Submitted by सुप्रिया जाधव. on 11 February, 2018 - 13:21
तरही मिसऱ्यासाठी बेफिजींचे आभार मानून....
गैरसमजांचे जहर करतेय प्राशन यारहो
*दाखवा ठेवून माझ्यासारखे मन यारहो*
वर्तमानाचे किरण भेदू न शकले आजवर
आठवांचे केवढे घनदाट हे वन यारहो
जेवढ्या सच्चेपणाने पाळते नियमावली
तेवढे हे लादते आयुष्य बंधन यारहो
वेदना शमवायला निरुपाय ठरला काळही
अनुभवांचा भेटला निष्णात सर्जन यारहो
गांवकूसावर मनाच्या एक रस्ता थबकला
थक्क झाला पाहुनी स्वर्गीय यौवन यारहो
चार घटकेचा प्रवासी ह्या इथे प्रत्येकजण
परतण्यासाठी कधीचे सज्ज वाहन यारहो
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा