विशाल भारद्वाजने मनावर घेतलेली भारतीय प्रेम कहाणी- भाग ४
पक्याने दादांच्या ड्रायव्हरला फोन करून गाडी मागवली.
शोभनाला बसायला सांगून , परिक्षित बाजूच्या छोट्या खोलीत शिरला, शोभनाने बसल्या बसल्या आजूबाजूला नजर फिरवली ,
“लोकांचे पण काय षौक असतात, साला .. हे सगळे बेडरूममध्ये करायचे सोडून लायब्ररीत करायचा प्लान?? जाऊ दे, माणूस थोडा येडा वाटतोय.” तसेही हि मगासपासून, तिला अगम्य असणाऱ्या विषयात स्वारस्य दाखवून ती कंटाळली होती. मेंदूचे विमान टेक ऑफ करायच्या तयारीत असताना आणि डोक्यावर वेगळेच भूत स्वर असताना फालतू गोष्टीत इंटरेस्ट दाखवणे तिला फार कठीण जात होते. मात्र त्याचवेळी आपण काहीतरी कारण देऊन इकडून निघावे, घरी जाऊन सकीना ला उठवावे आणि तिच्याशी बोलत बसावे असे तिला वाटू लागले.
तेव्हाढ्यात परिक्षित आतून ऑरेंज ज्यूसचे ग्लासेस घेऊन आला . मागच्या कपाटातून २-३ पुस्तके निवडून ती सुद्धा टेबलवर ठेवली, रिमोटने कोपऱ्यातील म्युझिक सिस्टम सुरु केली. jazz च्या आर्त सुरांनी खोली भरून गेली. शोभनाला हे संगीत नवे होते, कमीतकमी वाद्यात साकारलेली सुरावट काळजाला हात घालत होती मात्र त्याचवेळी ते संगीत मनाला सुखवत होते. तिने खोलवर मनात वर्षानुवर्ष गाडून टाकलेले काहीतरी उसळ्या मारून वर येण्याचा प्रयत्न करत होते. तिला जोरजोरात रडावेसे वाटत होते.
शोभना बसलेल्या सोफ्याला काटकोन करून असणाऱ्या सोफ्यावर परिक्षित येऊन बसला,
“घे ” आपला ग्लास उचलत तो म्हणाला. समोरचे एक पुस्तक उचलून तो काही संदर्भ शोधू लागला.
“अरे, यार...जे करायला मला इथे आणलस ते कर ना...किती नाटके करशील?” शोभनाचे स्वगत चालू झाले.
न राहवून तिने त्याच्या गुडघ्यावर हात ठेवला, त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही, २ सेकंद वाट पाहून तिने तो वर सरकवला. त्याने शांतपणे तिचा हात उचलला, आपल्या दोन्ही हातात घेतला. तिच्या नजरेत नजर घालत तो म्हणाला,“ शोभना, तू एक खूप चांगली मुलगी आहेस. I really like you. मला तुझ्यामधलं सगळ्यात काय आवडले सांगू? आपल्याला ज्यातले ओ का ठो कळत नाही, तो विषय देखिल तू किती इंटरेस्टने ऐकतेस!!.“ असे म्हणून त्याने एक खट्याळ स्मितहास्य केले. गेले दीड, दोन तास आपण करीत असलेले नाटक असे फसलेले पाहून शोभना वरमली, पण तेव्हाच होणार्या पराभवाच्या जाणीवेने अंतर्बाह्य पेटून उठली. आज पहिल्यांदाच असे होत होते कि तिच्या आवाहनांना कोणी पुरुष प्रतिसाद देत नव्हता, हा अपमान तिला टोचत होता.
ती उठली, त्याच्या सोफ्याच्या handrest वर बसली आणि त्याला मिठीत घेतले. त्याचे डोके आपल्या छातीवर तिने दाबून धरले. त्याने हळुवारपणे स्वत: ला सोडवले, आणि तो उभा राहिला, तिलाही त्याने उभे केले. आणि तिला परत मिठीत घेतले. मात्र हे प्रणयाचा पूर्वरंग उधळणारे घट्ट घट्ट आलिंगन नव्हते. तर ती मित्राला स्पर्शातून आपला आधार सांगणारी,पण त्याचं वेळी त्याच्या वैयक्तिक स्पेस चा आदर करणारी, वासनेचा स्पर्श नसणारी मिठी होती.
शोभनाला सुद्धा काहीतरी वेगळे जाणवत होते, पण समोरच्या पुरुषाला जिंकण्याची सवय तिला मागे फिरु देत नव्हती. धुंदपणे तिने आपला चेहरा वर केला आणि प्रणयोत्सुकपणे आपले ओठ पुढे केले. त्याने मात्र चेहरा फिरवून तिच्या डोक्यावर आपले ओठ टेकवले
हा शोभनासाठी ब्रेकिंग पोईंट ठरला. ती अचानक मिठीतून बाहेर पडली आणि सोफ्यावर मान खाली घालून बसली. अपेक्षित परिणाम मिळाल्याचे समाधान परीक्षित च्या चेहऱ्यावर दिसले. त्याने पुढे होऊन तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. हा लहानसा स्पर्श देखील शोभनाला सहन झाला नाही , तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हुंदके देऊन ती रडू लागली. परिक्षितने हलकेच तिच्यासमोर टिश्यूपेपर चा बॉक्स सरकवला आणि शांतपणे तिच्या समोर दुसऱ्या सोफ्यावर बसला.
थोडा वेळ तिला तसेच रडू दिल्यानंतर परीक्षितने तिच्या समोर पाण्याचा ग्लास धरला, “feeling better now? मोकळं वाटतंय? आपण एक काम करूया, सी फेसवर चक्कर मारून येऊया, मोकळ्यावर तुला बरं वाटेल, मग तुला बोलावेसे वाटले तर तू बोल.”
डोळे पुसत, मूकपणे तिने हो म्हणून मान हलवली आणि बाहेर जाण्यासाठी उभी राहिली.
दोघे खाली आले, बाहेर पडण्याआधी परिक्षित आतल्या खोलीत जाऊन एक स्टोल घेऊन आला, आणि शोभनाच्या खांद्यावर टाकला. दोघे पायीच निघाले. बांद्रा हिल उतरून ते समुद्रकिनारी आले. मुंबईचा गजबजलेला समुद्रकिनारा आता शांतावला होता, एरवी ट्राफिकच्या आवाजात हरवलेली समुद्राची गाज आता स्पष्ट ऐकू येत होती. शोभनाला त्या गाजेत मगासच्या संगीताचा भास झाला.
निशब्दपणे त्यांनी चालायला सुरवात केली, पण शोभनाच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. आज पहिल्यांदीच तिला एका पुरुषाबरोबर भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटत होते. याच्याशी सगळे सगळे बोलून मोकळे व्हावे असे तिला फार वाटत होते, तेव्हाच आपला भूतकाळ उघड करणे म्हणजे आपल्या भविष्यातील सुरक्षिततेला सुरुंग लावणे आहे हे सुद्धा तिला कळत होते. आपल्या आयुष्यातील कोणता भाग सांगावा आणि कोणता सांगू नये याचा ती विचार करत होती.
विचारांच्या तंद्रीत तिची चाल क्षणभर मंदावली, त्यांच्यामध्ये काही पावलांचे अंतर पडले आणि तिच्या दंडाला एक मजबूत पकड जाणवली. भीतीने तिने वळून पहिले, आता मात्र आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले तो पक्या होता.तिच्या तोंडून एक चित्कार निघाला,
काही पावले पुढे असणाऱ्या परिक्षितने दचकून वळून पहिले तेव्हा एक मवाली शोभनाला खेचत काळ्या काचांच्या गाडीकडे घेऊन जाताना दिसला.परिक्षित एका ढांगेत त्यांच्या पर्यत पोहोचला, त्याने पुढे काही करायच्या आत, त्या मवाल्याने त्याला मागे ढकलून दिले, आणि उघडा चाकु नाचवत तो म्हणाला “तुम इसमे मत पडो साहाब, ये हमारा आपसी मामला है”, बेसावध परिक्षित दिव्याच्या खांबावर आदळला, त्याला कानशिलावर काहीतरी ओल जाणवली आणि त्याला भोवळ आली.
पक्याने शोभनाला गाडीत ढकलले, ड्रायव्हरने दारे लॉक केली आणि गाडी सुसाट सुटली. मागोमाग पक्या आपल्या बाईक वरून निघाला. हे सगळे ऑपरेशन इतक्या सुरळीत पार पडल्याचे त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होते. गाडीत टाकलेल्या शोभनाला दारू, मानसिक ताण, रात्रीचे जागरण आणि कारच्या स्पीडने कधी ग्लानी आली ते कळले नाही.
हे सगळे नाट्य २ बाईक वरचे ते ४ लोक थोड्या लांबून गुपचूप बघत होते, काळ्या काचांच्या त्या गाडीत किती लोक, किती तयारीनिशी असतील याचा त्यांना अंदाज नव्हता, आणि डिस्को मधून उचलून आणलेल्या एका फालतू पोरीपायी , बांद्रा सारख्या हाय सिक्युरीटी एरियामध्ये राडा करून लोकांच्या नजरेत येण्याचे त्यांना काही कारण नव्हते. मात्र त्यांनी पक्याला ओळखले, या घटनेमागे कोणाचा हात असू शकेल याचा अंदाज त्यांना व्यवस्थित आला होता.
मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये एक दुसर्याच्या पोरी उचलणे हि सर्वसाधारण गोष्ट असली तरी एखाद्या gang च्या बॉसच्या मुलाची छावी त्याच्या समोर उचलून नेणे हा मोठा गुन्हा होता. हे टोळीला दिलेले आव्हान होते, आणि हि हिम्मत एका छोट्याश्या स्थानिक टोळीने दाखवणे चिंताजनक होते. याचा बिमोड व्हायलाच हवा होता, आणि गरजेपेक्षा जास्त शक्ती लाऊन व्हायला हवा होता. याच निमित्ताने शक्तीप्रदर्शन करून मुंबईच्या अंडरवर्ल्ड मध्ये बॉस कोण आहे हे दाखवायची चांगली संधी होती.
ताबडतोब फोन झाले आणि दुसऱ्या दिवसाची योजना आखली गेली.
बांद्रा सीफेस वरून सुसाट सुटलेली गाडी थेट दादाच्या वस्तीत येऊन थांबली. शोभनाला जरी दादांनी मुलगी मानली असली तरी ते एका घरात राहत नव्हते, सद्य स्थितीत हि व्यवस्था पथ्यावरच पडली. गाडी मनाच्या जिन्याला खेटून उभी केली, पक्याने अक्षरशः खांद्यावर उचलून शोभनाला वर नेले. आणि तिच्या बिछान्यात झोपवले. शोभनाचा अवतार पाहून कावेरी दचकल.
“ ताई को कुछ हुआ नाही है, एकदम सेफ है, लेकीन अभी वो थकी होगी, सुबह जबतक वो खुद्से ना उठे तब तक उसे सोने देना, और हा... जब तक उससे बात ना हो, दादा को कुछ नही बताना” इतके सांगून पक्या निघूनपण गेला.
जेमतेम ३-४ तास गेले असतील, टोळधाड यावी तश्या २ उघड्या जीप्स गल्लीत घुसल्या, त्यातून उतरलेले गुंड दुकानांच्या दारात झोपलेल्या पंटर लोकांना झोडपून काढू लागले. पहाटे पहाटे दुकानं उघडणारे चहावाले, इराणी, पेपरवाले याचा पहिला बळी ठरले, एका वाईन शॉप चे शटर फोडून आत तुफान तोडफोड केली. ३-४ लोक गल्लीभर पक्याचा शोध घेत फिरत होते, पक्याचे डोळे उघडायच्या आत त्याच्या मुसक्या बांधून त्याला एका जीप मध्ये टाकले. दादा चे लोक भानावर येऊन प्रतिकारासाठी पुढे येई पर्यंत आपला कार्यभाग आटपून जीप्स परत सुद्धा गेल्या होत्या.
पक्याला उचलून नेल्याची बातमी बस्तीत आगीसारखी पसरली. काल झालेला प्रकार आणि आज झालेला हल्ला यात काहीतरी संबंध असावा असे कावेरीला राहून राहुन वाटू लागले. काल झालेला प्रकार दादाच्या कानावर घालायचे तिने ठरवले.
दादाच्या खोलीला युध्द शिबिराचे रूप आले होते. खर तर गेले कित्येक वर्ष दोन्ही टोळ्या आपापल्या आखून घेतलेल्या वर्तुळात राहात होत्या, अधून मधून कुरबुरी होत पण त्याचे पर्यवसन कधीच टोळीयुद्धात झाले नव्हते.आज अचानक ती शांतता इतक्या हिंसक पद्धतीने तोडली गेली याचे दादाला आश्चर्य वाटत होते. कावेरीला आलेली पाहून, त्यांनी बाकी लोकांना बाहेर घालवले. थोड्या वेळाने कावेरी जाऊन सकीनाला उठवून घेऊन आली, सकीनाचे बोलणे संपले तेव्हा दादांच्या चेहर्याचा रंग उडाला होता.
शोभना जागी झाली तेव्हा तिचे डोके जड झाले होते. उठल्यावर आपले कपडे पाहून कालची रात्र तिला पुन्हा आठवली, पण ती संपूर्ण रात्र तिला स्वप्नासारखी आठवत होती,नेमक्या कोणत्या ठिकाणी ते स्वप्न संपले आणि गाढ झोप सुरु झाली हेच तिला आठवत नव्हते. ती पलंगावरून उठली, पलंगाखाली पडलेला स्टोल तिने खांद्याभोवती लपेटून घेतला आणि ती खिडकीपाशी आली, खालच्या रस्त्याची एखादे वादळ येऊन जावे तशी अवस्था झाली होती, रस्त्यात काचांचा खच पडला होता, उभ्या असलेल्या कार्स च्या काचा फोडून टाकल्या होत्या, रस्त्यावरची वर्दळ कर्फ्यू लागला असावा इतकही कमी होती. घरात मौसीची चाहूल लागत नव्हती, सकीना तशीही या वेळी घरी नसायचीच,पण आज तिचे अंथरूण पण तिने आवरून ठेवले नव्हते. दार हलवून पहिले तर मुख्य दाराला बाहेरून कुलूप होते.
एकंदरीत शोभनाला कुठल्याच गोष्टीची संगती लावता येत नव्हती. शेवटी एका ग्लास मध्ये गार लिम्बु पाणी घेऊन ती सोफ्यावर बसली.
थोड्या वेळात कुलूप उघडल्याचा आवाज आला, कावेरी आणि तिच्यामागून मान खाली घालून भयभीत सकीना आत आल्या.
“मौसी, ये सब क्या चल रहा है? मेरेको कुछ समझ नही आ रहा है” शोभा कुरकुरली.
“ लो सुन लो इसकी बात, madam इतना बडा कांड करके आई है, और बोलती है कि कुच समझ नाही आता” कावेरी उपरोधाने म्हणाली, “ गणेशभाई च्या लोकांनी बस्तीवर हमला केला, पक्याला घेऊन गेलेत और ये सब तेरे वजह से हुआ है”. कावेरी एकामागून एक बॉम्ब टाकत होती.
“पक्या जिवंत हवा असेल तर त्यांनी तुला त्यांच्या हवाली करायला सांगितले आहे.” हुंदके देत सकीना तिला म्हणाली,” देख, इस खेल मै बोहोत खतरा है ,कहती थी ना मै?” सकीनाचे रडून सुजलेले डोळे आणि सुजलेला एक गाल ,तिला कशातून जावे लागले आहे याची साक्ष देत होते.” भाईच्या लोकांशी बोलायला दादा स्वत: गेलेत”’
“म्हणजे? दादांना सगळे कळले? मी काय करायचे ते सगळे?” शोभनाच्या चेहऱ्यावर भीती दाटून आली. “ काय म्हणाले ते?”
“ एक शब्दही बोलले नाहीत, पण चेहऱ्यावरून त्यांचे दु:ख कळत होतं. कोणाशीतरी फोनवर बोलताना मी ऐकले, ‘आपली ताकद खूप कमी आहे, या लफड्यात काय काय सोडावे लागेल काय माहित’ “. सकीना म्हणाली
शोभानावर जणू वीज कोसळली, आपल्या माणसाला सोडवण्यासाठी दादांची शोभनाला शत्रूला देऊन टाकायची तयारी आहे हे ऐकून तिचे त्राण गेले, काल तर काहीच झाले नव्हते, तरीही परीक्षित अशी विचित्र मागणी का करतो आहे हे तिला कळेना. दादांनी तिच्या दुसर्या रुपाबद्दल बोलणे म्हणजे तिचा निनावीपणाचा बुरखा फाडणे होते. शुब्बू कोण आहे ? हे थोड्याच अवधीत पूर्ण जगाला कळणार होते, मग तिने अपमानित केलेल्या एखाद्या मुलाला तिच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नव्हता, दादांचे भक्कम संरक्षण नसेल तर कोणीही, कधीही तिला उचलून नेऊ शकतो. झालेल्या अपमानाचा तो कसा बदला घेईल? लखलखणारे सुरीचे पाते पोटात खुपसेल? कि गळा चिरेल? कि एकाकी जागी एकटीला गाठून पाशवी बलात्कार आणि मग खुन? तेव्ह्ढ्याने त्याचा अपमान शमेल? कि आपल्याला नेऊन परत कुठेतरी विकेल? दूरदेशी? कुठे असू आपण? आई कोठ्यावरून बाहेर पडायला आयुष्यभर धडपडली, आणि मी? आपल्या कर्माने त्या वाटेवर चालले आहे, शोभाला विचार करता करता ग्लानी आली
आईच्या वाट्याला आलेला छळ,अपमान,अवहेलना आठवून तिला ढवळून आले, हे सगळे सगळे आपल्याला भोगायचे आहे, कदाचित जास्तच..... नाही, मला ते आयुष्य मंजूर नाही, असे आयुष्य जगण्यापेक्षा मी आयुष्य संपवून टाकेन,
शोभाचा निश्चय ठरला, तिने खोलीचे दार बंद करून त्याला कडी घातली, आपली झोपेच्या औषधाची बाटली काढली, त्यातल्या मुठभर गोळ्या बाहेर काढल्या, आता शांतपणे एक एक गोळी घ्यायची , आणि हळुवारपणे कायमचे झोपी जायचे या निश्चयाने तिने पहिली गोळी उचलली.
तेव्हड्यात दारावर थापा बसू लागल्या,
” शोभा, शोभा, दरवाजा खोल, बाहर आ, पक्या वापस आला आहे,” कावेरी उत्तेजित होउन ओरडत होती.”
“..और साथ मै मुझे उठाने के लिये आदमी लाया होगा,” शोभना ओरडून म्हणाली.
“नाही बेटा.. दार उघड , प्लीज” दादांचा आवाज आला.
त्या आवाजात संताप नव्हता चीड, हुकुमत नव्हती, आर्जव होते ....बेटा.... शब्दाला शोभना अडखळली, ती दादांना गेली १० वर्षे तरी ओळखत होती. जरी बाप म्हणून दादांनी तिला आपले नाव दिले असले तरी त्यांनी एक अंतर कायम राखले होते .‘बेटा’ म्हणून हाक मारण्याइतकी जवळीक त्यांच्यात कधीच नव्हती.
शोभनाने गोळ्या तश्याच मुठीत पकडून दार उघडले. खोलीत कावेरी, सकीना, पक्या आणि दादांशिवाय कोणी नव्हते. पक्याच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या पण एरवी तो व्यवस्थित दिसत होता.
“वाचलीस तू शोभा, आज परिक्षित होता म्हणून हे सगळे प्रकरण मिटले” दादा बोलू लागले.
“ त्याच्यामुळे मिटले? मुळात सुरु पण त्याच्यामुळेच झाले ना? आपली पोरगी पळवली, म्हणजे वाट्टेल ते करून हवा तितका जोर वापरून, तिला परत मिळवले पाहिजे, हेच केले ना त्यांनी पण?”
“ अरे नही ताई, मां कसम, इसमे उसका कोई हात नही, कालच्या धक्काबुक्की मध्ये तो जखमी झाला.ते पाहून गणेश भाई च्या पंटरनि इकडे येऊन राडा घातला, आज मला उचलून नेले आणि इकडे फोन केले, नंतर ओळख पटवायला मला त्याच्यापुढे उभे केले. तेव्हा त्याला सकाळपासून झालेला राडा कळला, सगळ्यात पहिल्यांदी त्याने त्या पंटर लोकांचे कान उपटले, मग मला बसवून माझ्याशी बोलला, दादांना फोन करून बोलावून घेतले, बराच वेळ तो आणि दादा दार लाऊन बोलत होते, नंतर आम्ही घरी आलो” पक्या गोष्टीचा त्याचा भाग सांगू लागला.
दादांनी शोभनाचा हात हातात घेतला, हळूच मुठ सोडवली, मुठीतल्या गोळ्या जमिनीवर घरंगळल्या. नंतर तिला बाजूच्या सोफ्यावर बसवले आणि एक घडी केलेला कागद तिच्यापुढे केला, “ तो खूप बोलत होता, मोठेमोठे शब्द वापरत होता, मला सगळे कळले नाही , पण जितके कळले तितके तुझी बाजू समजून घ्यायला पुरेसे आहे, शेवटी त्याने एक चिठ्ठी लिहिली, आणि तुला द्यायला सांगितली,”’
शोभानाने अधीरपणे ते पत्र उघडले, पत्र जरी घाईघाईत लिहिले असले तरी त्यातला व्यवास्थितपणा लपत नव्हता.
.....
“ शोभना,
ज्या अर्थी तू हे पत्र वाचते आहेस त्या अर्थीमाझा या प्रकरणात काडीचा सहभाग नाही, हे तुला कळले असेलच. आता मी जे लिहिणार आहे , ते समोरासमोर बसून बोलायला मला जास्त आवडले असते, जर काल ती घटना घडली नसती तर कदाचित वॉक वरून परत आल्यावर मी हे बोललो असतो.
तू मला डिस्को मध्ये भेटलीस तेव्हा पासून मी तुझे निरीक्षण करत होतो, तुला मी सांगितलेच कि मी सायकोलोजी शिकवतो. छोट्या छोट्या निर्हेतुक स्पर्शाला तू खूप जास्त react करत होतीस. मला त्याचे कारण कळत नव्हते, सुरवातीला तू नुसतीच एक इंटरेस्टिंग केस वाटलीस, म्हणून मी तुझ्याबरोबर अजून थोडा वेळ घालवायचे ठरवले. पण घरी जेव्हा तुझा ब्रेक डाऊन झाला तेव्हा तुला मदतीची गरज आहे असे तीव्रतेने वाटले. तुला वाटणाऱ्या स्पर्शाच्या भीतीचे , तुझ्या भूतकाळात लपलेले कारण मला समजून घ्यायचे होते.
तुझा भूतकाळ मला दादांकडून कळला, कलंकित बालपण काय असते हे मीसुद्धा काही अंशी अनुभवले आहे. मी तुझी व्यथा समजू शकतो.
पुरुष म्हणजे ऑप्रेस्सर हे तुझ्या मनात जणू गोंदवले गेले आहे.या पुरुषांवर कुरघोडी करून तू लहानपणीच्या शोभनाच्या मनातली भीती धुवून टाकायचा प्रयत्न करते आहेस. पण तसे नाहीये शोभना, भाऊ, बाप, मित्र ,सहकारी या सगळ्या रुपात तुला पुरुष भेटतील, दुर्दैवाने तुला लहानपाणी जी नाती मिळाली नाहीत, ती आता मिळवायचा प्रयत्न कर, बाहेर पड, नवीन अनुभव घे, नवीन नाती जोपास, माणसांनी दिलेले डाग मिटवण्यासाठी नवीन माणसे जोडणे हा एकाच उपाय आहे.
लहानपणा पासून तू पुरुषाच्या स्पर्शाचे एकच रूप पहिले आहेस, त्यामुळे कुठल्याही पुरुषाचा स्पर्श तुला झाला कि तुझ्या मनातील दाहक आठवणी वर येतात आणि तू ठरून गेलेल्या पद्धतीने त्यला उत्तर देतेस.
हे व्यसन आहे शोभना, तुझे समाधान करण्यासाठी, हळू हळू याचा डोस तुला वाढवावा लागेल. लहानपणी ज्युडो कराटे खेळून तू तुझे समाधान करायचीस, पुढे बस ट्रेन मध्ये अंगचटीला येणाऱ्या मुलांना रस्त्यात बडवून तुझे समाधान व्हायला लागले, आता तू एक पायरी पुढे गेली आहेस, तुझ्यासाठी यातले थ्रील पण लौकरच कमी होईल, मग काय करशील? अजून हिंसा ? खुन?
स्वत: ला सावर शोभना.
मी डॉक्टर नाही, मी तुला यातून बाहेर काढू शकत नाही, पण यातून बाहेर पडायला मदत जरूर करू शकतो. तुला जेव्हा कधी बोलावेसे वाटेल तेव्हा लक्ष देऊन ऐकणारा कान आणि मन मी जरूर बनू शकतो. मी भारतात तसाही महिन्याभरासाठी आलो होतो,कालच्या प्रकाराने आईला माझ्या सुरक्षिततेची काळजी वाटायला लागली आहे आणि मी आजच्या आज परत जावे असे तिचे म्हणणे आहे.
रात्री ३ वाजता माझे फ्लाईट आहे, जाण्या अगोदर एकदा मला तुला भेटायला आवडेल. मी संध्याकाळी ५ वाजता सीफेसवर, जिकडे आपण दुरावलो, त्याचं ठिकाणी तुझी वाट पाहीन. जर तुलासुद्धा भेटावेसे वाटत असेल तर मला तिकडे भेट.
तुझा मित्र,
परिक्षित
वाचता वाचता शोभनाचे डोळे भरून आले, तिने घड्याळात पहिले ४ वाजत आले होते.
पटपट कपडे बदलून शोभानाने ड्रायवरला गाडी काढायला सांगितले
आज पहिल्यांदीच मेकअप न करता शोभना एका पुरुषाला भेटायला जात होती.
समाप्त
कथेच्या नावा विषयी थोडेसे.
कथेच्या नावा विषयी थोडेसे.
खरेतर विशाल भारद्वाज चा इकडे काहीच डायरेक्ट रेफरन्स नाही'.
"कालिदासाने मनावर न घेतलेल्याकाही भारतीय प्रेमकहाण्या" कथा वाचली.
एक उपवर मुलगी मुलांना भुलवते, त्यांना आपल्या नादी लावते आणि त्यांचा हृदयभंग करून निघून जाते.
यथावकाश तिला खरे प्रेम करणारा मुलगा भेटतो.
साधारण हे कथासूत्र होते.
हेच कथासूत्र जर आजच्या रेफरन्स ने मांडायचे झाले तर काय कथा होईल याचा विचार करत होतो.
हिंदी चित्रपट सृष्टीत असे प्रयोग मोप झाले आहेत , जसे ऑथेल्लो चा ओमकारा, hamlet चा हैदर., देवदास चा देव-डी.
एकंदर सुरवातीला कथा लिहिण्याचा अप्रोच बराच कॅजुअल होता, आणि एक - फार तर २ भागात विडम्बना च्या अंगाने जाणारी कथा लिहायचे डोक्यात होते, त्यामुळे नाव ठेवायला फारसा विचार केला नाही. वरच्या चित्रपटांच्या दिग्दर्शकाचे नाव देऊन टाकले
पण पात्र कन्विन्सिंग करायच्या नादात कथा वाढतच गेली , आणि विडम्बनाच्या ऐवजी सिरिअस कथा आकाराला आली.
खरेतर या कथेला वेगळे समर्पक शीर्षक द्यायला हवे. पण पहिले २-३ भाग होईपर्यंत मलाच कॉन्फिडन्स नव्हता , आणि ३ भागानंतर नाव बदलल्याने लोकांचा गोंधळ होईल असे वाटले. त्यामुळे जुनेच नाव कंटिन्यू केले.
तुमच्या तुमच्या प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल परत एकदा धन्यवाद.
मस्त.. आवडली.खुप वेगळ्या
मस्त.. आवडली.खुप वेगळ्या पदधतीने संपविली कथा.
मस्त शेवट
मस्त शेवट
मस्त. आवडला शेवट पण.
मस्त.
आवडला शेवट पण.
खूप छान ..
खूप छान ..
चांगली जमलीय कथा .. अशाच कथा
चांगली जमलीय कथा .. अशाच कथा अजुन येऊ द्यात...
पु.ले.शु.
आवडली कथा ...
आवडली कथा ...
आणि खूप छान शेवट .
मस्त जमलीय कथा. लेखनाचा किडा
मस्त जमलीय कथा. लेखनाचा किडा चावलाय. त्याचे लाड करा आता.
जमलीय.
जमलीय.
पक्की बॉलीवूडीय स्टोरी आहे. तरी विशाल भार्द्वाजचा रेफरन्स नसता तरी चालंलं असतं.
विशाल भार्द्वाजचा रेफरन्स आल्याने शेवटचा भाग वाचताना सारखं डोक्यात "पहली बार मोहब्बत की है" वाजत होतं.
आवडली कथा.
आवडली कथा.
ज्जे बात!!!
ज्जे बात!!!
मला उगाच भिती वाटत होती की तुम्ही या दोघांचं प्रेम वगैरे जुळवताय की काय. पण तुम्ही मस्त वळणावर आणुन सोडुन दिलंत. यापुढे प्रत्येकाने आपापली कल्पनाशक्ती वापरावी.
लिहीत रहा, आम्ही वाचायला आहोतच
कथा अगदी छान वाटली.
कथा अगदी छान वाटली.
कथा आवडली आणि शेवट ही. असेच
कथा आवडली आणि शेवट ही. असेच लिहीत रहा...
आवडली कथा. छान लिहिली आहे.
आवडली कथा. छान लिहिली आहे. आणि शेवटसुद्धा मस्त जमला आहे.
शेवटचा भाग वाचताना सारखं
शेवटचा भाग वाचताना सारखं डोक्यात "पहली बार मोहब्बत की है" वाजत होतं.>>>> काय आठवण काढलीस सस्मित.माझ ऑट्फे गाण आहे हे.
विशाल भारद्वाजने मनावर घेतलेली भारतीय प्रेम कहाणी - पार्ट २ लिहा खरं.
विशाल भारद्वाजने मनावर
विशाल भारद्वाजने मनावर घेतलेली भारतीय प्रेम कहाणी - पार्ट २>>>>>> +१
पण ह्याचाच पुढचा भाग नको. मला दुसरी कथा आवडेल वाचायला.
वि. भा. कोण ते माहित नाय.. पण
वि. भा. कोण ते माहित नाय.. पण ही कथा छान फुलवली आहे आवडली.. विशेषतः शेवट जास्त आवडला. असेच लिहीत रहा.. शुभेच्छा..
गोष्ट आवडली. तो मारामारीचा
गोष्ट आवडली. तो मारामारीचा भाग फार पटला नाही पण ठिक आहे.
मस्त मी कास्टिंग सुरु
मस्त मी कास्टिंग सुरु केले सिनेमासाठी. कंगना रानावत आणि इर्फान खान. दादा- सौरभ शुक्ला, मौसी- रिचा चढ्ढा. सकीना स्वरा भास्कर. पक्या अर्षद वारसी किंवा पंकज त्रिपाठी.
पक्यासाठी नवाजुद्दिन घ्या
पक्यासाठी नवाजुद्दिन घ्या
हो ना, नवाजुद्द्दीन होताच
हो ना, नवाजुद्द्दीन होताच डोक्यात पण त्याला बिचार्याला जास्त काम नाही ना.
आवडली गोष्ट.
आवडली गोष्ट.
मै, भारी कास्टिंग!
मै, काम जादा रहो या कम....
मै, काम जादा रहो या कम.... कास्टींग परफेक्ट होणी चाहीये....
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=ql-GQ8EL8DY
मस्त कथा..
मस्त कथा..
अरे मस्त झाला शेवट पण. तसा
अरे मस्त झाला शेवट पण. तसा फिल्मी झाला पण ते अपेक्षितच होते
जबरदस्त. सिम्बा, कथा लगेच
जबरदस्त. सिम्बा, कथा लगेच कास्टींग सकट वि.भा.ला पाठवा.. ग्यारींटीड हिट्ट....
सिम्बा, शॉर्टफिल्मसाठी मला
सिम्बा, शॉर्टफिल्मसाठी मला द्या.. प्लिज.
मस्त, आपण तुमच्या फँन क्लबात
मस्त, आपण तुमच्या फँन क्लबात सामिल.।
छान झालीये कथा. आवडली. लिहित
छान झालीये कथा. आवडली. लिहित रहा.
Pages