Submitted by निशिकांत on 21 May, 2018 - 01:20
झोपडीत तुजसवेच भोगलाय मी महल
लागलो तुझ्यामुळेच गुणगुणावया गझल
ब्रह्मगाठ दाबताच दूर भूत जायचे
आज जानव्या! तुझीच संपली चहल पहल
पायपीट खूप खूप शोधण्या सुखास मी
झोपडी जुनी बघून, शोध जाहला सफल
आत्मसात तंत्र मंत्र जाहले, गझल तरी
वाटली जरी कठीण, मारलीच मी मजल
मौन आपुल्यांसवेच, काचते किती गळा!
अंतरात बघ कळेल, प्रश्न तू नि तू उकल
हात खडबडीत आज, कालच्या श्रमांमुळे
सांज पांगळी सुखात, दु:ख आठवे धवल
तोच कालचा असून, आज का नगण्य मी?
वृध्द मी स्वतःतुनीच जाहलोय बेदखल
वादळास मागतोस का भिकेत शांतता?
झुंज देउनी मिळेल, जे हवे तुला सकल
वृत्त, काफिया, रदीफ यात गुंतल्यामुळे
सूर जीवना! खरेच जाहला किती तरल!
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--देवराज
लगावली---गाल गाल गाल गाल-गाल गाल गाल गा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बकवास
बकवास
@ माधा बकवास अशी प्रतिक्रिया
@ माधा बकवास अशी प्रतिक्रिया देण्यापूर्वी तुमची प्रतिभादेखील सर्वांना दाखवून दिली तर बरे होईल.
निशिकांत जी सुरेख आहे गझल