चाळीतल्या गमती-जमती (१२)
आपण एखाद्या माणसाच्या सातत्याने संपर्कात येतो तस तस त्या व्यक्तीबद्दल आपल्याला इत्यंभू माहिती मिळत जाते.तर त्या आज्जींबद्दल मी सांगत होते ना (मराठी मध्ये म्हातारी हा पर्याय आहेच नावडत्या आजी साठी तो चपलख बसतो पण या शब्दाने आदर लगेच हद्दपार होतो ना)तर त्यांचे नाव इंदू आज्जी.त्यांच्या शेजारी राहून आम्हाला त्यांचा दिनक्रम माहीत होतं गेला.सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत काम काम आणि कामच करीत राहायच्या त्या आज्जी.या मध्ये काही निमित्ताने शिव्यांची लाखोली आहेच.रागाला यायला कोणतेही कारण पुरायचे त्यांना.अगदी पाणी पाच दहा मिनिटं उशिरा सुटलं की तिच्या तोंडाचा पट्टा सुरू..व्हय कौतुक कर्त्याती,,,पाणी उशिरा सोडताय व्हय भडव्यानो..कस माझ्या देवाला ताज पाणी मिळायच आणि कवा सार आवरून मी बाजारात जाणार ...तेगार कर्त्याती...होय त्यांच्या बा चा नळ असल्यासारखी वागत्याती...आम्हाला घरात बसून इतकं हासू यायच.की कितीही तोंड दाबून हासू रोखलं तर त्याचा स्फोट व्हायचा.मग या आवाजाने पुन्हा म्हातारी लगोलग आमच्या दारात येऊन..राजे य इकडं भाईर...कश्याच ग तुला हासू येतंय एवढ आ म्हणून मला डाफ्रायची.मी पण काही कच्या गुरूचा चेला नव्हते मी म्हणायचे मी नळाला हसतेय तुमचं काय जातंय.... मग धुमसत पुन्हा तो पाडा दहा दहा वेळा पाठांतर असल्यासारखा सुरू...व्हय...नळाला हसतेय मेली...
आता विचार करते तर या कजाग आणि भांडखोर म्हातारी मूळ मला लहानपणापासून आपत्ती व्यवस्थापनाचे बाळकडू मिळत गेले.माझ्या आयुष्यात आपत्ती घेऊन आलेल्या आणि इथूनही पुढे भविष्यात आपत्ती घेऊन येणाऱ्या एकाही व्यक्तीला इंदू आज्जीची सर येणार नाही असे माझे ठाम मत आहे
राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
११/०४/२०१८
हे पण छान लिहिलंय...
हे पण छान लिहिलंय...
धन्यवाद मेघा
धन्यवाद मेघा
मस्त चाललीये ही सिरीज.
मस्त चाललीये ही सिरीज.
धन्यवाद वंदनाजी
धन्यवाद वंदनाजी
राजेश्री तुम्हाला एक सुचवू का
राजेश्री तुम्हाला एक सुचवू का? प्रत्येक लेखाच्या शीर्षकामधे त्या लेखात काय आहे ह्याची झलक द्या, म्हणजे आवडलेला लेख परत शोधायला सोपे जाईल.
उदा. चाळीतील गमती जमती - इंदू आज्जींचा शेजार
छान चालू आहे हि गमतीजमतींची
छान चालू आहे हि गमतीजमतींची मालिका , तुमच्या चाळीतल्या लोकांशी हळूहळू संपर्क वाढतोय आमचा! पुलेशु
वंदनाजी तुमच्या सूचना अंमलात
वंदनाजी तुमच्या सूचना अंमलात आणेन मी नक्कीच
Thank you Poonam
Thank you Poonam
मी म्हणायचे मी नळाला हसतेय
मी म्हणायचे मी नळाला हसतेय तुमचं काय जातंय.... >>>
मस्तं!!!
माझ्या मामाच्या घरामागे पण
माझ्या मामाच्या घरामागे पण अशीच एक तोंडाळ आउ होती... जे तोंड सोडायची ना!!