आपल्या भारतात फार पूर्वी रामराज्य का काय होते म्हणतात. तशीच स्थिती सांप्रतकाली पुन्हा भारतास प्राप्त झालेली आहे. ह्या घडीस भारतात कोणी गुन्हेगारच राहिलेला नसल्याचे शुभवर्तमान वेळोवेळी जनतेला मिळेल, ह्याची पुरेपूर खात्री नियंत्याने सध्या घेतलेली दिसते. 'आम्हाला काम मिळू द्या, काम न होता पगार मिळण्याचे दुर्भाग्य आमुच्या भाळी नको' अशी आर्त विनवणी पोलिस, वाहतूक नियंत्रक इ. इ. यंत्रणा रस्तोरस्ती उभी राहून मायबाप सरकारकडे करत असतात. परंतु लायसन्स नसलेले, डोळ्यांसमोर सिग्नल तोडून जाणारे, गल्लोगल्ली लहान मुलींच्या शरीराचा बाजार वगैरे मांडणारे, राजकीय पुंडाई करणारे वगैरे लोक कुणी त्यांना दिसतच नाहीत. ह्याचे कारण म्हणजे ह्या देशात कोणी गुन्हेगार राहिलेले नाहीतच मुळी! 'आपणच आपल्या मोहावर नियंत्रण ठेवावे' वगैरे वचने सर्वांनीच अंगी बाणवून घेतलेली दिसतात. भारतीय तत्वज्ञानाचा असा व्यक्तीव्यक्तीमध्ये झालेला आविष्कार हेवा वाटावा असाच आहे.
आजच भारतीय न्यायव्यवस्थेने ह्यावर पुन्हा शिक्कामोर्तब केले. ह्या न्यायव्यवस्थेच्या पोतडीतून निघालेली अनेक रत्ने आपण वेळोवेळी पाहिलेली आहेतच. फुटपाथवरची माणसे असो, की जंगलातली हरणे, प्रत्येकाला कडेकोट न्याय मिळेल ह्याची काळजी हीच न्यायव्यवस्था घेते. उपरोल्लेखित पोलिसांना तोंडी लावायला का होईना पण काम मिळावे, म्हणून चित्रपटगृहांत राष्ट्रगीत लावणारी हीच मायबाप व्यवस्था. भारतात गुन्हे नाहीतच म्हणून ते थोडेतरी निर्माण होऊन आपल्या अस्तित्वाचा हेतू साध्य व्हावा, म्हणून असे ३७० प्रकार ही व्यवस्था करत असते. पण भारतीय लोक मुळातच गुन्हे करत नसल्याने ते तिचे सर्व प्रयत्न हाणून पाडतात, आणि तिला ह्या लोकांची निर्दोष सुटका करावीच लागते.
आज पुन्हा एकदा हा प्रत्यय आला. २जीघोटाळ्यातील सर्व संशयितांना आमच्या न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. सध्याच्या सरकारच्या काळात भारतात गुन्हे सापडणे अजूनच मुश्किल आहे असे ऐकतो. त्यामुळे हे होणारच होते. त्यातून काही असलेच, तर आदरणीय पंतप्रधान निवडणूक प्रचाराच्या सभांमध्येच न्यायव्यवस्थेचे काम स्वतःच परभारे करून टाकून निकाल लावतात. अश्या न्यायास तत्पर आणि गुन्हेच नसलेल्या देशाचे आपण नागरिक, ही भावनाच किती सुखद आणि रोमहर्षक आहे, ह्याची जाणीव इतर देशातल्यांना कुठली यायला!
अहो,
अहो,
यांना रामदेव बाबाचेच औषध द्यायला हवे.
पाश्चात्य वैद्यक नकोच.
दिसत नसेल तर गप गुमान पडावे घरी. चष्मा, ही पाश्चात्य गोष्ट आहे.
लालूंना झालेली शिक्षा भारतात
लालूंना झालेली शिक्षा भारतात अजून गुन्हेगार आहेत याचे द्योतक आहे
आणि हो हे राहुल मुळे झाले बरं का त्याने तो अध्यादेश फाडला नसता तर सर्व पक्षाच्या पाठिंब्याने कुठल्याही नेत्याला अटक करता आली नसती असा कायदा निर्माण झाला असता आणि आज लालू बाहेर फिरत असता
कोर्टाने ताशेरे हे लिलाव का
कोर्टाने ताशेरे हे लिलाव का केला नाही यावर ओढले आहे. >>> हो. आणि त्याच बरोबर तत्कालीन पद्धतीची अंमलबजावणी करताना जे घाईघाईत बदल केले - तारखा मागे खेचणे वगैरे- त्यावरही.
बाय द वे - तुमचे ते लिलाव न करण्याचे धोरण आधीपासूनच असणे वगैरे बरोबर आहे. १९९९-२००१ च्या मधे कधीतरी ते ठरले असे दिसते. कोर्टाने त्यालाच चुकीचे ठरवले.
जे आत्ता निर्दोष सुटले आहेत त्यांची मीडिया ट्रायल इथे करायची गरज नाही. पण मुळातच स्कॅम काहीच नव्हता आणि एका सज्जन सरकारला खाली खेचण्यासाठी जनतेला उल्लू बनवण्यात आले ही फार मोठी उडी आहे. ज्यांना भाजपला, काँग्रेसला फ्री पास द्यायचे आहेत त्यांना देउ द्या. पण प्रत्यक्षात असे दिसते की खटला तर उत्साहात भरला गेला पण पुढे इच्छाशक्ती कोणाचीच नव्हती काही करण्याची.
मात्र खुद्द मनमोहन सिंग यात नसावेत असे कायमच वाटत होते/वाटते - आणि सुदैवाने ते तसे आहे! त्यांना undermine करण्याचे अनेक प्रयत्न काँग्रेस मधून २००९ पासून पुढे होउ लागले असे माहीत होते. या खटल्याबद्दल वाचताना ते आधीपासूनच होत होते हे उघड होते.
एक बोलकी whatsapp post.
एक बोलकी whatsapp post.
Miracle - A land called INDIA
No one killed Jesica
No one killed Sunanda Pushkar
No one killed Arushi
No one killed people sleeping on the foot path
No one killed the Black Bucks
and now
No one Conned the country of 1.7 Lakh Crores
and in future
No one will be guilty in Coal Scam
No one will be guilty in CWG Scam
No one will be guilty in National Herald Scam
No one will be guilty in Augusta Westland Scam
No one will be guilty in any SCAM
ONLY WE IDIOTS ARE GUILTY OF WASTING OUR TIME WATCHING THE DISCUSSIONS OF THESE SCAMS ON TV
*Incredible India* for sure.
बर्मन्ग त्य साधवि नि
बर्मन्ग त्य साधवि नि पुरोहितावर्ला मोक्का काधल्याच काय कराच ? काई खब्बर्बात?
गाधी हत्या आणि मी वाचले आहे
गाधी हत्या आणि मी वाचले आहे का?
*Incredible India* for sure.
*Incredible India* for sure. >>>>> हे घ्या अजुन , ताजे ताजे, किती वेळ जुने उगाळत बसणार !
No one killed Justice Loya
No one killed 49 people in Vyapam
No one killed Akhlaq
No one killed Rohit Vemula
No one killed Najeeb Ahmed
No one will be guilty in KG basin scam
No one will be guilty in Sahara Biral scam
No one will be guilty in panama papers
No one will be guilty in Paradise papers
No one will be guilty in Chikki scam
अहो
अहो
दिन दयाळ उपाध्याय यांचा ही वध कोणी केला हे माहीत पडले नाही
Submitted by दत्तात्रय
Submitted by दत्तात्रय साळुंके on 26 December, 2017 - 22:39 आणि त्यावर राहुलका ह्यांची पोस्ट आवडली
कोथरूड:- नीलेश घायवळची सुटका
कोथरूड:- नीलेश घायवळची सुटका
काय टायमिंग आहे.....
Pages