इंडिपेंडन्स पॉईंट via ताम्हिणी घाट - भन्नाट रोड ट्रिप
.
.
.
यंदा पुण्यात पावसाची हजेरी बरीच लांबली होती पण पावसात भिजण्याचा मोह काही आवरत नव्हता . ग्रुप मध्ये चर्चा सत्र सुरु झाला . पाऊस कुठे असेल यावर जणू डिबेट च सुरु झाले . थोडी चर्चा झाली असता स्पॉट ठरला "ताम्हिणी घाट" . तिथे पाऊस नक्कीच असेल असे सगळ्यांना वाटत होते आणि तसेच झाले पाऊस तर सोडा वाऱ्यासारकीं पावसाची लाट च तेथे होती. नेहमी प्रमाणे सकाळी लवकर जायचे ठरले आणि नेहमी प्रमाणे १ तास उशीर झाला तेही माझ्या मुळेच :p
.
.
.
.
.
.
.
मुंढवा चौक - B T कवडे रोड - फातिमा नगर - स्वारगेट असं करत करत आम्ही( मी आणि रवी ) सिद्धेश्वर आणि गणेश ला पिकप साठी निघालो.
त्यांना घेऊन थेट कोथरूड - पौड मार्गे आम्ही ताम्हणी घाटाला लागलो . पाऊस तर काहीच नव्हता पण जसा घाट सुरु झाला पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली . सगळ्यांच्या जीवात जीव आला कारण ज्याच्या साठी आम्ही निघालो होतो तोच क्षण आला होता म्हणजे मनभरून भिजण्याचा . टिंगल टवाळगे करत आम्ही आमची रोड ट्रिप सुरु केली'
.
.
.
.
.
.
.
पावसाने चांगलाच जोर पकडला होता . गरम गरम चहाची गरज भासत होती . एक आजी दिसली चहा विकताना बोर्ड "येथे गवती चहा मिळेल" असा होता . मी bike वरून उतरताच क्षणी आजी ना विचारले "आजी गवती चहा च आहे ना" आजी ने अगदी प्रेमानी उत्तर दिले "एकदम गरम गरम गवती चहा" . सगळ्यांनी चहा वर ताव मारायला सुरुवात केली फक्त रवी ला सोडून ... चहा १० रुपये ला एक होता मी ५० रूपयाची नोट काढली पण आजी एकदम "बाळ सुटे पैसे दे ना म्हणजे मला पण बर वाटेल". सगळ्यांनी एकमेकांकडे बघ्याची भूमिका घेतली . शेवटी रवी ने सुटे पैसे दिले . यार पण रवी खूप चिडला चहा तर पिला नाही आणि पैसे मीच देऊ :p पुन्हा चेष्टा मस्करी सुरु झाली . आणि पुन्हा bike चालू झाल्या ते थेट इंडिपेडन्स पॉईंट पाहण्यासाठी ...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
>फोटोग्राफी अमोल कवदे :
.
.
.
>फोटोग्राफी अमोल कवदे :
.
.
.
>फोटोग्राफी अमोल कवदे :
.
.
.
>फोटोग्राफी अमोल कवदे :
.
.
.
पॉईंट ला येताच थोडा पाऊस कमी झाला आणि धुक्यानी पावसाची जागा घेतली धुके म्हणण्यापेक्षा ते ढगच होते सगळ्यांच्या जीवात जीव आला . आपापले मोबाइल बॅग मधून बाहेर आले जे पाऊस येताच कॅरीबॅग मध्ये गुंडाळून गेले होते. सेल्फी आणि विडिओ रेकॉर्डिंग सुरु झाल्या .
ते सुंदर दृश्य फक्त बघतच राहावं कि त्यांना आपल्या मोबाइल मध्ये कैद करावे काहीच काळत नव्हते . आकाशाला गवसणी घालणारे ते उंचच उंच डोंगर . कधी ढगांच्या आड लपणारे आणि हळूच बाहेर मान काढून आपली उंची सांगणारे मोठं मोठाले सुळखे . ती डोळ्यांत न मावणारी खोल दरी .
एक वेगळाच आनंद होत होता .. रोजच्या धावपळीच्या जीवनातून खूपच लांब आलोय आणि हे सगळं पाहायला मिळतंय हे मी भाग्याच समजत होतो .
.
.
>फोटोग्राफी अमोल कवदे :
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
काही क्षण कॅपचर करण्यात आले काही नुसतेच डोळ्यात भरून घेण्यात आले .. आमचा अजून एक मेंबर "विशाल" काही येऊ शकला नाही पण तो हि हाच म्हणायचा "मोमेन्ट एन्जॉय करा रे कॅपचर करु नका " आम्ही पण त्याला उत्तर द्यायचो "एन्जॉय पण करा आणि कॅप्चर पण करा :p ". "missing विशाल" सारखे वाक्य सिद्धेश्वर च्या तोंडी येत होत्या (सिद्धेश्वर मित्राचे नाव आहे पण देवमाणूसच आहे).
पोटातील कावळ्यांना हि त्यांचेच आवाज ऐकू येत होते "अरे जेवायला द्या आम्हाला" . सिद्ध ने ब्रेड आणि रवी ने सॅन्डविच साठी लागणारे साहित्य आणि मी ऑम्लेट आणलेले होते पण पाऊस चालू झाला आणि त्याचा वेग हि वाढला . पण मग सँडविच खायचे कसे .. bike पुन्हा चालू झाल्या जागा शोधत शोधत आम्ही अंधारबनं च्या दिशेने निघालो पण जागा काही भेटली नाही . पुन्हा घाट मार्गे जाण्याचा निर्णय घेण्यात आला . परतीचा प्रवास सुरु होत होता पण भूक हि भयानक लागली होती . शेवटी एका गावात बस स्थानक दिसले . तिथे कधी बस आल्या कि नाही माहित नाही पण जागा छान होती पत्राचे शेड ३ हि बाजूने भिंत भिजण्याची भीतीच नव्हती ' bike पार्क करण्यात आल्या बॅग ढिले करण्यात आली शिदोरी उघडण्यात आली रवी सँडविच बनवण्याचे काम हाती घेतले आणि सिद्ध ने कांदे टमाटे कापायला सुरुवात केली (बिचारा त्याचा उपवास होता आणि तोच मदत करत होता मी बोलो होतो ना "देवमाणूस" हाच तो) . आणि मी नुसताच उभा राहून बघत होतो ' पावसाचा जोर हि कायम होता . सँडविच सुदखा सुद्धा तयार झाल्या . पोटात जाताच सगळ्यांच्या तोंडून एकच आवाज ("waaaaaaa") . वाह घरात बसून रोजच जेवतो आणि आज चक्क बस स्टॉप मध्ये भर पाऊस आणि थंडी गार वारा .. सोबत जेवण्याची वेगळीच मजा आली .
अश्या प्रकारे आमची रोड ट्रिप
.
.
.
.
.
.
>फोटोग्राफी अमोल कवदे :
.
.
.
>फोटोग्राफी अमोल कवदे :
.
.
.
>फोटोग्राफी अमोल कवदे :
.
.
.
.
लेखन करण्यास खुप मेहनत घेतली आहे. आमची अशी भटकंती आवडल्यास नक्कीच कमेंट करा
धन्यवाद।
राहुल
ट्रेक चा पुर्ण विडिओ : https://www.youtube.com/watch?v=tMFiHqfKg7A
नक्कीच लाइक आणि subscribe करा।
छान लिहीलय अन् फोटो पण मस्त
छान लिहीलय अन् फोटो पण मस्त आलेत...
Thank you
Thank you
लेख आवडला.
लेख आवडला.
फोटोदेखील छान आलेत. विशेषतः तो दगडांवर दगड रचलेला आणि गवताच्या पातीचा फोटो आवडला.
असंच लिहीत राहा.
छान लिखाणाला नयनरम्य
छान लिखाणाला नयनरम्य छायाचित्रणाची जोड ....
thank you rahul and
thank you rahul and vijaykumar.......