कालची रात्र..........
नेहमी सारखी रात्री ९ ला सकीना घरी आली, खोलीत TV चालू होता. आल्या आल्या तिने बुरखा काढला, व्यवस्थित घडी घालून खुर्चीच्या पाठीवर ठेवला, येताना ती तिच्या खानावळीतुन डबा घेऊन आली होती, टेबलपाशी बसून तिने डबा संपवला. तितक्यात शॉवर मधून शोभा बाहेर आली.
“आ गयी तू? चल, फटाफट तयार कर मला” शोभाने ऑर्डर सोडली
“ आज तू बाहेर जाणारेस?” सकीनाला आलेले दडपण तिच्या आवाजातून जाणवत होते.
“दुपारपासून भयंकर मूड होतोय बघ” शोभना खट्याळ हसली आणि आरश्यासमोर जाऊन बसली. “ आत्ता तरी मी पब मध्ये जातेय, नंतर कुठे असेन माहित नाही” असे म्हणून शोभानाने डोळा मारला सकीनापण कसनुशी हसली. तिने भरभर हात चालवायला सुरवात केली.
थोड्याच वेळा शोभना चे शुब्बू मध्ये रुपांतर झाले,
शोभनाचा उफाड्याचा, टंच बांधा आणि साकीनाच्या हातांची करामत यांचे मिश्रण अतिशय जीवघेणे होते. विग, contact लेन्सेस आणि भरपूर मेकअप च्या थराखाली शोभना पूर्णपणे नाहीशी झाली होती.
मेकअप पूर्ण झाल्यावर शुब्बू उठली आणि कपडे बदलू लागली. चामड्याची ग्लॉसी काळी pant तिने चढवली, वर काळ्या टिकल्या जडवलेला ट्यूब top, त्यावर सोनेरी रंगाचा झिरझिरीत शर्ट, त्यातून दिसणारा विंचवाचा tatoo हातात, गळ्यात चंकी ज्वेलरी, सगळ्यात शेवटी तिने ज्वेलरी ड्रोवरच्या चोर कप्प्यात हात घातला आणि सहा इंची पात्याचा धारदार बटन चाकू बाहेर काढला. pant च्या मागच्या बाजूला खोचला, वरतून top आणि शर्ट सारखा केला. मग मादक परफ्युम चा फिनिशिंग टच दिला
बाहेर पडताना तिने खुर्चीवरचा बुरखा उचलला आणि अंगात चढवला, चेहर्यावरती त्याचा पडदा अडजस्ट करत ती मागचा जिना उतरू लागली.
स्कुटी घेऊन ती थेट कुलाब्याला पोहोचली , बुरखा स्कूटीच्या डिकीत टाकून ती “थ्री फ्लाईटस अप” पब मध्ये घुसली, हातात एक फालतू ड्रिंक घेऊन एका कोपर्यातल्या स्टुलावर बसून राहिली,.
तिला फार वेळ वाट पहावी लागली नाही, पंधरा मिनिटात तिघेजण येऊन तिला हाय .हल्लो करून गेले, पण तीच्या दृष्टीने ती सगळी पपलू पोरे होती, शेवटी तिला “तो” दिसला, पिळदार अंगयष्टी, ती अजून उठून दिसेल असा तंग t शर्ट, कमरेखालचे आकार-उकार स्पष्ट दिसतील इतकी घट्ट जीन्स, दंडावर मोठा tatoo, चेहऱ्यावर एक नैसर्गिक तुसडेपणा आणि प्रचंड माज, बारकाउंटर जवळ एका पोरीचा हात हातात घेऊन बोलत होता, त्याच्या बरोबरची मुलगी नाही ,नाह,, अशी मान हलवत होती. त्याला पाहताच शुब्बू च्या डोळ्यात चमक आली,.
आता खेळ सुरु झाला होता.
ड्रिंक तसेच टेबल वर सोडून ती बार काउंटर कडे निघाली, जाताना गर्दीत अगदी चुकून झाले असे वाटावे इतक्या नैसर्गिकपणे त्याला अंग घासून गेली. मात्र २ पावले पुढे केल्यावर मागे वळून एक कटाक्ष टाकायला विसरली नाही. त्याच्यातल्या नराला तेवढा इशारा पुरेसा होता. काउंट रवर थोडे झुकून ती कॉकटेल लिस्ट वाचायचे नाटक करू लागली.
तितक्यात मागून “ एक्स्युज मी” चा पुकारा आलाच. ती मागे न वळताच स्वत:शी हसली, पहिला पोईंट स्कोअर झाला होता. मग ती हलकेच वळली, एक भुवई वर करून त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहिले.
“hey baby, I will get you a drink” तो म्हणाला. हा प्रश्न नव्हता, सरळ सरळ ऑफर होत. ती ऑफर नाकारली जाणार नाहीच असा आत्मविश्वास त्याच्या स्वरामध्ये ठासून भरला होता
“ oh sure, but I prefer cock-tail” शब्द नेमक्या ठिकाणी तोडत, शुब्बूने गळ टाकला
“ I thought you will settle for virgin merry…” त्याने पण एक बॉर्डर लाईन कमेंट करून अंदाज घ्यायचा प्रयत्न केला
“Nah... I am more of bloody merry types” डोळे मिचकावत शुब्बू म्हणाली
“Try my screw driver ….” हातातला ग्लास उंचावत तो म्हणाला
“ hmm, after I have sex on the beach” किंचित पुढे झुकून त्याच्या त्याच्या कानाकडे तोंड नेत शुब्बू कुजबुजली.
“ ... fine, get one sex on the beach for my gal” त्याने अतिशय उर्मट पणे टिचक्या वाजवत बारटेंडर ला ऑर्डर दिली.
२ मिनिटात तिचे ड्रिंक आले
“Can I taste your… drink??” त्याने तिच्या गुडघ्यावर हात ठेवत विचारले.
माश्याने आमिष गिळले होते अगदी hook, line and sinker...
पुढच्या पंचवीस मिनिटात शुब्बूने स्वत: पहिल्या ड्रिंक वर राहून अजून ५ शॉट्स त्याच्या घश्यात उतरवले होते.आणि त्याचा हात आता गुडघा सोडून तिच्या मांड्यांमध्ये घोटाळत होता.
“ ok, I am done, ta…, see you again”, आपले अर्धे संपलेले ड्रिंक टेबल वर ठेवत शुब्बू म्हणाली.
“ रुक रे.., let me give u a ride, … to heaven” म्हणत तो उभा राहिला, शुब्बू ने पुढे होऊन त्याचा हात आपल्या गळ्यात घालत त्याचा तोल सावरला. किंचित डगमगत्या पावलांनी चालणाऱ्या त्याला आधार देत बाहेर काढले, त्याने बेदरकारपणे पार्किंग-असिस्टंटच्या अंगावर किल्ली भिरकावली,गाडीची वाट पाहताना सहजच शुब्बूने मोबाईलबाहेर काढला, आणि दोघांची एक खास सेल्फी घेतली.
प्लान चा दुसरा टप्पा सुरु झाला होता
गाडी आणायला उशीर झाल्याबद्दल असिस्टंटला २ शिव्या हासडून दोघे कार मध्ये बसले, आणि कोलाब्याच्या रस्त्यावरून SUV वेगाने धावू लागली. थोड्याच वेळातच ती एका हॉटेल पुढे येऊन थांबली. डगमगत दोघे रिसेप्शन मध्ये आले, रजिस्टर मध्ये थातुरमातुर एन्ट्री करून एक रूम घेतली, लिफ्टने दोघे दुसऱ्या मजल्यावर गेले, रूम बॉयने दार उघडून दिल्यावर त्याला दारातूनच घालवले.
दार बंद केल्या मिनिटाला त्याने तिला मिठीत घेतले, आणि तिच्या ओठावर ओठ टेकायचा प्रयत्न करू लागला. ती सुद्धा तितक्याच असोशीने त्याला प्रतिसाद देऊ लागली, हळूहळू त्याचे ओठ मानेवर घसरले आणि त्याने मानेवर एक चावा घेतला. खूप दुखल्यासारखे दाखवत ती त्याच्या मिठीतून निसटली आणि आत जाऊन बेड वर बसली. पिसाटासारखा तो तिच्या मागे आलाच, तिच्या शर्टच्या बटनांशी तो झोंबू लागला, क्षणभरात तिचा शर्ट जमिनीवर लोळत होता, आता तिचा tatoo पूर्ण पाहण्यासाठी तो तिच्या top बरोबर झटू लागला. शुब्बुने त्याचा टी शर्ट काढला. इच्छा अनिवार होऊन त्याने आपण होऊन आपली जीन्स उतरवली आणि तो शुब्बुकडे झेपावला.
शुब्बूने अतिशय थंडपणे पण ठामपणे त्याच्या छातीवर हात ठेऊन थोपवले, ती पलंगावरून उठलीआणि बाजूला एक सिंगल सीटर सोफा होता त्यावर जाऊन बसली.
तो गोंधळला “अरे.. क्या हुआ?आ ना इधर”
तिने त्याच्याकडे थंडपणे रोखून पहिले अन म्हणाली “मूड नही है”
त्याच्या डोक्यात तिडीक गेली, “रंडी साली, तुझे पुछा क्या मैने मूड है क्या नहि? चुपचाप ये इकडे”
शुब्बू चा चेहरा अजून ताठरला “बोला ना तेरे को, नही आना है मुझे“ तिचा आवाज अजून थंड झाला होता.
आता मात्र तो तिरीमिरीत पलंगावरून उठला, नकार ऐकायची त्याला सवय नव्हती आणि आपण स्वत: इतके उत्तेजीत होऊन तयार असताना मुलगी मूड नाहि म्हणून बाजूला जाऊन बसते हा त्याला त्याचा वैयक्तिक अपमान वाटला, भयंकर मोठा अपमान.
मजबूत पकडीत त्याने तिचा हात धरून तिला उठवले, पण त्याने पुढे काही करायच्या आत त्याच्या दोन पायांमध्ये एक जोरदार लाथ बसली, टोकाच्या वेदनांनी सुन्न होऊन तो खाली बसला, थोड्या वेळाने सावरून वर बघायला त्याने मान वर केली तर एक सणसणीत थोबाडीत त्याला बसली, बेसावध असताना इतका जोराचा प्रहर झाल्याने तो एका बाजूला कलंडला, कसाबसा उठत त्याने समोर पहिले तर समोर शुब्बू हातात उघडा चाकू घेऊन उभी होती.
“ क्यू भोसडीके, चढे का मुझ पे?” पाठोपाठ त्याला अजून एक थोबाडी बसली.
काय चाललय ते त्याला कळेना, १० मिनिटापूर्वी आपल्याला चढवून घ्यायला आसुसलेली मुलगी असे काय वागयेत ते त्याला सुधारेना.
“काय करतेय तू? माझा बाप कोण आहे महितेये का तुला? सोडणार नाही तुला मी “ त्याचा अजून पीळ जळायला तयार नव्हता.
“ तुझा बाप कौन है पता नही क्या तेरे को? इतने लोगोंके साथ सोयी क्या तेरी मां?” त्याच्या छातीवर लाथ मारत तिने विचारले, तो त्या आघाताने मागे कलंडला, मागच्या टिपोय वर डोके आपटले आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली.
किती वेळ गेला माहित नाही पण तोंडावर पाण्याचा शिपका बसल्याने त्याला थोडी जाग आली. तोंड पुसायला हात हलवला तेव्हा त्याला जाणवले त्याचे दोन्ही हात बांधले होते.
समोर शुब्बू सुरा घेऊन उभी होती, आपण भयानक संकटात सापडल्याची जाणीव त्याला झाली.
“ काय? पाहिजे काय तुला? पैसे? साली मग इथपर्यंत का आलीस? गाडीतच घ्यायचे ना?” त्याने थोड्या खालच्या सुरात विचारले.
“ पैसा,हुं ..” ती तुच्छतेने म्हणाली “मला पाहिजे तुझी इज्जत, तुझ्या खानदानाची इज्जत” हळूहळू तिचा आवाज कठोर होत गेला“ आता मी तुझी इज्जत लुटणार आहे आणि तू काही गांडमस्ती केलीस तर हा खाली घुसला समज ” हातातला सुरा दाखवत तिने धमकावले.
तो हसू लागला.
एक पोरगी आपल्यावर बलात्कार करायच्या गोष्टी करतेय ऐकून त्याला हसू आवरेना,त्याला हसताना पाहून शुब्बू पण हसायला लागली, हसता हसता तिने सुरा त्याच्या अंडरवेअरवर फिरवला,त्या पातळ कापडाच्या क्षणात चीरफळ्या झाल्या, आणि मांडीवर उठलेल्या ओरखड्या मधून रक्त येऊ लागले
“ ए, येडी झाली काय, काय करतेय ?” तो व्हिव्हळला. हि पोरगी वाटते तितकी साधी नाही हे त्याला कळून चुकलेले.
“ मी अजून काहीच केले नाहीये, आता करणार आहेस ते तू.... मी सांगेन ते” तिने सुनावले “ आत्ता ट्रेलर दाखवलाय, जर हुशारी करशील तर छाटून टाकेन.”
त्याला मानगूट धरून उभा केला, मगाशी रिचवलेली दारू आता त्याच्यावर प्रभाव दाखू लागली होती.
एकंदर झालेल्या घडामोडींच्या प्रभावाने मगाशी त्याचे उसळणारे पौरुष आता लुळे पडले होते.
हातात मोबाईल कॅमेरा नाचवत ती पुढे झाली, “उल्लुलू, माझं पिल्लू ते... थांब लोकांना तुझी मापं कळू देत,” फाटाफट flash उडाले, काय होतय ते त्याच्या ध्यानात आले आणि बांधलेल्या हाताने तो आपली लाज झाकायचा केविलवाणा प्रयत्न करु लागला, “आता हे फोटो मी FB टाकणार, आणि त्यात तुला tag करणार, पुढे हे पण लिहिणार समोर अख्खी बाई तयार उभी असताना तू असा मरगळून पडला होतास ”
“ए बाई, असले काही करू नको , बरबाद करशील मला, सोड ना मला, काय हवय काय तुला?”
“ सोडू तुला? चल सोडते, नाच कर माझ्या समोर, डिस्क मध्ये गांड हलवत नाचत होतास ना? आवडला तो डान्स मला, नाच आता माझ्यासाठी, थांब गाणी लावते,“ तिने रिमोट ने टीव्ही चालू केला कुठलातरी इंग्लिश गाण्यांचा channel लावला, “ नाच की भडव्या आता,” त्याच्या ढुंगणावरती सटकन फटका मारत ती ओरडली.
अवघ्या तासाभरापूर्वी त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा माज आणि उद्धटपणा आता नावालाही दिसत नव्हता. दिसत होती ती फक्त भीती, तिच्या पूर्ण दहशतीखाली त्याने अंग हलवायचा प्रयत्न केला, भीती आणि दारू च्या अंमलाखाली त्याच्या हालचाली विलक्षण बेंगरूळ वाटत होत्या.
“ए ए, थांब, जमत नाही काही तुला, आता मुजरा कर, मुजरा ,तुझी लायकी तीच ... कोठ्यावर नाचायची” channel सर्फ करत ती एका हिंदी गाण्यांच्या channel वर थांबली. परत एक फटका आणि तो नाच करू लागला,
“ हा... जमतय तुला साला खानदानी कोठेवाला दिसतोस,” म्हणत तिने मोबाईल वर नाच रेकॉर्ड करयला सुरवात केली. ती काय करतेय हे लक्षात आल्यावर तो तटकन थांबला, त्याबरोबर घाण घाण शिव्या घालत तिने त्याला अजून २ थोबाडीत मारल्या.
हे सगळे कुठे जातंय त्याला कळेना,
शेवटी शुब्बू त्याच्या जवळ गेली, एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला, दुसर्या हातातल्या चाकूचे पाते खाली रोखुन म्हणाली “ याचं काय करायचे बाबा? राणीसाहेब समोर आल्यात त्यांना सलाम बिलाम काही करत नाय हा, साला तितके पण जमत नाय मग ठेवायचा कशाला याला?”
त्याच्या जमिनीवर लोळणाऱ्या जीन्स च्या खिशातून लायटर काढला, खटका दाबून ज्योत पेटवली, आणि हात स्लो मोशन मध्ये खाली नेऊ लागली, आपल्याबरोबर काय घडणार आहे याची कल्पना आलेला तो भयानक घाबरला, गुडघे वाकवून, कमरेत वाकून स्वत: ला वाचवायचा प्रयत्न करू लागला. कोणत्याही वर्णमालेत लिहिता येणार नाहीत असे आवाज घशातून काढत तो भेसूर रडत होता. शुब्बूने शेवटी त्याला पायात पाय घालून खाली पाडला, आणि लायटर त्याच्या जवळ घेऊन गेली. धग लागल्या बरोबर तो किंचाळला, तिने ज्योत बंद केली, १० सेकंदात परत सुरु, परत बंद, सुरु , बंद,
प्रत्येक वेळी त्याने केलेला आकांत, विनवण्या, घातलेल्या शिव्या ती मोबाईल मध्ये साठवून घेत होती.
रडून भेकून त्याची हालत खराब झाली होती, तोंडाला कोरड पडली होती, तो पाणी मागू लागला.
शुब्बू ने टेबल वरची बाटली उचलली आणि attached बाथरूम मध्ये जमिनीवर ओतली, “जा, जाऊन पी पाणी” ती म्हणाली, आता मात्र हद्द झाली, शेवटी त्याच्या तोंडातून प्रश्न आला, “पण का? का माझा इतका छळ चालवला आहेस? काय बिघडवले आहे मी तुझे?”
शुब्बुने इतका वेळ पांघरलेला शांतपणाचा बुरखा फाटला, ती तारस्वरात ओरडली “ रेखाने तरी काय बिघडवलेले कोणाचे? याच्या कित्येकपट भोगलेय तिने, रोज... ६ वर्ष... काय चूक होती रे तिची? नवऱ्यावर विश्वास ठेवला हि? सात वर्षाच्या पोरीवर हात फिरवत होते लोक, काय चूक होती तिची? भडव्या, तुझे अंथरूण गरम करायला नव्या पोरी हव्या असतात ना तुला? जा स्वत: च्या अंथरुणात जाताना पण फाटेल आता तुझी.” “हे फोटो येतील ना जेव्हा पोर्न साईट वर तेव्हा लोकांना सांगत फिर तुझा बाप कोण ते... उद्या FB चेक कर, लोकांना तुझी मर्दानगी लाइव्ह दिसणार आहे. सगळ्या एस्कॉर्टसच्या साईट वर अपलोड करणारे तुझे डीटेल्स, नाय तुला रांड करून टाकला तर बघ.”
आपल्या होऊ घातलेल्या बदनामीने तो हबकला, रडत भेकत तो शुब्बुच्या पायावर लोळण घेऊ लागला, त्याच्या तोंडातून लाळ गळत होती, पण शुब्बू ला पाझर फुटला नाही, तिने त्याला बाथरूम मध्ये ढकलले, बाथरूम बाहेरून लॉक केली, tv चा आवाज वाढवला. आरशात पाहून एकदा आपला अवतार ठीक केला आणि खोलीचे दार लाऊन घेऊन ती बाहेर पडली.
बाहेर पडताच तिने कॅब ला हात केला. ती थेट ३ फ्लाईटस अप च्या मागच्या गल्लीत आली. स्कूटीच्या डिक्कीत ठेवलेला बुरखा चढवला आणि परत घराकडे निघाली. मागच्या जिन्यावर तिने पाय ठेवला तेव्हा घड्याळात सव्वा दोन वाजत होते.
नाक्यावर उभ्या असलेल्या पक्याने स्कूटीवरून परत येणाऱ्या मुलीला पहिले होते आणि सकीना बद्दल उद्या कावेरीला सांगायचेच याची मनात खुणगाठ बांधली
झणझणीत
झणझणीत
मस्त जमली आहे.
मस्त जमली आहे.
जमलीय कथा !
जमलीय कथा !
विशाल भारद्वाज नक्कीच नाही पण
विशाल भारद्वाज नक्कीच नाही पण अनुराग कश्यप लेवल 100% आहे.
मस्त जमलीय कथा
मस्त जमलीय कथा
एकदम भारी
एकदम भारी
अरे वाह पुढचा भाभागही आलाय
एकदम बापरे झालं. भारी लिहिलय.
एकदम बापरे झालं. भारी लिहिलय. दोघांचेही उन्माद भारी लिहीलेत. बया आता काय करते नी काय नाय वाटत होतं सारखं.
अर्रे बाप्रे
अर्रे बाप्रे
विशाल भारद्वाज नक्कीच नाही पण अनुराग कश्यप लेवल 100% आहे. >> +१