आजारपणात काय खावे आणि आणि काय नको हा प्रश्न नेहमीच पडतो. काय खाल्ले की त्रास होतो, काय खाणे चांगले, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तोंडाला चव नसताना काय घश्याखाली उतरू शकते. शेवटी अपराधी पोटाची भूक तर भागवलीच पाहिजे. पण काही पदार्थ ईतरवेळी अत्यंत आवडीचे असूनही आजारपणात तोंडाला चव नसल्याने खावेसे वाटत नाहीत, किंवा खावेसे वाटले तरी सर्दी ताप खोकल्यात चालत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाचे आजारपणात खायचे पदार्थ ठरलेले असतात. तेच या धाग्यावर लिहायचे आहेत. कदाचित हे पदार्थ व्यक्तीपरत्वे बदलतील. एकाचे दुसर्याला चालणार नाहीत. पण चालले तर लोकांना चार अतिरीक्त पर्याय मिळतील. म्हणून आजारी असताना आणि तोंडाला चव नसताना ज्या ठराविक पदार्थांवर मी जगतो ते मी लिहितो. तुम्ही आपले लिहा
१) दालखिचडी - नुकतेच मायबोलीवर दालखिचडीवर एक धागा येऊन गेला. ज्यात मी दालखिचडी फक्त आजारपणातच खातो असा उल्लेख केला होता. आणि ते खरेच आहे. मी आजारी पडलो आणि तोंडाला काही चव नसली तर मी दिवसातून दोन वेळा पोटभरीचे असे काही खाऊ शकतो तर ती फक्त दालखिचडीच. गंमत म्हणजे जेव्हा मी आजारातून उठतो. म्हणजे कायमचा नाही, तर जेव्हा बरा होतो. तेव्हा मात्र अचानक त्या दालखिचडीचा तिटकारा वाटू लागतो
यंदाच्या दिवाळीनंतर आजारी पडलो तेव्हाची ही दाखखिचडी. थंडी-ताप-खोकला नसल्याने खिचडीसोबत वाईच घोटभर ताक सुद्धा घेतले होते. आणि हो, ज्याप्रमाणे दारूसोबत चकणा तसे दालखिचडी सोबत पापड मस्टच असल्याने तो ही होताच. तसेच चार चटण्या लोणची असली की तेवढीच तोंडाला चव येते. पण त्यातही फोटोत दिसणारी भरलेली तळलेली सुकी मिरची माझी फेव्हरेट
२) मीठ मीरपूड लावलेले सफरचंद - हा एक भारी प्रकार असतो. सफरचंद ईतरवेळीही आवडतेच. सर्वांनाच आवडत असावे. पण तापात मात्र तोंडाला चव नसली की खाणे अवघड होते. अश्यावेळी मग त्याला मीठ-मीरपूड चापडून बघावे. जादू केल्यासारखे अख्खे सफरचंद संपवाल. पोटालाही छान आधार मिळतो. मात्र हा पदार्थ देखील मी आजारी नसताना खात नाही. म्हणजे सफरचंद खातो, पण मीठमिरपूड लावत नाही.
३) लिंकोमीसा सरबत - आजारात शरीरातले पाणी कमी होते. पण पाण्याचीही चव लागत नसल्याने ते सतत पिणे अवघड होते. अश्यावेळी मी हे लिंकोमीसा सरबत बनवतो.
कृती फार सोपी आहे,
१. टोपभर पाणी घेऊन उकळायला ठेवा.
२. त्यात कोकमाच्या सात आठ पाकळ्या टाका.
३. थोड्या चेचा. थोडे चमचाने ढवळा. पाण्यात छानसा काळपट लाल रंग उतरू द्या.
४. अर्धे रसभरे लिंबू त्यात पिळून घ्या आणि साल त्यातच उकळायला टाका.
५. चवीनुसार मीठ-साखर घ्या.
६. त्यात जास्तीचे पाणी टाकून एकदिड लीटरचे पातळ सरबत तयार करा.
७. सरबताची भरलेली बाटली जवळ बाळगा आणि पाण्यासारखे अधनामधना पित राहा.
सात स्टेप्स आणि सात मिनिटात आजारपणात जगवणारे लिंकोमीसा टॉनिक तयार
४) डाळिंबाचे दाणे - फटाक्यांच्या माळेतील एकेक लवंगी सोडून वाजवावी तसे डाळिंबाचा एकेक दाणा तोंडात टाकत टाईमपास करायचा. तोंडाला चव येत राहते आणि काहीतरी पोटात जातेय याचे समाधान मिळते. मी त्यातील बी थुकतो. कारण मला माज नाही. पण किडनीस्टोन आहे.
५) तवा ब्रेड बटर - मी ते हॉटेलमधील ब्रेडबटर टोस्ट फार आवडीने खात नाही. मला माझ्या आईच्या हातचे आवडतात. ब्रेड स्लाईसच्या दोन्ही बाजूला मस्का लावून, तव्यावर परतून काविलत्याने दाबून दाबून, खरपूस भाजून किंचित ब्राऊनिश केलेले.. आजारी असो वा नसो, आवडीच्या ब्रेकफास्ट पदार्थांपैकी हा एक आहे.
६) ऑलटाईम फेव्हरेट कांदेपोहे - प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी असा फेव्हरेट पदार्थ असतो की जो तो मेल्यावरही कावळा बनून खायला येतो. मग आजारपण काय चीज आहे.
माझ्यासाठी तो पदार्थ कांदेपोहे आहे.
माझ्या पोहेप्रेमाबद्दल ईथे सविस्तर जाणून घेऊ शकता - कांदे पोहे आणि फ्रेंडशिप डे - https://www.maayboli.com/node/54988
फोटो मात्र आजवर काढला नाही. कारण पोहे समोर आले की मी बस्स तुटून पडतो
अरे हो, आजारपणात चहा प्यावीशी वाटत नाही, मात्र पोह्याबरोबर तेव्हाही जाते..
७) मॅगी - आजारात जसे डाळभात खावासा वाटत नाही तसे मॅगीही खायला होत नाही. पण आजारातून उठता उठता जेव्हा जीभ थोडीशी लपलपू लागते तेव्हा थोडीशी चटकदार चवीची गरमागरम मॅगी बरी वाटते. आजारात आईला खूप त्रास दिलेला असतो, पण मुळात आपलाच तो दुसर्यावर अवलंबून राहायचा त्रासदायक काळ असतो. त्यामुळे स्वत:च्या हाताने मॅगी करून खाणे बरे वाटते
ईतरवेळी मी मॅगीवर बरेच प्रयोग करतो - या ईथे ते जाणून घेऊ शकता - १२ मिनिट म्यागी - https://www.maayboli.com/node/59052
मात्र आजारपणात माझ्या मॅगीचे प्रयोग टाळतो, बस्स अगदीच प्लेन नको म्हणून चवीपुरता हलक्या हाताने शेवफरसाण भुरभुरून घेतो.
८) सटरफटर - या प्रकारात नमकीन बिस्किटे खायला बरी वाटतात. त्यात मोनॅको डार्लिंग आणि मस्काचस्का हे आवडीचे.
ता.क. - ‘मांसाहार हेच खरे मनुष्याचे अन्न आणि तेच खरे पुर्णब्रह्म’ असे समजणारा मी एक नॉनवेजप्रिय व्यक्ती असलो तरी सामिष पदार्थांचे आमिष मला आजारात झेपत नाहीत. अगदी अंड्यापासूनही दूर राहतो.
असो, आणखी काही आठवलेच तर ईथेच भर टाकेन.... तसेच येत्या काळात आजारी पडलो आणि वरच्या लिस्टव्यतिरीक्त काही खाल्ले तर त्याचेही फोटो टाकेन. पण आता ईतरांचा आजार आहार जाणून घेण्यास उत्सुक
मोसंबीचा रस- (इथे मोसंबी हे
मोसंबीचा रस- (इथे मोसंबी हे फळ आहे याची नोंद घ्यावी.)
एरवी अगदी नकोसा होतो. पण आजारपणात आई मीठ मिरपूड घालून एकदम फ्रेश बनवून द्यायची तो मात्र मस्त लागायचा.
बाकी साजूक तूप वा बटरवर भाजलेली ब्रेड.... अगदी एकमत या बाबतीत.
लिंकोमीसा सरबत फोटो सॉलिड
लिंकोमीसा सरबत फोटो सॉलिड एकदम. हे नव्हतं माहीती. करून बघेन आता.
मुगडाळ मऊसर खिचडी त्यावर साजूक तूप, असेल तर एखादा पोहा पापड भाजून , उडीद पापड नाही कारण तो पचायला जड. मऊभात बरोबर मेतकुट, साजूक तूप, मिरपूड आणि लिंबाचे उपासाचे आंबट तिखट गोड लोणचं, भाजलेला पोह्याचा पापड असेल तर बरोबर. साधारण हेच आजारपणात किंवा अगदी साधे मुगाचे वरण भात, तूप. आई कधी कधी मुगाची उसळ करायची आणि कळण पण द्यायची प्यायला किंवा सुंठेची कढी किंवा फोडणीचे ताक म्हणतात ते. असं आईकडून शिकले तेच साधारण असतं आजारपणात. काढा पण असतो, बरेच पदार्थ मिक्स करून उकळवलेला तो रात्री प्यायचा.
छान लेख नी लिस्ट ऋ.
छान लेख नी लिस्ट ऋ.
तुझे मॅगीचे प्रयोग बरेचसे आवडले नव्हतेच त्यामुळे हा फरसाण प्रकारही नाहीच आवडला. बाकी सगळे प्रकार छान. मला सफरचंद हे आजारी माणसाचे फळ असेच वाटते. आजारी नसताना खाल्लं की आजारी झाल्यासारखं वाटतं.
बाळा,
आजारपणात उकडलेले अंडे खावे. चांगले असते. ऍडमिट असताना पण हॉस्पिटलच्या जेवणात / नाश्त्यात देतात. मला तर एकदा मस्त फिश राईस्प्लेट दिलेली. हॉस्पिटलमध्ये हे बघून धन्यधन्य झाले होते.
Chhan List!
Chhan List!
हे आजारपणावर अवलंबून आहे ना?
हे आजारपणावर अवलंबून आहे ना?
लहानपणी तापात नेहमी उकड्या तांदळाची किंचित खारट पेज, त्यासोबत लोणच्यातल्या कैरीची करकरीत फोड, ओल्या खोबर्र्याचा तुकडा हे ठरलेले होते.
सर्दी-खोकला ताप असेल टमाटो रसम. त्यात मिरपूड मस्ट.
पोट बिघडल्यावर दहीभात. सफरचंद.
डोकं दुखत असेल, तर चहाऐवजी कॉफी.
अगदी त्राण नाही असं वाटत असेल तर लिंबू सरबत.
तांदळाच्या कण्या जिरं तूप
तांदळाच्या कण्या जिरं तूप घालून
ऋ, मस्त लिहिलं आहेस.
ऋ, मस्त लिहिलं आहेस.
मला बरं नसेल सर्दी, ताप, पोट अपसेट, पित्त असं काही ही झालं असेल तरी मी नेहमी मौभात ,तूप ,मीठ ,मेतकूट आणि लिंबाचं लोणचं हेच खाते. चहा पण नाही घेऊ शकत ताक मात्र पिते. अगदी चार पाच दिवस सुद्धा हे खाऊ शकते मी. जसं जसं बरं वाटेल तसं तसच दुसरं काही खायची इच्छा होते.
अन्जू, त्या लिंकोमीसा मध्ये
अन्जू, त्या लिंकोमीसा मध्ये माहीत नसण्यासारखे काय मला पित्ताचा त्रास आहे त्यामुळे कोकम सरबत अधनामधना पित असतो. पण आजारात ते बाजारातले गोडूस चवीचे कोकम सरबत प्यायला मजा येत नाही. म्हणून या लिंकोमीसा घटकांवर प्रयोग करत माझ्या टेस्टला साजेसे सरबत बनवलेय इतकेच.
बाकी माझाही खोकला आईने बरेच प्रकार उकळवत केलेल्या काढ्यावरच निघतो.
सोनू, म्यागीच्या प्रयोगाची मी ग्यारंटी घेत नाही, मात्र माझ्या भाताच्या प्रयोगाची गर्लफ्रेंडसुद्धा फॅन आहे. म्हणजे तिची वरचेवर ते खायची फर्माईश असते.
@ उकडलेले अंडे, तापाच्या चवीत मला खायला होत नाही. अगदी क्वचित कधीतरी, मीठ-मीरपूड-मसाला लावत ते देशी दारू पिणारे चकणा म्हणून खातात तश्या फोडी करून अर्धे एक कसेबसे गेले तर गेले.. अंड्याचा माझा सर्वात आवडता प्रकार म्हणजे हाल्फफ्राय. पण ते आजारात खाल्ले तर मळमळते.
भरत >> लहानपणी तापात नेहमी उकड्या तांदळाची किंचित खारट पेज >> +७८६ लहानपणी आधी ती आवडायची नाही, पण घरचे जबरदस्ती पाजायचे. नंतर हळूहळू आवडीने जाऊ लागली. तेव्हा घरचे त्यातील भात सुद्धा खा म्हणून सांगायचे, पण तो जायचा नाही.
लिंकोमीसा सरबतात एक घटक
लिंकोमीसा सरबतात एक घटक (वाडका) वाढवुन त्याचं लिंकोमीसावा किंवा लिंकोमीवा केलं तर शरीराला तरतरी येउन रक्ताभिसरणाला हि चालना मिळते असं अभ्यास सांगतो...
खुपच कमी खातोस आजारपणात असो
खुपच कमी खातोस आजारपणात असो
आवडला लेख
चिकन सूप का नाही लिस्ट मध्ये?
चिकन सूप का नाही लिस्ट मध्ये?
राज, वाडका ?? वोडका का?
राज, वाडका ?? वोडका का?
च्रप्स, चिकन सूप नाही सध्या घेत. पण आजी होती तेव्हा ती कोंबडीचा काढा बनवायची. तो आजारपणात मुद्दाम मला द्यायचे. ती टेस्ट मला आजवर जगात कुठे सापडली नाही. आजी गेली आणि तो काढा बंदच झाला. ईतरांनी बनवायचा प्रयत्न केला पण त्या टेस्टचा जमलाच नाही. आणि मग तो नाद सोडून दिला. कारण त्या काढ्यामुळे उर्वरीत कोंबडीची चव थोडीफार उतरते. म्हणजे काढा पिणार्याची मजा पण इतरांवर अन्याय होतो
अन्जू, त्या लिंकोमीसा मध्ये
अन्जू, त्या लिंकोमीसा मध्ये माहीत नसण्यासारखे काय >>> नव्हतं माहीती रे, छान आहे ती रेसिपी. नुसतं कोकम सरबत माहीतेय, नुसते लिंबू सरबत माहीतेय, सोलकढी माहितेय, कोकम सार माहितेय पण ही तू शोधून काढलेली पद्धत छान वाटली.
मस्त लिस्ट ऋ. आता बरा आहेस ना
मस्त लिस्ट ऋ. आता बरा आहेस ना?
सरबत आवडलंय. करुन बघणार.
मुगडाळ+ तांदुळ मऊ खिचडी. गावठी तांदळाच्या कण्यांची पेज.
फ्रेश मोसंबी ज्युस. दहीभात. ताकभात.
थोडीशी डाळ शिजवुन पातळ्सर करुन नुसती गरम्गरम प्यायची. रसम सारखं फक्त मसाले ते नाहीत हलक्या चवीची.
एरवी आवडीचे कांदेपोहे मात्र खात नाही कारण अॅसिडीटी होते.
त्या मॅगीच्या फोटोमध्ये कंगवा
त्या मॅगीच्या फोटोमध्ये कंगवा का ठेवलाय बाजुला?
काटा (Fork) नसला किंवा मिळत नसला तर कंगव्याने मॅगी खायचा प्लान होता की क्वॉय?
(No subject)
{{{ मी त्यातील बी थुकतो. कारण
{{{ मी त्यातील बी थुकतो. कारण मला माज नाही. पण किडनीस्टोन आहे. }}}
टोमॅटोच्या धाग्यावरच सावध केले होतं तेव्हा कुणातरी बिनडोकाने पर्सनल कमेंट केली म्हणून नाक मुरडले होते पण इतके जास्त टोमॅटो खाल्ल्यामुळे किडनीस्टोन होणारच होता.
हायला मला नव्हता दिसला कंगवा.
हायला मला नव्हता दिसला कंगवा. लई भारी निरीक्षण ना भोऽऽऽ
कदाचित मॅगीतला गुंता काढायला फणी मिळाली नसेल म्हणून कंगवा.
नाहीतर फणी वापरून डोक्यातल्या XX काढतात. ही मॅगी ताजी होती ना?
इथे वाचलं म्हणून आताच मीठ
इथे वाचलं म्हणून आताच मीठ मीरपूड लावलेले सफरचंद खाल्लं. खूप धन्स रे रु!
गेल्या महिनाभरापासून पोटाच्या गडबडी सुरु आहेत, तोंडाची चव गेली आहे आणि अन्नावरची वासनाही.
बरं वाटलं खाऊन. आता एक एक आयटम ट्राय करतो.
इथे वाचलं म्हणून आताच मीठ
इथे वाचलं म्हणून आताच मीठ मीरपूड लावलेले सफरचंद खाल्लं. खूप धन्स रे रु! >> __/\__ मला सुद्धा जेव्हा हे माझ्या वडीलांनी पहिल्यांदा सांगितले तेव्हापासून आजही आजारी पडलो की त्यांना धन्यवाद देतो. आजारत तोंडाला चव नसताना जे अन्न जाते त्याची चव त्याची वॅल्यू तेव्हाच कळते.
@ कंगवा निरीक्षण भारी. मात्र तो कंगवा असाच ईथेतिथे पडलेला असतो. मी कधी कंगवा वापरत नाही, शेवटचा शाळेत कधीतरी वापरला असेल. अन्यथा आपला पाच बोटांचा हात जगन्नाथ. असो, अवांतर फार नको, आजारात आपल्या हाताने घ्यायचे आणि बेडवर बसून खायचे हा माझा शिरस्ता. म्हणून बरेच फोटो असे बेडवर वगैरे आहेत.
अरे पण ते चांगले झाले की
अरे पण ते चांगले झाले की कंगवा फोटोत आहे. म्हणजे फोटो घरामध्ये काढला आहे हे प्रूव्ह करता येईल. (आठवा फ्रीज-माठ केस)
आजारपणातले खाद्य छान लिस्ट
आजारपणातले खाद्य छान लिस्ट दिली आहे. माझी आज्जी होती तेव्हा तिचा एक ठरलेला पदार्थ म्हणजे साबूदाण्याची खीर. मला ती कधीच आवडायची नाही. पण आजारपणात औषध म्हणून घ्यायची.
छान लिस्ट. फक्त मोनॅको व
छान लिस्ट. फक्त मोनॅको व मस्का चस्का जरा मीठ व मसाले प्रिझर्वेटिव्ह चे जास्त प्रमाण म्हणून खाउ नये आजारी असताना. मला हाय बीपी असल्यानी मीठ कमीच खाते. कधीतरी मोनॅकोचा प्याक आणून खाल्ले की फारच खारट वाट्ते ती चव.
वरण भात तूप मौ शिजवलेले गरम गरम व साले न काढता केलेली बटाट्याची काच र्या भाजी. हा माझा फेवरिट आयटेम आजारी असले की.
तूप मेतकूट नाहीतर तूप मीठ भात , दही भात दूध भात हे आजारा नुसार.
हॉट अँड सावर सूप. चिकन आणि व्हेज.
एका मैत्रीणीला आजारी असताना संत्री मोसंबी सोलून मिक्स करून त्यावर हलकी दालचिनी पाव्डर घालून दिले होते ते ही तिला फ्रेश वाट ले व आव डले होते.
ब्रेड तव्यावर भाजून जरा खरपूस करून बट र लावून.
आणखी एक म्हणजे ... ब्रॅण्डिं
आणखी एक म्हणजे ... ब्रॅण्डिं राहिलीय लिस्ट मध्ये...
सूप मी सुद्धा यावर्षी दोनेक
सूप मी सुद्धा यावर्षी दोनेक आजारांपासून सुरू केले आहे. नॉरचे स्वीट कॉर्न सूप, पण त्यात चवीला सोया चिली सॉसेस टाकून..
@ सस्मित, आता बरा आहे. नेहनीचाच आजार आहे. लाईफलाँग चालत राहणारा. त्याबद्दल कधीतरी दुसरया धाग्यावर
ब्लॅक कॉफी विथ लिंबू एकदम
ब्लॅक कॉफी विथ लिंबू एकदम भारी
लिस्ट मस्त पण नॉट फॉर
लिस्ट मस्त पण नॉट फॉर एव्हरीवन असं म्हणेन.
म्हणजे मला सफरचंद कधीच आवडत नाही, आजारपणात तर बिग नो
सेम विथ मॅगी
पोहे आणि ब्रेड ऑल टाईम फेवरेट, त्यासाठी आजारी पडयची गरज नाही.
माझ्या आजारपणात खायच्या लिस्टीत हे पदार्थ येतात -
१) उपिट, फार रेअरली शीरा (इतर वेळेला बिग नो)
२) तुप मेतकुट भात ( ऑल टाईम फेवरेट)
३) साबुदाणा खिचडी (इतर वेळेला बिग नो)
४) साबुदाण्याची खारट खीर ( पापड बनवताना करतात तो प्रकार)
५) ब्रेड तुपात भाजुन त्यावर पिठीसाखर
६) शेवयाचं उपिट/ खीर ( आजारपणाच्या प्रकारावर अवलंबुन आहे)
७) टॉमॅटो सुप (हे नेहमीच आवडतं)
२) तुप मेतकुट भात ( ऑल टाईम
२) तुप मेतकुट भात ( ऑल टाईम फेवरेट) >+१ यासोबत लिंबाचं लोणच, मिरगुंड.
तोंडाला चव आणण्यासाठी आलं+लिंबू रस + मीठ + साखर
मलाही आजारपणात मॅगी खायला
मलाही आजारपणात मॅगी खायला आवडते. तोंडाला चव नसेल तर वरण भात आणि लिंबाच लोणच.
बरोबर लिहीलेस, मांसाहार तेव्हा नकोसाच वाटतो.
मस्त लिस्ट आहे ऋ .
मस्त लिस्ट आहे ऋ .
बरोबर लिहीलेस, मांसाहार तेव्हा नकोसाच वाटतो. >>>>>_+ १०००
माझं ऑटाफे
१. मूगाची लसणीची फोडणी देउन मउसर खिचडी , भरपूर साजूक तूप घालून .
२.सूप - पालक्/दूधी किन्वा मका किन्वा टोमॅटो किन्वा उकडलेल्या चण्यांच पाणी (हे सर्दीच्यावेळी मस्ट - माझी आई मस्त बनवते)
३.भाताची पेज , नुसती निवळ ही मी गटागटा पिउ शकते .
४. शिरा - लापशीचा असेल तर उत्तमच.
Pages