Submitted by अजय on 6 January, 2018 - 13:23
कांकून , मेक्सिकोला जायची तयारी करतो आहे. या भागात काय पाहणे मस्ट आहे, काय नाही? तुम्हाला एखाद्या हॉटेलचा अनुभव कसा आहे? इतर काही टीप्स?
मेक्सिकोत पहिल्यांदाच जातो आहे. (टेक्निकली दुसर्यांदा, पहिल्यांदा गेलो तेंव्हा क्रूझबरोबर फक्त कॉझमेलला गेलो होतो पण त्यामुळे काहीच तयारी करावी लागली नव्हती). कांकून ला उडत जाऊन, कार भाड्याने घेऊन आजूबाजूला फिरायचा विचार आहे. फक्त प्रौढ, लहान मुलं सोबत नाही.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हा पुर्विचा एक धागा पहा
हा पुर्विचा एक धागा पहा उपयोगी पडतो का.
बर्याच रिसॉर्ट्स्ची ऑल इंक्लुझिव पॅकेजेस असतात, त्यामुळे खाण्या-पिण्यासाठी बाहेर पडायचा प्रश्न उद्भवत नाहि (सेफ्टि इशु हि आहे/होता). साइट-सिइंग वाल्यांची हि डोर-टु-डोर सर्विस अस्ल्याने कार रेंट करण्याची गरज भासत नाहि...
माहीत नाही पण पैसे, पर्स,
माहीत नाही पण पैसे, पर्स, सामान सांभाळा म्हणतात मेक्सिकोत.
कांकून अगदी गर्दीचे ठिकाण आहे
कांकून अगदी बेकार गर्दीचे ठिकाण आहे. गोव्याच्य आंज्र्ना बीच सारखेच.
लिहुते आणखी..
भिंत?
भिंत?
आम्ही नुकतेच जाऊन आलो. त्या
आम्ही नुकतेच जाऊन आलो. त्या कुकुल्कान बुलेवार्ड वर जवळपास सगळी हॉटेल्स आहेत तिथेच राहिलो होतो एका ऑल इन्क्लुजिव रिजोर्ट मधे. सेफ्टीचा काही इशू आला नाही. पण अगदी एअरपोर्ट वर उतरल्या उतरल्या जे ते टाइम शेअर वाले मागे लागतात ते सगळीकडे असतात. आपल्या हॉटेल मधेही. त्यांना पेशन्स ने नम्र नकार देत रहावे लागते
आम्ही कार रेन्ट केली नाही, गरज पण अजिबात पडली नाही. एअरपोर्ट वरून हॉटेल ला जाण्यासाअठी बरीच हॉटेल्स त्यांच्या टॅक्सी ऑफर करतात, शिवाय "कॅनडा ट्रान्स्फर " आणि "युएसए ट्रान्सफर" अशा दोन रिलायबल सर्व्हिसेस ची नावे आम्हाला मित्रांकडून समजली होती. आम्ही कॅनडा ट्रान्सफर वापरली. उत्तम सर्विस होती. एअरपोर्ट लहान आहे, बाहेर पडल्या पडल्या टॅक्सीवाले घेराव घालतात. आपला जो कोण माणूस असेल तो दिसल्याखेरीज एअरपोर्ट च्या दरवाजापासून हलू नये हे बरे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हॉटेल्स असलेला भाग एअरपोर्ट पासून जवळच आहे , २० एक मिनिटे फार तर.
हॉटेल आम्ही ट्रिप अॅडवायजर वर रिव्ह्यू बघून आणि ओळखीच्यांना विचारून बुक केले होते. बाहेरून सगळीच छान वाटतात , रिउ , मून पॅलेस वगैरे बद्दल चांगले ऐकले आहे. हॉटेल आणि टुर्स किंवा इतर सगळीकडे स्टाफ चा अनुभव खरंच छान एकदम सर्व्हिस ओरिएंटेड, सगळे लोक बाय डॅफॉल्ट नम्र, हसतमुख होते. फक्त ते टाइम शेअर वाल्यांपासून दूर रहावे लागते सारखे.
इथे बीचेस सुंदर असले तरी पाणवनस्पती आहेत , त्यामुळे समुद्रात पोहण्याची तित्तकी मजा नाही. रिजोर्ट च्या पूल वर ती मजा करावी
साइट सीइंग ला एक्सकॅरेट (थीम पार्क) , टुलुम रुइन्स आणि चिचेन इत्झा ही ऑप्शन्स आहेत. आम्ही फक्त चिचेन इत्झा ला जाऊन आलो. ती टूर तिथे गेल्यावरच बुक केली फोन वर. काही प्रॉब्लेम आला नाही. हॉटेल च्या दारातून पिक अप होते आणि तिथेच संध्याकाळी आणून सोडले. चिचेन इत्झा ला पण ते सुवेनियर विक्रेते फार मागे लागतात. तिथे काहीही घ्यायचे तर वाट्टेल त्या किमती सांगतात त्यामुळे भरपूर बार्गेन करावे लागते. आमच्या टूर ऑपरेटर ने सांगितले होते की त्या फेरीवाल्यांकडून काही घेऊ नका, ते लोक चुकीचे, इल्लीगल रंग , पॉलिश इ. वापरतात, वासावरून पकडले जाईल आणि एअरपोर्ट वर अडवतील वगैरे, शक्यतो एखाद्या स्टँडर्ड दुकानातून काय ते घ्या. त्याने एका शॉप मधे थांबवली होती बस. आम्ही तिथे आमचे शॉपिंग केले. पण आता हे त्या दुकानाचे आणि टूर ऑपरेट्र चे सेटींगही असू शकते.
चिचेन इत्झा आणि इतर बरेच ठिकाणी त्या नैसर्गिक झर्यांच्या तळ्यांचे ( सिनोटे) फार कौतुक सांगतात. आमच्या टूर ऑपरेटर ने अशा एका ठिकाणी गाडी १ तास थांबवली होती. लोकांना त्या तळ्यात पोहायचे असते. पण आम्हाला त्यात काहीच खास वाटले नाही. गावाकडे शेतात मोठ्ठी दगडी बांधणीची विहिर पाहिली असेल (सैराट टाइप) तर तसे असते. नथिंग ग्रेट. तेवढ्यासाठी कपडे वगैरे नेणे, बदलून तिथे पोहोणे , पुन्हा कपडे बदलणे वगैरे टू मच वाटले आम्हाला.
बाकी हॉटेल मधे किंवा तिथेच जवळपास काही रेस्टॉ. मधे डीनर आणि डान्स शो असतात त्यातला एक आम्ही आमच्या हॉटेल च्या रेको. मुळे जाऊन बघितला. मजा आली आम्हाला. एनर्जेटिक डान्स आणि भयंकर सुंदर कॉस्च्युम्स.तिथे पण जायला हॉटेल ची ट्रान्स्फर सर्विस होती त्यामुळे कार ची उणीव भासली नाही .
एकूण साइट सीइंगपेक्षा रिलॅक्सिंग ट्रिप म्हणून कॅनकुन बेस्ट आहे.
धन्यवाद सगळ्याना.
धन्यवाद सगळ्याना.
@maitreyee
तुम्हाला आठवत असेल तर तुमच्या रिसॉर्ट्ची , डान्स शो आणि जिथले जेवण आवडले त्या रेस्टॉ. ची नावे सांगू शकाल का?
अजय, आम्ही ह्या ऑल
अजय, आम्ही https://www.melia.com/en/hotels/mexico/cancun/paradisus-cancun/rooms.html
ह्या ऑल इन्क्लुसिव्ह रिसॉर्टमध्ये राहिलो होतो. लोकेशन, बीच, हॉटेल रुम्स वगैरे मस्त होतं. ऑल इन्क्लुसिवच्या जेवणाचं कौतुक पहिल्या दिवशी वाटतं आणि नंतर कंटाळा येतो रोज तेच तेच बघून आणि खाऊन.
साईट सिंईंगचं मैत्रेयीने सांगितलं आहेच.
Dhanywad
धन्यवाद सायो.
आम्ही रॉयल सँड्स ला राहिलो
आम्ही रॉयल सँड्स ला राहिलो होतो. रेस्टॉ चे नाव आठवायचा प्रयत्न करत होते म्हणून आधी लिहिले नाही, आता आठवलं.
http://captainscoverestaurant.com/entertainment-and-events.php
बायदवे तो डान्स शो फक्त सोमवारी असतो. इतर दिवशी कॅरिओकी वगैरे इतर काही असते.
या रेस्टॉ . चे रॉयल रिजोर्ट्स शी काहीतरी टाय अप आहे म्हणून आम्हाला रेको. करण्यात आले होते. मी आणि लेकीने तो शो एंजॉय केला आणि इतर मंडळींना फूड पण आवडले.
आम्ही कॅनकून ला ८-९
आम्ही कॅनकून ला ८-९ वर्षांपूर्वी गेलो होतो. क्रूझ आणि ऑल इन्क्लुझिव्ह रीसॉर्ट हे आम्हा दोघांच्या पत्रिकेतच नसल्याने आम्ही मॅरिऑट मधे राहिलो होतो. तिथला अनुभव अगदी छान होता. टाइम शेअर वाल्यांचा फारसा उपद्रव जाणवला नाहि. समुद्राचा व्ह्यू असलेली रुम आवर्जून बूक केली होती . सकाळी, संध्याकाळी बाल्कनीत बसून चहा / कॉफी / रंपा इ प्यायला फार मस्त !
एक दिवस रीसॉर्टच्या आवारात आणि एक दिवस बाहेर ट्रिप असे अल्टर्नेट करत होतो. इस्ला मुहेरेस , एक्स कारेट आणि तुलुम एकेक दिवस गेलो. लहान मुले असतील किंवा पोहण्याची / स्नोर्केलिंग ची सवय - आवड असेल तर एक्स कारेट बेस्ट आहे. नाहीतर भरमसाठ एंट्री फी आणि आत जाऊन करण्यासारखे काही नाही.
तुलुम इथे मायन रुइन्स आहेत. गाइड छान माहिती देतात. मागचा समुद्र किनारा एकदम टॉप टेन आहे. मऊ सूत वाळू, नितळ पाणी आणि जेंटल वेव्ह्स. आम्ही गेलो तेंव्हा तिथे काही सोयी नव्हत्या पण किनारा अतिशय स्वच्छ होता.
गावात मध्यावर एक शॉपिंग एरिया आहे - मुंबै मधले एल्को आर्केड टाइप. छोटी छोटी हँडिक्राफ्टची दुकाने आहेत. तिथल्या फूड कोर्ट मधे त्यातल्या त्यात ऑथेंटिक फूड मिळत होते.
गाडी असल्यास रेसिडेंशियल भागात बरीच रेस्टॉरंट्स आहेत. आम्ही पुएब्ला आणि युकातान स्पेशल अशा दोन रेस्टॉ मधे गेलो होतो. मिडल इस्टर्न रेस्टॉ पण होती असं वाटतंय पण आम्ही गेलो नाहीत.
मॅरिऑटमधे अमेरिका , कॅनडा, यू के इथून आलेली भारतीय मंडळी बरीच भेटली. तिथे शाकाहारी लोकांसाठी जेवणाची सोय चांगली आहे. गावातल्या रेस्टॉ मधे मात्र शाकाहारी पदार्थ कितपत मिळतील कल्पना नाही.
सॉरी फॉर अवांतर- पण
सॉरी फॉर अवांतर- पण माझ्याकडून शिर्षक सारखं ‘काकूंनं मेक्सिकोत काय पहावे? ‘ असं वाचलं जातंय.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आणखीन एक अजय, जर ऑल इन्क्लुसिव्ह रिसॉर्ट्समध्ये रहाणार असाल तर त्या रिसॉर्ट परिसरातच स्पेशल्टी रेस्टॉरंट्स असतात जिथे बुकिंग करावं लागतं. तेव्हा रिसॉर्ट्मध्ये पोचल्या पोचल्या ते करुन टाका. फॉर्मल घाला वगैरे लोकं म्हणतात पण त्याची गरज नाही, स्मार्ट कॅजुअल्स चालतात.
वर मैत्रेयीने लिहिलंय ते साईट सिंईंग फारच महाग वाटलं. एक्स कॅरेट पार्कला जाऊ नका अजिबात. नॉट वर्थ द होल डे अँड मनी.
धन्यवाद maitreyee, मेधा, सायो
धन्यवाद maitreyee, मेधा, सायो. सध्यातरी ऑल इन्क्लुसिव्ह नको असे ठरते आहे कारण एकच जण सामीष खाणार, रंपा दाबून पिऊन वसूल करणारा कुणी नाही . यापूर्वी दुसरीकडे क्रूझ , ऑल इन्क्लुसिव्ह झाले आहे त्यामुळे थोडा वेगळा प्रयत्न आहे. कांकून ला भोज्या ठेवून इतरत्र हिंडण्यापेक्षा , तिथे १-२ दिवसच राहून आजूबाजूलाच छोट्या छोट्या गावी/हॉटेलात राहून भटकंती करावी असा विचार करतो आहे.
तिथे १-२ दिवसच राहून
तिथे १-२ दिवसच राहून आजूबाजूलाच छोट्या छोट्या गावी/हॉटेलात राहून भटकंती करावी असा विचार करतो आहे.>> ही बेस्ट आयडिया आहे .
इथे प्रवासवर्णन लिहा(च) मग.
आम्ही जाणार आहोत पण just
आम्ही जाणार आहोत पण just relax with beach cabanas, pool, ocean , ocean views , cultural entertainment shows इ. फक्त एंजॉय करावे कि टुर्स घ्याव्यात याबद्दल कनफ्युज आहे.
तिथे गेल्यावर ठरवु बहुतेक टुर्स घ्यायच्या कि नाहीत.