असे अजूनही बरेच आहेत.
https://www.facebook.com/pg/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9...
https://www.facebook.com/pages/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A...
https://www.facebook.com/pages/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A...
https://www.facebook.com/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A-%...
https://fbayzer.com/page/asumeshgc
https://www.pintaram.com/u/prashant_0093/1769377274916023815_6565287458
मी काय म्हणतो, ते तेवढं बार
मी काय म्हणतो, ते तेवढं बार मधे जाऊन पेग घेणं बंद केलं तर.....>> मग हे असं स्फुट पाडायला कसं जमेल!
मग हे काय आहे?
मग हे काय आहे?
>> हाच तर जातीयवाद आहे. हाच ब्राह्मणवाद आहे.
कवितेमधलं शेवटचं वाक्य वाचा.
कवितेमधलं शेवटचं वाक्य वाचा.
https://www.facebook.com/kishor.matkar.33/videos/978789125599971/
{{{गर्वच नाही तर माज आहे*
मी मराठा असल्याचा
जयोस्तु मराठा }}}
हा ब्राह्मणवाद नव्हे.
नक्की कुठकुठल्या जातीचा
नक्की कुठकुठल्या जातीचा उल्लेख म्हणजे जातीयवाद?
हा ब्राह्मणवाद नव्हे.
हा ब्राह्मणवाद नव्हे.
>> काय असतो ब्राह्मणवाद? जातीने ब्राह्मण असल्याचा माज असणे म्हणजे ब्राह्मणवाद नव्हे.
वर काही महत्वाचे मुद्दे
वर काही महत्वाचे मुद्दे निघाले आहेत, त्याबाबत:
१. मी आंतरजातीय विवाह केला नाही ह्याला काहीच विशेष कारण नाही. प्रेमविवाह आहे व आवडलेली मुलगी स्वजातीय होती. शिवाय, आंतरजातीय विवाह केलेलेच जातीयवादी नसतात हे गृहीतक अयोग्य वाटते. आपण जातीयवादी ठरू नये म्हणून मुद्दाम आंतरजातीय विवाह करणारे तसेही इथे किती आहेत ह्याची उत्सुकता आहेच. ह्यावर 'आम्ही डांगोरा पिटत नाही' ह्या उत्तराऐवजी 'आम्ही जातीयवादी नाही हे सिद्ध करण्यासाठी मुद्दाम आंतरजातीय विवाह केला' असे उत्तर देऊ शकणाऱयांबद्दल पूर्ण आदर@
२. माबोवरील एका धाग्यावरील शर्मिला ह्यांच्या प्रतिसादाला सपोर्ट करण्यासाठी लिहिलेला एक प्रतिसाद ही माझी येथील कायमस्वरूपी भूमिका आहे हे ठसवण्यासाठी केल्या गेलेल्या व केल्या जात असणाऱ्या अथक प्रयत्नांबद्दल सहानुभूती आहे. तेव्हा डॉक्टर हा मुद्दा अविरत चघळण्यास माझी हरकत असू शकत नाही.
३. ब्राह्मणवाद म्हणजे कोणत्याही इतर जातीतल्याने आणखी तिसऱ्याच जातीतल्याला जातीसापेक्ष वागणूक देणे ह्या अर्थाच्या साती ह्यांच्या एकेकाळच्या प्रतिसदांना मी येथे तीव्र आक्षेप घेतलेला होता. ब्राह्मणेतरांनी इतर ब्राह्मणेतरांशी वागताना जातीयवादी वर्तन ठेवणे हाही आणि आजच्याही काळात ब्राह्मणांचाच दोष आहे असे म्हणत राहणे हे स्वतः जातीयवादी असण्याचे खापर आजच्या ब्राह्मणांवर फोडणे आहे.
४. स्फुटात लिहिलेल्या जाती मला कशा माहीत ह्यावरचे उत्तर हे आहे की घनिष्ठ संबंध आल्यावर अनेकदा हे उल्लेख सहजच केले जातात. कानिफनाथासाठीचे जेवण जेवायला या, आमच्या म्हसकोबाची यात्रा आहे वगैरे विधाने सहज केली जातात.
५. आपण जात न पाळता समाजात मिसळलो तरी समाज जात विसरू देत नाही ही दुर्दैवी अवस्था अभिव्यक्त करणे हे ह्या स्फुटाचे काम आहे. हे काम मी इतर जातीचा असतो तरी (जर मला असे लिहावेसे वाटले असते आणि लिहिले असते तर) त्या स्फुटाने केलेच असते
६. शेवटचा पॅरा हा निव्वळ उद्वेग आहे व तो निरीक्षणातून आलेला आहे. ती निरीक्षणेच अपवादात्मक असतील किंवा ती निरीक्षणे प्रातिनिधिक असतील ह्या दोन्ही विचारांशी मी पूर्णपणे सहमत आहे.
हरपेन ह्यांच्यासाठी,
टीका अवश्य करा, उपदेश कृपया नको. जातीचे उल्लेख कोठेही होऊ शकतात हे सांगणे आहे.
एकंदरीत - मी तथाकथित ब्राह्मण्य सोडले तरी समाज तोच शिक्का मारतो / मारू शकतो व मायबोलीवर म्हणायचे तर मारण्यास आसुसलेला असतो इतकेच ह्या धाग्यातून म्हणायचे होते
ह्याच अर्थाचे कोणी इतर जातीयांनी लिहिले तर ते कदाचित डोक्यावर घेतले जाईल
बिपीन चंद्र, योग्य वेळी योग्य पुरावे देण्यासाठी आभार
सर्व टीकाकार व प्रतिसाददाते ह्यांचे विनम्र आभार
-'बेफिकीर'!
बेफी, तो उपदेश नाही. मी ते
बेफी, तो उपदेश नाही. मी ते अत्यंत निर्मळ मनाने इंग्रजीत ज्याला आपण लाईट हार्टेड म्हणतो तसे लिहिले होते. पुढचे प्रतिसाद बघितल्यावर माझे लिहिणे वेगळे वाटू शकते याची जाणीव आहे.
मलाही अशा प्रकारच्या शेरेबाजीला सामोरे जायला लागण्याचा प्रसंग अनेकदा आलेला आहे. सुरुवातीस नाही जमले पण आता मी जो कोणी असे काही म्हणतो त्याला नजरेत नजर मिळवून उत्तर देतो हो मी जशी गोडसेची औलाद आहे त्याचप्रमाणे ना. गोपाळकृष्ण गोखले आणि विनोबा भावे यांचीही औलाद आहे. कित्येक जणांना तर हे दोघे कोण आहेत हे ही माहित नसते. पण चालायचंच. असो.
Pages