प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.
https://www.maayboli.com/node/64155
समारोपाचे मनोगत :
काही अपरिहार्य कारणास्तव (कोणतेही कारण न सांगण्याकरिता हे एक चांगले कारण असते, नाही!!!? हा! हा!! हा!!) माझी ही मालिका मी थांबवत आहे. तरी मी असे करण्याचे कारण सांगतो. गेले दहा आठवडे म्हणजे अडीच महिने मी ही मालिका चालवत असताना एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली, की दर रविवारी मी मालिकेचा नवीन भाग प्रसिद्ध करतो. रविवार ते मंगळवार, बुधवार प्रतिक्रियांना उत्तरे देण्यात जातात. गुरुवार ते शनिवार पुन्हा नवीन भाग लिहितो. आणि रविवारी तो प्रसिद्ध करतो. गेले अडीच महिने हे असेच चक्र चालू आहे. त्यामुळे होतंय काय, की एकाच प्रकारच्या लिखाणात मी अडकून पडलोय. माझे इतर लिखाण आणि वैयक्तिक वाचन बंद झालेय. जरका मी अजून पुढील दहा भाग लिहिले तर पुन्हा पुढील अडीच महिने त्या चक्रात अडकून पडण्याची निश्चिंती झाली. आणि हे लेखक म्हणून मला नक्कीच परवडणारे नाही. लेखकाने नेहमी चौफेर लिखाण करावे या गोष्टीला माझ्या स्वतःकडूनच बाधा येत आहे.
आणि म्हणूनच खालील ११ फोटो आणि त्यांचे स्टेटस एकत्रच प्रसिद्ध करून माझ्या ह्या मालिकेला मी आज पूर्णविराम देत आहे. खालील फोटो आणि स्टेट्सना मी मेकिंग लिहिले नाही, याकरिता आपण नाराज व्हाल याची मला कल्पना आहे. त्याबद्दल मी आपली माफी मागतो. नऊ मेकिंगसहित वीस फोटो आणि त्यांचे स्टेटस अशा या मालिकेला आपण भरभरून प्रतिसाद दिलात, माझ्या कार्याचे कौतुक केलेत, एका नवीन प्रयोगाला पाठिंबा दिलात, याकरिता मी आपणां सर्वांचा आभारी आहे.
माझ्या एका वैयक्तिक ग्रुपवर चर्चा करताना मला making of photo and status ची कल्पना सुचली. आणि आपण ती उचलून धरली याचा मला फार आनंद आहे. दर आठवड्याला एक मेकिंग लिहिणे आणि रविवार सकाळची बरोबर नऊची वेळ पाळून ते प्रसिद्ध करणे हे कार्य माझ्याकरीता खरोखरच आव्हानात्मक होते, जे पूर्ण करताना मला फार आनंद मिळाला. पुष्कळ काही शिकायला मिळाले. वैयक्तिक अडचणींवर मात करून, Dead line पाळून आणि लेखाची गुणवत्ता सांभाळून लिखाण कसे करावे, याचा मला चांगलाच सराव झाला. याचे संपूर्ण श्रेय मी आपणां सर्वांना देतो. महिन्यातून एखादा लेख लिहिणाऱ्या मला, लागोपाठ नऊ रविवार लेख लिहिता येण्यामागे आपण दिलेल्या प्रोत्साहनाचाच मोठा सहभाग आहे. त्याकरिता आपले पुन्हा एकदा आभार!
यापुढील माझ्या लिखाणालाही आपले असेच प्रेम, आशीर्वाद आणि आश्रय मिळेल याची मला खात्री आहे.
कळावे, लोभ असावा ही विनंती.
--- सचिन काळे.
महत्वाची सूचना : खालील फोटो हे फेसबुकवरून दिलेल्या लिंक आहेत. त्यामुळे ज्यांच्या नोडवर फेसबुक चालत नाही त्यांना खालील फोटो दिसणार नाहीत.
१) भाजीवाली.
हियां तो हम बहुत खुस हैं। ऐसन लागत है के हम अपन के खेत मांही बैठें है। हां! तरकारी के खेत मां। और बतावा, गईयान को कोई बछडा वछडा होई के नाही?
२) फुलपाखरू.
फुलपाखरु म्हणे, सोडवेना मज साथ ह्या सुंदर हातांची, स्पर्शुनी येतसे आठवण माझ्या प्रियतमेची !!!!
३) पपई.
पपई नांव आहे माझं. पण मला पालक भारी आवडतो. I am a sailor man. माझ्या हाताची बेंडकुळी पाहिलीत का ? एक ठोसा लगावला ना तर समोरचा थेट ढगात जातो.
४) घोडा.
छान झालं, माझ्या मालकाचं तंगडं मोडलं ते! ढोल्या कुठचा! जणू गव्हाचं पोतंच कि हो! आता काही दिवस फुकटच्या रपेटीतून माझी सुटका! हिं हिं हिं हिं !!!
५) मछली.
खालील स्टेटस मी सहज गंमत म्हणून लिहिलं होतं. whatsapp करिता नव्हतं. त्यामुळे ते जरासं मोठं झालेलं दिसेल.
1- ए शेंबड्या !!! हो बाजुला, नाहीतर मला स्वाईन फ्लूचा प्रसाद देशील.
2- हे राम !!! फक्त एका फोटोकरता, नाही त्या गोष्टीचा मला मुका घ्यावा लागतोय.
3- ए भवाने !!! पडून रहा की गुमान. कशापायी वळवळतेय, गुदगुल्या होतायत् ना मला.
4- कधीचा XXणाला चावतोय मेला !!!
६) डोळा.
काय भौ? ठिक हाए ना? का म्हून माझ्या डोळ्यात बघतायसा? लई आवडल्याले दिसत्यात. हाइतच झ्याक ! आमची मिशेस तर लई जीव टाकते बघा माझ्या डोळ्यांवर.
७) ताट.
मटकीच्या ऊसळीचा रस्सा, नुकत्याच तव्यावरुन काढलेल्या चपात्या, पापड आणि कैरीचं लोणचं असा जेवणाचा खासा बेत. वाह्! स्वर्ग! स्वर्ग! म्हणतात तो हाच.
८) माय क्रश.
मोटरसायकलवाल्या आज्जीबाई !!!..... My Crush !!!...... Please, don't tell anybody, हां !!!...... It's my dammmmn secret !!!.....
९) कामवालीबाई.
बघा बाईजी, सक्काळच्या वखताला तुमची खिटपिट नाय पायजेल. म्या सांगतो, जमतंय तर ठेवा, नायतर आत्ताच्याला माझा हिसाब चुकता करून टाका. बात फिनीस्!
१०) अवतार.
"नको ! नको !! नको ना काढू माझा फोटो !!! माझा अवतार काही बरोबर नाहिए."..... मी आपला प्रेमाने फोटो काढायला गेलो तर सौ.ने माझा असा पोपट केला.
११) स्टाईल.
असं करायचं नाही बाळा. स्टाईल मारायची होती तर दुसरं कोणतंही झाड पकडायचं. बिचार्या जोडप्यांना त्रास दिलास. त्यांचं आपलं चाललं होतं, गुलुगुलु.
(समाप्त)
--- सचिन काळे.
माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in
सुंदर चित्र - लेखमाला !
सुंदर चित्र - लेखमाला !
पुलेंशु
सगळेच स्टेटस भारी.. माश्यांचा
सगळेच स्टेटस भारी.. माश्यांचा फार हासावतोय
प्लिज असे करू नका हो, तुमचं
प्लिज असे करू नका हो, तुमचं असं लिहिणं बंद करणे सहन होण्यासारखे नाही, इतकी सुंदर मालिका बंद होणे चुकीचे आहे, इतक्या फालतू रटाळ मालिका सुरु असतात, त्यात अशी ही एक सुरु राहिली असतो तर काय बिघडलं असतं, तुमच्या त्रासाची कल्पना आहे पण गर्भवतीलाच तर प्रसव वेदना भोगाव्या लागतात, त्याशिवाय का नवसर्जन शक्य होत? तुमच्यासारखा निर्मळ मनाचा इतके कष्ट घेणारा लेखक सहज निर्माण होत नसतो, ते ध्याबत घ्या आणि आपल्या चाहत्यांवर असा अन्याय करू नको हो, नाही नाही नाही
तुम्ही स्वतःतल्या लेखकाला
तुम्ही स्वतःतल्या लेखकाला खूपच गांभीर्याने घेताय.
पुढील लेखनास शुभेच्छा!
सर्व स्टेटस मस्त
सर्व स्टेटस मस्त
@ कुमार१, च्रप्स, नानाकळा,
@ कुमार१, च्रप्स, नानाकळा, भरत, सायुरी प्रतिक्रियेकरिता आपले आभार.
नुसते फोटो आणि स्टेटस वाचायला
नुसते फोटो आणि स्टेटस वाचायला मजा आली. तुमचे ते १०० फोटो असेच थोडे थोडे करून टाका की.. त्याचं मेकिंग वगैरे लिहायची गरज नाही. नुसता फोटो आणि स्टेटस बघून पण कळतंय खूप काही.
मस्त
मस्त
'नुसते फोटो आणि स्टेटस वाचायला मजा आली. तुमचे ते १०० फोटो असेच थोडे थोडे करून टाका की.. त्याचं मेकिंग वगैरे लिहायची गरज नाही. नुसता फोटो आणि स्टेटस बघून पण कळतंय खूप काही. '>>+१११
@ पियू, किट्टु२१
@ पियू, किट्टु२१ प्रतिक्रियेकरिता आभार!! मी आपणांस सांगू इच्छितो की राहिलेल्या फोटो आणि स्टेटसपैकी बरेचसे हे माझे स्वतःचे, कौटुंबिक किंवा मित्रमंडळींचे आहेत. जे इथे ओपन प्लॅटफॉर्मवर टाकणे योग्य होणार नाही.
आणि हे लेखक म्हणून मला नक्कीच
आणि हे लेखक म्हणून मला नक्कीच परवडणारे नाही. लेखकाने नेहमी चौफेर लिखाण करावे >>>> लिखाणाबद्दल बोलत नाही. पण चौफेर वाचन करायची तुम्हाला फार गरज आहे एवढे लिहिल्याशिवाय राहवत नाही.
नाना + ११११
नाना + ११११
आजचे सगळे फोटो आणि स्टेटस झक्कास. तुमच्या पुढच्या ललीतच्या प्रतिक्षेत. पु. ले. शु.
सगळे फोटो आणि स्टेटस छान....
सगळे फोटो आणि स्टेटस छान....
@ maitreyee, अक्षय दुधाळ,
@ maitreyee, अक्षय दुधाळ, पवनपरी11, प्रतिक्रियेकरिता आपले आभार.