Submitted by मंगेश.... on 18 February, 2018 - 13:09
गेले काही दिवस मी उष्णतेच्या आजाराने त्रस्त आहे. उष्णतेचा दाह फक्त तळपायांना जास्त जाणवतो. डॊक्टरना विचारले पण दरवेळी डॊकटर गोळ्या देऊन परत पाठवतात. पण त्याने तितका फरक नाही पडत. पायात दिवसभर शुज असतात. तळपायाची जळजळ होत असली की तात्पुरता हापिसाच्या पार्किंग मधे जाऊन पाय धुवुन येतो. असे दिवसातुन तीन चार वेळा तरी. रस्त्यातुन चालताना अचानक पायाची जळजळ चालु होते. आणि चालणे मुश्कील होते. कधीकधी अनवाणी पायांनी चालाव अस वाटत. इतका त्रास होतो. मध्यंतरी कोल्हापुरी चप्पल घेतलेली. पण हापिसात घालुन जाणं ऒकवर्ड वाटत.
डॊक्टरांनाही कोणते चप्पल वापरु? असे विचारायला बरे वाटले नाही. आणि दुकानदारही हे घेऊन जा. म्हणुन कोणतेही देतात.
यावर उपाय म्हणुन कोणता ब्रॅंंड् आहे का? प्लीज उपाय सुचवा. आणि कोणी थट्टा उडवणार नाही अशी अपेक्षा ठेवतो.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मधुमेह आहे का? शुगर चेक करून
मधुमेह आहे का? शुगर चेक करून घ्या.
झोपताना पायाला शतधौतघृत लावा. तात्पुरता फरक पडेल.
पोटात परिपाठादी काढा.
गुलकंद, काळ्या मनुकांचे पाणी इ. चा उपयोग होईल.
पण नक्की काय प्रॉब्लेम आहे ते तपासून घेणे आवश्यक आहे.
झोपताना पायाला तूप लावून
झोपताना पायाला तूप लावून काश्याच्या वाटीने चोळणे.सब्जा बी पाण्यात घालून सिपर मध्ये घेऊन जाणे आणि दिवसभर पीत राहणे.
कमी साखर वाले कोकम सरबत घरी पिणे.ऑफिस मध्ये जमेल तितका वेळ बूट काढून ठेवणे.(ऑफिसात वापरायला एक कापडी (टर्किश्/वेलवेट नसलेले) स्लिपर घेता येतील.)
चप्पल बद्दल विशेष एक्पर्ट नाही.पण 'ऑल सीझन' नसलेले कोणतेही चालतील.ऑल सीझन वाल्यात किंवा फ्लोटर्स मध्ये प्लास्टिक असते त्यामुळे उष्णता शोषली जाणार नाही.कापड कंटेंट जास्त असलेले हवा खेळती असलेले स्पोर्ट शूज पण चालतील.
पायाला कैलास जीवन लावून मसाज
पायाला कैलास जीवन लावून मसाज करा. बरे वाटेल. तसेच जेवणा त ताक लिम्बू सरबत असे ठेवा. काकडी दही इत्यादि. पण सोसते ना बघा आधी. तुळ शीचे बी पक्षी सब्जा रात्री भिजत घालून सकाळी त्यात गार दूध घालून घ्या.
हे तात्पुरते उपाय करून बघाच
हे तात्पुरते उपाय करून बघाच पण एकूण लाईफ स्टाईल काय आहे ते बघा, काय खाता, कधी खाता नियमित आहे का
झोप होते का नीट,
पायची जळजळ होणे हा विकार मला होतो अधून मधून, झोप झाली नसेल तर, इंफॅक्ट जस्ट आता ही होत आहे कारण दोन रात्री जागरणात गेल्यात
वर लिहीले उपाय उत्तम आहेतच
वर लिहीले उपाय उत्तम आहेतच तसेच चमचा चमचा धणे-जीरे रात्री ग्लासभर पाण्यात भिजवुन सकाळी ते धणे जीरे कुस्करुन गाळुन ते पाणी प्या.
हा धागापण बघा:https://www
हा धागापण बघा:
https://www.maayboli.com/node/57018
पायाची जळजळ होण्याच मुख्य
पायाची जळजळ होण्याच मुख्य कारण म्हणजे पित्त दोष वाढणे
दर ३ - ३.५ तासानी थोडेसे का होईना काहितरी खा आणी दही , गुलकंद घेउन बघा
फरक वाटेल
छान आहेत उपाय.. माझ्या आईला
छान आहेत उपाय.. माझ्या आईला पण हा फार त्रास आहे. पण तिला मधुमेह आहे.
सिन्थेटिक मटेरियल चे बूट
सिन्थेटिक मटेरियल चे बूट वापरू नका. त्याने डोळे आणि तळपाय दोन्हीची आग होते. बाकी उपाय सुरू ठेवाच.
मन ही शांत ठेवा.
@ आश्विनी , अनु, अमा,मेघपाल
@ आश्विनी , अनु, अमा,मेघपाल,रश्मी,मानव ,मृनिश ,भावना दक्षिणा सर्वांचे मन:पुर्वक आभार आपण सुचवलेले उपाय खुपच सरस आहेत. नक्कि ट्राय करीन.
@आश्विनी मधुमेह नाही. असता तर तसे डॊक्टरांनी सांगितले असते.
@ मेघपाल जेवण आणि झोप वेळेवर नसतेच कधी त्यामुळेही हा त्रास असु शकेल कदाचित
नसला तर उत्तमच आहे पण शुगर
नसला तर उत्तमच आहे पण शुगर कधीच चेक केली नसेल तर एकदा करून घ्या.
आणि कोल्हापुरी चपला मूळीच वापरू नका. चपला, बूट जे काही वापरणार असाल ते अतिशय सॉफ्ट असले पाहीजे.
वरील उपायांबरोबरच तळपायाला
वरील उपायांबरोबरच तळपायाला मेंदी लावल्याने पण बरीच पायची होणारी आग कमी होते. रात्री लाऊन झोपायचे सकाळी धुवुन टाकायची, तळपायाला असल्याने दिसत पण नाही. (अर्थात हा कायमस्वरुपी उपाय नाही)
अश्विनि कोल्हापूरी चप्पल
अश्विनि कोल्हापूरी चप्पल कातडी असल्याने उलट उष्णता शोषली जाते शरिरातली. उन्हाळ्यात बेस्ट
उमर भर ग़ालिब यही भूल करता
उमर भर ग़ालिब यही भूल करता रहा
धूल चहेरे पे थी और आइना साफ करता रहा.!!
जेवण आणि झोप वेळेवर नाही. ते सुधारा. वरवरचे उपाय समाधान देणार नाहीत.
इतर काही कारण नसेल (मधुमेह
इतर काही कारण नसेल (मधुमेह वगैरे) तर दिवसातून पाणी किती पिता, काय आहार घेता, झोप किती घेता, व्यायाम किती करता हे पहा. शरीरातील उष्णतेचा समतोल त्यावर खूप अवलंबून असतो.
१. दिवसाकाठी कमीत कमी तीन लिटर पाणी प्या
२. सकाळी किंवा संध्याकाळी एक तास व्यायाम करा (घरी नव्हे. जिम किंवा योगा जॉईन करा)
३. रात्री किमान सात तास झोप घ्या
४. मद्यपान तसेच मसालेदार/तिखट/तेलकट/खारट पदार्थांचे प्रमाण अत्यंत कमी किंवा बंदच करा.
या चार गोष्टी गांभीर्याने घ्या. आरोग्याच्या बऱ्याच समस्या (उष्णता/जळजळ वगैरे) सुटतात.
आणि झोपण्यापूर्वी पायाचे तळवे स्वच्छ धूत जा (नुसते पाणी टाकून वरवर धुवू नका. त्याने काहीही फरक पडत नाही. तळवे खरखरीत फरशी/दगडावर घासून धुणे. घामामुळे तळव्यांना चिकटलेली सारी धूळ निघून झोपण्यापूर्वी तळवे पूर्णपणे साफ होणे आवश्यक आहे)
अजून एक: उन्हाळा तोंडावर येतोय. पोहायला येत असेल तर पोहायला जा. नसेल तर अर्धा पाऊन तास डुबक्या मारून आलात तरी खूप आहे. पोहण्याने उष्णता कमी होण्यास खूप मदत होते.
सोर्स: स्वानुभव
@दक्षिणा, मला somehow हा
@दक्षिणा, मला somehow हा उष्णतेचा प्रॉब्लेम वाटत नाहीये. तसे असते तर इतर लक्षणे असली असती. मला तळपायातल्या nerves चा issue वाटतोय. त्यासाठी मऊ पादत्राणे घालणे योग्य.
१. दिवसाकाठी कमीत कमी तीन
१. दिवसाकाठी कमीत कमी तीन लिटर पाणी प्या - धिस इज व्हाट आय कॉल ब्रोसायन्स.
हिरव्या गवतावर चालून बघावे
हिरव्या गवतावर चालून बघावे का? अर्थात अनवाणी.
काही वर्षांपूर्वी मला हा
काही वर्षांपूर्वी मला हा त्रास झाला होता. रक्त तपासणी मध्ये B 12 कमी निघाले. एक महिना व्हिटामिनच्या गोळ्या घेतल्या आणि त्रास गेला. घामट बुटांमुळे सुद्धा संसर्ग होऊन असा त्रास होऊ शकतो असेही तेंव्हा समजले.
बाह्य उपाय काही उपयोगाचे
बाह्य उपाय काही उपयोगाचे नाहीत. पायाचे रोग म्हणजेच अशुद्ध द्रव्ये लघवीतून बाहेर पडत नाहीत.
>>अशुद्ध द्रव्ये लघवीतून
>>अशुद्ध द्रव्ये लघवीतून बाहेर पडत नाहीत.
+1
केटॉजेनिक डायेट ने मला ख़ुप
केटॉजेनिक डायेट ने मला ख़ुप फ़ायदा झाला होता... बाकि सगळे म्हनजे सगळे करुन बघितले होते.. ट्राय करा..
पायना ठंड वाटण्यासाठी मी
पायना ठंड वाटण्यासाठी मी पुर्वी एक ऊपाय करीत असे अजूनही कधी वेळ मिळाल्यास करतो खुप बरे लगेचच वाटतेउ अर्थात मी काही डॉक्टर नाही तो ऊपाय असा बारीक वस्त्र्गाळ लाल िकिंवा काळी माती पाण्यात कालवुून पाय थोडावेळ ठेवायचे नंतर बाहेर काढून वाळवायचे आणि पाय धुुुुवुन स्वच्छ करावयाचे आहाहा अगदी ठंड वाटते कधिकधि िशिंका पण येतात