Submitted by सुप्रिया जाधव. on 31 March, 2018 - 01:48
तरही....
नको ती मागणी करतोस... तू पण ना !
उन्हाला सावली म्हणतोस... तू पण ना !!
तिला डोळ्यांमधे ह्या शोधतो माझ्या
फसवतो आणखी फसतोस.... तू पण ना ?
नको ते नेमके करतोस हट्टाने
हवे त्याची हमी भरतोस... तू पण ना !
ज़िच्यासाठी उगवतो नित्य-नेमाने
तिच्यावाचून मावळतोस... तू पण ना !
लपेटुन भाव, वाढ़वतोस तू गुंता
दिल्यागत ढील भासवतोस... तू पण ना !
कशाला चौकश्या करतोस रस्त्यांच्या ?
उभ्या जागी उभा असतोस... तू पण ना !
कशाने थांबली भुणभूण भुंग्याची ?
मिठी पडताच विरघळतोस... तू पण ना ?
किती सावधगिरीने बोलतो आपण !
दुधाने पोळला दिसतोस.... तू पण ना ?
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती सावधगिरीने बोलतो आपण !
किती सावधगिरीने बोलतो आपण !
दुधाने पोळला दिसतोस.... तू पण ना ? ....सहीच !