फेसबूक पेटून उठले होते. जंगली मराठी ग्रूपवर नवीन टॉपिक आला होता. दारू जुनीच. बाटली नवीन. विषय गोरक्षकावरून सुरू होऊन तालिबान, ईस्लाम, आतंकवाद, ते ईंदिरा गांधीना सोबत घेत, महात्मा गांधी असा येऊन पोहोचला होता. अहिंसो परमो धर्म: .. अशक्य आहे हे. टोटल हिंसा किंवा टोटल अहिंसा. मधलं काहीतरी जमायला हवे. पण कोणंच ऐकायला तयार नव्हते. वर्षानुवर्षे तेच मुद्दे. सोहमच्या डोक्याचा भुगा झाला होता. असह्य होऊन तो उठला आणि किचनमध्ये जाऊन कॉफी उकळवायला ठेवली. कॉफीसोबत त्याच्या आवडत्या कूकीज घ्यायला म्हणून फडताळावरच्या डब्याला हात घातला. पण वीजेचा झटका बसल्यागत हात मागे आला. भिंतीवरून मुंग्यांची एक रांग त्या डब्याला वेटोळे घालून बसली होती. त्या झटकल्याशिवाय डब्बा उघडणे अशक्य होते. एवढ्या मोठ्या संख्येचा नायनाट करणेही अशक्य होते. कूकीजशिवाय कॉफीला काही अर्थ नव्हता. त्याने वैतागून गॅस बंद केला आणि पुन्हा कॉम्प्युटरमध्ये डोके खुपसून बसला. थोडी गाणी ऐकली. थोडे यूट्यूब विडिओ पाहिले. पण फार वेळ राहावले नाही. थोड्यावेळाने पुन्हा जंगली मराठीवर चक्कर टाकली. वीस-पंचवीस नवीन पोस्ट आल्या होत्या. वाद आणखी चिघळला होता. आता तो हिटलरवर पोहोचला होता. त्याने अधाश्यासारख्या सर्व पोस्ट वाचून काढल्या. हिटलरचेही समर्थक आहेत हे पचवणे त्याला जड जात होते. अवघड आहे सारे. पुन्हा एकदा तो या निष्कर्शापर्यंत पोहोचला. पोटातल्या कॉफीच्या तल्लफीने पुन्हा उचल खाल्ली. पण कूकीजशिवाय कॉफीला काही अर्थ नाही. आता तरी त्या मुंग्या आपल्या घरी गेल्या असतील का बघायला म्हणून उठला. पण त्या सुद्धा त्या सोशलसाईटवर पडलेल्या मुंगळ्यासारख्याच चिवट होत्या. हटायलाच तयार नव्हत्या. चरफडत त्याने एकीवर राग काढला. एक वाट सोडून भटकलेल्या मुंगीला बोट दाबून चिरडले. कडाकड तिची हाडे मोडली आणि तिथेच भिंतीला चिकटली. तो हाडं मोडायचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचला नाही. पण बोटाला जाणीव झाली. त्या संवेदना थेट मेंदूपर्यंत पोहोचल्या आणि अगदीच क्षुल्लक कारणासाठी एखाद्या निष्पाप जीवाची हत्या हातून घडल्याने त्याचे डोके गरगरू लागले. त्याच अवस्थेत तो पुन्हा कॉम्पुटरवर बसला. पण आता जंगली मराठीवर जायची भिती वाटू लागली. हिंसा, अहिंसा, गोहत्या, एका क्षुद्र मुंगीला चिरडणे, अहिंसो परमो धर्म:, ती माणसांनी माणसांची फोडलेली डोकी, रक्ताच्या चिळकांड्या, कडाकडा मोडलेली हाडे, त्यांचा मेंदूला होणारा त्रास.. डोके आणखी गरगरवून घ्यायचे नव्हते. कॉफीशिवाय पर्याय नव्हता. पण कूकीजशिवाय कॉफीला अर्थ नव्हता. ईतक्यात त्याला आठवले, काल रात्रीच्या चार शिल्लक कुकीज पुन्हा डब्यात भरून ठेवायचा कंटाळा म्हणून तश्याच ओवनमध्ये ठेवल्या होता. त्याने चटकन ओवनकडे धाव घेतली. जाता जाता कॉफीचा गॅस पुन्हा चालू केला. पण ओवनकडे पाहतो तर त्याचा दरवाजा तसाच उघडा होता. अरे देवा, नरम तर पडल्या नसतील. त्याने हाताने दाबून चेक करायला कूकीजकडे हात नेला. आणि पुन्हा झटका बसल्यागत हात मागे आला. पुर्ण प्लेट मुंग्यांनी भरली होती. एखाद्या नवीन मुंगीला प्लेटमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. ओवन ते शेजारची भिंत अशी एक आतबाहेर करणारी मुंग्यांची रांग लागली होती. किती होत्या त्या एकूण. शंभर दोनशे, हजार पाचशे. सहज असतील. आज ना कूकीज नशीबात होत्या ना कॉफी. संतापून ओवनचा दरवाजा त्याने बंद केला आणि एक विचार त्याच्या डोक्यात चमकला. स्विच ऑन केला आणि स्टार्ट बटण दाबले. ओवन तीस सेकंदावर सेट होत चालू झाला. भट्टीने पेट घेतला होता. आपसूक त्याचे हात कानावर गेले, तो आक्रोश त्या किंकाळ्या त्याला ऐकायच्या नव्हत्या. पण कानावर कसलाही आवाज येत नव्हता. मेंदूपर्यंत कोणत्याही संवेदना पोहोचत नव्हत्या. ना मनाला कोणत्या वेदना जाणवत होत्या. कानावरचा हात काढला. पंधरा सेकंद झाले होते. ईतके पुरेसे म्हणत त्याने ओवन बंद केला. दरवाजा उघडला. सर्व मुंग्या निपचित पडल्या होत्या. एक ओला फडका घेऊन त्याने ओवन पुसून घेतला. फडका धुताना मुंग्यांची प्रेतंही वॉशबेसिनमार्गे गंगेला मिळाली. कूकीजना चिकटलेल्या मुंग्यांना खरडवून त्याने साफ केले. त्यांच्याबद्दल आता फक्त सोहमलाच ठाऊक होते. प्लेट धुवून पुसून त्याने कूकीज पुन्हा प्लेटमध्ये ठेवल्या. प्लेट ओवनमध्ये ठेवली. आणि ओवनचा दरवाजा पुन्हा एकदा तसाच किंचित उघडा ठेवून तो कॉप्म्युटरकडे वळला. जंगली मराठीचे पेज रिफ्रेश केले. कोणीतरी आता तिथे हिटलरचा फोटो अपलोड केला होता. मिशीतल्या मिशीत सोहमकडे बघून तो हसत होता...
- ऋन्मेष
आ. रा. रा., तुम्ही इकडे
आ. रा. रा., तुम्ही इकडे ज्यासाठी ओपन तक्रार नोंदवलीत एक्झॅक्टली तेच तुमच्या चाळणी पोस्ट मधून केलंत असं वाटत नाही का?
आ रा रा आणि अमित यांना
आ रा रा आणि अमित यांना अनुमोदन.
हे holocaust उदात्तीकरण आहे . सिम्पल. सिक. या आयडीवर आतातरी कारवाई करा.
ऋन्म्या, हाराकिरी पथक अ
ऋन्म्या, हाराकिरी पथक अॅक्टिव झालेलं असुन तु आणि मी रेडार वर आलेलो आहे...
या धाग्यावर आलेल्या प्रतिसादांवरुन माबोवर अजुनहि सुजाण, रसीक वाचक (नेहेमीच्या यशस्वी कलाकारांचा अपवाद वगळता) आहेत हे मत आवर्जुन नोंदवावसं वाटतंय...
बाकि, उदात्तीकरण हा शब्द हल्ली खुप स्वस्त झालेला आहे...
हो. अन लोकांची अक्कल काढण, हे
हो. अन लोकांची अक्कल काढण, हे अधिक स्वस्त आहे.
अगदी अगदी @ सशल. देऊळ
अगदी अगदी @ सशल. देऊळ बांधायला राज यांच्याकडे देणगी जमा करा.

रच्याकने, आमच्यात अन आमच्या लहानपणी देव "बुद्धी" वाटत असे.. तुमच्यात कसं असतं ते आम्हास ठाउक नाही
बाकी माझ्या तक्रारीला अर्थ
बाकी माझ्या तक्रारीला अर्थ नाही, हे योग्य ठिकाणाहून आलेल्या प्र्तिसादानंतर दिवस उलटायच्या आतच गुडमार्निंग झालं मला. टाटा.
माझ्यावर खुशाल टिका करा,
माझ्यावर खुशाल टिका करा, माझ्या लेखाची बिनधास्त चिरफाड करा, पण कृपया अवांतर गप्पा टाळा. त्यामुळे चर्चेची मजा जाते. मी रात्री जेवून आल्यावर शांतपणे विचार आणि आत्मपरीक्षण करून पुन्हा एकदा नव्याने आणि प्रामाणिकपणे माझी बाजू मांडून बघतो
तोपर्यंत तुम्ही माझ्या नुकत्याच प्रसवलेल्या नवीन बाळाला बघून या. तसेच ईथे होणार्या अवांतर गप्पा तिथे चालतील म्हणून लिंक देतो
माझं बाळ - https://www.maayboli.com/node/64672
पण कृपया अवांतर गप्पा टाळा.
पण कृपया अवांतर गप्पा टाळा. त्यामुळे चर्चेची मजा जाते.
>>> वाह... कोण बोलतंय __/\__
स्कोअर सेटलिंगकडे वळलाय धागा.
स्कोअर सेटलिंगकडे वळलाय का धागा?
आरारा, सनव, अमितव
आरारा, सनव, अमितव
आपले प्रतिसाद अनुक्रमे असे आले
आरारा- हिटलरचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न, मलातरी अत्यंत विकृत व घृणास्पद तसेच निषेधार्ह वाटतो.
अमितव - हिटलर(ज्यु) आणि मुंग्या अशी तुलना आणि वर तोंड करून दिलेलं स्पष्टीकरण सगळंच सिक आहे. हे उद्दातीकरणावरही त्वरीत कारवाई व्हावी.
सनव - हे holocaust उदात्तीकरण आहे . सिम्पल. सिक. या आयडीवर आतातरी कारवाई करा.
(सनव, या विधानात पेरलेल्या holocaust या ईंग्रजी शब्दाचा प्लीज अर्थ सांगा)
आता एक बेसिक प्रश्न -
माझ्या कथेत हिटलरचे उदात्तीकरण आहे अथवा नाही हे थोडा वेळ बाजूला ठेऊया. कारण मी माझ्या विचारातून कथा साकारली आहे आणि तुम्ही तुमच्या नजरेतून कथेकडे बघत आहात. त्यामुळे आपण एकमेकांना पटवून द्यायचा वाद अनंत काळापर्यंत चालू राहील. निष्कर्श शून्य निघेल.
म्हणून आता बेसिक प्रश्न - हिटलरचे उदात्तीकरण करण्यात नेमके गैर काय आहे? जे मायबोलीवर खपवून घेतले जाऊ नये? जर कोणी मायबोलीवर हिटरलचे समर्थन करत असेल तर आपल्यामते ते कोणत्या नियमाअंतर्गत चुकीचे ठरेल?
शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज
ऑस्ट्रिआ, जर्मनी आणि अनेक
ऑस्ट्रिआ, जर्मनी आणि अनेक युरोपिअन देशांत हिटलरला ग्लोरिफाय करणे हा गुन्हा आहे. नाझी सॅल्युट केला तरी तुरुंगाची हवा खावी लागेल.
)
हेट स्पीच जिकडे जिकडे गुन्हा आहे तिकडे तिकडे हिटलरचे समर्थन हा गुन्हा ठरेल.
अमेरिकेसारखी फ्री स्पीच पॉलिसी असेल तर वाट्टेल ते बोललेलं चालेल. पण माबोवर फर्स्ट अमेंडमेंट चालत नाही हे आत्ता पर्यंत अनेकदा बघितलं आहे, सो हा गुन्हा ठरवा असं मनोमन वाटतं. बाकी माबो खाजगी जागा आहे तिकडे काय चालेल आणि काय नाही हे तू /मी किंवा आणि कोणी ठरवू शकत नाही. सो या प्रश्नाला उत्तर द्यायचं असेल तर प्रशासक देतील. (ते ही तुला इग्नोर मारतील बहुतेक.
बाकी मला वाटतं इथलं कुणीच तुला काहीही पटवून देऊ इच्छित नाही/ तुझ्याशी वाद घालू इच्छित नाही. त्यामुळे अनंत काळ वगैरे वाद अजिबात होणार नाही. तू चूक मान्य करू नको आणि कर बाबा हिटलर समर्थन.
ऑस्ट्रिआ, जर्मनी आणि अनेक
ऑस्ट्रिआ, जर्मनी आणि अनेक युरोपिअन देशांत हिटलरला ग्लोरिफाय करणे हा गुन्हा आहे.
>>
ओके! म्हणजे
1) जगभरात हा गुन्हा नाही आहे.
2) माझा प्रश्न होता यात काय गुन्हा आहे? पण तुम्ही कुठे कुठे हा गुन्हा आहे हे सांगितले. थोडक्यात प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले.
(ते ही तुला इग्नोर मारतील बहुतेक. Lol )
>>>>>>
1) आधी आपण प्रशासकांकडे याच्याकडे कारवाई करा अशी कळकळीने विनंती केली. मग मी का कारवाई करावी याचे कारण मागताच ते न देता प्रशासक इग्नोर मारतील असे स्वत:च ठरवत बॅकफूटवर गेलात. थोडक्यात प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले.
2) लोल करत एखादा विनोद घडवल्यासारखे हसलात. आणि वर जे मला तुमची विनंती कळक्ळीची वाटली होती त्यातील गांभीर्य स्वत:च घालवलेत. किंवा ते नव्हतेच हे दाखवलेत
असो, धन्यवाद,
सनव आणि आरारा यांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत ......
मुंबईत तीन वाजत आले. जरा झोपतो आता. उद्याच बोलूया. शब्बाखैर!
Honestly I have nothing to
Honestly I have nothing to say to you. Not interested in interacting further. Carry on.
जगात गुन्हा नाही इत्यादी फाटे
जगात गुन्हा नाही इत्यादी फाटे फोडशील खात्री होती. चालुद्या निओ नात्झीगिरी.
काहीही कंपॅरिझन...
काहीही कंपॅरिझन...
मुद्दा खोडणे ईज ईक्वल टू फाटा
मुद्दा खोडणे ईज ईक्वल टू फाटा फोडणे
जर एखादी गोष्ट भारतात गुन्हा असती पण जगातल्या ईतर काही देशात गुन्हा नसती आणि तेव्हा मी बोल्लो असतो की बघा हे जगभरात होत नाहीये तर तो फाटा झाला असता.
पण ईथे आपण भारतात आणि एका मराठी संकेतस्थळावर आहोत. जगातल्या जर्मनी, ऑस्ट्रिया आणि अंटाक्रिटामध्ये काय समजले जाते हे तुम्ही मला का सांगत आहात? तो त्यांचा ईतिहास आहे तिथे हा गुन्हाच समजला जाणार.
हे म्हणजे असे झाले की जगातल्या काही युरोपियन देशात हाताने जेवणे असभ्यपणाचे लक्षण समजले जाते म्हणून तुम्ही त्या आधारावर मायबोलीवरील भारतीयांना असभ्य म्हणून हिणवणार
असो, माझा प्रश्न होता यात काय गुन्हा आहे? पण तुम्ही कुठे कुठे हा गुन्हा आहे यातच अजून रमला आहात. थोडक्यात प्रश्नाचे थेट उत्तर देणे अजूनही टाळत आहात.
Honestly I have nothing to
Honestly I have nothing to say to you. Not interested in interacting further. Carry on.
>>>>
सनव, आपल्याकडे याआधीही काही मुद्दा नव्हताच. आपण नुसते हे सिक आहे कारवाई करा कारवाई करा हेच गेले काही पोस्ट लिहित होता. तेच तुमच्या लक्षात आणून द्यायला तुम्हालाही त्या प्रश्नात टॅग केले. आपल्याकडून उत्तर येईल अशी अपेक्षा नव्हतीच. फक्त आपली काहीही मुद्दा न मांडता कारवाई करा पोस्ट थांबवणे एवढाच हेतू होता. सफल झाला. धन्यवाद
अमितव,
अमितव,
तुमच्यासाठी प्रश्न थोडा सोपा करतो.
तुम्ही सलमानचे चित्रपट बघता का?
काय पण लोक कंपॅरीझन करताहेत.
काय पण लोक कंपॅरीझन करताहेत. कथा आहे ती. लेखकाच्या डोक्यातुन आलेली.
तेच त्याचे विचार आहेत की कसं हे कसं बुवा कळलं?
कथेत हिट्लरचे उदात्तीकरण कुठे दिसलं लोकांना?
आणि बरं दिसलं असेलही तरी लगेच लेखक सिक मनोवृत्तीचा? लगेच कारवाई करा?
ग्रो अप.
हे नेहमीचे यशस्वी कलाकार आपल्या पर्सनल स्पेस मधे ऋन्मेष कस्सा माझ्या डोक्यात जातो, कशी चिड येते त्याच्यामुळे, आणि मी बै कशी इग्नोर करायला शिकले / शिकलो, त्यामुळे कसं बरं वाटतंय असे तावातावाने लिहित असतात.
त्यांना ऋ ला इग्नोर करणं खरं जमतच नाही का?
ऋन्मेष . चांगल लिहिलय. मला
ऋन्मेष . चांगल लिहिलय. मला यात जी ए किंवा दिलीप चित्रे यांचे प्रतिबिंब दिसले.
)
मी कधी तुम्हाला किंवा तुमच्या धाग्याला प्रतिसाद देत नाही. पण यावेळेस वाटल. वेगळ काही तरी असल्याने. बाकी भारंभार धागे आणि प्रतिसादांपेक्षा आपल्या कडून अस काही तरी चांगल वाचायला मिळेल ही अपेक्षा. (मी पुण्याचा
मला तरी यात कुठे हिटलरची भलावण दिसत नाही. असेल तर हिंस्त्र वृत्ती बरोबरचे साम्य दाखवलेले दिसले.
त्यांना ऋ ला इग्नोर करणं खरं
त्यांना ऋ ला इग्नोर करणं खरं जमतच नाही का? >>>>> अगदी अगदी. +11111.
ऋन्मेषचा धागा उघडायचाच नाही ना आवडत नाही तर.
एक काल्पनीक कथा म्हणून
एक काल्पनीक कथा म्हणून नक्कीच आवडली. बाकी मी मात्र सस्मित आणी विक्रमसिंह यांच्याशी सहमत.
प्रत्येक व्यक्ती मध्ये हिटलर
प्रत्येक व्यक्ती मध्ये हिटलर आणि बुद्ध असतो, तो स्थळ काळ आणि मनो अवस्था प्रमाणे प्रगट हो तो.
विक्रमसिंह, धन्यवाद.
विक्रमसिंह, धन्यवाद.

मला असे कधीतरीच येणारे प्रतिसाद आनंद देऊन जातात. लेख चांगला झाला असावा म्हणूनच नाही तर आज नेहमीपेक्षा काही वेगळे जमले म्हणून
भारंभार धागे कमी करायचा प्रयत्न सध्या आहेच, प्रतिसाद कमी करणे शक्य नाही कारण ती माझी रक्तवाहिनी आहे, पण जमेल तितके चांगले लिहायचा प्रयत्न राहीलच..
अवांतर - आई लव्ह पुणेकर्स ! त्यांची थोडीशी गंमत करायलाही आवडते, कारण त्यानंतर पुणे स्पिरीट बघायला मिळते
सस्मित, भान धन्यवाद...

सस्मित, तुम्ही तर माझी ढाल बनून नेहमीच असतात
पण फक्त माझे दुकान बंद कराल ईतकाही राग देऊ नका कोणाला
जोक्स द अपार्ट, पहिले ३०-३५ प्रतिसाद पाहता कोणाच्याही डोक्यात आले नसावे की यात हिटलरचे उदात्तीकरण वगैरे आहे. जेव्हा बहुसंख्यांना एखादी गोष्ट खटकते तेव्हा मी आत्मपरीक्षण करून सुधारायचा प्रयत्ना करतोच. पण पुढे तिघाचौघांकडून त्या आशयाचे प्रतिसाद आल्यानंतरही मी थोडासा शांत डोक्याने विचार केला. तरी उदात्तीकरण म्हणतात तसे काही मला जाणवले नाही. मुळात माझ्याकडून ते होणे शक्यही नाही. कारण मी स्वत: सर्वधर्मसमभाव, नास्तिक, अहिंसाप्रिय, लोकशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा माणूस आहे. माझ्याकडून एका हुकूमशहाचे उदात्तीकरण निव्वळ अशक्य आहे. बाकी प्रत्येक जण आपल्या नजरेतून अर्थ काढायचा हक्क राखतो. तो प्रामाणिक असल्यास त्या मताचा आदर आहेच
मी विचारलेल्या कठीण प्रश्नांची उत्तरे मिळणे अवघड असल्याने आता मी देखील फार न ताणता हा विषय माझ्याकडूना क्लोज करतो
प्रत्येक व्यक्ती मध्ये हिटलर
प्रत्येक व्यक्ती मध्ये हिटलर आणि बुद्ध असतो, तो स्थळ काळ आणि मनो अवस्था प्रमाणे प्रगट हो तो.
>>>
राम तेरे मन मे है, राम मेरे मन मे है
मन से रावन जो निकाले, राम उसके मन मे है
- शाहरूख खान, स्वदेस
तुम मुझे खून दो मै तुम्हे
तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा
- सचिन खेडेकर
आँख के बदले में आँख पूरे विश्व को अँधा बना देगी।
- Ben Kingsley
मानव
मानव
ओये! ढाल बिल बनुन काही नाही
ओये! ढाल बिल बनुन काही नाही हं.

आणि तुझं दुकान बंद होणारं नाहीये.
लोक जे काही रान उठवतात, चिडचिड करतात आणि मुख्य म्हणजे सतत एखाद्याला कमी लेखत स्वतः किती ग्रेट,किती परफेक्ट आहोत अशा आविर्भावात रहातात त्यावर बोलले मी.
आता तु टार्गेट आहेस नंतर कुणी दुसरं असेल.
काहीही बोला पण दर्जेदार लिखाण
काहीही बोला पण दर्जेदार लिखाण होते, आपल्याला झेपलेच नाही पहिल्यांदा... लगे राहो रुंम्याभाई
भारी लेख आवडला अतिशय रंजकपणे
भारी लेख आवडला अतिशय रंजकपणे मांडलाय
मला तरी यात कुठे हिटलरची भलावण दिसत नाही. असेल तर हिंस्त्र वृत्ती बरोबरचे साम्य दाखवलेले दिसले.>>>+१११११
Pages