पाँझी स्किम, बॅजर गेम, स्पॅनिश प्रिझनर, नायजेरिअन स्कॅम ते चेन मार्केटिंग आणि भविष्यकथन अशी अनेकविध नावं विविध ठिकाणी आपल्या कानावर पडत असतात. हॉलिवुडने तर कॉन आर्टिस्टना (कॉन्फिडन्स आर्टिस्ट) टोटल रोमॅंटिसाईझ केलंय. या वेगवेगळ्या क्लुप्त्या नक्की आहेत काय आणि त्यात आपण कसे फसवले जातो याची लिस्ट करायचा प्रयत्न करतोय.
ही सगळी माहिती पब्लिक डोमेन मधूनच शोधून लिहिली आहे. ही फसवणूक करण्यासाठी लिहिलेली कृती नसून मला याविषयावर माहिती एकत्र करावीशी वाटली म्हणून लिहिलेली वेब एन्ट्री आहे. कुणाला घोटाळ्यात अडकण्यापासून किंवा 'घोटाळा आहे' हे समजायला या माहितीचा उपयोग झाला तर उत्तमच.
अशा प्रकारची फसवणूक "भारताच्या" राजकारणात घडली असेल तरी हा धागा भारताच्या राजकारणावर नाही याची नोंद घ्या आणि शक्यतो कृपया इथे त्याचा रेफरन्स देणे टाळा.
कॉन्फिडन्स गेम किंवा विश्वास जिंकून फसवणूक करताना फसवणूक करणारी व्यक्ती मानवी मनाच्या सहज आणि पुरेशा पुराव्याशिवाय विश्वास ठेवणे, अती-निरागसता (नाईव्ह), सहवेदना आणि त्यातून पटकन मदत करणे, स्वतःच्या कर्तृत्वावर/ गुणांवर/ क्षमतेवर असलेला फाजील विश्वास, कधीतरी फायद्यासाठी अनैतिक वागणूक करणे पण ती नैतिक नाही याचे पुरेपुर भान असणे, अप्रामाणिकपणा, लोभ, संधीसाधूपणा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हाव इ. सहज प्रेरणांच्या वापर आपल्या फायद्या साठी करतात.
अशी विश्वास जिंकून फसवणूक करताना साधारण या सहा पायऱ्या वापरल्या जातात.
१. तयारी: आधी फसवणुक कशी करायची याची जय्यत तयारी केली जाते. कोणी मदत करणारा लागणार असेल मदतनिसाची नेमणूक होते.
२. सावज (व्हिक्टिम) हेरणे आणि त्याच्याशी संपर्क करणे
३. बिल्ट अप: या अन्यायग्रस्त व्यक्तीला फायदा मिळण्याची संधी उपलब्ध करणे. जेणेकरून त्याच्या मनात हाव निर्माण होईल आणि ती हाव सारासारविचार क्षमतेवर हावी होईल.
४. फायदा होणे: यात त्या व्यक्तीला थोडाफार आर्थिक फायदा होईल, आणि व्यक्तीचा एकुणात स्कीमवरचा विश्वास दुणावेल.
५. गोंधळाची परिस्थिती निर्माण करून अन्यायग्रस्त व्यक्तीला चटकन निर्णय घेण्यास भाग पाडणे
६. त्याच वेळी आजूबाजूच्या व्यक्ती (ज्या फसवणुकीत सामील आहेत) त्याच स्कीम मध्ये गुंतवणूक करत आहेत असा भास निर्माण करणे जेणे करून जे चालू आहे ते योग्य आहे हा भास कायम राहील.
काही प्रसिध्द फसवणुकीची जाळी
१. स्पॅनिश प्रिझनर: किंवा अॅडव्हान्स फी, नायजेरिअन पत्र इ. : यात फसवणूक करणारी व्यक्ती आपण एका श्रीमंत माणसाच्या संपर्कात आहोत जो/ जी स्पेन मध्ये जेल मध्ये आहे असं सांगते. त्याची श्रीमंत व्यक्तीची ओळख जाहीर केली तर त्या व्यक्तीला भयानक परिणामांना सामोरे जायला लागेल हे ही सांगते. यात कधीकधी ती व्यक्ती लांबची नातेवाईक आहे, परिचित आहे असंही भासवले जाते. त्या व्यक्तीच्या तुरुंगातून सुटकेस पैसे उभे करण्यासाठी जर तुम्ही मदत केलीत तर नंतर तिच्या संपत्तीतला वाटा आणि संपतीशिवाय काही फायदा जसे... तिच्या सुंदर मुलीशी विवाह इ. आमिष दाखवले जाते. तुम्ही एकदा मदत केलीत की थोडे दिवसांनी, त्याच्या सुटकेत आणखी काही विघ्ने येतात आणि आणखी जास्त पैशांची गरज भासू लागते.
ही फसवणूक तुमच्याकडचे पैसे संपे पर्यंत किंवा तुम्ही पैसे देणे बंद करे पर्यंत चालू रहाते.
यात कुठेतरी ठेवलेली मौल्यवान वस्तू वेअरहाउस मधून सोडवून घेणे, हरवलेल्या सामानात काही मौल्यवान आहे ते एअरपोर्ट वरून सोडवून घ्यायचे आहे, कोणा आफ्रिकन माणसाला कोट्यावधी हवाला करायचे आहेत त्यासाठी इनिशिअल रक्कम भरा, फेसबुक अकौंट हायजॅक करुन सगळ्या फ्रेंडलिस्टला ही व्यक्ती परदेशी अडचणीत आहे पैसे पाठवा मेसेज पाठवणे अशी अनेक व्हेरीएशन आज काल करण्यात येतात.
२. सोन्याची फवारणी करुन खाण आहे भासवणे (सॉल्टिंग/ सॉल्टिंग द माईन): : सोन्याच्या खाणीवर शॉटगन मधून चक्क सोने फवारणे आणि भावी खरेदीदाराला प्रचंड मौल्यवान साठा सापडला आहे असं भासवून पैसे उकळणे. डायमंड होक्स, ब्रेक्स इ. ठिकाणी याचा वापरा केला गेलेला.
३. झाकली मूठ (पिग इन अ पोक/ कॅट इन अ बॅग) : पिशवीत डुक्कर (काही तरी मौल्यवान) आहे सांगून ती विकायची, आणि न उघडताच खरेदी करणारा जेव्हा उघडून बघेल तेव्हा कवडीमोल मांजर (मीटच्या दृष्टीने कवडीमोल, मांजरप्रेमींनी स्वतःला दुखापत करून घेऊ नये) बाहेर पडेल.
letting the cat out of the bag ह्या वाक्पाराचाराचा उगम ह्या हातचलाखीत आहे म्हणतात.
ह्याचा बळी आपण कधी कधी झालोय असं वाटत रहातं.
४. बॅजर गेम: : ही अशी फसवणूक लग्न झालेल्या संसारिक माणसाची केली जाते. समजा 'क्ष' या पुरुषाचे 'य' ह्या स्त्रीशी लग्न झाले आहे. तर त्याला 'ज्ञ' ही स्त्री आपल्या प्रेमात अडकवून विवाहबाह्य संबंधात अडकवते आणि हे 'फ' बघतो, जो 'ज्ञ' चा नवरा/ भाऊ असतो. तो 'क्ष' कडून हे गुप्त ठेवण्यासाठी पैसे मागतो.
यात ज्ञ ही हा संबध जबरदस्ती तून होता सांगून बलात्कार/ विनयभंग इ. आरोप करू शकते. यात समलिंगी संबंध, लहानमुलांबरोबर संबंध,
पॉर्नोग्राफी, समाज 'अ'मान्य पद्धतीने लैंगिक भावनाचा निचरा इ. बदल असू शकतात.
आणखी एक प्रकार म्हणजे आजारी असण्याच्या बहाण्याने डॉक्टरकडे जाऊन फिजिकल चेकप मध्ये डॉक्टरने अतिप्रसंग केला असा बहाणा करणे. लैंगिक भावनाचा वापर न करता, समाजात टॅबू असणाऱ्या गोष्टी जसे दारू पिणे, मांस भक्षण इ. केल्या तर त्या झाकायला ही हा प्रकार वापरला जातो.
५. बोगस लाँड्री बिल पाठवणे: गावातल्या एखाद्या खऱ्या लाँड्रीच्या बिलाच्या अनेक प्रती सगळ्या महागड्या उपहारगृहांना पाठवून तुमच्या वेटरने अंगावर अन्न/ पेयं/ वाईन सांडली त्यामुळे आलेलं हे कपडे धुवायचं बिल भरा असं पत्र पाठवणे. 'थोडक्यात निभावलं' म्हणून अनेक उपहारगृहे हे बिल भरून मोकळे होतात. पत्ता अर्थात मेल बॉक्सचा असतो.
६. आजी/ आजोबांची फसवणूक: आजोबांना नातवाचा/ नातीचा फोन किंवा मेल येतो की तिला दुसऱ्या देशात अटक केली आहे आणि जामिनासाठी पैसे हवे आहेत. आणि तिला हे आई वडिलांपासून लपवून ठेवायचं आहे. मग काय दुधावरची साय विरघळते.
७. भविष्यकथन: अस्पष्ट दावे ऐकले की माणूस ते आपापल्या बकुवा प्रमाणे आपल्याला चिकटवून घेतो. शारीर हालचाली इ. वरून चुकीच्या माहिती वरून पटकन दूर जायचे आणि बरोबर माहिती ठसवत रहायची... की विजय असत्याचाच होतो. भविष्यकथन काही आपल्याला नवीन नाही.
८. थाई मोती (आपण श्रीलंकन मोती, केरळची वेलची, म्हैसूरचे चंदन, आणि कुठली साडी/ रेशीम इ. म्हणू): परदेशी प्रवाश्यांना ड्युटी फ्री मौल्यवान रत्ने दाखवत अनेक दुकानातून हिंडवणे आणि शेवटी आपल्याच दुकानातून साध्यासुध्या गोष्टी भरमसाठ भावात विकणे. यात अनेक स्तरांत अख्खीच्या अख्खी इंडस्ट्रीही सामील असते.
९. मेरे पिया रहे रंगून (रोमान्स स्कॅम) : ऑनलाईन डेटिंग इ. च्या माध्यमातून रोमँटिक संबंध प्रस्थापित करून मग भेटायचं आहे पण तिकिटाला पैसे मागणे. अर्थात पैसे मागण्यासाठी अनेकविध कारणे सांगता येतात. किंवा पैसे न मागता एनकॅश न होणारे चेक्स पाठवणे आणि पैसे रेमिट करायला सांगणे.
१०. वैयक्तिक माहिती जमा करणे: पे-डे लोन, किंवा इतर लोन देतो म्हणून ग्राहकांकडून माहिती मागवणे आणि नाव, पत्ता, वाहन चालक परवाना इ. माहिती मिळाली की टी विकणे ज्यातून आयडेंटिटीची चोरी करुन त्याच्या नावावर लोन घेणे, खोटी कर भरल्याची पत्रे सरकारला देऊन सोशल सिक्युरिटी इ. चे पैसे घेणे इ.
११.विमा घोटाळा : मुद्दाम वाहनाचा अपघात घडवून आणणे. जसे हा बदमाश सावजापुढे वाहत्या रस्त्यात आपली गाडी आणतो आणि त्याचा दुसरा साथीदार त्या बदमाशाच्यापुढे गाडी आणतो. आता अपघात वाचवण्यासाठी ती बदमाश व्यक्ती अचानक ब्रेक दाबतो. साथीदार वेगात पुढे जातो पण मागून सावज त्या बदमाशाच्या गाडीवर आपटतो. मग इंश्युरंस कंपनीला अवतीर्ण व्हावेच लागते आणि केस आणि खर्च वाचवण्यासाठी कितीही खोटी केस वाटली तरी ती कॉनला पैसे देऊन मोकळी होते.
१२. फिडल गेम : याच्यात दोन व्यक्ती सामील असतात. एक गबाळ्या कपड्यात भारी उपहारगृहात खायला जातो. खाऊन झाल्यावर पैशाचं पाकीट तपासतो तर ते घरी राहिलेलं असतं. मग त्याच्या जवळची कुठली तरी मौल्यवान वस्तू जसं व्हायोलीन इ. तारण ठेऊन घरी पैसे आणायला जातो. तो गेल्यावर दुसरा तिकडे येतो आणि काही अचाट रक्कम देऊन ते फिडल खरेदी करू इच्छितो. पण मग तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि तो आपलं कार्ड आणि नंबर देऊन जातो.
थोड्यावेळाने पहिला फाटका माणूस पैसे घेऊन आपलं व्हायोलीन परत न्यायला येतो. पण रेस्टॉरंट ओनर त्या दुसऱ्या व्यक्तीची ऑफर आहे समजून ते जास्त पैशात विकत घ्यायला त्याला पटवतो. नाखुशीनेच फाटका माणूस ते विकायला तयार होतो. रेस्टॉरंट ओनरला आता फायदा होणार वाटते, पण तो दुसरा कधी उगवतच नाही.
इंटरनेट वापरून अजून अनेक प्रकारे फसवणुकीचे सापळे लावलेले सापडतील. वेळ मिळाला की त्यावर लिहितो. तुम्हाला आणखी माहिती असतील तर लिहा.
.आवाजात प्रचंड उद्धटपणा,
.आवाजात प्रचंड उद्धटपणा, आत्मविश्वास आणि अर्जन्सी याने समोरच्याला गोंधवळणे हे पहिलं अस्त्र आहे.>>> अगदी बरोबर.
काम करण्याची पद्धत अगदी नीट लिहिली आहेस. थँक्स अनू.
प्रेमळ संवाद खरं तर आपल्या ला स्कॅम लक्षात आला की बघू तरी काय करतोय ही स्टाईल तयार होते, पण फोन हॅक वगैरे काहीतरी गोष्ट नकळत क्षणार्धातच होऊ शकते, म्हणुन खरंच जीव थार्या वर नसतो.
अनु म्हणताहेत तसे फोन मला आले
अनु म्हणताहेत तसे फोन मला आले आहेत. मी त्यांच्या वरताण उद्धटपणाने उत्तरे देऊन त्यांनाच फोन ठेवायला लावला. मागच्या एका पानावर लिहिले आहे.
मलाही अनेकदा आले आहेत
मलाही अनेकदा आले आहेत इन्शुरन्स स्कॅमचे कॉल्स. दोन दिवसांपूर्वीही आला होता, तेव्हा मी घाईत होतो, तिने सुरवात केली आणि लक्षात आल्यावर चिडलोच म्हणालो, चूप, एकदम चूप! पता है तुम्हारे धंदे, फिरसे कॉल नही करना. तिने लागलीच कट केला.
चूप, एकदम चूप!... मानवदादा
चूप, एकदम चूप!...
मानवदादा
गेल्या आठवड्यात आलेला स्कॅमचा
गेल्या आठवड्यात आलेला स्कॅमचा अनुभव.
मी गेली दोन वर्षे आमच्या काउंटीत इनवेझिव स्पेसीज निर्मुलनाचे काम करत आहे. तर त्या संबंधी जी संस्था सुरु केली त्याचे नॉन प्रॉफिट स्टेट्ससाठीचे अर्ज वगैरे सबमिट केले तर त्या डेटाचा वापर करुन की काय पण आमच्या राज्याचे गुड स्टँडिंग सर्टिफिकेट, लेबर लॉ पोस्टर यासाठी असे सगळे मिळून $२०० च्या आसपास रक्कम भरावी अन्यथा $४०,००० दंड वगैरे भीती दाखवणारे पत्र आले. सोबत ऑफिशिअल दिसणारा ऑर्डर फॉर्न वगैरे होता. खरे तर स्टेटकडे नोंदणी झाली की गुड स्टँडिंग सर्टिफिकेट ऑनलाईन मिळते. नॉन प्रॉफिटकडे पगारी माणूस नसल्यास लेबर लॉ पोस्टरची गरज नाही, लावायचे असले तरी ते गवर्मेंटकडे फुकट डाऊनलोड आहे, फॅन्सी हवे तर अॅमॅझॉनवर $१० ते $२५ रेंजमधे मिळते. मग जालावर शोधले असता दुसर्या राज्यात या प्रकारच्या स्कॅमसाठी त्यांच्या अॅटर्नी जनरलचा अॅलर्ट सापडला. आता आमच्या राज्याच्या अॅटर्नी जनरलला नोटिफाय करु.
>> काही नंबर सायबर क्राईमला
>> काही नंबर सायबर क्राईमला रिपोर्ट सुद्धा केलेत परंतु त्याचा कितपत परिणाम होतोय शंकाच आहे.
काही फायदा होत नाही. अशाच एका केस मध्ये मी साय्बर क्राइम आणि पी एन बी बँकेत तक्रार केली होती. पुढे त्याचं काही झालं नाही. पी एन बी बँके च्या केस मध्ये तर त्यांनी पी एन बी बँकेची डुप्लिकेट वेब्साईट पण बनवली होती त्यामुळे मला वाटलं होतं की ते त्यांच्या लेव्हल ला ती वेब्साईट ब्लोक करण्यासाठी प्रयत्न करतील पण जवळ्पास ३ महिन्यानंतर देखील ती डुप्लिकेट वेब्साईट चालू होती आणि किती लोक त्यांच्या स्कॅम ला बळी पडले असतील.
चूप, एकदम चूप>>> सहीच आहात
चूप, एकदम चूप>>> सहीच आहात तुम्ही मानव
जवळपास ३ महिन्यांनंतर देखील ती डुप्लिकेट वेब्साईट चालू होती>>> फारच विदारक. बँकेला काही पडलेलेच नाही..ह्या साठीच रक्कम छोटी असो वा मोठी, पोलीस तक्रार & मीडीया ची धमकी द्यायलाच हवी..
जवळपास ३ महिन्यांनंतर देखील
जवळपास ३ महिन्यांनंतर देखील ती डुप्लिकेट वेब्साईट चालू होती
एका साईट ने मलाही टोपी घातली होती, मी whoishostingthis वगैरे वरून त्यांचा आयेस्पी शोधला अ तिथे तक्रार केली, त्यांनी लगेच बंद केली.
हा अजून एक अनुभव:
हा अजून एक अनुभव:
(1. इथं 'मग क्रेडिट कार्ड वापरा ना' वगैरे क्विक सोल्युशन्स अपेक्षित नाहीत.हे अनुभव कथन आहे.'मग मी काय करू सांगा ना' वालं अपील नाहीये.
2. व्यवहार करणारी माणसं या सर्व टेक्नॉलॉजी वापरतात, उपाय करतात आणि काळजी घेतात.
3. 'सगळे वाईट प्रकार तुमच्या सोबत घडतायत म्हणजे किती बावळट आणि अशिक्षित असाल' वगैरे जज करू नका लगेच.हल्ली सर्वात जास्त मनी स्कॅमस मध्ये सुशिक्षित, it मध्ये काम करणारे किंवा इतर कॉम्प्युटर, ऑनलाईन व्यवहाराशी रोजची ओळख असलेले पण फसतील असे स्कॅम होत आहेत.)
Mngl चा अतिशय ऑफिशियल वाटणारा मेसेज येतो की नंबर बदललाय.तुमच्या मीटर चे स्क्रीनशॉट आणि बिलिंग डिटेल्स या नंबरवर पाठवा.
तर कुटुंबातील व्यक्ती ला mnglच्या या sms मध्ये 'ऑफिशियल' नंबर वरून फोन आला.बिल भरलं नाही डिस्कनेक्ट होईल इत्यादी इत्यादी.(अश्या वेळी आपण जनरली पटकन काहीतरी फोन वरून व्यवहार करून पटकन बिल भरून पुढच्या कामाला लागतो.) तर ही 2-3 वाक्य बोलणं चालू असताना 3 sms आले की तुमच्या बँक अकाऊंट मध्ये अमुक transaction झालं आणि declined. 3 वाक्य झाल्यावर फोन वरच्या पलीकडे व्यक्तीने प्रेमाने 'तुमच्या डेबिट कार्ड चा पुढच्या मागच्या बाजूचा स्क्रीनशॉट आमच्या ऑफिशियल नंबरवर शेअर करा' चालू केल्यावर ट्यूब पेटली आणि फोन ठेवून लगेच बँक ला सस्पिशियस activity रिपोर्ट केली.बँक ने अकाऊंट व्यवहार आणि डेबिट क्रेडिट कार्ड व्यवहार करायला फ्रीझ करून ठेवली(हा सस्पिशियस ऍक्टिव्हिटी रिपोर्ट केल्यावरचा नेहमीचा प्रोटोकॉल.)
यात फोन आणि व्हॉटसॅप चे सिम कार्ड आणि हॅन्डसेट वेगवेगळे असल्याने पटकन हे मेसेजेस पाहिले गेले.
सोसायटीत अनेक लोकांनी 'हा ऑफिशियल mngl वरून आलेलाच मेसेज आहे' असं कन्फर्म केलं.mngl वाल्याना फोन केल्यावर त्यांनी 'नाही नाही जुन्याच नंबर ला स्क्रीनशॉट पाठवा' सांगितलं.ते नवा नंबर असल्याचा स्वीकार आणि नकार दोन्ही दाखवत नव्हते.
थोडक्यात:
1. शक्य तितके व्यवहार शक्य तेव्हा डेस्कटॉप वरून, ईनकॉगनिटो विंडोतुन आणि त्या संस्थेच्या ऑफिशियल पोर्टल वर नीट वेब साईट बघूनच करा.
2. Mseb किंवा mngl वरून फोन किंवा मेसेज येऊन 'कनेक्शन आता लगेच डिस्कनेक्ट होणार आहे, बिल भरा' सांगितले तर फोन कट करा किंवा 'करा डिस्कनेक्ट, मी चालू करेन नंतर ' म्हणून पुढे एंटरटेन करू नका.कोणत्याही व्हॉट्सअप किंवा sms मधल्या बिलिंग लिंक उघडू नका.स्वतः साईटवर जाऊन शक्यतो डेस्कटॉप वरून हे बिल नक्की खोळंबलंय का ते तपासून भरा.
3. तुमच्या कुटुंबातला अमका अरेस्ट झालाय, अपघात झालाय,मेलाय, हॉस्पिटलमध्ये नेलाय असे फोन आले तर ज्या ठिकाणी नेलाय तिथला फक्त पत्ता घ्या आणि फोन बंद करा.शक्यतो अश्या वेळी जो माणूस मेलाय असं सांगितलेलं असतं त्याला फोन केल्यास तो व्यस्त असावा/काही कारणाने उचलला जाऊ नये अशीही व्यवस्था फुल प्रूफ केलेली असते.
4. फोन वर अर्जन्सी दिसली की लगेच फोन ठेवून द्या.जर खरा अडचणीत असलेला नातेवाईक असेल तर sms करेल, इतरांना फोन करेल.
5. ज्या खात्यातून बिल भरायची तो बँक अकाउंट क्रेडिट कार्ड नसलेला, अगदी बिल भरण्या पुरता आणि बँक च्या मिनिमम नियमा इतकाच बॅलन्स असलेला वेगळा ठेवा.सॅलरी अकाउंट वरून हे सर्व करू नका.
6. आपले नंबर पॉलिसी कम्पेअर करणाऱ्या साईट्स वर (किंवा जिथे त्याची गरज नाहीये, पण माहिती म्हणून बघणार आहे अश्या ठिकाणी) देऊ नका.त्या शिवाय पुढे जाता येत नसेल तर दुसऱ्या साईट बघा, जिथे फक्त मेल आयडी देऊन काम होईल.
7. अगदी साधे प्रोग्राम लिहून ऑफिशियल साईट कडून आहे असं वाटणारे मेसेज (बँक मध्ये अमुक लाख रुपये जमा झाले इत्यादी) पाठवणं अतिशय सोपं आहे.त्यामुळे sms, व्हॉट्सअप वर विश्वास न ठेवता दुसऱ्या सिस्टम वरून स्वतः बँक च्या ऍप वर जाऊन हे पैसे जमा झालेत का तपासा.आता हे स्कॅम वाढले आहेत.माणूस अगदी छोट्या व्यवहारासाठी संपर्क ठेवेल.मग एखाद्या दिवशी घाईत त्याने आपल्याला 10 रुपये द्यायचे तर 500 रुपये दिलेत चुकून, आणि त्याला पैश्याची निकड असल्याने हे चुकून पाठवलेले पैसे 10 रु वजा करून परत पाठवा अशी कळवळीची विनंती.इथे हा माणूस पुरावा म्हणून त्याच्या बँकिंग ऍप किंवा upi चा स्क्रीनशॉट पाठवेल. ज्यातून त्याचे पैसे गेलेले दिसतील. तुम्हाला हे पैसे त्या नंबर वरून तुमच्या अकाउंट ला आल्याचे मेसेजेस आलेले असतील.कारण खोटे मेसेज पाठवायला बँक ऍप हॅक करावी लागत नाहीत.
MNGL बोले तो महानगर गॅस का?
MNGL बोले तो महानगर गॅस का?
फोन चालू असतानाच बँक खात्यातून पैसे काढायचे प्रयत्न झाले याचा अर्थ आपला डेटा नको त्या हातांत पोचला आहे. बँक अकाउंट काही आपण फोन नंबर सारखा उठ सूट देत नाही. म्हणजे जिथे दिलाय तिथूनच तो डेटा लीक झाला (विकला? हॅक झाला?)
अवांतर - इस्कॉन वाल्यांनी sms करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि पैसे मागितले. मी आतापर्यंत यांच्याशी कधीही संबंध येऊ दिलेला नाहे. यांनी सुद्धा माझा डेटा विकत घेतला / चोरला?
हो बहुतेक.
हो बहुतेक. इस्कॉन ला नंबर कुठून मिळाला माहीत नाही.कधीकधी 'देवाचं काम, सत्कार्य' म्हणून सोसायटी मॅनेजर ने पण आपल्या सोसायटी मधल्या लोकांची यादि आणि नंबर दिलेले असू शकतात. स्थानिक नगर सेवक ऑफिस कडे सर्वांचे नंबर्स असतात, त्यांना इस्कॉन ने 'चांगलं काही करू, गरीब कल्याण करू' असे सांगून नंबर्स घेतलेले असू शकतात.
आमचे नंबर्स, डेटा इतक्या ठिकाणी आहे की आम्ही आता पूर्ण (सायबररित्या) उघडे आहोत.पण त्यातल्या त्यात माहीत असलेले सर्व उपाय वापरून डॅमेज कंट्रोल.
यावरून आठवलं: नव्या 2 दुकानात खरेदी करताना फोन नंबर दिला नाही.नेहमी प्रमाणे 'तुम्हाला एक्स्चेंज रिटर्न ला त्रास होईल' सांगितलं गेलं, त्यांना 'नंबर देणार नाही, एक्स्चेंज रिटर्न करणार नाही' सांगितलं.ज्यांच्याकडे नंबर गेले ते गेले.नव्यांकडे जाऊ देणार नाही.
ते नावाचा शॉर्ट फॉर्म MGL
ते नावाचा शॉर्ट फॉर्म MGL असा करतात.
काल फेसबुकवर युरेका
युरेका फोर्ब्सच्या नावाखाली भलताच माणूस सर्व्हिसिंग करायला आला आणि अमुक तमुक बिघडलंय, बदलायला लागेल, पैसे द्या असं म्हणू लागला अशी स्टोरी काल फेसबुकवर वाचली.
तो यायच्या आधी सो कॉल्ड युरेका फोर्ब्स कडून सर्व्हिसिंगची वेळ झाली असा फोनही आला होता.
म्हणजे युरेका फॉर्ब्स चा
म्हणजे युरेका फॉर्ब्स चा एखादा जुना मॅकेनिक नकली पार्ट किंवा थोडे कमी प्रतीचे पार्ट विकतो असं असेल.सॅमसंग मशीन आणि प्युरीट फिल्टर, टाटा स्काय च्या पण अश्या केस आहेत.नंतर फीडबॅक कॉल येतो त्यात तुम्हाला पार्ट विकून पैसे घेतले का हा प्रश्न असतो.
इस्कॉनला फोन नंबर मिळाला याचं
इस्कॉनला फोन नंबर मिळाला याचं नवल नाही. पण जन्मतारीखसुद्धा मिळाली.
https://www.livemint.com/news/india/aadhaar-data-leak-personal-informati....
https://etinsights.et-edge.com/top-7-data-breach-incidents-in-india/
आमच्या इथे 'महनगर गॅस' कडुन
आमच्या इथे 'महनगर गॅस' कडुन तपासणी साठी येणार म्हणुन पत्रक लावुन गेले. दिलेल्या तारखेला आले आणि तपासणी करुन प्रत्येकी ३००/- रु का असंच काही घेऊन गेले. जाताना ते पत्रक काढुन गेले. नंतर समजले की काही तरी फेक प्रकार होता
ओह.
ओह.
इथून प्रेरणा घेऊन एका super
इथून प्रेरणा घेऊन एका super market मध्ये billing करताना मीही नंबर दिला नाही
(डिस्क्लेमर: हे व्हिक्टईम
(डिस्क्लेमर: हे व्हिक्टईम कार्ड खेळणं किंवा ओव्हर शेअरिंग किंवा 'हेल्प मी' नसून 'असंही होऊ शकतं आणि लक्ष ठेवा' या साठी सांगितलेला सिक्वेन्स आहे.)
1. माझे मागचे प्रतिसाद (इन्श्युरन्स ग्रिव्हन्स सेल आणि mngl बिलिंग) या घटना तुम्ही वाचल्या असतील.या गेल्या 3 महिन्यात घडल्या. यानंतर आज:
2. नवऱ्याचा (नेहमी च्या सिम कार्ड चा ) फोन स्विच ऑफ लागत होता.दुसऱ्या सिम चा फोन घरी विसरला होता.पहिली शक्यता: चार्ज करायला विसरलं असणे आणि बाहेर चार्जिंग पॉईंट न मिळणे.पण तो मॉल मध्ये जाणार होता, जिथे चार्जिंग पॉईंट असतात.
3. असा स्विच ऑफ 3 तास लागत होता, आणि इंग्लिश नंतर पुढचा मेसेज बंगाली होता.
4. घरी आल्यावर मी विचारल्यावर कळलं की फोन ऑन आणि रेंज मध्ये होता.
5. जवळ असलेल्या कोणत्याच फोन्स वरून कॉल लागत नव्हते.सर्वांना स्विच ऑफ आणि बंगाली मेसेज येत होते.
6. मुख्य शंका सिम हॅक झाल्याची(हा फुल ऍक्सेस पास.व्यक्ती कडे आपले otp, sms सर्व जाणार.) पण आऊटवर्ड चालू होता त्यामुळे ती शक्यता कमी.
7. सेटिंग मध्ये जाऊन पाहिल्यावर कॉल फॉरवर्ड मध्ये वेगळा नंबर होता जो आमचा नव्हता.तो काढला, आणि एअरटेल कस्टमर केअर च्या केंद्रात जाऊन ही घटना रिपोर्ट केली.कॉल फॉरवर्ड होतात.sms आणि otp नाही.पण व्हिज्युअल चॅलेंजड माणसासाठी otp आणि कॅपचा फोन कॉल वरून ऐकता यायची सोय (काही साईटस वर किंवा ऍप वर) असते.याचा गैरवापर होणे सोपे आहे.
8. हे सर्व बंगाली मेसेज मुळे कळलं.हे महाराष्ट्रातून केल्यास अर्थातच आपण नॉर्मल कोणीही माणूस 'फोन रेंज बाहेर आहे, सिम इश्यू आहे, रिस्टार्ट केल्यावर नीट होईल' म्हणून शांत बसू.
ही सर्व डाटा चोरी कोण्या एकाच फेक कॉल सेंटर शी(जमताडा रेफरन्स) संबंधित असू शकते.
बाकी घटनांवर बारीक लक्ष ठेवून आहे.
बापरे.
बापरे.
>>>सेटिंग मध्ये जाऊन
>>>सेटिंग मध्ये जाऊन पाहिल्यावर कॉल फॉरवर्ड मध्ये वेगळा नंबर होता जो आमचा नव्हता.>>>>
दुस-याचा नंबर यायला फोन काही काळ हॅक झाला असावा अथवा एखादे कुकीज सारखे प्रकरण असावे असे वाटते....
mi_anu हा नवीन प्रकार शेअर केल्याबद्दल धन्यवाद...
>>>>आमच्या इथे 'महनगर गॅस'
>>>>आमच्या इथे 'महनगर गॅस' कडुन तपासणी साठी येणार म्हणुन पत्रक लावुन गेले. दिलेल्या तारखेला आले आणि तपासणी करुन प्रत्येकी ३००/- रु का असंच काही घेऊन गेले. जाताना ते पत्रक काढुन गेले.>>>>
अशा केस मध्ये महानगर गॅसला फोन करून विचारायला हवे होते.
बापरे! हे फार पुढचं क्रिमिनल
बापरे! हे फार पुढचं क्रिमिनल आहे!
सांभाळून!
otp आणि कॅपचा फोन कॉल वरून
otp आणि कॅपचा फोन कॉल वरून ऐकता यायची सोय (काही साईटस वर किंवा ऍप वर) असते.याचा गैरवापर होणे सोपे आहे.>>
बरोबर...ही ट्रिक मुख्यत्वे तुमचे व्हाट्सअप अकाउंट हॅक करण्यासाठी होते, जिथे ओ टी पी व्हॉइस कॉल वर ऐकायची सुविधा असते. तुमचा कॉल रीडाइरेक्ट नंबर रजिस्टर्ड करण्यासाठी Man Machine Interface (MMI) code (हे प्रत्येक सर्विस प्रोव्हायडर्स चे वेगवेगळे असतात) डायल करून त्यांनतर जो मोबाईल नंबर रीडाइरेक्ट मध्ये टाकायचा आहे त्या दहा आकडी नंबर वर कॉल करायला लावतात.... जेणे करून तो नंबर तुमच्या मोबाईलच्या कॉल रीडाइरेक्शन मध्ये आपोआप रजिस्टर्ड होतो.
याचे सविस्तर तांत्रिक माहिती खालील लिंक मध्ये दिली आहे
https://www.bleepingcomputer.com/news/security/hackers-steal-whatsapp-accounts-using-call-forwarding-trick/
जोपर्यंत अशा प्रकारचे fraud /
जोपर्यंत अशा प्रकारचे fraud / scams करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देणारा कठोर कायदा येऊन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत असे निरनिराळे scams येतच राहणार!!!
एक family friend HGI business
एक family friend HGI business opertunity साठी खुप आग्रह करतो आहे. तर ही scam स्कीम आहे की legit आहे.
HGI म्हणजे MLM स्कीम आहे का?
HGI म्हणजे MLM स्कीम आहे का? दूर रहा त्यापासून.
https://helpingdesi.com/hgi-review/
हो हेच आहे. thank you
हो हेच आहे.
thank you
आमच्या मागे पण लोक हात धुवुन
आमच्या मागे पण लोक हात धुवुन लागले होते याबद्दल. “नाही” म्हटले तरी. जवळचे मित्र आहेत तरी. मित्र लोक असल्याने हसुन “नाही” म्हणत राहिलो फक्त. एक वर्ष मागे लागले. आता नाही विचारत. बरं त्यांच्याकडे काय स्किम आहेत, कोणती स्किम चांगली आहे हे सांगा म्हटले तर कोणालाही काहीही माहिती नाही. फार वैताग झालेला.
सुरुवातीचे त्यांचे वाक्य,
सुरुवातीचे त्यांचे वाक्य, “इतके पैसे मिळवशील की नोकरीची गरजच नाही रहाणार“. त्याला म्हटले, “मला ही नोकरी आवडते व मला नकोत अजुन पैसे“.
Pages