Submitted by सुप्रिया जाधव. on 30 March, 2018 - 05:11
सांगा कोणी असा कसा तो
शर्यतीतला जणू ससा तो !
असा दाहतो मनास माझ्या
वैशाखातिल सूर्य जसा तो !
धागा-धागा जोडत जाते
उसवत जातो भसा-भसा तो !
उमटत जातो धुरकट होतो
ह्रदयावरचा गूढ ठसा तो !
धमन्यातिल रक्तातुन वाहे
पुलकित करतो नसा-नसा तो !
त्याला पाहुन विचार येतो
'अवघड घ्यावा कुणी वसा तो !'
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा