पतंग २

Submitted by सुर्वेप्रतीक on 3 November, 2017 - 00:35

162199.gif
तू मला अन मी तुला
जाणून आहे एवढे
काळजाच्या वेदनेला
आणि समजावे कुणी .
त्या दिवशी तो असं निघून गेला ...माझं कशातच मन लागलं नाही..रात्रभर त्याचाच विचार करत होते . दुसऱ्या दिवशी कॉलेज ला लवकर गेली...पण तो कुठे दिसलाच नाही. कलासरूम , कॅन्टीन लायब्ररी सगळीकडे शोधला पण कुठेच सापडला नाही ..मित्रांकडे चौकशी केली पण त्याना सुद्धा माही नव्हता हा कुठेय , त्याचा फ़ोन सुद्धा Out of नेटवर्क दाखवत होता .मग राहवलं नाही शेवटी त्याच्या घरी गेली .त्याची आई भेटली घरी .त्याची चौकशी केल्यावर समजल कि तो कुठेतरी बाहेर गेला आहे .कधी येणार असं विचारावं वाटलं पण नाही विचारल ..तसच घरी गेली .दिवसभर कोणाशीच काही बोली नाही ..गप्प राहिली . मनात का असं वाटलं कि ज्याच्या बरोबर आपण दोन वर्ष कॉलेज मध्ये होतो . तो मनोहर आपल्याला अजून कळलाच नाही कि काय ..ठरवलं कि त्याला आता कॉल करायचा नाही .त्याला बोलायचं असेल तर तो स्वतः कॉल करेल. पण शेवटी मलाच राहवलं नाही. पुन्हा त्याला कॉल केला. रिंग जात होती त्याच्या फोन वर ..हा घेईल कि नाही असं वाटत असताना शेवटी त्यांनी एकदाच घेतला कॉल...मी बोलण्याच्या अगोदरच ...हाय कशी आहेस ? असा त्याचा प्रश्न ऐकून मला त्याचा खूप राग आला . एक तर त्या दिवशी फोन घ्यायचा नाही ..दुसऱ्या दिवशी फोन Out of नेटवर्क ,,आणि आणि हा मलाच प्रश्न विचारात होता.. अरे कुठे होतास ? कधी पासून कॉल करतेय तुला ? न सांगता असा अचानक कुठे गेला ?? हे भराभर प्रश्न माझ्या डोक्यात आले ..पण हे काही माझ्या ओठावर आले नाही ..बरी आहे असं उत्तर मी त्याला दिल . त्याच्या कडून एका उत्तराची अपेक्षा होती . पण तो त्या विषयावर काही बोलतच नव्हता . त्याच बोलणं मला काही पाहिल्यासारखं वाटलं नाही..जेवलीस का? कसा होता आजचा दिवस ? असे त्याचे प्रश्न आले ..मला स्वतःचाच राग आला . आणि मी गुड night बोलून फोन कट केला . दुसऱ्या दिवशी कॉलेज ला गेली . हा ग्रुप मध्ये उभा होता . त्यांनी मला बघून smile दिली . मी पण ग्रुप ला joint झाली .दिवसभर गप्पा , मस्ती , lecture , झाले . कॅन्टीन मध्ये timepass झाला .पण मला जे काही हवं होत तो ते काही बोलत नव्हता ..कदाचित ग्रुप मध्ये असेल म्हणून हा बोलत नव्हता असं मला वाटलं ..कॉलेज संपल्यावर नेहमीच्या ठिकाणी आम्ही भेटलो . दोघे एकमेकांशी काही बोलत नव्हतो . मला तो माझ्याशी बोलवा असं मला वाटत होत .तेवढ्या निघायचं का ? असं तो बोलला ..मी त्याच्याकडे खूप रागाने बघितल .त्याला काही न बोलता सरळ तिथून निघून गेली. मला माझं उत्तर मिळालं अशी मी स्वतःचीच समजूत काढली . ठरवलं कि आता ह्या विषयावर काहीच बोलायचं नाही ..त्या दिवसापासून मी त्याला टाळू लागली ...आमचं in genral बोलणं व्हायचं . काही दिवसापासून मी ग्रुप मध्ये जास्त राहणं सोडून दिल .पहिल्या सारखं भेटणं बोलणं ..त्याच्या कविता ऐकणं ,सगळं सगळं बंद झालं . असं म्हणता म्हणता कॉलेजच शेवटचं वर्ष पण संपल. कॉलेज संपल तरी तो काही माझ्या मनातून गेला नाही . का असं झालं अशी मनाला चुन चुन लागायची .त्या दिवशी माझ्या मैत्रिण (शीतल)चा कॉल आला ..तिच्या कडून कळलं कि सगळ्यांनी मिळून तिच्या घरी Farewell पार्टी अरेंज केली आहे . मला तर जायचंच नव्हत..खरं तर त्या दिवसापासून मी ग्रुप मध्ये जास्त राहणंच सोडून दिल होत . पण नंतर आपण कधी भेटणार . अशा तिच्या प्रश्नांनी माझं मन आपोआप त्या पार्टी ला जायला तयार झालं ..मनात एक विचार सुद्धा आला कि शेवटचं तरी त्याला बघेल. त्यांनी जरी माझ्यावर प्रेम केलं असेल कि नसेल पण मी तर त्याच्यावर प्रेम करत आहे .जरी ते एकतर्फी असल तरी .. सगळ्यांनी मिळून खूप छान arrengement केली होती तिच्या घरी ..तिचे आई वडील घरी नव्हते ...त्यामुळे खूप धमाल झाली .पार्टी मध्ये मी पाहुनी असल्यासारखं मला वाटत होत .तो तिथे असून सुद्धा मी त्याच्याकडे बघत नव्हती . माझ मनचं घाबरत होत .शीतल कडून समजल कि तो जेव्हा पासून पार्टी ला आला तेव्हा पासून माझ्याकडेच बघतोय . ह्या वाक्यांनी मला बर वाटलं ..पण हृदयाची धड धड वाढत होती . स्नॅक्स खाल्ले ,,डान्स केला , कॉलेज च्या आठवणीत रमलो . एक मेकांविषयी चांगल आणि वाईट हि बोलो ..पण हे सगळं मस्करीत चालू असताना ग्रुप मधल्या मित्रांनी मनोहर ला कविता म्हणायला सांगितली ..बऱ्याच दिवस तुझ्या कविता ऐकल्या नाही ..हल्ली तू कविताच करत नाही ..असं म्हणून त्याला चिडवू लागले ..त्याना माहित होत कि आमचं आता पहिल्या सारखं Relation राहील नाही. पण मित्र थोडीच ऐकणारे असतात . न जाणे माझ्या डोळ्यात अचानक पाणी कस आलं. तो अचानक माझ्या समोर आला .माझ्यासमोर गुडघा टेकून खाली बसला .त्याची नजर माझ्या नजरेला काही सांगत होती . पण पुन्हा नको म्हणून मी दुसरीकडे बघितल.
सांगू तुला कसे
शब्दही सुचेना
न सांगताच सारे
समजेल का तुला
ह्या त्याच्या ओळीने मी त्याच्या कडे बघितल ..त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू जमा झालेले .माझी नजर त्याच्या नजरे वरून हटतच नव्हती .गुलाबाचं फुल त्यांनी माझ्या पुढे केलं . मी त्याच्याकडे बघतच बसली ..माझ विश्वासच बसत नव्हता. काय होतंय , काय चालय. काहीच समजत नव्हत. पुन्हा तेच ,
सांगू तुला कसे
शब्दही सुचेना
न सांगताच सारे
समजेल का तुला

बोलायचे खुप आहे
शब्द जुळत नाही
अवचित होणाऱ्या भेटीत
वेळ पुरत नाही

अवघड आहे सांगणं
तुच समजुन घे ना
वाच माझ्या मनातलं
देऊन नजर नजरेला

कधीकधी विचार करतो
तुझ्या त्या प्रश्नाचा
कळेलच तुला
भाव माझ्या मनाचा

प्रश्न न विचारता
उत्तर मला देशील का
माझे प्रेम समजल्यावर
होकार देशील का?
माझ्या डोळ्यासमोर अश्रू जमा झालेले ..तो तर अक्षरशः रडत होता ..मी खाली बसले त्याचा चेहरा हातात घेतला .माझ्या ओढणीने मी त्याचे अश्रू पुसले ..तेवढ्यात त्यांनी मला मिठी मारली . दोन मिनिटे आम्ही एक मेकांच्या मिठीत सामावलेलो होतो ..मित्रांच्या आरडाओरड आणि टाळ्यांनी आम्ही भानावर आलो ..त्यांनी माझ्या कपाळावर किस केलं ..आणि गुलाब देऊन ज्या उत्तराची मी इतके वर्ष वाट बघत होती त्याच उत्तर " I लव्ह u . मला माफ कर ..मी तुझा गुनेगार आहे .असं तो बोलू लागला ..मला तर विश्वासच बसत नव्हता .मी कधीच विचार केला नव्हता कि आता ह्या वेळी असं होईल . पण मी स्वतःला सावरल ..गुलाब हातात घेतल, तो मला बाहेर घेऊन आला .ज्या coffe शॉप मध्ये आम्ही जायचो त्या coffe शॉप मध्ये आम्ही आलो ..मला तर स्वप्नातच असल्यासारखं वाटत होत .मी काहीच reaction देत नव्हती .आमची coffe पिऊन झाली ..तरी तो सुद्धा गप्प आणि मी सुद्धा .तेव्हा त्याच्या फोन वर कॉल आला ..त्यांनी कट केला ..परत आला ,,परत कट केला ..तो खूप गोधळेल वाटला ..तेव्हा मीच बोली अरे घे ना कॉल. तर नाही काही खास नाही .असं बोलून टाळू लागला ..आमचा विषय कुठे तरी दुसरीकडेच चालाय ह्याची मला जाणीव झाली . शेवटी पुन्हा त्याचा फोन वाजला .त्याला खूप राग आला ..खर तर मला वाटल हा फोन फेकून देतोय कि काय. पण नाही त्यांनी स्वतःला सावरला ,,,मी तुला उद्या कॉल करतो .असं बोलून गडबडीत उठला .आणि जायला निघाला . पुन्हा तेच मी स्वतःलाच म्हणाली . तो coffe shop च्या बाहेर निघाला ,...ह्या वेळी परत नाही ..असं म्हणून मी पण त्याच्या मागे निघाली ..पुढे जाऊन त्याचा हात पकडून त्याला थाबवलं..त्याच्या कडे बघत होती तर त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झालेले . अरे काय झालय? का असा रडतोयस ? त्या दिवशी पण असाच निघून गेला ? आणि इतक्या वर्षांनी पुन्हा एकत्र आलो ..तर परत तेच ? काय झालय सांगशील का ? .. आणि ह्या वेळी मी तुला असं जाऊन देणार नाही...तो काहीच बोलत नव्हता ...शेवटी मीच त्याचा फोन ओढून घेतला . तर त्यावर भरपूर मिस कॉल होते ..ओपन करून बघीतलं तर रिया . कोण आहे हि रिया ? मी त्याला विचारल .
रिकाम्या आभाळात पतंगाची जोडी असते,
फरक एवढाच कि त्यांची दोर त्यांच्या हातात नसते.
सागरामधील शिंपल्यातहि एक मोती असतो,
जो सहज कोणालाही मिळत नसतो
विरहाची वादळे आता माझ्याभोवती फिरत आहे
तुझ्या वावराच्या राज्यात तेवढ्यापुरती रमली आहे .......!!!!!!!

पुढचा भाग 3
162199.gif

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users