भाग १
http://www.maayboli.com/node/42915
भाग २
http://www.maayboli.com/node/42919
भाग ३
http://www.maayboli.com/node/42971
भाग ४
https://www.maayboli.com/node/43034
भाग ५
https://www.maayboli.com/node/64622
(लहान मुला-मुलींना कुठली सायकल घ्याल, वय १ ते १०)
भाग ६
https://www.maayboli.com/node/64648
(सायकलींच्या किंमती इतक्या का असतात?)
===================================================================
गेल्या भागात आपण सायकलच्या किंमती कशावर अवलंबून असतात हे पाहिले. अर्थात त्यात बरीच तांत्रिक माहीती ठासून भरल्याने अनेकांना तो कंटाळवाणा वाटला असल्याची शक्यता आहे. आणि असेही हा विषय इतका मोठा आहे आणि मी इतकाही त्यातला तज्ज्ञ नसल्याने किती लिहावे यावर मर्यादा आहेच.
लिहून झाल्यावरही अनेकदा वाटत राहते की हा मुद्दा राहून गेला, तो मुद्दा अजून स्पष्ट करायला हवा होता. बरेच वेळा प्रश्नोत्तरातून काही मुद्दे लक्षात येतात, त्यामुळे ही लेखमालिका नुसती माहीतीपर न राहता इंटरअॅक्टीव्ह झाली तर जास्त आवडेल. तुमचे प्रश्न कितीही बेसिक वाटले तरी विनासंकोच विचारा, मी माझ्यापरीने शक्य तितके उत्तर देण्याचे प्रयत्न करेन.
गेल्या भागात दिल्याप्रमाणे जर तुम्ही आपल्या सायकलचे बजेट ठरवले असेल तर त्यानुसार सायकली कशा निवडायच्या यावर या भागात माहीती देतो.
रु. १०,००० च्या आतल्या सायकली
भारतात सगळ्यात मोठ्या प्रमाणात विक्री होणारा सेगमेंट. याचे कारण अजून आपली मानसिकता सायकलींवर खर्च करण्याची झालेली नाही. अनेकांना १० हजार पण खूप जास्त वाटतात. असो.
तर या सेगमेंटमध्ये फार क्वचितच परदेशी बनावटीची सायकल येत असेल. ज्या आहेत त्या सगळ्या भारतीय बनावटीच्या, स्टीलच्या सायकली. मी मागच्या भागात म्हणल्याप्रमाणे ऑफ रोड सायकलींग करण्याचा विचार नसेल आणि वापर मुख्यत्वे शहरी रस्त्यांवरच होणार असेल तर माऊंटन बाईक्स टाळलेल्या उत्तम.
पण तुम्ही नुसतेच दुकानात चक्कर मारायला गेलात तर तुम्हाला माऊंटन बाईक्सची रेलचेल दिसेल. भारतीय बनावटीच्या अनेक सायकलीपण त्याच गटात मोडतात. आणि दहा हजारच्या खालच्या अनेक सायकली ना धड पूर्णपणे एमटीबी ना धड सिटी, पण जडच्या जड, त्यात फ्रंट सस्पेशन, बॅक सस्पेन्शन, जाड-जुड टायर्स अशा दिसतात. आणि दुकानदारही त्या कशा मजबूत आणि टिकावू आहेत असे सांगत आपल्या गळ्यात लोढणे घालतात. उत्साहात घरी आणून काही दिवस चालवले की मग त्या चालवायचा कंटाळा येतो आणि मग त्या पडून राहतात.
आणि दुर्दैवाने हेच लोक बाकी लोकांना निरुत्साही करण्याचे काम करतात. अरे नको घेऊ सायकल, वापर होत नाही, मी घेतली होती चांगले ८-१० हजार घालवून, महिन्याभरात पडून राहीलीये, गंजत पडलीये आता.
तर हे आता आपले होऊ नये यासाठी काय करावे?
तर सगळ्यात बेस्ट म्हणजे, सिंगल गियरची सायकल. (काहीजण विदाऊट गियर म्हणतात, पण असे नसते, सायकलला एक गियर असतोच, म्हणूनच ती पुढे जाते).
जर बजेट अगदीच तोकडे असेल आणि दहा हजारपेक्षा जास्त घालण्याची इच्छा नसेल जर वापर पाच - दहा किमी पेक्षा जास्त नसेल, ज्या भागात राहता तिथे फार चढ-उतार, फ्लायओव्हर नसतील, लांब राईडपेक्षा केवळ फिटनेस आणि रोजच्या रोज व्यायाम म्हणून चालवायची असेल तर सिंगल गियर इतके सुखाचे काही नाही. मल्टी-गियर सायकलला शिफ्टर, डिल्युलर असे फार सांभाळावे लागते. आणि वजनी मल्टी गियरपेक्षा साधी, सोपी, सुटसुटीत सिंगल गियर कधीपण मस्त.
आणि अजून एक सिंगल गियरवर लांबच्या राईड मारता येत नाहीत असे काही नाही. म्हणजे खरे सांगायचे तर मलाही तसे वाटत होते पण नुकतेच नाशिकच्या महेंद्र महाजननी काळा घोडा उर्फ दुधवाला सायकलवर २०० किमीची बीआरएम वेळेत पूर्ण केली. सायकलींग म्हणजे महागडा छंद नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी हे आव्हान पेलून दाखवले.
आणि याही पेक्षा भारी म्हणजे, पुण्याचा संतोष होली हा एक अजब युवक. याने मल्टीगियर घ्यायला पैसे नव्हते म्हणून बायकोने गिफ्ट केलेल्या सिंगल गियरवर संपूर्ण भारतभ्रमण केले.
त्याची सायकल तिचे नाव त्याने मरिच ठेवले आहे, त्यावर त्याने २३ दिवसात ३७०० किमी चालवले आणि त्याचे नाव लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आले. त्या नंतर त्याने १११ दिवसात १५,२२२ किमी सायकल चालवत गिनिज बुक मध्ये पण नाव नोंदवले. त्याच सिंगल गियर सायकलवर.
https://www.facebook.com/santosh.holi
हॅट्स ऑफ त्या माणसाला.
तर सस्पेशन, २१ गियर्स, डिस्क ब्रेक असल्या फिचर्सचा मोह टाळा आणि हलकी-फुलकी सिंगल गियर घरी आणा. आणि सध्या याचाही वर्ग वाढत चालल्याने भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.
BROOKS MYTH SS 26 - (2017) ₹7,999
MACH CITY IBIKE SINGLE SPEED (2015) ₹6,799
ATLAS PRONTO DX 26 (2014) ₹4,481
RALEIGH MY RIDE S/S (2017) ₹7,525
Firefox Axxis 26 8,750
MACH CITY IBIKE Women MULTI SPEED (2016) ₹8,649
BSA LADYBIRD EVITA (2016) ₹5,450
या नमुन्यादाखल काही सायकली.
याच दरम्यान, सिंगल गियर शोधताना या ब्रँडवर नजर पडली. bikeARK नावाचा हा ब्रँड चेन्नईमध्ये आयआयटी मद्रासच्या पदवीधर मुलांनी सुरु केला आहे. तीनच महिने त्यांना झाले असून त्यांच्या या आकर्षक बनावटीच्या सायकली बऱ्याच लोकप्रिय झाल्या आहेत. हाय टेन्साईल स्टीलचा वापर करून फ्रेम बनवल्याने त्या हलक्या आहेत आणि युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी अलॉय व्हिल, डिझायनर हँडलबार्स आणि किंमत ८ ते ११ हजारच्या दरम्यान. या सायकली अॅमेझॉनवर देखील उपलब्ध आहेत.
https://www.amazon.in/s/ref=w_bl_hsx_s_sp_web_0?ie=UTF8&search-alias=aps...
(अजून एक गोंधळ होऊ नये म्हणून - सिंगल गियर सारखीच फिक्सी हाही एक प्रकार आहे. वरून दिसताना दोन्ही सेम दिसतात पण त्यात फरक असा आहे की सिंगल गियर म्हणजे आपल्या नेहमीच्या साध्या सायकली, तर फिक्सीला हब फिक्स असतो म्हणजे त्याला ब्रेक्स नसतात, पॅडल मारणे थांबवले तर सायकल थांबणार, आणि पॅडल उलटे फिरवले तर उलटी जाणार. फिक्सी अजून आपल्याकडे फारश्या उपलब्ध नाहीत पण ऑनलाईन कुणी मागवायचे ठरवले तर गडबड होऊ नये म्हणून ही पोस्ट) आणि मी वरती उल्लेख केलेल्या बाईकआर्कच्या सायकली दोन्ही प्रकारात उपलब्ध आहेत.
डिस्क ब्रेक आणि सस्पेन्शन हवेच असणाऱ्यांसाठी
Hero Icon 26T Single Speed With Disc Brake - Sea Green & Black 9,794.00
मल्टी गियर सायकली
आता ज्यांना सिंगल गियर सायकल नकोच आहे, किंवा ज्यांना पुढे मागे मोठ्या राईड्स डोक्यात आहेत, किंवा ज्यांना सुलभपणे सायकल चालवता यायला पाहिजे अशांसाठी मल्टीगियर पण उपलब्ध आहेत. पण त्या चांगल्याच वजनी असणार आहेत हा तोटा लक्षात ठेवलाच पहिजे.
त्यातली मी रेकमेंड अनेकांना करतो ती म्हणजे रॉक रायडर.
https://www.decathlon.in/p/8284495_rockrider-300-mtb-black.html?gclid=Cj...
ही माऊंटन बाईक असली तरी नॉर्मल एमटीबी पेक्षा हलकी आहे आणि पळवायलाही छान आहे. माझ्या अनेक मित्रांनी घेतली आहे. तुमच्या जवळपास डेकथलॉन स्टोअर असेल तर जाऊन एक राईड मारून या.
Hercules Roadeo Hardliner 18 Speed Cycle - 9,999.00
ही अल्युमिनियम अलॉय असल्याचा दावा आहे तरी तिचे वजन १८ किलो आहे. सस्पेन्शनमध्ये दोन-अडीच किलो धरले तरी बाकीचे वजन कशाने एवढे वाढले कोडेच आहे.
याखेरीज फायरफॉक्स आणि श्नेल यांच्याही काही सायकली १० हजारच्या आत मिळतात. त्यात फायरफॉक्स नक्कीच चांगला आहे श्नेलपेक्षा एवढे नक्की.
या व्यतिरिक्त अजून कोणाच्या पाहण्यात, वापरण्यात अशा काही सायकली असतील त्यांच्या बद्दल लिहा, कळवा, फिडबॅक द्या आणि नव्याने खरेदी करणाऱ्यांना उपयोग होईल...
पुढच्या भागात १० हजार ते २० हजार दरम्यानच्या सायकलींबद्दल
हो ऑफलाईन चालते स्ट्रवा. फक्त
हो ऑफलाईन चालते स्ट्रवा. फक्त मध्ये मध्ये जीपीएस सोडत त्यामुळे काही किमी खाते, आणि ऑटो पाझ चा option घ्या नाहीतर वैताग होतो विसरला स्टॉप करायचे तर.
choosemybicycle वरून मॅच सिटी
choosemybicycle वरून मॅच सिटी सिंगल स्पीड ऑर्डर केली होती ती मिळाली आज. मस्त आहे चालवायला. कंफर्ट पण मस्त आहे. टायर साईझ त्यांनी review मध्ये 25C सांगितले आणि स्पेसिफिकेशन्स मध्ये 35C . पण मला वाटत ते 25C चे टायर आहेत.
अरे वा! ब्लॉग वाचून बरीच
अरे वा! ब्लॉग वाचून बरीच मंडळी सायकल घेत आहेत किंव्हा पुन्हा सायकलिंग सुरु करत आहेत. क्या बात, मस्त रे चॅम्प.
आता पुढाकार घेऊन एक छोटेखानी सायकल मेळावा घे. माबो मंडळी एकत्र येऊ.
टायर साईझ त्यांनी review
टायर साईझ त्यांनी review मध्ये 25C सांगितले आणि स्पेसिफिकेशन्स मध्ये 35C . पण मला वाटत ते 25C चे टायर आहेत.
२५ असण्याबद्दल मी साशंक आहे. कारण २३-२५ ही रोडबाईक टायर्सची रेंज आहे..
हायब्रीड २८ ते ३५ आणि माऊंटनबाईक ३५ पासून पुढे असे साधारण असते. तरीही शंका असल्यास टायरवर त्याची विड्थ लिहीलेली असते. ७०० गुणीले च्या पुढे जो आकडा असेल तो
choosemybicycle वरून मॅच सिटी सिंगल स्पीड ऑर्डर केली होती ती मिळाली आज.
रच्याकने, ऑनलाईन सायकल घेण्याचा अनुभव कसा होता. त्यांनी असेंबल करून पाठवली होती का आल्यावर असेंबल करून घेतली ?
मी गुरुवारी संध्याकाळी सायकल
मी गुरुवारी संध्याकाळी सायकल ऑर्डर केली आणि आज म्हणजेच मंगळवारी मिळाली. तुमचा लेख वाचून सायकल घ्यायची इच्छा झाली. सहज choosemybicycle भेट दिली तर तिथे भरपूर सायकली उपलब्ध होत्या. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. जर कुठली सायकल घ्यायची समजली नाही तर त्यांच्या सायकल एक्स्पर्ट बरोबर ऑनलाइन चॅटिंग करायचा ऑप्शन उपलब्ध होता. त्यांना आपल्या requirement सांगायच्या कि ते आपल्याला सायकल सजेस्ट करतात. म्हणालो चला त्या एक्स्पर्टची क्रॉस चेकिंग करू. त्याला बोललो २० हजाराच्या आतली चांगली सायकल सांग मला . requirement तुमच्या १०-20k बजेट लेखातल्या सांगितल्या. त्यानी मला तुमचाच montra ट्रान्स पर्याय सुचवला. मग खात्री पटली कि बाबा हा खरोखरच एक्स्पर्ट आहे. आता माझं ऑफिस घरापासून फक्त ३किमि च्या अंतरावर आहे त्यात ऑफिसला फक्त रविवारी सुट्टी त्यामुळे लांब पल्य्याच्या राइड्स मला नको हव्या होत्या. साधी सुटसुटीत सिंगल गिअर सायकल त्याला विचारली त्यात त्यानी मला मॅच सिटी आय बाईक आणि मॅच सिटी म्युनिच सुचवली. म्युनिच आवडली आणि ऑर्डर केली. सगळी सायकल तिकडेच असेम्ब्ली होऊन आली. फक्त हॅन्डल सरळ करायचा होता आणि पेडल लावायचे होते. सायकल सरळ कंपनीतच मागवली होती त्यामुळे हॅण्डल सरळ करायचा आणि पेडल लावायची काम उत्साही मित्र मंडळींनी केली. त्यानी त्यासाठी लागणारे टूल्स दिले होते सोबत. आता १ सर्विसिंग फ्री देतात ते. नंतर जर त्यांच्याकडून सर्व्हिसिंग करायची असेल तर ५०० रुपये चार्जेस आहेत. सायकलला कुठे स्क्रॅच किंवा तुटलं वगैरे असेल तर त्यांचा माणूस येऊन फ्री मध्ये रिपेरिंग करून देतो नाहीतर सायकल परत पाठवायचि ते करून देतात फ्री ऑफ कॉस्ट. एकंदरीत चांगला अनुभव होता.
सगळी सायकल तिकडेच असेम्ब्ली
सगळी सायकल तिकडेच असेम्ब्ली होऊन आली. फक्त हॅन्डल सरळ करायचा होता आणि पेडल लावायचे होते. सायकल सरळ कंपनीतच मागवली होती त्यामुळे हॅण्डल सरळ करायचा आणि पेडल लावायची काम उत्साही मित्र मंडळींनी केली>>>
भारीच काम झालं
त्यानी त्यासाठी लागणारे टूल्स दिले होते सोबत.
फुकट????
आता १ सर्विसिंग फ्री देतात ते. नंतर जर त्यांच्याकडून सर्व्हिसिंग करायची असेल तर ५०० रुपये चार्जेस आहेत.
कुठे आहे त्यांचे सर्विस सेंटर....???
मुळात हे सगळे कुठल्या शहरात घडले?
टूल्स म्हणजे दोन allen key
टूल्स म्हणजे दोन allen key आणि एक spanner दिला. हो फुकट दिले. चेन्नईला आहे सर्विस सेंटर. सायकल पण तिकडूनच आली. दहा हजाराच्या वरची सायकल घेतली कि T -SHIRT , टूल्स, लॉक, बेल( लॉक आणि बेल मला पण फुकट मिळाले), वॉटर बॉटल आणि त्याचा स्टॅन्ड, साधा हॅन्ड पंप असं काही फ्री देतात.
तुम्ही कुठे राहायला?
तुम्ही कुठे राहायला?
डीलरचा कट वजा केल्याने त्यांना परवडणारे आहे फ्रिबी देणे.
मी डोंबिवलीला राहतो. आज
मी डोंबिवलीला राहतो. आज संध्याकाळी एका लोकल सायकलवाल्याकडे जाऊन आलो. याच्याकडे सायकल घेण्याच्या आधी ३-४ चकरा मारल्या पण दुर्लक्ष केलं होतं माझ्याकडे. माझी सायकल पाहिल्यावर चांगल्याच मिरच्या झोंबल्या नाकाला. मला पहिली किंमत विचारली ८ .५ हजार सांगितल्यावर मला बोलतोय सेम ऍटलास ची ५ हजारात आली आली असती. म्हटलं आलो होतो तुमच्याकडे तेव्हा सांगितलं नाहीत. तर बोलतोय चायनीज माल ठेवत नाही. बोललो इंडियन ब्रँड आहे हा तसा गप्पच बसला.
मी काल सकाळी माझी पहिली राईड
मी काल सकाळी माझी पहिली राईड 30km २ तासात पूर्ण केली. पुढची राईड 40km करणार आहे.
वा वा, अभिनंदन
वा वा, अभिनंदन
कल्पतरू सायकलिंग कसे सुरू आहे
कल्पतरू सायकलिंग कसे सुरू आहे?

बाकीची मंडळी सायकलिंग सिजन सुरू होतोय, घ्या मनावर
म्हणजे पावसाळा संपत आलाय आणि थंडी सुरू होतीय म्हणून
जानेवारीत मुलाचा वाढदिवस आहे.
जानेवारीत मुलाचा वाढदिवस आहे. त्याची आधीची सायकल छोटी आणि जुनी झाली आहे. नविन सायकल घेऊन द्यायचे मनात आहे. सध्यातरी तो सायकल सोसायटीच्या आतच चालवतो. बाहेर जाण्याचे काही कारण पडत नाही. पण सायकल घेतली की ती चारपाच वर्षे तरी वापरली जाईल. जानेवारीत मुलगा अकरा वर्षांचा होईल. तो पंधरासोळा वर्षांचा होईपर्यंत त्याला आणि कधीकधी त्याच्या वडिलांना चालवता येईल अशी सायकल हवी आहे. अजून तीन महिने अवकाश आहे सायकल घ्यायला. पण साधारण कशी सायकल असावी किंवा सायकल घेताना कोणत्या गोष्टी बघून घ्याव्या, कोणी सांगेल काय? बजेट आठेक हजाराचे आहे. चांगली वाटली सायकल तर दोनेक हजार अजून वाढवता येतील.
सायकल घेताना कुठल्या गोष्टी
सायकल घेताना कुठल्या गोष्टी बघव्यात यासाठी एक वेगळा धागा काढला आहे
याच मालिकेत पुढे आहे
मुलाला आणि वडिलांना एकच सायकल पसंत पडणे अवघड आहे कारण मुलांना फॅन्सी सायकल आवडतात आणि बाबा लोक त्या कितपत चालवतील याची शंका आहे
दहा हजारच्या आत अंतरराष्ट्रीय दर्जाचा कुठलाच ब्रँड येणार नाही
त्यामुळे हिरो कंपनीच्या कुठल्याही सायकली बघा
तुमच्या जवळपास दुकानात श्ननेल, डोज सारख्या सायकली मिळतील
शक्यतो सल्ला हा की घेऊ नका पण हिरो ची नाही मिळाली तर शेवटचा पर्याय तोच
सोसायटीच्या आतच चालववणार असाल तर सिंगल गियर साधी सुटसुटीत सायकल घ्या
मुलाला बाकी मित्रांच्या गियरच्या सायकली बघून मोह होणे स्वाभाविक आहे
आता त्याला हे कसे पटवून देता हे तुमचे कौशल्य
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/64918
हे पहा
मी सिंगल गियरच्या मताची आहे
मी सिंगल गियरच्या मताची आहे तर मुलगा बाकी मुलांच्या गियरच्या सायकली बघून तशीच मागतोय. खरेतर जवळपास रोडवर, ट्यूशन किंवा व्यायाम करण्यापुरताच उपयोग होणार आहे सायकलचा मुलालाही आणि बाबालाही.
हो पण मुलांना हे पटत नाही
हो पण मुलांना हे पटत नाही
बाकी मुलांच्या तुलनेत आपली सायकल साधी आहे म्हणल्यावर खट्टू होतात
भले मग ती अगदी भारीतली असली तरी फॅन्सी नसेल तर बोर आहे ही असे खुशाल म्हणू शकतात
Pages