Work From Home " https://www.upwork.com" साईट विषयी

Submitted by चिमु on 14 March, 2018 - 15:03

कोणाला https://www.upwork.com या Freelancer म्हणुन Job देणाऱ्या Site बद्दल कोणाला काही माहीत आहे का ? Safe आहे का ?
किंवा या आधी कोणी काम केले असेल तर प्लिज सांगा ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या एका कलिग ने ही साईट सुचवली होती, तो स्वत: ह्या मार्फत गेली २ ३ वर्षं असाईनमेंट्स/ कॉन्ट्रॅक्ट मिळवून काम करत आहे
Remoteok.io पण सुचवली होती...

काम मिळणं ह्यासाठी पेशंसची गरज आहे असं ओळखीतल्या एकाकडून कळलं. अर्थात तुमचं स्किल निश असेल तर मिळेलही काम पटकन.

मला एक प्रश्न पडतो नेहमी, हे असे Work From Home जे असते ,ते पेमेंट करतात का वेळेवर की फक्त काम करुन घेतात.

हल्ली स्टेशन बाहेर कोणी न कोणी दिसतच Work From Home / Part time work from home ची जाहिरात करत

कितपत सेफ असते

मी कॉलेज मध्ये असताना काही दिवस इलान्स आणि ओडेस्क वर काम केले. जर पोर्टफोलिओ असेल तर अतिशय उत्तम. मार्केटिंग चे थोडे तरी ज्ञान पाहिजे. म्हणजे प्रोपोझल कसा लिहावा वगैरे. त्यांच्या काही टेस्ट असतात त्या जरूर पूर्ण करा. पूर्णपणे क्लायंट साठी ह्याच साईट वर अवलंबून ना राहता बाकी चॅनेल पण वापरून पहा. गुगल ऍड अतिशय उपयोगी पडतात. उदाहरणार्थ तुम्ही भाषांतरकार आहात तर german english translator in pune ह्या कीवर्ड वर ऍड चालवू शकता. शुभेच्च्छा!