या भागात आपण पेपर क्विलिंग चे fringed फूल कसे बनवायचे ते पाहूया.
Fringed flowers बनवण्यासाठी लागणारे साहित्य- यासाठी आपल्याला काही बेसिक टूल्स लागतील.
10mm क्विलिंग स्ट्रिप्स,
रंगीत क्राफ्ट पेपर,
कैची,
ग्लू,
रुलर,
क्विलिंग नीडल.
रुलर आणि कैचिचा वापर करून तुम्हाला हवी त्या जाडीची स्ट्रिप्स कापून घ्या अथवा 10mm स्ट्रिप्स घ्या. 2 स्ट्रिप्स एकमेकांना चिकटवून मोठ्या लांबीची एक स्ट्रिप बनवा. कैचीच्या साहाय्याने या स्ट्रिप ना fringes बनवा. Fringes बनवण्यासाठी टूल्स देखील उपलब्ध आहेत. जर मोठ्या प्रकरणात fringes बनवायचे असतील तर हे टूल्स उपयोगी पडतात तसेच वेळ देखील वाचतो आणि एकसारख्या आकाराचे fringes मिळतात. Fringe टूल ची माहिती आपण पहिल्या भागात बघितली.
Fringed स्ट्रिप
Fringed flower बनवण्यासाठी fringe केलेलइ स्ट्रिप घ्या. दुसरी कोणत्याही तुमच्या आवडीच्या रंगाची साधी स्ट्रिप त्याला चिकटवा.
साध्या स्ट्रिप चे टोक quilling निडल मध्ये घालून कॉईल बनवायला सुरुवात करा.
Fringed स्ट्रिप काळजीपूर्वक रोल करा जेणेकरून साध्या कॉईल वर ती नीट गुंडाळली जाईल. कॉईल पूर्ण झाली की glue लावा. ग्लू नीट सुकल्यावर fringes खाली वळवा. झाले फूल तयार…
ही फुलं तुम्ही हेअररबॅण्ड, हेअरक्लिप, गिफ्टबॉक्स वर लावून सजवू शकता. Paperclip वर लावून बुकमार्क बनवू शकता.
(सर्व फोटो आंतरजालावरून साभार)
पेपर क्विलिंग- 3 (fringed flower)
Submitted by jui.k on 6 January, 2018 - 03:19
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर.. मस्त ट्युटोरिअल
सुंदर..
मस्त ट्युटोरिअल
थँक्स टीना
थँक्स टीना