Submitted by निशिकांत on 19 March, 2018 - 00:38
खाते माझ्या आयुष्याचे
पाने चाळा, असेल जर का वाचायाचे
दिवाळखोरी खाते माझ्या आयुष्याचे
सायंकाळी कशास मागे बघावयाचे?
घडून गेले जे जे होते घडावयाचे
दुर्मिळ झाली आज, तरी का कण्हावयाचे?
गोंगाटाला निरव शांतता म्हणावयाचे
पाप असो की पुण्य, जगावे मनाजोगते
कीर्तिरुपाने कुणास आहे उरावयाचे?
चिऊ शिकविते उडावयाचे, माहित असुनी
पिलास असते दूर जाउनी वसावयाचे
नको समिक्षा आयुष्याची दिशा ठरवण्या
पडावयाचे, उठावयाचे, चालायाचे
बंद घराच्या आत पोसती किती जळमटे !
दार मनाचे जरा किलकिले उघडायाचे
बहारायची आस केवढी मनात असते !
स्वप्न मनी निर्माल्याच्याही फुलावयाचे
कुणास तू "निशिकांत" शोधसी अंतक्षणाला?
गूढ प्रवासी तुलाच आहे निघावयाचे
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच, आवडली
मस्तच, आवडली
मस्तच, आवडली
.
निशीकांत तुमच्या कविता खूपच
निशीकांत तुमच्या कविता खूपच छान आहेत. इतर कविता पण वाचल्या - सोड चाकोरीतले जगणे, पालखीतल्या अंधाराचा भोई, नाते जुडून गेले, त्रुप्त मनाने जावे म्हणतो या कविता विशेष आवडल्या. गेल्या काही वर्षात विशेष चांगल्या कविता वाचल्या नव्हत्या त्या वाचायला मिळाल्या.
काही कवितांचे प्रकाशन वगैरे केले आहे का? किंवा करायचा विचार आहे का? असल्यास जरूर कळवा.
>>निशीकांत तुमच्या कविता खूपच
>>निशीकांत तुमच्या कविता खूपच छान आहेत. इतर कविता पण वाचल्या
मी पण - सहमत !!!