सिरिया अजून धुमसतोय... नाही नाही... अजून स्फोटक झालाय. तिथे काहीच विशेष नसलं तरी सगळे हेवी वेट्स त्याच्या भोवती आपल्या अहंकाराचं जाळं स्वतःच विणतायत आणि त्यात स्वतःच अजून गुरफटतायत. असो...
सिरियातील अस्साद राजवटीने आपल्याच जनतेवर दौमा येथे रासायनिक हल्ले केले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत अमेरिकेने सिरियाच्या विरोधात प्रस्ताव मांडला. नेहमीप्रमाणे रशियाने नकाराधिकाराचा वापर करून अमेरिकेचा प्रयत्न उधळला. ह्या वर्षात तब्बल ४ वेळा रशियाने सिरियाला नकाराधिकार वापरून वाचवलं आहे (एकूण १२ वेळा). ह्यावेळी मात्र अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स गप्प बसले नाहीत. त्यांनी सिरियासोबत चर्चा सुरू केली, जी सिरियावरील हल्ल्याची तयारीही असू शकते. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान ह्यांनी फ्रान्समधील संयुक्त पत्रकार परिषदेत, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सिरिया विरोधात कठोर व संघटीत कारवाई करावी असे मत व्यक्त केले. त्यामुळे मित्र देशांनी सिरियावर हल्ला चढवल्यास सौदीसोबत सौदीचे आखातातील यूएई, इजिप्त, कुवैत व बाहरीन हे पण सहभागी होवू शकतात. सिरियावरील हल्ल्याचे शक्यता वाढल्याचे दावे केले जात असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस ह्यांनी आपले नियोजित दौरे रद्द केले आहेत.
युरोपातील हवाई वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या युरोकंट्रोलने भूमध्य सागरावरून प्रवास करणाऱ्या विमानांना इशारा दिला आहे. पुढच्या काही तासांत सिरियावर हल्ले होवू शकतात. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी ह्यांनीही आपल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमांनांना सिरियन हवाई क्षेत्रात शिरण्याबद्दल इशारे दिले होते. त्यामुळे परवा फक्त एकाच विमानाने सिरिया व लेबेनॉनवरून प्रवास केला.
आता अमेरिका आली म्हणजे रशिया आलाच!! सिरियातल्या तार्तूस संरक्षणतळाजवळ आलेल्या यूएसएस डोनाल्ड कूक ह्या अमेरिकेच्या प्रगत विनाशिकेवरून रशियन लढाऊ विमानांनी घिरट्या घातल्या. ह्या विनाशिकेवर टॉमहॉक क्षेपणास्त्रे आहेत. हे वृत्त एका तुर्की वृत्तसंस्थेने दिले असले तरी पेंटॅगॉनने फेटाळले आहे. युद्धनौका बर्क क्लास गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहे व तार्तूसपासून फक्त १०० किमीवर आहे. अमेरिकेची युएसएस पोर्टर ही दुसरी विनाशिकासुद्धा सिरियाजवळ आली आहे. अर्थात पेंटॅगॉन सांगतंय की तुर्की चुकीचे वृत्त देत आहे.
त्यातच रशियन परराष्ट्र मंत्रालयाने आरोप केला आहे की अमेरिकेची स्मार्ट क्षेपणास्त्रे सिरियातील रासायनिक हल्ल्याचा तपास सुरू असताना डागली जाणार ती पुरावे नष्ट करण्यासाठीच का? त्या आधी अमेरिकेने आरोप केला होता की रासायनिक हल्ल्याला सिरियन राजवट व ह्या राजवटीच्या सहाय्याला असणारा रशिया जबाबदार आहे. रशियन राजदूत वॅसिली नेबेंझिया ह्यांनी निर्वाळा दिला की हा रासायनिक हल्ला सिरियाने केला नाही, उलट अमेरिकेनेच हे हल्ले केले आहेत. ह्या हल्ल्याचा तपास ऑर्गनायझेशन ऑफ प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स करणार आहे आणि त्या आधीच ह्या हल्ल्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी अमेरिकेची स्मार्ट क्षेपणास्त्रे प्रयत्न करणार आहेत. सिरियानेही आरोप नाकारले आहेत. अमेरिकेच्या ड्रोन्सना भरकटवण्यासाठी रशियाने सिरियाच्या भागात जॅमर्सही बसवल्याच्या खर्या/खोट्या बातम्या आहेत. ह्या जॅमर्समुळे ड्रोन्सना चुकीची माहिती मिळेल व युद्धासंबंधीचे आडाखे चुकू शकतील.
काही महिन्यांमध्ये सिरियाच्या अस्साद ह्यांनी रशिया, इराण आणि हिजबुल्लाहच्या जोरावर २०११ पासून गमावलेला भूभाग परत मिळवण्यास सुरुवात केल्यामुळे अमेरिका व इतर सहकारी देशांचे इरादे उधळले गेल्याचेही मानले जाते. सिरियातल्या संघर्षाच्या निमित्ताने इराण आपले आखातातील स्थान मजबूत करायच्या मागे आहे. आणि हीच बाब इस्रायल, सौदी अरेबियासह अमेरिकेलाही त्रासाची ठरणारी आहे.
दुसर्या बाजूला, अमेरिकेचे माजी उपसंरक्षणदल प्रमुख जनरल जॅक केन ह्यांनी दावा केला आहे की रशिया व इराण हे दोघेही आखातात वर्चस्व आणि सत्ता मिळवण्यासाठी ॲंबिशियस आहेत. त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर युद्धाचा भडका अटळ. जनरल केन ह्यांनी जॉर्ज बुश कारकिर्दीत इराक युद्धासाठी सल्लागार म्हणून काम केले होते. सिरियातील अस्साद राजवटीला हैराण करायचे असेल तर सिरियन वायुसेनेच्या ठिकाणांवर अचूक हल्ले चढवावे लागतील आणि आखातातील युद्धाला रशिया व इराण कारणीभूत असतील. इस्रायलचे लेबेनॉन व हिजबुल्लाह्बरोबर युद्ध पेटले तरी लेबेनॉन आडून इराण युद्धात उडी घेईलच. सोमवारी सिरियात इस्रायलने हवाई हल्ले चढवून लष्करी तळाला टारगेट केले तेव्हा ७ इराणी जवान ठार झाले होते. लगोलग इराणचे सर्वोच्च धर्मगुरू आयातुल्लाह खामेनी सिरियात दाखल झाले. इराणच्या कारवाईच्या शक्यतेमुळे इस्रायलने आधीच आपली लष्करी सिद्धता वाढवली आहे. इस्रायल सद्ध्या हाय ॲलर्टवर आहे. बेन्जामिन नेत्यान्याहूनी इस्रायलचा घात करणार्यां वर हल्ले चढवू असे इशारेही दिले आहेत.
सिरियावरून कधीही तिसर्या महायुद्धाची ठिणगी पडेल अशी परिस्थिती असताना रशियाच्या पुतिन ह्यांनी गेल्या काही दिवसांत काय केलं आहे? ----
- 'आमच्या क्षेपणास्त्रापासून जगातला कुठलाही देश सुरक्षित नाही आणि रशियावर अणुहल्ला झाल्यास रशिया सारे जग भस्मसात करेल' ही धमकी. ह्या धमक्या खर्या असल्याचे अमेरिका व ब्रिटनचे वरिष्ठ लष्करी अधिकारी सांगत आहेत.
- ब्रिटनमधल्या रशियन हेर सर्जेई स्क्रिपल ह्याच्यावरील विषप्रयोगानंतर ब्रिटन व अमेरिकेला दिलेली धमकी.
- एकीकडे अमेरिका, फ्रान्स व ब्रिटन सिरियावर हल्ला करण्याच्या तयारीत असताना आता पुतिन ह्यांनी "जागतीक पातळीवर अराजक माजले असताना विविध देशांतील संबंध विघातक झाले आहेत. तरीही शहाणपण टिकून राहील असा रशियाला विश्वास आहे. त्यामुळे रशिया जागतिक व क्षेत्रिय सुरक्षेसाठी काम करतच राहील" अशी कमेंट केली आहे.
- "अमेरिकेने सिरियावर क्षेपणास्त्रे टाकली तर रशिया ही क्षेपणास्त्रे भेदेलच. सिरियावरचा हल्ला म्हणजे आमच्यावरचाच हल्ला" अशी भूमिका.
- सिरियाला वाचवण्यासाठी रशिया जी पावले उचलेल ती आंतररााष्ट्रीय स्थैर्य व सुरक्षेसाठी आवश्यकच असतील. पण रशियाच्या हालचालींवर अमेरिका व मित्रराष्ट्रांनी कारवाई केली तर तो शहाणपणा नसेल कारण त्यानंतर भयानक घडामोडींची मालिकाच सुरू होईल. - हे विधान थंड वाटते पण तसे नाही. अत्यंत विनाशकारी संदेश आहे तो.
- अणुहल्ला झाल्यास स्वतःला सुरक्षित ठेवणारे न्यूक बंकर्स किंवा बॉम्ब शेल्टर्स कसे बनवायचे ह्याची माहिती रशियन टिव्हीवरून दिली जात आहे. सरकार संलग्न 'रोसिया-२४' ह्या वाहिनीने अणुहल्ला झाल्यास बंकरमध्ये लपलेल्यांनी काय काळजी घ्यावी, काय खावे प्यावे ह्याचीही माहिती प्रसारीत केली आहे.
ट्रम्प ह्यांनी सिरियावरील कारवाईची घोषणा केल्यावर अमेरिकेची युएसएस ट्रुमन ही विमानवाहू नौका ९० लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स घेवून भूमध्य समुद्राकडे निघाली. शिवाय टॉमहॉक मिसाईल्स असलेल्या युद्धनौका आहेतच. सिरियाचे अस्साद म्हणजे जनावर आहेत आणि पुढच्या काळात त्यांनाच टार्गेट केलं जाईल असं ट्रम्पनी बजावल्यावर रशियाने अस्साद ह्यांच्या रक्षणासाठी एस-४०० चे संरक्षक कडे (रिंग ऑफ स्टिल - रशियाची अभेद्य हवाई सुरक्षा यंत्रणा) तयार केल्याचं ब्रिटिश माध्यमं सांगत आहेत. रशियाने आधीच जॅमर्स बसवल्यामुळे अमेरिकेच्या रडारांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणार व अमेरिकेचे हवाई हल्ले रशियाकडून रोखले जातील.
अमेरिकेचे ड्रोन हल्ले रासायनिक हल्ल्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी असणार असा रशियाचा आरोप आणि सिरियातल्या दौमामधली रशियाची सैन्य तैनाती दौमामधील रासायनिक हल्ल्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी केली गेली आहे असा अमेरिकेचा आरोप. तब्बल ८० बळी गेलेल्या ह्या रासायनिक हल्ल्याच्या मुळाशी सिरियन लष्कर असल्याचा दावाही अमेरिका व मित्रदेश करत आहेत. नक्की कुणाचं पातक आहे हे?
http://www.bbc.com/news/world-middle-east-43747922
ट्रम्प ह्यांनी सिरियावरील हल्ला काही तासांत होईल म्हटलं तरी वेळ सांगितली नाही असा खुलासा ट्विटरवर केला आहे. आखात व युरोपिय देश अमेरिकेला अपेक्षित मदत करत नाहियेत का? कारण ट्रम्प ह्यांनीच म्हटलं आहे की आपल्या नेतृत्वाखालील अमेरिकन प्रशासनाने आयएसपासून ह्या क्षेत्राला वाचवले पण तरी कुणी अमेरिकेला थॅन्क्यू म्हटलेले नाही. हे सूचक आहे. जगभरात आयएस किंवा दाईश ह्या दहशतवादी संघटनेने इराक, सिरिया व इतर देशांमध्ये धुमाकूळ घातलेला असताना भयंकर नरसंहार घडवला होता. त्यामुळेच इराक व सिरियातून निर्वासितांचे लोंढे युरोपिय देशांमध्ये दाखल झाले होते. इराक व सिरियानंतर आखातातील इतर देशही आयएसच्या खिलाफतीशी जोडले जातील अशी घोषणा आयएसने केल्यामुळे आखातातील मुख्य देशांवर कमालीचे दडपण होते. ट्रम्प ह्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कठोर भूमिका घेतल्यामुळे आयएसची पीछेहाट झाली आणि धोका कमी झाला. पण ह्याच्या बदल्यात कुणीही थॅन्क्सहे म्हटले नाहीत.... म्हणजेच ती जाणीव ठेवून आखात व युरोपिय देशांकडून अपेक्षित सहकार्य नाही. तसे असल्यास ती कृतघ्नता ठरते व ह्यापुढे अमेरिका कुठलीही कारवाई कुणाचेही हित/सुरक्षा लक्षात घेवून करणार नाही असाही संदेश जातो.
ट्रम्प ह्यांनी सिरियावरील हल्ल्याची घोषणा केल्यावर अमेरिकेच्या आण्विक 'डूम्स डे प्लेन'ने बुधवारी इलिनॉईसमधून उड्डाण केले. हे प्लेन अणुयुद्धाच्या काळात कमांड सेंटर म्हणून वापरण्यात येते. अमेरिकेचे National Emergency Airborne Command Post म्हणून बोईंग ई-४बी नाईटवॉचचे उड्डाण म्हणजे सिरियावरील हल्ल्याची व महायुद्ध भडकण्याची शक्यता असेल असा दावा केला जातो आहे.
बघू काय होतं ते.
(वरील माहिती इंटरनेट, टिव्ही चॅनेल व वृत्तपत्रातून मिळाली आहे)
रशियन नेते व संरक्षणदलांतील
रशियन नेते व संरक्षणदलांतील आजी/माजी अधिकारी कालच्या हल्ल्यांबाबत तुफान टिकास्त्र सोडत आहेत. रशियाच्या माजी नौदल प्रमुखांनी तर म्हटलं की अमेरिकन विनाशिकेवर टोर्पॅडो सोडू. रशियन नौदलाला कशाचीही भीती नाही आणि अगदी वेगळ्या जगात वावरणार्या अमेरिकेला रशियाशी युद्ध छेडणे महागात पडेल. सिरियाजवळ असलेली युएसएस कुक बुडवायची पण गरज नाही. टोर्पॅडो तिचे पुरेपूर नुकसान करू शकतं. रशियाचे माजी लष्करप्रमुख बुझिन्स्की ह्यांनी रशिया सिरिया हल्ल्यामागे असलेल्या ब्रिटनचा सायप्रसमधला तळ उद्ध्वस्त करू शकतो असा इशारा दिला आहे. इराण व चीननेही सिरियावरील हल्ल्याला विरोध केला आहे.
Surprisingly, इस्रायल, जपान ऑस्ट्रेलिया सोबत तुर्कीनेही सिरियावरच्या हल्ल्याचे स्वागत केले. आतापर्यंत तुर्की सिरियाबद्दलच्या संघर्षात अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेत होता. पण आता "दौमातील रासायनिक हल्ला म्हणजे मानवतेवरील हल्ला होता. त्याची तुर्कीने आधीच कठोर शब्दांत निर्भत्सना केली असून कालचे हल्ले अस्साद राजवटीसाठी सडेतोड उत्तर होते" असे तुर्की परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
रशिया शांत राहिला याबद्दल
रशिया शांत राहिला याबद्दल देवाचे पाय धरावे, अजून काय?
अरे तो असाद माणुस आहे का?
अरे तो असाद माणुस आहे का? स्वत: च्याच लोकान्ना का मारतो आहे? सत्ता टिकवणे, खुर्चिला चिकटणे समजतो... पण शेकडो हजार स्वत: चीच माणसे का मारतो आहे?
ट्रम्पला लक्ष घरगुती प्रश्नावरुन लोकान्चे लक्ष दुसरीकडे वेधायचे आहे. आणि पुन्हा रशिया मदतीला धावला. रासायनिक हल्ला केवळ निमीत्त (हे कारणही रशियाने तयार केले असेल) आहे असे तर नाही ?
<<<इथे मला इराक आठवला. Mass
<<<इथे मला इराक आठवला. Mass destruction weapons नष्ट करणे हे कारण अमेरिकेने इराकवरील हल्ल्यांसाठी दिले होते. कुठे आहेत ती शस्त्रे कुणास ठाऊक!.>>>
हे नुसते सांगण्याचे कारण होते.
https://www.youtube.com/watch?v=nUCwCgthp_E हे वाचा. न दिसल्यास 7 countries in 5 years हे गूगल करून पहा.
काही लोक - चेनी, रम्सफेल्ड,वुल्फोवित्झ यांनी एक प्रकारे Policy coup करून, म्हणजे गुप्तपणे खलबते करून ठरवले की लवकरात लवकर इराक, सिरिया, लेबॅनन, लिबिया, सोमालिया, सुदान व शेवटी इराण ही राष्ट्रे अमेरिकेच्या अंकित करून घ्यायची. ही गोष्ट सर्व काँग्रेसमेन, आणि नंतर राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांना पण कळवले नाही. २००१ साली ९/११ झाले, रम्स्फेल्ड , छेनि वगैरेंच्या हाती सत्ता आलीच होती, आता संधि पण मिळाली. लगेच हुकुम काढला - इराकवर हल्ला करा! जनरल्स ना माहित नव्हते का? पण हुकुम म्हणजे हुकुम.
या सगळ्याचा पूर्ण पचका झाला नि होत आहे.
आता काय, वादळात सापडलेल्या बोटी प्रमाणे अमेरिका हेलकावे खात आहे. काय बोलणार?
वेस्लि क्लार्क चे "Don't Wait for the Next War" हे भाषण गूगल करून बघा.
असे हल्ले अनेकदा झालेले आहेत.
असे हल्ले अनेकदा झालेले आहेत. होत असतात. मर्यादित हल्ला होता. महायुद्धाची वगैरे होण्याची शक्यता धूसर होती. सध्याच्या काळात ती तशीही कमीच आहे. मित्र राष्ट्रांनी सद्दामच्या इराकवर हल्ला केला तेंव्हा तर याहून भयंकर परिस्थिती होती. नव्वदच्या आसपासचा काळ असेल. जॉर्ज बुश यांच्या अंतिम आवाहनाला सद्दामने जुमानले नव्हते. तेंव्हा जगातल्या सर्व नेत्यांच्या पुंगळ्या टाईट झाल्या होत्या. तिसरे महायुद्ध अटळ आहे असे अंदाज भल्याभल्यांनी बांधले होते. पण सुदैवाने तसे काही झाले नाही. आताच्या काळात तर डेवलपमेंट इतकी झाली आहे कि युद्ध हे कोणत्याच राष्ट्राला परवडणारे नाही अशी स्थिती आहे (अर्थात त्या राष्ट्राचे नेतृत्व समंजस शहाणे व शिकलेले हवे)
युद्धात शस्त्रास्त्रे बनवणाऱ्या कंपन्याना फायदा होतो आणि अमेरिकेत या कंपन्यांची फार प्रभावी लॉबी आहे. म्हणूनच तिथे गोळीबाराच्या इतक्या घटना होऊन सुद्धा तिथे बंदूक वापरावर कोणी नियंत्रण आणू शकलेले नाही. अफगाणिस्तान पासून लिबिया पर्यंत अनेक देशांना त्यांनी शस्त्रे पुरवली आहेत व युद्धे घडवून आणली आहेत. पण सध्या अनेक राष्ट्रे (भारता सहित) डेव्हलपमेंटच्या मार्गावर आहेत. युद्धाची मानसिकता कमी होत आहे. त्यामुळे शस्त्रलॉबीसाठी आजकाल युद्धे घडवणे पूर्वीइतके सोपे राहिलेले नाही. टीव्हीवर केवळ एकच ते कोणतेतरी च्यानेल (बहुतेक न्यूज १८ असे काहीतरी) आणि इथे तुमचा हा धागा, या दोनच जागी "तिसरे महायुद्ध सुरु" अशा प्रकारची हाकाटी सुरु होती. अन्य कोणीही या हल्ल्याने उगाचच प्यानिक झालेले नाही. अनेकांनी दखल पण घेतलेली नाही.
"अरे तो असाद माणुस आहे का? स्वत: च्याच लोकान्ना का मारतो आहे?"
>>> कोणत्याही मुद्द्यावर (धर्म, प्रांत वगैरे) विभाजनाची भाषा करणारे लोक सत्तेत आले कि हे व्हायला वेळ लागत नाही. जस्ट म्याटर ऑफ टाईम. सत्तेत राहण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. सर्वसामान्य येड्या जनतेला इतर प्रांत/धर्म याविरोधात घाबरवायचे, थापा मारायच्या, जाहिरातबाजी करायची, रेडिओवर भाषणे देत राहायचे, आपल्या झुंडी बनवायच्या व येनकेन प्रकारे सत्तेत राहायचे. आणि कोणी विरोध करू लागले कि आपल्या झुंडी वापरून त्यांची कत्तल करायची असे हे भयंकर गणित आहे. हिटलर पासून पॉल पॉट पर्यंत सर्वांनी हेच केले. आजकाल चीन अमेरिका रशिया सारख्या महासत्ता अशा देशांची वाटच पाहत असतात. आणि एखाद्या देशात अशा झुंडी दिसल्या कि तिथे येऊन त्यांची शस्त्र लॉबी हत्यारवाटपाचे काम करते. एक महासत्ता एका झुंडीला आणि दुसरी दुसऱ्या झुंडीला हत्यारे देते. आणि यादवी होऊन महासंहार होऊन अखेर तो देश त्यांच्या वळचणीला जाऊन बसतो.
युद्धात शस्त्रास्त्रे
युद्धात शस्त्रास्त्रे बनवणाऱ्या कंपन्याना फायदा होतो आणि अमेरिकेत या कंपन्यांची फार प्रभावी लॉबी आहे. >> +१
आपण त्या वेळी BBC वगैरे पाहिलं नाही का?
गेलं वर्षंभर लोकसत्तेत रवि
गेलं वर्षंभर लोकसत्तेत रवि आमले यांची 'प्रचारभान' ही लेखमाला येत होती. अगदी पहिल्या महायुद्धापासून एखाद्या देशाविरोधात आणि युद्धाच्या बाजूने जनमत तयार करायला कशा प्रचारयंत्रणा कशी वापरली जाते ते त्यांनी लिहिलं होतं.
सीरियाबद्दलच्या बातम्या नियमितपणे आणि खोलात जाऊन वाचलेल्या नाहीत. पण इथेही असंच काही असू शकेल , असंही वाटत होतं. सद्दाम हुसेन अजून विसरला गेला नाहीए. आपण पोस्ट ट्रुथ युगात जगतो आहोतच.
आजच्या इंडियम एक्स्प्रेसमध्ये सी.उदय भास्कर यांचा हा लेख आलाय.
त्यातून Orchestration appears to be the more visible leitmotif of the attack on Syria. Moscow has alleged that a British NGO, White Helmets, had staged a fake chemical weapon attack in the Syrian town of Douma on April 7 and that this was used as a pretext for the coordinated US-UK-France action. It is believed, in many quarters, that the intervention in Syria is a diversionary tactic by the leaders of these three nations to divert attention from domestic political discord and citizen dissatisfaction and a loyal TV campaign would shape national sentiment accordingly. The script has been followed, by and large. For a brief period, Russian TV warned of an impending third World War and provided a quick tutorial on how to access bomb shelters, in the event of the military escalation that was being hinted at — but not explicitly stated by Moscow.
गेल्या आठवड्यातल्या सिरिया
गेल्या आठवड्यातल्या सिरिया हल्ल्यानंतर ऑफिसमध्ये सहज बोलताना म्हटलं होतं की अमेरिकेला अफाट खर्च येत असेल अगदी छोट्या हल्ल्यांसाठीसुद्धा. कसा आणि का करत असतील? एकेक मिसाईलसुद्धा किती खर्चाचं असेल, इतके सैनिक दूर देशात ठेवायचे म्हणजे त्यांचा खर्चही खूप.
आज नेमकं वाचनात आलं की सिरियासाठीचा अमेरिकन सैन्याचा मुक्काम वाढत असून खर्चही प्रचंड येत असल्याने ट्रम्पनी आवाहन केले आहे की सिरियाची जबाबदारी अरबांनी स्वीकारावी. त्यांनी संयुक्त लष्कर तैनात करावं आणि निधीही उभारावा.
म्हणजे अमेरिकेचं सिरियाबद्दलचं धोरण बदलतंय का? ह्या नव्या धोरणाच्या शक्याशक्यतेवर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन काम करत आहेत. त्यांनी सौदी, यूएई, कतार व इजिप्तशी चर्चाही सुरू केली आहे. Actually, गेल्याच आठवड्यात ट्रम्पनी सैन्यमाघारीचे संकेत दिले होते पण फ्रान्सच्या मॅक्रॉननी सिरियात सैन्य तैनाती आवश्यक असल्याचे सांगून ट्रम्प ह्यांचे मन वळवले होते.
ट्रम्प ह्यांच्या नव्या भूमिकेला सहमती म्हणून सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान ह्यांनी सिरियाबाबत व्यापक भूमिका स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यामुळे कदाचित सिरियात अरबांचे संयुक्त लष्कर भाकर्या भाजत बसेल आणि अमेरिकी परत जातील. मागच्या वेळेस ओबामांनी इराकमधून सैन्य मागे घेतल्यावर आयएस उदयाला आली होती. तसेच परत सिरियामध्ये आयएस जोर धरू नये म्हणून ही योजना.
बाकी इस्रायल सिरियात दमास्कस
बाकी इस्रायल सिरियात दमास्कस वगैरेवर अधूनमधून मिसाईल डागतंच आहे. त्यांचा रोख इराणच्या सिरियातील तळांवर आहे. सद्ध्या लेबेनॉनच्या हद्दीतून मिसाईल सोडली जातायत पण इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी सिरियाच्या हवाई हद्दीत घुसूनही हल्ले करावे लागले तरी परवानगी दिली आहे. त्यांचा रशियाबद्दल आकस नाही, पण इराणच्या शस्त्रास्त्रांची सिरियातील तैनाती इस्रायली खपवून घेणार नाहीत असा इशारा इस्रायली संरक्षणमंत्री लिबरमन ह्यांनी दिला आहे. इराणी नेत्यांनी तर तेल अविव व हैफा शहरांवर हल्ले करून उध्वस्त करू अशा धमक्या दिल्या आहेत.
आधी इराण व इस्रायल हिजबुल्ला वगैरेंच्या थ्रू भांडत होते पण आता इराण डायरेक्ट इस्रायलवर हल्ला करायच्या तयारीत आहे. फेब्रुवारीत इराणी ड्रोन्सनी इस्रायली सीमाही ओलांडल्या होत्या.
इराणचे एक 'कुद्स फोर्स' (नीट उच्चार माहित नाही) नावाचे पथक सिरियात आहे. ते मेजर जनरल कासिम सुलेमानी ह्यांच्या
नेतृत्वाखाली काम करत आहे. इराक व आता सिरियामध्ये इराणच्या बाजूने ज्या सत्ता आहेत त्यांना वाचवण्यासाठी हे अतीशय कणखर सेनानी
म्हणून ओळखले जातात. http://www.mei.edu/content/io/iran-s-quds-force-officers-limelight
इस्रायली माध्यमं इराण लवकरच उत्तरेकडून इस्रायलवर हल्ले सुरू करेल असे दावे करतायत.
सिरियाच्या दक्षिण सीमेला
सिरियाच्या दक्षिण सीमेला लागून असलेल्या जॉर्डनमध्ये राजधानी अम्मानजवळ जॉर्डन व अमेरिकेचा एकत्र युद्धसराव 'इगल लायन' चालून आहे. महत्वाचं म्हणजे ह्यात इतर गोष्टींबरोबरच रासायनिक युद्धाला तोंड देण्यासाठी मोबाईल लॅबोरेटरी टीमही आहे.
ट्रम्प ह्यांच्या नव्या
ट्रम्प ह्यांच्या नव्या भूमिकेला सहमती म्हणून सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान ह्यांनी सिरियाबाबत व्यापक भूमिका स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यामुळे कदाचित सिरियात अरबांचे संयुक्त लष्कर भाकर्या भाजत बसेल आणि अमेरिकी परत जातील. मागच्या वेळेस ओबामांनी इराकमधून सैन्य मागे घेतल्यावर आयएस उदयाला आली होती. तसेच परत सिरियामध्ये आयएस जोर धरू नये म्हणून ही योजना.
Submitted by अश्विनी के on 18 April, 2018 - 13:21 >>>>
ह्याच्या पुढे घडामोडी सुरू होण्याचे लक्षण आहे. ट्रम्प ह्यांनी जे सूतोवाच केले होते त्याला बळकटी देणारे वृत्त म्हणजे सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी कतारला इशारा-कम-सूचना-कम-धमकी दिली आहे की सिरियातील अमेरिकेच्या सैन्यतैनातीच्या खर्चाचा भार कतारने उचलावा व सिरियातील संघर्षासाठी कतारने आपले लष्कर रवाना करावे. कतारने आपला वाटा उचलला नाही तर अमेरिका कतारमधील आपले लष्कर मागे बोलावून घेईल आणि मग कतारची राजवट उलथायला वेळ लागणार नाही.
आखातातले काही देश तेलामुळे अतीश्रीमंत आहेत आणि ह्या देशांची सुरक्षा अमेरिकेने पुरवलेल्या संरक्षणामुळे अबाधित आहे. ह्याचीच किंमत ह्या देशांनी चुकती करावी अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. (खरंच, ह्या अमेरिका किंवा इतर राष्ट्रांच्या छत्राखाली आपल्या देशाची सुरक्षा कधी देवू नये. त्यापेक्षा आपले बजेट हळूहळू वाढवत त्यातून शस्त्रास्त्रं, अत्याधुनिक संरक्षण साहित्य जमवत स्वतःच स्वसंरक्षणाची क्षमता राखणं बरं. हे असं मग आपल्याला मान्य नसलेल्या मार्गानेही परतफेड करावी लागते).
कतारमध्ये राजधानी दोहाच्या जवळच अल-उदैद येथे अमेरिकेचा जगातील सगळ्यात मोठा लष्करी तळ आहे. तिथे अमेरिकेचे जवळ जवळ १० हजार सैनिक, लढाऊ/बॉम्बर्/टेहळणी विमानं आहेत. सिरिया, इराक वगैरे ठिकाणच्या लष्करी मोहिमांसाठी ह्या तळाचा वापर होतो. त्यामुळे कतार अमेरिकेचा मित्र मानला जातो. पण आता वरच्या एका पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे अमेरिकेला खर्च व इतर इन्वोल्वमेंटच्या दृष्टीने हे लोढणं आखाती देशांच्या गळ्यात टाकायचे आहे.
GDP चा विचार केला तर आखातात सर्वात श्रीमंत देश कतार आहे. त्यानंतर कुवैत, यूएई, सौदी, बाहरिन वगैरे. सगळ्यात गरीब आणि त्रस्त देश म्हणजे येमेन, त्यापेक्षा बरा सिरिया आणि त्यापेक्षा बरा इराक. युद्धांनी कंबरडं मोडलं बिचार्यांचं. https://www.worldatlas.com/articles/the-richest-and-poorest-economies-in...
तर, अशी श्रीमंती असूनही कतारने सिरियामध्ये महत्वाची भूमिका घेतली नाही. हे उकसवणं झाल्यावर कतारने अत्यंत सावधपणे सिरियाचा प्रश्न चर्चेतून सोडवण्याचे आवाहन केले आहे.. त्यासोबत सिरियातील मानवतावादी सहाय्यासाठी कतार आर्थिक मदत करेल अशी घोषणा कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे. मतलब, कतार तटस्थ राहणार. सौदी अरेबिया, यूएई, बाहरिन व इजिप्तने ह्या आधी दहशतवादाला सहाय्य करत असल्याचा आरोप करून कतारची कोंडी केली होती तेव्हा कतारला जीवनावश्यक वस्तू पुरवून इराण आणि तुर्कीने सहाय्य केले होते. हे सहाय्य करणार्या देशांच्या विरोधात आणि अमेरिका/सौदीच्या बाजूने सिरियात कतार उतरेल का? नाही उतरला तर भविष्यात अमेरिका कतारचं काय करेल? अमेरिका जे म्हणेल त्याची री सौदी व इतर आखाती देश ओढतीलच असे सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या इशार्यातून वाटतंय.
इस्रायली माध्यमं इराण लवकरच
इस्रायली माध्यमं इराण लवकरच उत्तरेकडून इस्रायलवर हल्ले सुरू करेल असे दावे करतायत.
Submitted by अश्विनी के on 18 April, 2018 - 13:39 >>> इथून पुढे....
इस्रायलने परवा परत सिरियातल्या हमस व अलेप्पो मधल्या इराणच्या लष्करी तळावर हवाई हल्ला केला.
https://www.jpost.com/Middle-East/Report-US-officials-say-Israel-prepari...
त्यानंतर इराणकडून प्रतिहल्ल्या होण्याची दाट शक्यता असल्याने इस्रायलने सिरियालगतची हवाई सीमा बंद केली असल्याचे व मे अखेरीपर्यंत ह्या हद्दीतून प्रवासी विमानांना परवानगी देणार नसल्याचे इस्रायली लोकल मिडिया सांगतंय. इस्रायलच्या सरकारी यंत्रणांनी ह्याबद्दल काही जाहिर केलेले नाही.
त्यातच आता इस्रायली पंतप्रधानांनी इराणच्या अण्वस्त्र सज्जतेबद्दलचे व अण्वस्त्र निर्मितीचे पुरावे जाहिर करून इराण जगाची फसवणूक करतो आहे असा आरोप केला. अक्षरशः लाखभर फिजिकल्/इलेक्ट्रोनिक कागदपत्र ठेवलेल्या फाईल्स, इराणच्या गोपनीय अणुकार्यक्रमाचे फोटो, डीव्हीडी वगैरे मांडले. काही वर्षांपुर्वीच इराणने आपल्या अणुकार्यक्रमाचे पुरावे एका कोठारातील मोठाल्या तिजोर्या मध्ये लपवले होते. ही माहिती इराणच्या खास अधिकार्यांव्यतिरिक्त कुणालाही नसली तरी इराणच्या नकळत इराणच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून असलेल्या इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेला ह्या ठिकाणांची व कागदपत्रांची माहिती होती. इराणच्या अमाद प्रोजेक्टमध्ये 'डिझाईन, प्रोड्यूस अँड टेस्ट फाईव्ह वॉरहेड्स' ह्या नावाखाली इराणने १० हजार टन स्फोटकांनी सज्ज असलेल्या अणुबाँबची निर्मिती करायची तयारी केली आहे. ह्यापैकी एका बाँबची क्षमता हिरोशिमावर टाकल्या गेलेल्या बाँब एवढी असल्याचे त्यांनी सांगितले. तेल अविवहून त्यांची ही पत्रकार परिषद लाईव्ह दाखवली गेली. पाश्चिमात्यांबरोबर जो अणुकरार झाला त्याच्या आधी आणि नंतरही इराणच्या अणु उद्योगात काहिही फरक पडलेला नाही, उलट अजून जोमाने अण्वस्त्रनिर्मिती सुरू असल्याचे नेत्यान्याहू म्हणाले.
http://mfa.gov.il/MFA/PressRoom/2018/Pages/PM-Netanyahu-presents-conclus...
नेत्यान्याहूंनी ह्याबाबत पुतिन ह्यांच्याशीही चर्चा केली आणि पुराव्यांचे डिटेल्स फ्रान्स व जर्मनीला पाठवणार.
इराणच्या अणुकराराची मुदत लवकरच संपते आहे. ह्यापुराव्यांमुळे करारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आणि जर अमेरिकेने अणुकरारातून माघार घेतली तर इराणकडे असलेल्या अतिप्रगत तंत्रध्न्यानाने उच्च संवर्धित युरेनियम मिळवेल अशी धमकी इराणच्या अणुकार्यक्रमाचे मुख्य अली अकबर सालेही ह्यांनी दिली आहे. ह्या आधीसुद्धा इराणने ४८ तासांत २०% युरेनियम संवर्धित करण्याचे जाहिर करून इराण वेगाने अणुबाँब तयार करू शकतो असे दर्शवले होते.
नेत्यान्याहूंनी जे पुरावे जाहिर केले त्याला अर्थातच इराणने खोटारडेपणा म्हटला आहे. अमेरिकेच्या मित्रदेशांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग नि:पक्षपाती आहे व ह्या आरोपांमुळे इराणवर दोष ठेवता येणार नाही असे युरोपिय महासंघ म्हणतोय. ब्रिटननेही अणुकराराचं समर्थन केलं आहे. जर्मनी आरोपांची चौकशी करून निर्णय घेणार आहे.
अमेरिकेचं nuclear deal
अमेरिकेचं nuclear deal फिसकटलं. Now keep your fingers crossed...
सिरिया आणि इस्रायलच्या बाबतीत आधीच ठिणगी पडायच्या बेतात असलेला इराण आता काय करेल? ह्या फिसकटू घातलेल्या nuclear deal बद्दल लिहायचं गेले काही दिवस मुद्दाम टाळलं होतं कारण वाटलं होतं इतक्या तडकाफडकी काही होणार नाही. नुसत्याच दोन्ही बाजूंनी याव करू आणि त्याव करू म्हणून धमक्या असतील. पण नाही, एक पाऊल पुढे पडलंय.
भारतावर विविध प्रकारे होवू शकणारा परिणाम -
Donald Trump's Pullout From Iran Nuclear Deal A Bump For India
https://www.ndtv.com/india-news/donald-trumps-pullout-from-iran-nuclear-...
अमेरिकेने nuclear deal dump
https://www.independent.co.uk/news/world/middle-east/israel-iran-war-lat...
अमेरिकेने nuclear deal dump केल्यावर काही तासांत इराणने सिरियामधून इस्रायलच्या गोलान टेकड्यांजवळच्या सीमेवर क्षेपणास्त्रे व रॉकेट्सचे हल्ले चढवले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने खवळून जाऊन आपल्या २८ लढाऊ विमानांमधून सिरियातल्या इराणच्या तळांवर ६० पेक्षा जास्त क्षेपणात्रे डागली आणि इराणच्या सिरियातील लष्करी पायाभूत सुविधा नष्ट केल्या. अणुकरार फिस्कटल्याबरोबर गोलान सीमेवर इस्रायलने सगळी सज्जता ठेवली होती आणि बॉम्ब शेल्टर्स तयारे ठेवले होते. As expected बुधवारी इराणने हल्ले सुरू केले. हे हल्ले कुद्स फोर्स quote (इराणचे एक 'कुद्स फोर्स' (नीट उच्चार माहित नाही) नावाचे पथक सिरियात आहे. ते मेजर जनरल कासिम सुलेमानी ह्यांच्या
नेतृत्वाखाली काम करत आहे. इराक व आता सिरियामध्ये इराणच्या बाजूने ज्या सत्ता आहेत त्यांना वाचवण्यासाठी हे अतीशय कणखर सेनानी
म्हणून ओळखले जातात. http://www.mei.edu/content/io/iran-s-quds-force-officers-limelight
इस्रायली माध्यमं इराण लवकरच उत्तरेकडून इस्रायलवर हल्ले सुरू करेल असे दावे करतायत.
Submitted by अश्विनी के on 18 April, 2018 - 13व) unquote ने कासिम सुलेमानींच्या आदेशावरून झाल्याचा दावा इस्रायली लेफ्टनंट कर्नल (इस्रायली संरक्षण दलाचे प्रवक्ते) कॉनक्रिअस ह्यांनी केला आहे. हा इराणने इस्रायलवर केलेला पहिलाच हल्ला.
लागलीच इस्रायलची एफ-१५ व एफ-१६ ही विमाने सिरियात पाठवली आणि ती सिरियातील दमास्कस जवळच्या मेझेह व मेतूला इथे असलेल्या इराणच्या लष्करी तळांवर भयानक हल्ले चढवून आली. तुम्ही आमच्यावर वर्षाव केलात तर तुमच्यावर वादळी प्रपात कोसळवू हे स्पष्ट केले आहे आणि हे प्रकरण इथे संपलंय व सगळ्यांना योग्य ती समज मिळाली असावी अश्या शब्दांत इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी इस्रायलची भूमिका मांडली.
सिरियन मिडियाने मात्र इस्रायलच्या क्षेपणास्त्रांपैकी निम्मी सिरियाच्या हवाई यंत्रणेने भेदली असा दावा केला आहे. रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इस्रायल व इराणमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी केली आहे. इराणने तर सिरियात आपलं लष्करी तळ किंवा सैन्य वगैरे काहीच नाही असं म्हटलंय.
Meanwhile, अमेरिकेने इराणबरोबरील अणुकरारातून माघार घेतल्या घेतल्या रशियाचे पुतिन ह्यांना भेटल्यावर इस्रायलच्या नेत्यान्याहूंनी म्हटलंय की इस्रायल आत्मपरिक्षण करत असताना, इस्रायली लष्कर सिरियात कारवाई करत असताना रशिया त्यात हस्तक्षेप करणार नाही व समन्वय साधून असेल अशी आशा आहे. ह्यावरून, सिरियात इराणच्या तळांवर हल्ले करताना आधी इस्रायलने रशियाला विश्वासात घेतले होते ह्या विश्लेषकांच्या दाव्याला अर्थ प्राप्त होतो. कारण ह्या भेटीच्या काही तासांतच इस्रायलने इराणच्या तळांवर ६०+ क्षेपणास्त्रे डागली.
मतलब, रशिया सिरियन राजवटीचे समर्थन करत असला तरी सिरियातल्या इराणच्या सगळ्या कारवायांना रशियाचा पाठिंबा आहे असं नाही.
अमेरिकेने न्युक्लिअर डील
अमेरिकेने न्युक्लिअर डील बरखास्त केल्यावर इराणच्या रोहानींनी इराणच्या अणुऊर्जेशी निगडीत यंत्रणांना युरेनियमचे जोरदार संवर्धन करण्याचे आदेश दिले आहेत. आणि इराणकडे अण्वस्त्र आली तर सौदी अरेबियाही मागे राहाणार नाही, तो ही अणुबॉम्ब तयार करेल असा इशारा सौदीने दिला आहे. आता सौदी कुठल्याही थराला जाऊ शकतो. सौदीने अमेरिकेबरोबर अणुकरारासाठी चर्चाही सुरू केली आहे. सौदीत अणुप्रकल्प उभारण्यासाठी इतर राष्ट्रांनी निविदाही सादर केल्या गेल्या आहेत. अगदी रशिया व चीनही ह्यात भाग घ्यायला उत्सूक आहेत पण सौदीने त्यांना hold वर ठेवलंय.
सिरियामधल्या इराणच्या तळांवर
सिरियामधल्या इराणच्या तळांवर इस्रायलकडून होणार्या सततच्या हल्ल्यांच्या तडाख्यांमुळे इराणने नमते घेवून इस्रायलपुढे चर्चेचा प्रस्ताव मांडला आणि जॉर्डनची राजधानी अम्मान येथे इराणचे राजदूत मुस्ताफ मोसलेह्जादेह व इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोस्सादच्या अधिकार्यांमध्ये चर्चाही पार पडली आहे. ह्यात जॉर्डनने मध्यस्थाची भूमिका पार पाडली आहे. ह्यात खालील प्रस्ताव मान्य झाले ---
- दक्षिण सिरियातील इस्रायल-जॉर्डन सीमेवरील दारा व कुनित्रा ह्या भागातील संघर्षात इराण व इस्रायल सहभागी होणार नाहीत.
- इराणचे लष्कर, हिजबुल्लाह व समर्थक संघटना सिरियन लष्कराच्या मोहिमेत सामील होणार नाहीत.
- इस्रायल जॉर्डन-इस्रायल सीमा व गोलान टेकड्यांमध्ये सिरियन लष्कर व बंडखोरांमधल्या संघर्षात मध्ये पडणार नाही.
- जॉर्डन आपल्या सीमेतून सिरियात बंडखोर घुसू देणार नाहीत.
ह्या आधी इराणने इस्रायलच्या तेल अवीव व इतर शहरांवर हल्ले करून उध्वस्त करू अश्या धमक्या दिल्या होत्या.
सिरिया एखाद्या ब्लॅक होलसारखा झाला आहे. त्याच्या निमित्ताने अनेक राष्ट्रं विविध प्रकारच्या संघर्षात खेचली गेली, अनेकांची जुनी दुखणी वर आली, शत्रूचा शत्रू तो मित्र झाला, कुणी एकमेकांचे अर्धे शत्रू व त्याच वेळेला अर्धे मित्र झाले. कायच्याकाय चालू झालं एकाच वेळी.
मध्येच इस्रायल रशियाला आपल्या बाजूला वळवायला बघतोय व काही अंशी त्यांना यशही येतंय. पण मग अमेरिकेच्या शेपटावर पाय पडणार. तिकडून धुसफुस सुरु होणार. रशियाच्या संपर्कात कुठलाही देश जास्त येतोय हे लक्षात आलं की अमेरिका डायरेक्ट सँक्शनच उगारते. आपल्यालाही धमक्या मिळू लागल्या आहेत रशियाबरोबर शस्त्रास्त्रं, मिसाईलं व इतर यंत्रणा खरेदी करण्याच्या वाटाघाटी चालू असल्यामुळे.
पुर्वी इराणशी संबंध न तोडल्यामुळे काही प्रमाणात सँक्शन आपल्यावर थोडे दिवसांपुरते घातले होते. आताही व्यवहार करू नका म्हणून इशारे येत आहेत. नाही विचारत आम्ही तुमच्या सँक्शन्सना, आम्ही फक्त संयुक्त राष्ट्रसंघाने घातलेले सँक्शन पाळतो
Pages