देवकुंड वाटरफॉल ट्रेक

Submitted by राहुल सलगर on 29 October, 2017 - 15:26

देवकुंड वाटरफॉल ट्रेक एक थरार
या वर्षीच्या पावसाळ्याची वाट आम्ही ट्रेकर्स आतुरतेने पाहत होतो . तसेच या वर्षी नावाजलेला "देवकुंड धबधबा" पाहण्याचा उत्साह मात्र कोणाला आवरत नव्हता . तशी ट्रेक लिस्ट तर तयारच होती पण पहिला नंबर देवकुंडचा च होता. महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समजला जाणारा हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी सगळेच खूप उत्साही होते. ग्रुप वर चर्चा सुरु झाली , प्रत्येकाने काय घ्यावे, पाण्याच्या बाटल्या , खाण्याचे पदार्थ , किती वाजता निघायचे . तशी माझीही तबियत थोडी खराब होती , पण काय करणार सह्याद्री गप बसू देत नव्हती . शेवटी दिवस ठरला ९ जुलै २०१७. पण एका आठवड्या खाली एक बातमी कळली कि ५५ ट्रेकर्स ला देवकुंड मधून वाचवण्यात आले होते आणि भीती थोडी भीती हि वाढली . पण अजून थोडी चौकशी केली असता कळले कि सध्या तरी पाऊस कमी असल्याने काळजी करण्याचे कारण नाही. पहाटे ५ ला निघायचे ठरले पण ५.३० आम्ही घरा बाहेर पडलो .

19787433_1516594141744162_2819067875351048712_o.jpg19942775_1516593128410930_7207216465430650968_o.jpg19983697_1516594405077469_3284318585931154455_o.jpg19957014_1516594265077483_4513401585036901211_o.jpg19956108_1516593935077516_143822727287298042_o.jpg19984159_1516593428410900_2758863325350705914_o.jpg

डेक्कन वरून अमोल ला पिक केला आणि चांदणी चौकात आमचे अजून ४ ट्रेकर्स आमची वाट पाहत होते, त्यांना हि पिक केलं, आणि निघालो घाट माथ्याकडे . एका मागे एक बाइक्स जातच होत्या , रविवार असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी हि वाढत होती . घाट रोड लागताच थोडासा पाऊस सुरु झाला आणि गार वारा हळुवार पणे स्पर्श करू लागताच चहाची मागणी झाली बाइक्स हॉटेल कडे वळली . GST चा पुरे पूर वापर इथे होताना दिसला , एक चहा ३० रुपये :O , आता आलोयच तर निदान कटिंग तरी घेऊ. independence पॉईंट चा थोडा आनंद घेऊन आणि तिथेच सकाळचा नाश्ता करून आम्ही निघालो भिरा गावाकडे , जिथून आम्हाला देवकुंड चा ट्रेक करायचा होता. B|

19944586_1516602808409962_1750539530692611446_o.jpg19956138_1516603368409906_5561662130049162111_o.jpg19956980_1516602645076645_5105561945375626676_o.jpg20017488_1516595865077323_7730614076641232355_o.jpg19984132_1516605971742979_3501996928243508816_o.jpg19983390_1516603051743271_649792729551600688_o.jpg19956603_1516596401743936_1526959673085635774_o.jpg19943078_1516602438409999_2807442767454973852_o.jpg19942699_1516603851743191_3576321294368515629_o.jpg19942656_1516595008410742_7997296068031606728_o.jpg

----------------------------------------------
संपूर्ण घाट संपल्यानंतर रस्त्याचे २ फाटे फुटतात पहिला जो डावीकडे महाड ला जातो आणि दुसरा सरळ जो पाटणस गावाकडे जातो . पाटणस गावापासून थोडा उजवा रोड लागतो तिथून थेट भिरा गावापर्यंत गाडी जाऊ शकते . पाटणस गाव लागताच तेथील गावकरी रस्ता अडवू लागले, विचारपूस केली असता कळले कि गावात पुलाचे काम चालू आहे आणि ते फक्त पर्यटकांसाठी आहे आणि त्या साठी मदत म्हणून प्रत्येकी १० रुपये द्यावे लागतील असे पाटणस ग्रामपंचायती कडून मागणी होती . मनात थोडी शंकाही वाटत होती पण पावती बुक हि त्यांच्या हातात होती मी जवळ जाऊन ती तपासली आणि तोपर्यंत आमच्या एका ट्रेकर् ने म्हणजे रोहित ने पैसे भरले . चला चला गाड्या चालू करा ओरडा ओरड झाली आणि आम्ही थेट भिरा गावात येऊन पोहचलो . पण तिथे हि पार्किंग च्या नावाखाली प्रत्येक बाईक चे ३० रुपये असे घेण्यात आले . ३० रुपये खूपच जास्त होतात म्हणून थोडा वाद विवाद झाला पण गावकरी काही ऐकायला तयार नव्हता .... शेवटी नाईलाजाने ते हि भरावे लागले .

19983353_1516601891743387_3277211011279210515_o.jpg

अनुभवी ट्रेकर्स सोबत होते त्यामुळे काळजी नव्हतीच पण ट्रेक स्टार्ट पॉईंट काही सापडत नव्हता , त्याच गावकरी ला विचार पूस केली असता पुन्हा तो म्हणाला गाईड घेऊन जावा तुम्हाला रस्ता समजणार नाही माहिती साठी विचारला असता तो म्हणाला एका साठी १०० रुपये , बापरे आम्ही १० जण आणि १००० रुपये ते हि फक्त रस्ता दाखवण्याचे , जबरदस्ती तर नव्हती पण १००० खूपच जास्त होतात , शेवटी फक्त ट्रेक स्टार्ट पॉईंट ची माहिती काढून आम्ही १ वाजता ट्रेक ला सुरवात केली . जंगली झाडे , चिखलाने माखलेली पायवाट , रिमझिम पडणारा पाऊस , गार वारा , हिरवेगार पर्वत रांगा पाहून मन अगदी फ्रेश झालं होत. फोटो क्लिक होत होते, काही पुढे तर काही मागे ,आणि त्यात मी सगळ्यात मागे (कारण पाय थोडा injured होता ), माझ्या सोबत रोहित सारखाच असायचा . रॉक patch च्या ठिकाणी माझी मदत करायचा , .. ट्रेकर्स ची येणारी गर्दी वाढत चाली होती त्यामुळे रस्ता आपोआप समजत होता शोधायची गरज नव्हती . ३०-४५ मिनिटे चालून झाल्यावर एक ओढा लागला

19787201_1516622095074700_6199046328319260107_o.jpg19800580_1516620345074875_999404433415406822_o.jpg19942593_1516620211741555_6098925383027478570_o (1).jpg19942694_1516622468407996_445824822747623309_o.jpg19944673_1516618691741707_3847505823471359442_o.jpg19956994_1516621528408090_1556826938700147449_o.jpg19983831_1516617785075131_8284016131554399251_o.jpg19983598_1516622255074684_2212374855724785240_o.jpg19983510_1516619018408341_5003525957449292499_o.jpg19983258_1516619575074952_907152083710296363_o.jpg20017662_1516621691741407_7170891131445468318_o.jpg

पाण्याचा प्रवाह खूप होता, धाडस करण्याच कारण नव्हता , सेफ्टी साठी म्हणून झाडाच्या वेली सोबत घेतल्या आणि ओढा पार करण्याचा प्रयत्न सुरु झाला , प्रवाह खूपच जास्त होता ट्रेक जेवढा सोपा वाटत होता तेवढा कठीण होत चालला होता . खरंच निसर्ग कधी आपला सुंदर रूप सोडून भयानक रूप दाखवेल काही सांगता येत नव्हता .. १ आठवड्या खाली झालेल्या rescue ऑपेरेशन ची चित्र डोळ्या समोर दिसू लागले आपले हि असे काही नाही होणार ना हा प्रश्न चिन्ह होता . पण धबधबा बघितल्या शिवाय इथून जायचं नाही ,"सगळे आपापसात बोलू लागले" , ठीक आहे ! काही नियोजन आखण्यात आले ,
सगळे बॅग्स चेक करण्यात आले खाण्याचे काहीच पदार्थ नव्हते पाणी मुबलक होता, अंधार पडायच्या आत सगळ्यांनी परतीचा प्रवास सुरु करायचा ठरवलं , पण धबधबा अजून खूपच लांब होता पण पाण्याचा आवाज इतका होता कि वाटायचा कि समोरच १० मिनिटाच्या पावलावर आहे . निसर्गाने आपले रौद्र रूप दाखवायला सुरु केले होते . :O

19983622_1516616861741890_7327964008190819105_o.jpg19957001_1516616951741881_3690494240521675633_o.jpg19944570_1516615145075395_6189320260927299353_o.jpg19942908_1516616368408606_5980154337072152689_o.jpg

मदतीचा हाथ आपोआप पुढे येत होता , सगळे आतून घाबरलेले होते पण इच्छा शक्ती पुढे काहीच नाही . जवळ जवळ ४-५ ओढे पार करताना वाटायचे कि का करतोय आपण हे, कशासाठी करतोय , काय गरज होती असल्या खबदडित यायची , कुणी सांगितलं , शांत आराम केला असता ना घारी ?
इतक्यात कुणी बोलायचा यालाच तर म्हणतात सह्याद्री ची ओढ जी आपलं बूड एका जागी ठेऊ देत नाही . आत्मविश्वास वाढत चालला होता .
सगळे ओढे पार करून झाल्यावर टाळ्यांचा गजर झाला एक मेकांना अभिनंदन करत शेवटी आम्ही म्हणजे ३. ३० च्या सुमारास देवकुंड जवळ पोहोचलो ,,, wow शब्द सगळ्यांच्या तोंडात येत होता , खरच खूपच सुंदर धबधबा , कपबशी च्या आकाराचा देवकुंड धबधबा पाहतच राहावा असं वाटत होता
सगळे अगदी मजेत धबधब्याचा आनंद घेत होती .. धबधब्याच्या वरून पडणाऱ्या आवाजामुळे भीती हि वाटत होती .. पाण्याचा वेग खूपच जास्त होता , सगळे खूप भिजलो ,मस्ती केली , रोजच्या धकाधकीच्या आणि प्रदूषण्याच्या युगातून स्वर्ग युगात आलोय असं वाटू लागला होता , स्वछ हवा , हिरवेगार जंगले , पाण्याच्या प्रवाहाचा आवाज मन अगदी प्रसन्न झालं होत.
इतक्यात निसर्गाने आपले रौद्र रूप दाखवायला सुरु केले ,,,, बातमी कानावर पडली कि २ ट्रेकर्स मिसिंग आहेत . सगळी कडे भीतीचे वातावरण पसरले , पाहता पाहता शोध कार्य सुरु झाले आणि आम्ही सगळ्यांनी एकमेकांकडे बघ्यांची भूमिका घेतली. गर्दी खूप होती आणि लवकरात लवकर म्हणजे अंधार पडायच्या आत आम्हाला पुन्हा ते ४-५ ओढे आणि जंगले पार करून बेस कॅम्प म्हणजे भिरा गावात पोहोचायचे होते . पाण्याची पातळी वाढली होती . सगळे एक मेकांचे हाथ धरून ओढा पार करु लागले होते . परतीचा प्रवास चालू झाला होता .. सुंदर वाटणार ते निसर्ग कधी आपले भयानक रूप दाखवेल काही सांगता येत नाही. त्या २ तरुणाच्या शोध अजून चालूच होता पण काहीच यश हाती येत नव्हता आणि पुढे काय होईल काही सांगता येत नव्हता ,,,, आम्ही चालत होतो चालत होतो पण शेवट काही होत नव्हता , एक ओढा पार करताना तर थेट गळ्यापर्यंत पाणी आला होता . पण आमच्या टीम च्या मदतीने आम्ही ते पार केले ,, शेवटी संध्याकाळी ६ - ६.३० च्या सुमारास आम्ही गावात पोहोचलो . आणि सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला , पण अजून लढाई संपलेली नव्हती नव्हती आणि त्या २ ट्रेकर तपास अजून चालूच होता . गावातून बाहेर पडून , घाट पार करून आम्हाला पुण्याला पोहचायचे होते जवळ जवळ १५० किलोमीटर चा प्रवास अजून बाकी होता ... सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे ड्रायविंग केले आणि आम्ही सुखरूप पुण्यात पोहोचलो . आणि चांदणी चौकात निरोप समारंभ करून एक मेकांना शुभेच्छा देऊन सगळे आपापल्या दिशेने चालू लागले , आणि जाता जाता सगळ्यांच्या तोंडून एकाच आवाज येत होता "नेक्स्ट ट्रेक तयार ठेवा रे"......

19800883_1516608128409430_804118195172178158_o.jpg19942594_1516607868409456_2107144315586099626_o.jpg19944418_1516607448409498_5369714463559205079_o.jpg19944658_1516608275076082_119174643763501193_o.jpg19955869_1516610035075906_417656947525145086_o.jpg19956091_1516609055076004_876476773714300546_o.jpg

सूचना : - हा ट्रेक(देवकुंड) दिसायला खूप सुंदर असला तरी तितकाच कठीण आहे . हा ट्रेक करायचा असेल शक्यतो अनुभवी ट्रेकर्स सोबत हा ट्रेक करावा आणि शक्यतो जास्त पावसात हा ट्रेक करू नये . हा ट्रेक करताना प्रत्येकी २ लिटर प्रमाणे पाणी आणि खाण्याचे पदार्थ सोबत असणे आवश्यक . अनुभवी नसाल तर गावातून गाईड घेतल्याशिवाय हा ट्रेक करू नये .

लेखन करण्यास खुप मेहनत घेतली आहे. आमची अशी भटकंती आवडल्यास नक्कीच कमेंट करा
धन्यवाद।
राहुल
ट्रेक चा पुर्ण विडिओ : https://www.youtube.com/watch?v=s1wRvNbOS8U&t=9s

नक्कीच लाइक आणि subscribe करा।

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@डोंगरवेडा
हॅलो डोंगरवेडा उर्फ (सागर) नावांप्रमणेच तू वेडा आहेस वाटत
तुझी हि कंमेंट वाचली :तुमच्यासारख्या पिकनिक छाप लोकांनी निसर्गाची पार वाट लावून टाकली आहे.

आणि मला खूप हसू आला .. मला माहित नाही तू आतापर्यंत किती ट्रेक केलेस पण तुला एक गोष्ट सांगतो मी हिंदवी परिवाराचा सदस्य आहे . आम्ही ट्रेक मौज मजा म्हणून करत नाही. भले खाण्याचे पदार्थ ट्रेक ला घेऊन जरी गेलो तरी त्याचे कॅरीबॅग , वेस्टेज , वाया गेलेले पदार्थ आम्ही निसर्गात इथे तिथे कुठेहि टाकत नाही . तू तरी केला असेलच आणि तुला माहित असेलच . आम्ही कुठल्याच ठिकाणी भले ते गडकिल्ले असो व डोंगर रांगा घाण करत नाही .. आणि आमच्या ग्रुप मध्ये आम्ही असले लोक सुद्धा सामील करून घेत नाही.

अरेरे,
वर फोटोत दिसणारी माणसांची गर्दी बघून, मासळीबाजार बरा असे वाटायला लागलेय.
किती पर्यावरणाचा र्‍हास चालू आहे.

छान लिहल आहात..
फक्त प्रचि मध्ये सेल्फि जरा जास्तच वाटत आहेत..
पुढच्या वेळेस निसर्गाचे प्रचि बघायला आवडेल.. Happy

हॅलो डोंगरवेडा उर्फ (सागर) नावांप्रमणेच तू वेडा आहेस वाटत>>
वैयक्तिक रित्या कोणाला असे काही बोलणे टाळा..
प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते..
आतापर्यंत माबो वर जेवढे ट्रेक करून आले आहेत त्यांचे धागे वाचल्यावर,प्रचि बघितल्यावर तिथे जायची ओढ लागते..
सेल्फिचे वेड तरूणाई ला असतच पण या धाग्यावर ते प्रमाण जास्त दिसल्याने थोडं वेगळ वाटतंय..

धन्यवाद कविता नाईक.

तुमचे बोल मनात रचून ठेवले आहेत आमच्या पुढच्या ट्रेक चे फोटो तुम्हाला नक्कीच आवडेल. देवकुंड एवढा सुदंर आहे कि समजतंच नाही कि नुसतं पाहत राहावं कि हे क्षण आपल्या कॅमेरा मध्ये टिपून घ्यावं ..

अरेरे,
वर फोटोत दिसणारी माणसांची गर्दी बघून, मासळीबाजार बरा असे वाटायला लागलेय.
किती पर्यावरणाचा र्‍हास चालू आहे..... >>>> १०१ % सहमत

एकदा अवश्य भेट देऊन या .. म्हणजे कळेल एवढे लोक का उत्सुक आहे या देवकुंड साठी. उत्सुकतेपोटी तर लोक आपला वेळ पैसे खर्च करून निसर्गाच्या भेटीला येतात. आपल्या महाराष्ट्रात फार कमी पर्यटन स्थळे आहेत जिथे लोक अंगमेहनत म्हणजे ट्रेक करून आपला ध्येय गाठतात. शॉपिंग मॉल ला जाण्यापेक्षा हे १०१% तर बरोबर आहे ना कि लोक सिमेंट चे डोंगर बघण्यापेक्षा दगडमातीचे डोंगर पाहायला पसंद करतात.
अपवाद:
ताम्हिणी घाटात मी कित्येकदा गेलो आहे पावसाळ्यात कितीतरी चंगळवादी लोक पार्ट्या करण्यासाठी येतात दारूच्या बाटल्या , प्लॅस्टिक वगैरे तसेच टाकतात. या सारख्या गोष्टीवर बंधन आणले पाहिजे.

लेख आवडला.

ट्रेकिंगला गेल्यावर सेल्फि काढणे लोकांना आवडत नसावे.
(सेल्फि नेहमी सुरक्षेचे भान ठेऊनच काढावेत. उगाच कड्यावरुन किंवा अन्य स्टंट करत सेल्फि काढू नयेत.)

गळाभर पाण्यातून ओढा पार केला.. लिहायला खूप सोपे आहे यापुढे तरी अशी रिस्क घेऊ नका हि विनंती..बाकी ट्रेक वृतांत छान लिहिला आहे.

धबधबा खरंच फार सुंदर आहे. एकदम दुधाळ पाणी.

मला तरी निसर्गाचे फोटो बघताना त्यात माणसं नसलेलेच फोटो बघायला आवडतात. Happy निव्वळ निसर्गदर्शन असेल तर फार छान वाटतं.

किरण भालेकर >> +1.

फोटो टाकताना दोन फोटोंच्या मध्ये पूर्णविराम किंवा फोटोंना नंबर दे. म्हणजे ते चिकटलेले दिसणार नाहीत. वेगवेगळे ओळखता येतील. Happy

धन्यवाद निधी ,

माझ्या पुढच्या ट्रेक च्या सगळ्या फोटो मध्ये तुम्हाला निसर्गाचे दर्शन नक्कीच होऊन जाईल

किरण भालेकर >>खर आहे जेव्हा ट्रेक करून सुखरूप घरी पोहचलो तेव्हा झालेला आनंद शब्दात सांगणं फार कठीण होता. नक्कीच पुढचे सगळॆ ट्रेक सुरक्षित होईल

खाण्याचे काहीच पदार्थ नव्हते पाणी मुबलक होता,
खाण्याचे पदार्थ नव्हते, रोप नव्हता, सोबत गांवकरी नव्हता. आणिबाणीच्या परिस्थितीत म्हणजे उदा. पाण्याला जोर वाढला असता, तुमच्यातले कुणी चुकले असते वगैरे तर अशा प्रसंगी कांय करण्याची तुमची तयारी होती ते कळत नाहीये लेखातून.. डोंगरवेड्याशी या गोष्टीमुळे मी सहमत होईन. निसर्गात भटकायला हवं पण ते सुरक्षित गोष्टी पाळून..

वरचे फोटो तुमच्याच ग्रुप चे आहेत असे धरले तर अनेक जण जीन्स घालून आलेले दिसतात. पावसाळयात, देवकुंड सारख्या ठिकाणी जीन्स घालून ट्रेक ला जाणाऱ्या लोकांना साष्टांग दंडवत आहे.
जीन्स भिजल्यावर काय मरणाची जड होते आणि गटांगळ्या खायची वेळ असली असती तर हीच जीन्स जीवघेणी ठरली असती.