उच्च विचारसरणी

Submitted by भरत. on 27 December, 2017 - 00:21

कर्नाटकातल्या कोपल जिल्ह्यातील कुकनूर येथे ब्राह्मण युवा परिषदेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी सेक्युलर लोक, भारताची घटना यांबद्दलचे आपले मौलिक विचार श्रोत्यांपुढे मांडले.
" आजकाल सेक्युलर प्रस्थ बोकाळलं आहे. कोणी म्हटलं की, " मी मुस्लिम आहे, मी ख्रिस्ती आहे, मी लिंगायत आहे किंवा मी हिंदू आहे," तर मल बरं वाटतं; कारण या लोकांना त्यांचं मूळ माहीत असतं. पण हे जे लोक स्वतःला सेक्युलर म्हणवतात, त्यांना काय म्हणावं तेच मला कळत नाही. या लोकांना आपल्या धमन्यांतून कोणाचं रक्त वाहत आहे, हे माहीत नसतं. त्यांना स्वतःची अशी ओळख नसते. आपले आईबाप कोण आहेत हे माहीत नसतं. पण हे लोक बुद्धिवादी असतात."
पुढे ते म्हणाले, लोकांनी आपापल्या धर्माच्या आणि जातीच्या आधारावर ओळखलं जावं. अशा व्यक्तींना मी नमन करेन. पण तुम्ही स्वतःला सेक्युलर म्हणवत असाल तर तुम्ही आहात तरी कोण? असा प्रश्न मला पडेल.

भारताच्या घटनेबद्दल ते म्हणाले "भारताची घटना ही जणू आंबेडकरस्मृति आहे. मला या घटनेबद्दल आदर आहे. पण यापुढे ती बदलली जाईल. आम्ही इथे (सत्तेत/राजकारणात) त्यासाठी आहोत. त्यासाठीच आम्ही इथे आहोत."

सेक्युलरिज्मपासून भारताच्या घटनेची मुक्तता करणे, (भारतीय मूल्यांची तिथे प्रतिष्ठापना करणे) , ज्यायोगे प्रत्येकाला आपल्या धर्माने, जातीने, वंशपरंपरेने (इथे वंश= बीज, रक्त, गुणसूत्र bloodline) ओळखले जाऊ शकेल, हे भाजपचे ध्येय आहे.

सरसंघचालकांनी ज्याचं अनेकदा सूतोवाच केले आहे , ते विचार, बेत, उद्दिष्ट एका भाजप सदस्याकडून, केंद्रीय मंत्र्याकडून, कर्नाटकच्या संभाव्य मुख्यमंत्र्याकडून उघडपणे सांगितले गेले हे छान झाले.

टीप : इथे मला बिहारी लोकांच्या डीएनएत असलेल्या दोषांची आठवण झाली. शस्त्रक्रिया करून ते डीएनए आता सुधारले आहेत. पण आपण कोणत्या वंशाचे आहोत हे माहीत नसणे यासाठी प्रत्येक बोलीभाषेत काही ना काही सुंदर शब्द आहेत. ते इथे लिहायची गरज नाही. अनंतकुमार हेगडे यांनी सेक्युलर लोकांसाठी एक नवे विशेषण सुचवून नेटभगव्यांसाठी एक टांकसाळच उघडून दिली आहे. त्यांचे अभिनंदन.

टीप :- भाजपच्या उच्च विचारसरणीचे साक्षात्कार घडवणारे आणखीही काही प्रसंग गेल्या दोनतीन दिवसांत घडले आहेत. त्यांबद्दल क्रमशः याच धाग्यावर.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users