पूर्वतयारी_उत्तरपूर्वीय_भारताची - २
"यार तू काही आता लवकर भेटणार नाहीस, चल ना भेटूयात तू टूरला जायच्या आधी... अगदी काकुळतीला आलेल्या शाळू मैत्रिणी!
(मनातल्या मनात) बरं फक्त आजची संध्याकाळ बाहेर, उद्या नक्की बॅग भरूया!
"हो, तुला मैत्रिणींसाठी बरा वेळ मिळतो, इतके दिवस चाललीएस तर आईला भेटायला यायला नको, तुझं अर्ध सामान तर या घरी पडलंय, ये गपचूप घरी." (मनातल्या मनात) बरं फक्त आजची संध्याकाळ बाहेर, उद्या नक्की बॅग भरूया!
"ऐक ना, तू खरंच निघतेयस टूरला?" - इति नवरोबा "आत्तापासूनच कसं तरी होतंय मला, खूप एकटेपणाच फिलिंग आलंय, माझ्याशी भांडणार कोण? माझे लाड कोण करणार? चल ना आजच्या दिवशी बाहेर जेवायला जाऊ आणि गप्पा मारू..." (मनातल्या मनात) बरं फक्त आजची संध्याकाळ बाहेर, उद्या नक्की बॅग भरूया!
"उद्यावर आलं जाणं तरी बॅग रिकामी 'आ' वासून उभी आहे!!
अशी असते 'शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघत' त्यात काय होईल बॅग भरून' म्हणणाऱ्या एक लेडी सोलो ट्रॅव्हलरची पूर्वतयारी! ।Hahaha
११ बज गये लेकिन बॅग भरनी बाकी है....
© स्मृती
#SoloTravel #NorthEastIndia #PackingandPreparations #LivetheFullest
लवकर टाका पुढचे भाग, उत्सुकता
लवकर टाका पुढचे भाग, उत्सुकता वाटते आहे