बाहेर मस्त छान पाऊस पडत होता , रात्रीचे १० वाजले होते तरी सुद्धा माझं आजच काम आटपलेले नव्हतं .आज बॉस ने दिलेल्या कामाची शेवटची dedline होती .त्यामुळे आज मला काम पूर्ण करूनच घरी जान भाग होत . तसा माझा ऑफिस चा स्टाफ निघून गेलेला. मी आणि ऑफिस चा पिऊन दोघंच होतो. कसबस एकदाच काम पूर्ण केलं .घड्याळात १० ३० वाजले होते .खूप उशीर झाला होता त्यात आज bus वाल्यांचा पण strike होता . लगेच निघालो बाहेर मुसळधार पाऊस पडत होता त्यात माझ्याकडे छत्री नव्हती . बाहेर आलो एक हि टॅक्सी वाला दिसत नव्हता .कसा तरी भिजत भिजत बस स्टॅन्ड पर्यंत गेलो .तिथे तरी टॅक्सी वाले असतील ह्या आशेने गेलो . पण तिथे सुद्धा एकहि टॅक्सी वाला नव्हता .भिजू नये म्हणून बस स्टॅन्ड च्या आडोशाला उभा राहिलो ,.निरव शांतता .सगळे दुकान सुद्धा बंद झालेले .थोड्याच वेळात एक आवाज कानावर पडला . हो येते मी लवकर .आताच बाहेर आली आहे.माहिती आहे मला उशीर झालाय .येते लवकर चल bye . दूरवरून एक मुलगी येताना दिसली. फोन वर बोलता बोलता बस स्टॅन्ड जवळ येऊन उभी राहिली. साडीत काय सुंदर दिसत होती ती.मी तिच्याकडे बघतच बसलो .जगात एवढ्या मुली बघीतल्या पण हिच्या सारखी नाही बघितली . कसली तरी ओढ होती कि मी तिच्याकडे आकर्षित होत होतो . चांगली गोष्ट म्हणजे तिच्याकडे छत्री होती .आणि मी एका आडोशाला उभा होतो . माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हती .हळूच नजरेने तिने माझ्याकडे बघितल. मी लगेच दुसरीकडे बघितल .जगात मेहनत करून सगळं मिळवता येत पण प्रेम असच होऊन जात. गरज नसली तरी एखादी गरज बनून जात. अशीच डोळ्यातली नजर हृदयात घर करून जाते .You are in love manas . अशीच ५ ते १० मिनिटे गेली . कसले तरी प्रश्नार्थक भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होते .थोड्या वेळाने पुन्हा तिने माझ्याकडे बघितल .हे काय ती तर माझ्याच जवळ येत होती .excuse मी आज एक हि बस दिसत नाही आहे ? माझं भानच नव्हतं मी आपल्याच विश्वात हरवून बसलो होतो . थोड्या वेळाने पुन्हा .
ती -हॅलो मिस्टर ?
मी-मी
ती -हा तुम्हीच मग इथे दुसरं कुणीही आहे का ?
मी -नाही . काय विचारात होतात आपण .
ती -अहो कधी पासून उभी आहे एक हि बस दिसत नाही .काय झालय आज ?
मी -तुम्ही काय news वगरे वाचत किंवा ऐकत नाही का .आज बस चा strike आहे .
ती -अरे बापरे .तरी शीतल ने मला सकाळी reminder केलं होत .shitt आता
मी - बघा कुठची टॅक्सी वगरे मिळते का ? मी सुद्धा त्याचीच वाट बघतोय .
तशीच ती निघाली .पुढे जाऊन थांबली Thank U बोलून पुन्हा निघाली . खर तर मला तिच्याशी बोलायचं होत . पण ह्या मॅडम तर चक्क चालत निघाल्यासुद्धा . shitt काय करू मानस असं बोलून मी स्वतःवरच ओरडलो . तेवढ्यात एक टॅक्सी वाला येताना दिसला . मी लगेच त्याला थांबवल . हि खूप लांब निघून गेलेली .लगेच आत बसलो आणि त्याला निघायला सांगितलं .पुढे गेल्यावर हि मला एका turn ला दिसली तिथे जाऊन टॅक्सी थांबवून बाहेर उतरलो .
मी-हे हाय ?
ती-हाय .
मी - टॅक्सी
ती -अरे वा gr8 . मग ?
मी - रात्रीची वेळ आहे तुम्ही अशा एकट्या कुठे चालाय . हि टॅक्सी तुम्ही घेऊन जा ?
ती -नाही its ओक मी बघते दुसरी टॅक्सी .
मी -अहो हि एक टॅक्सी चक्क पाउणतासाने भेटली आहे . माझं ऐका हि घेऊन जा तू sorry तुम्ही .
ती -नाही चालेले मला तू बोलेल आणि तुम्ही ?
मी -मग मला सुद्धा चालेल तू बोलेल ,
( दोघे एकमेकांकडे बघून हसतात )
मी- मी जाईल कसा पण. तू हि टॅक्सी घेऊन जा
ती - कुठे राहतोस तू
मी- बांद्रा
ती -बांद्रा ला कुठे ?
मी - पेरी रोड ला गोवर्धन सोसायटीत .
ती -अरे मी पण तिथेच राहते . म्हणजे माझी मैत्रीणच घर आहे , कालच मी तिच्याकडे राहायला आली आहे. हवं तर आपण दोघे एक दम जाऊया .
मी-चालेले तुला .
ती -आवडेल मला .
मी -काय ?
ती -(हसून) चल बस लवकर नाही तर हा निघून जायचा .
मी -(हसून )हा चल .
आम्ही दोघे टॅक्सी त बसून जायला निघालो .टॅक्सी मध्ये मस्त पैकी रोमँटिक गाणं लागलेलं असत. पण दोघेही गप्प. थोड्यावेळ पूर्वी एवढी बोलणारी हि गप्प कशी ? मग काय नेहमी प्रमाणे प्रत्येक गोष्टीत मुलालाच पुढाकार घ्यावा लागतो .
मी -हाय मी मानस पिळणकर .
ती - (हसून ) सॉरी हा मी गाणं ऐकण्यात धुंद होती . हे माझं आवडतं गाणं आहे .बघ ना काय सुंदर lyrics आहे .
मी -(हसून) हो तुला आवडत म्हणजे सुंदरच असेल ,पण आपल नाव सांगितलं तर खूप मेहरबानी होईल या गरिबांवर .
ती -(पुन्हा हसून ) ख़ुशी पटेल .
मी- म्हणजे तू गुजराती आहेस.
ती -का ? काही प्रॉब्लेम आहे का ?
मी- नाही .तुझी मराठी खूप चांगली आहे . वाटलं नाही कि तू गुजराती आहेस म्हणून .
ती -हो का .अरे माझी आई मराठी आहे आणि बाबा गुजराती .त्यामुळे हवं तर मला तू मराठी किंवा गुजराती काहीही बोलू शकतोस .
मी - (हसून ) नाही खुशीचं चांगल आहे .कोणाकडे राहतेस तू ?
ती -शीतल शर्मा .रूम नो -६०१ मध्ये. म्हणजे तू ओळखतच अशील .
मी - ऑफ कोर्से ओळखतो तशी आमची शाळेपासून ओळख आहे .आम्ही एकाच शाळेत होतो आणि एका सोसायटीत सुद्धा . ती माझी चांगली मैत्रीण आहे ,फक्त मैत्रीण हा .
(ती नुसतं मला बघून हसत राहते .मला समजलं मी काय गाढवपणा केला आहे .जरा शीतलच जास्तच कौतुक केलं आणि नुसती मैत्रीण हे तर जरा अतीच झालं .तेवढ्यात टॅक्सित लागलेल्या गाण्याकडे माझं लक्ष गेलं.)
दिल क्या करे जब किसी से किसी को प्यार हो जाए
जाने कहाँ कब किसी को किसी से प्यार हो जाए.
अशीच अवस्था माझ्या मनाची झाली होती . कसलीतरी विलक्षण ओढ होती , प्रेमात पडलो होतो मी तिच्या .थोड्या वेळाने आम्ही आमच्या सोसायटीच्या आवारात पोचलो . टॅक्सी वाल्याला पैसे द्यायला ती पुढे गेली . पण मी तिला पैसे देऊ केले नाही .मी पैसे दिले
ती - हि उधारी राहिली हा माझ्यावर Mr मानस ?
मी -चालेले ग .पुन्हा भेटायला कारण तर मिळालं.
ती - (हसून )अच्छा. असं का ?
मी - हो असच.
ती - चल मग मी निघते .( असं बोलून ती तिचा हात पुढे करते )
मी - हो चल सोडतो तुला घरापर्यंत (हात पुढे करून ) मी तुझ्याच floor वर राहतो.
ती - चल मग.
दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे सकाळी लेटच उठलो . रात्रभर तिच्या आठवणीत रमलो होतो .भेटून फक्त काही तास झाले होते . पण असं वाटत होत कि आमची खूप जुनी ओळख आहे .मी तिला बघताच शनी तिच्या प्रेमात पडलो होतो .सकाळ पासून कशातच लक्ष लागत नव्हतं .नाश्ता झाला .आणि नेहमी प्रमाणे मी क्रिकेट खेळायला आमच्या सोसायटीच्या ground वर गेलो . आमचं हे एक चांगल होत .आम्ही सारे अजून हि न चुकता रविवारी सगळे क्रिकेट खळायचो . माझा मित्र अमित. त्याला आणि मला क्रिकेट खूप आवडत .तो आणि मी एकाच कंपनीत कामाला होतो , तो मला बोलवायला आला . खरतर आज जाउसच वाटत नव्हत पण ह्यांनी ओढत मला खाली नेलं .आमची फिल्डिंग होती आणि माझं लक्ष ६व्या फ्लॉवर च्या बाल्कनीत . तिची एक झलक दिसेल या आशेवर .मित्रांच्या खूप शिव्या खात होतो कारण खेळात लक्षच लागत नव्हतं .आता आमची batting आली .अमित माझ्याजवळ आला
अमित - . हे बघ मानस फिल्डिंग खूप खराब झाली आहे . टार्गेट सुद्धा जास्त आहे ,plz batting वर लक्ष दे .
मी -हो रे tenshion नको देऊ . झिंकू आपण .
कसा बस एकदा स्टंप होण्यापासून वाचलो . ६ हि च्या ६ बोल मी एक रन हि न काढता घालवलेले होते . काय झालय मानस तुला अमित माझ्यावर नुसता ओरडत होता .थोड्याच वेळात एक गाडी आमच्या सोसायटीच्या आवारात आली .त्या गाडीतल्या music सिस्टिम वर मस्त रोमँटिक गाणं वाजत होत .
कुछ ख्वाब देखे है, कुछ रंग सोचे हैं
अब मैंने कल अपने तेरे संग सोचे हैं
इस राह में जब भी तू साथ होती है
किस्सों के पन्नो सी हर बात होती है
रूर जो हुयी में फ़िदा तो पल में उठी कोई सदा
के दिल से हुआ जुदा जुदा टूटा मैं इस तरह
सदका किया यूँ इश्क का, के सर झुका जहाँ, दीदार हुआ
काय टाईमिंग म्हणायचं .त्याच क्षणी . हो अगदी त्याच क्षणी ती बाल्कनीत आली . माझ्या कडे बघून तिने smile दिली आणि मी तसाच स्तब्ध उभा , माझ्याकडून काहीच रिप्लाय नाही .तिकडे अमित माझ्यावर ओरडतोय ,इकडे गाडीत मस्त रोमँटिक गाणं वाजतेय आणि इकडे हि आणि तिची ती smilie . ती हात हलवून कसलेतरी इशारे करत होती पण मला माझं भानच नव्हत . हा क्षण जाऊ नये असं वाटत होत .ती तिच्या डोक्यावर हात मारून आत मध्ये निघून गेली आणि इकडे अमित मला भानेवर आण्यासाठी मला हलवत होता .शेवटी काय ती match आम्ही हरलो .अमित माझ्यावर खूप रागावलेला होता पण त्याचा राग पण तसाच लगेच जाणारा होता . मी त्याच्या जवळ गेलो
मी - सॉरी यार .
अमित - ते जाऊ दे .कोण आहे ती ?
मी -कोण ?
अमित - अरे व्हा . मगाशी तुमचा जो रोमँटिक scene चालू होता तो मी बघितला आहे हा . एवढा चांगला खेळणारा तू .आज चक्क असा खेळालास . हे फक्त दोनच गोष्टीत होऊ शकतो . एक तर बॅड लक आणि दुसरं म्हणजे प्रेम .कारण प्रेमात पडणाऱ्याला कसलंच भान राहत नाही .(मी त्याला मधीच थांबवत )
मी -काही नाही रे . चल निघतो मी . भेटू संध्याकाळी .
अमित - हो आज भेटलंच पाहिजे .नाही का मानस
कोणाला भेटल पाहिजे ह्याला कि तिला ? असा विचार करत मी घरी आलो . माझ्या बहिणीच्या रूम मधून ओळखीचा आवाज येत होता . सरळ तिच्या रूम मध्ये गेलो . ख़ुशी चक्क तिच्या रूम मध्ये होती . life मध्ये पहिल्यांदा तिने काहीतरी चांगलं काम माझ्यासाठी केलं होत .तशी तिचा स्वभावाने बडबडी असल्यामुळे तिचे friends लगेच बनायचे .अगदी तिच्या opposite होतो मी . आमची दोघांची नाव "म" वरून पण स्वभाव एक दम वेगळे . मनाली पिळणकर तुला माझा सलाम .तिच्या रूम च्या दरवाज्यातच मी उभा होतो. लगेच मनाली ने मला बघितलं.
मनाली - ख़ुशी ,हा माझा भाऊ मानस आणि मानस हि ख़ुशी ,आपल्या सोसायटीत नवीन राहायला आली आहे .
ख़ुशी -हो माहिती आहे मला .आम्ही ओळखतो एक मेकांना .
मनाली - अरे वा. म्हणजे ओळख झाली वाटत तुमची .
मी - हो ,कालच आम्ही भेटलो .ऑफिस मधून येताना आमची भेट झाली .
मनाली -(ख़ुशी कडे बघून ) हम्म्म्मम्म्म्म ..
(ख़ुशी लगेच लाजते .तीच लाजणं पण किती गोड आहे यार . काय करू हीच .)
मनाली - दादा अरे कधी पासून ओरडतेय. लक्ष कुठे आहे तुझं .
मी - (लगेच विषय बदलून ) अरे ख़ुशी तू इकडे कशी ? कालचे पैसे द्यायला तर नाही ना आली .
मनाली -कसले पैसे ?
ख़ुशी - नाही रे . हि मनाली शीतल कडे आलेली तिला accounts मध्ये douts होते .शीतल कडे वेळ नव्हता म्हणून मी आली हिला शिकवायला .
मनाली - आणि हीच account खूप छान आहे हा दादा . tech mahindra मध्ये हि काम करते .तुझ्या ऑफिस च्या बाजूला आहे ना tech mahindra ?
मी - अच्छा हो का ? माहितीच नव्हत मला .तरी बोललो काल आपली भेट कशी झाली .
ख़ुशी - अरे कालच joint झाली आहे मी .पहिला दिवस होता ना ,काम समजून घेत होती .आणि उशीर झाला .
मी - हम्म ..मला पण accounts हा विषय आवडतो .पण त्याला मी नाही आवडत ( जरा जास्तच झालं मानस स्वतःलाच बोलून )
ख़ुशी आणि मनाली दोघी हसायला लागतात ,स्वतःची फजिती करायची सवयच झाली होती मला .ख़ुशी समोर असली कि स्वतःच भानच राहायचं नाही .काय बोलतोय मानस .कंट्रोल कर स्वतःवर .(स्वतःला बोलून )
मनाली - दादा नको काही फेकू .हि ला सांगितलं आहे मी तुझ्या बद्दल .
ख़ुशी -हो मानस मस्त job आहे तुझा .तू architect आहेस किती मस्त ना . actually मला सुद्धा architecture करायचं होत . पण नाही जमलं .
मी -नाही accounts पण मस्त जॉब आहे तुमचं जीवन plus आणि minus करण्यातच जात .
मनाली -(हसून ) दादा जा आता तू इथून आम्हाला study करू दे .
(ह्या बहिणी पण ना कधी व्हिलन सारख्या वागतात .किती मस्त जमतंय आमचं .पण नाही बघवत हिला .)
मी -ओक see u again ,चालू द्या तुमचा अभ्यास (मनाली कडे रागाने बघून )
ख़ुशी -बाय मानस
मी -बाय ख़ुशी .
संध्याकाळी मी आणि अमित असेच गप्पा मारत खाली बसलेलो .अमित काय हा विषय सोडणार नव्हता .शेवटी सांगितलं मी कि ती मला आवडते .
अमित - मग वेळ कशाला घालवतो dude . सांगून टाक तेरे दिल कि बात उसे.
मी - थांबा राजे .आपण खूप घाई करताय असे नाही वाटत आपल्याला
अमित - आपण नाही तू ( हसून ) .असं काय रे तिच्यात कि तिला २ दिवसात एवढी आवडायला लागली .
मी - हृदयात वाजे समथींग सारे जग वाटे हॅपनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग हो...असतो उगाच स्मायलींग बघतो तुला मन जम्पिंगवाटे हवे गोड फीलिंग त रारारा रारा... मी तर चक्क गाणं गुणगुणायला लागलो . प्रेम हे असच असत रे . नकळत होऊन जात ,कधी मनात शिरत आणि आपलंस होऊन जात समजत नाय .प्रेमाची व्याख्या खूप वेगळी आहे रे .प्रेमात पडणाऱ्यालाच ते समजत .बाकी काय आपल्या आपल्या मनातले विचार .अवघ्या दोन दिवसाची भेट दोन जन्मांपासून आहे कि काय असं वाटू लागल आहे .
अमित - (हसून )वा सरकार ,आपण तर philosopher झालात .जाऊ दे तुला ती आवडते ना?
मी - हो रे खूप ..
अमित - क्या बात है ..चल इस बात पे चाय पिते है
मी - चल .
following वाला फॉर्मुला. नेहमीच काम करतो. ख़ुशी च्या ऑफिस च्या समोर mcdonalds आहे . मनाली कडून समजलं कि ती दुपारी १.३० वाजता mcdonalds मध्ये येते आणि माझा सुद्धा लंच same टाईमिंग ला आहे . मग काय त्या दिवशी डब्बा न खाता सरळ mcdonalds मध्ये गेलो .तिच्या ऑफिस च्या दोन मैत्रिणी न बरोबर ती मला येताना दिसली . मी लायनीत उभा होतो आणि ती कमीत कमी ६ ते ७ जण सोडून मागे उभी होती . तस तिने मला लांबूनच बघितल होत पण मीच न बघितल्यासारखं दाखवत होतो तिला . लाईन तर पुढे सरकत होती आणि मी मागे सरकत होतो . exactly तिच्या पुढे मी आणि ती माझ्या .इकडे तिकडे बघायचं नाटक करून तिच्याकडे बघितल .
मी - हे हाय .
ख़ुशी - हाय .
मी - what a coincidence तू इकडे ( जरा जास्तच overacting करून )
ख़ुशी- तू मला follow करतोयस का ( असं बोलून माझ्या बाजूला येऊन उभी राहते )
मी -छे ग नाही .मला वाटलं तू मला follow करतेयस (हसून )
ख़ुशी - माझं ऑफिस आहे इकडे मानस
मी- मग माझं पण ऑफिस तुझ्या ऑफिस च्या बाजूलाच आहे ख़ुशी .
(दोघे हि एक मेकांना बघून हसतो )
मी - काय order करतेयस
ख़ुशी - अरे मी नाही खात इकडचं, मी टिफिन आणते . माझ्या मैत्रिणी ला आवडत इकडचं , म्हणून येते तिच्याबरोबर इकडे .तू रोज येतोस का ?
मी - नाही ग . आजच आलोय .
ख़ुशी - हम्म्म्म ( माझ्याकडे हसून ), चल तीच ऑर्डर आलय, मी निघते बाय .
मी - बाय .
संध्याकाळी तीच ऑफिस ७ वाजता सुटत . बरोबर ७.१५ ला ती बस स्टॉप वर येते ,आणि मी सुद्धा नेमका तितेच उभा होतो . का ते सांगायला नको .ती लांबूनच हाय करत माझ्या जवळ आली .
ख़ुशी - हाय , what a coincidence तू इकडे पुन्हा ( जोरात हसून )
मी - हो क्रिकेट खळतोय इकडे मी ( जरा रागानेच )
ख़ुशी - chill यार . मस्करी केली मी . नाक किती लाल झालय तुझं आणि किती handsome दिसतोस तू रागावल्यावर .
मी - तू नेहमीच खूप सुंदर दिसतेस ख़ुशी .coffe प्यायला येतेस का माझ्याबरोबर.
ख़ुशी - (थोडा विचार करून ) आता तू एवढी माझी तारीफ करतोयस तर यावंच लागेल नाही का .
मी - हो चल .इथे जवळच Coffe day आहे, चल तिकडे जाऊ .
ख़ुशी -चल
Coffe डे मध्ये खूप गप्पा झाल्या . तिला काय आवडत आणि काय आवडत नाय हे सगळं समजलं .खूप बोलकी आहे ती .तिच्या प्रमाणे तीच मन हि खुप सुंदर आहे .एक दम मोकळ. बोलता बोलता तिने हात माझ्या हातावर ठेवला .माझ्या शरीरात तर ३६० volt lighting चा करंट च बसला .
ख़ुशी - काय झालं its ok ?
मी -काही नाही ग , काही तरी आठवल
ख़ुशी - काय
मी - नातं
खुशी - नातं
मी -हो नातं , नातं बघ ना कस अगदी रेशीम धाग्यासारखं असत .तेवढच मौल्यवान आणि तेवढच जपणूक करणार ,जगात वेग वेगळी नाती आहेत पण काही नाती अगदी रेशीमगाठ पडावी अशी असतात .जस तुझं आणि माझं .
ख़ुशी - म्हणजे ? जरा समजेल असं सांगशील का मानस ?
मी - बघ ना अवघी आपली २ ते ३ दिवसाची ओळख , पण आपण आता एक मेकांविषयही किती काही जाणतो ,फक्त रेशीमगाठी जुळल्या पाहिजे .मग काय सगळं सोप्पं होऊन जात , मला तर तू ......( मी मधीच थांबतो )
ख़ुशी - काय मानस ( माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन )
मी - योग्य वेळ आल्यावर सांगेल .
ख़ुशी - आणि तुझी योग्य वेळ कधी येणार mr ,philosopher .( माझ्याकडे हसून )
मी - अशी दररोज भेटत राहिली कि येईलच लवकर .
असेच आम्ही दररोज office सुटल्यावर भेटत राहिलो, आमच्या दोघांमधली रेशीमगाठ अशीच मजबूत बनत चालली .sunday ला मस्त पैकी बाहेर मूवी बघायला जायचो , तिला romantic movies खूप आवडतात आणि मला romance करायला आवडतो .आम्ही एक मेकांच्या खूप जवळ आलेलो .जणू काय एकमेकांची सवयच लागलेली , दररोज ऑफिस ला एकत्र जायचो .येताना सुद्धा एकत्र यायचो , मस्त पावसात भिजायचो .एकदा तर खूप पाऊस पडत होता . छत्री असूनही आम्ही मस्त पावसात भिजत होतो . थोडं पुढे जाऊन एक छोटस हॉटेल होत.हॉटेल मधला माणूस मस्त पैकी गरमा गरम भजी काढत होता. ,मग काय हॉटेल मध्ये गेलो आणि मस्त भजी वर ताव मारला .बाहेर मस्त पाऊस पडत होता , फक्त वातावरणात थोड रोमँटिक नव्हतं .हॉटेल मध्ये सुद्धा रहदारी कमी होती .तेवढ्यात मला एक आयडिया सुचली .
मी - ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना (तिच्याकडे इशारा करून )
ख़ुशी -(माझ्याकडे हसून )
आभाळ खाली झुके ,पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे ,का सांग ना ?
मी -(तिचा हात हातात घेऊन )
वळ्णावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंझळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे
ख़ुशी -(माझा हात घट्ट पकडून )
डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे .
मी -सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला.
ख़ुशी -मी सावली होऊन तुझी देईल साथ हि तुला
दोघेही -ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना..(आमची नजर एक मेकांचा शोध घेत होती )
मी तिच्या खूप जवळ जातो. आमचे श्वास एक मेकांना जाणवत होते .मी तिच्या कपाळावर किस करतो आणि ती डोळे बंद करते.आमचा हात अजून हि एक मेकांच्या हातात असतो तसेच भिजत आम्ही घरी जातो .
पुढचा भाग -२
(किती सुंदर असतात ना या रेशीमगाठी ,पण हि गाठ सुद्धा तशी मजबूत असायला हवी . ते बघूया पुढच्या भागात )
रेशीमगाठी
Submitted by सुर्वेप्रतीक on 14 November, 2017 - 00:28
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
छान लिहिलय . पुलेशु
छान लिहिलय . पुलेशु
छान !!
छान !!
धन्यवाद मित्रानो.
धन्यवाद मित्रानो.
जमलीय
जमलीय
Pudhala bhaag kadhi yetoy
Pudhala bhaag kadhi yetoy.waiting ..
छान
छान
आलाय कि दुसरा भाग कधीच
आलाय कि दुसरा भाग कधीच
https://www.maayboli.com/node/64593