नोटः मी मायबोलीचा जुना सदस्य असलो तरी हा माझा डुप्लिकेट आयडी आहे
सहावर्षापुर्वी आमच्या एका नातेवाईकांकडून तिचे प्रोफाईल आमच्याकडे आले. प्रथमदर्शीच ती दिसायला निट नेटकी, चांगल शिक्षण असलेली असल्यामुळे आम्ही स्थळ पसंत केल.
दोन महिन्यानीं मध्ये आमचे अरेन्ज मॅरेज झाले. तिन आम्हाला एक गोड मुलगी देखिल झाली.
लग्न होण्याच्या अगोदरच मी तिला विचारले होते की 'तुझा कोणी बॉयफ्रेन्ड तर नाही/नव्हता' तीचे उत्तर नकारार्थी होते.
फ्रेन्ड सर्कल मोठा असल्याने तिचे खुपशे मित्र मैत्रीणी लग्नानंतर देखिल कॉन्टॅक्ट मधे आहेत. माझ्या विचारसरणी नुसार तिचे फ्रेन्ड्स असण्याला माझा काहीच विरोध नव्हता/नाही. पण तिच्या एका खास मित्राबद्दल मला नेहमी शंका यायची. ती नेहमी त्याची स्तुथी करते म्हणुन असेल कदाचीत. पण त्याचा whats-up/ facebook चे कम्युनिकेशन डाउट्फुल वाटायचे. whats-up चे चाट मी तपासायचा प्रयत्न करायचो पण ती चाट अगोदरच डिलीट करून ठेवायची.
मी तिचे कॉल्स रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला पण ते देखिल तिच्या लगेच लक्षात आले आणि ती रेकॉर्ड्स डिलिट मारायची.
एक आठवड्यापुर्वी ती तिच्या आईबाबांकडे गेलेय. त्यापुर्वी मी तिच्या मोबाईलमधे एक हॅकिंग सॉफ्टवेअर ईन्स्टॉल केले.
काल रात्री तिच्या त्या मित्रासोबत ती चाट करत होती आणि माझा संशय खरा ठरला. त्यांचे अफेअर आहे. ते एकमेकांना गलिच्छ असे मेसेज पाठवतात. स्वःताचे प्रायव्हेट फोटो शेअर करतात. ऑनलाईन मधे ईतके करत असतील तर रिअल लाईफ मधे कसे वागत असतील.
मी अजुन पर्यतं हा विषय कोणाशीच शेअर नाही केला आहे. तिला देखिल माहीत नाही कि मला सर्व समजले आहे
या त्यांच्या विचीत्र वागण्यामुळे बिचाय्रा माझ्या मुलीचे सर्वात जास्त नुकसान होणार आहे जे मला नकोय.
प्लिज काहीतरी सुचवा कि मी काय करू
मी काय करू
Submitted by मी निल on 24 October, 2017 - 01:14
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाप रे! तुमची व्यथा समजू
बाप रे! तुमची व्यथा समजू शकते. आजकाल ऑनलाईन जमाना आहे..त्यामुळे, असली प्रकरणे बोकाळत आहेत. तुम्ही फक्त एव्हढं चेक करा की ती नुसती मजा म्हणून मेसेजेस पाठविते की त्यांचं खरोखरीच बाहेरही भेटणं बोलणं आहे. जर का ते नुसते ऑनलाईनच बोलत असतील व टाईम पास करत असतील तर हे एक प्रकारचं अॅडिक्शन म्हणता येईल...किंवा फँसीज...ज्या काऊंसेलिंग ने दूर होऊ शकतात. व तुमचे लग्न वाचू शकते. पण जर ती खरीच भेटत असेल तर मग मात्र तिला जाब विचारा व पुढचा मार्ग ठरवा.
आंबटगोड यांच्याशी सहमत.
आंबटगोड यांच्याशी सहमत.
स्पष्ट बोलायचे तर यात दोन शक्यता आहेत.
1) त्यांचा तुमच्यामध्ये आणि तुमच्या संसारामध्ये ईण्टरेस्ट नसावा. तसे असल्यास हे नाते पुढे ताणण्यात अर्थ नाही.
2) संसार आणि तुमच्यातील नातेही प्रिय आहे पण या ईथे वाहावत गेल्या आहेत. कदाचित चूक समजली आणि या नादात आपण आपला संसार गमावू याची जाणीव झाली तर त्या भानावर येतील. त्यामुळे आणखी वेळ घालवण्याऐवजी वेळीच जाब विचारा आणि त्यांना ती जाणीव करून द्या.
जर ही दुसरी केस असेल तर तुम्ही या परिस्थितीतही नाते टिकवून त्यांना सांभाळून घेतले हे पाहता त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदर प्रेम वाढीस लागेल आणि आपल्यातील नाते आणखी घट्टही होऊ शकेल. असेच व्हावे यासाठी शुभेच्छा.
फक्त दोघांपैकी कुठली केस आहे त्यानुसार निर्णय घ्या. उलट करू नका. म्हणजे पहिली केस असेल तर उगाच नाते जपायचा प्रयत्न करून सर्वांचीच फरफट करू नका. तसेच दुसरी केस असेल तर घाईगडबडीत टोकाचा निर्णय घेऊ नका.
जर हे सारे स्पष्ट बोलणे अवघड जात असेल तर कौन्सेलर बघा. ईथले लोकं चांगला सुचवू शकतील.
हाय नील, जर तुमची बायको
हाय नील, जर तुमची बायको तुमचयाबरोबर नीट वागते तर सोडुन दया मुलगी लहान हे. तुमी सांगुन वाद होनार.
ऋन्मेऽऽषशी सहमत.
ऋन्मेऽऽषशी सहमत.
शक्यता 1 खरी असेल तर पुरावे जमा करुन तुम्ही मुलीच्या कस्टडीसाठी प्रयत्न करू शकता.
आंबट गोड यांच्याशी सहमत.
आंबट गोड यांच्याशी सहमत. तुम्हाला जर सगळे कळाले असेल, तर प्रथम समजुतीने हे जाणून घ्या की हे प्रकरण नक्की किती पुढे गेलेल आहे. केवळ टाईमपास म्हणून हे चालू आहे की खरच त्यांचे एकमेकांसोबत काही नाते आहे. त्याच बरोबर पुढे त्यांचे काय मत आहे. तुमच्या बरोबर त्यांना हे नाते कायम ठेवायचे आहे की संपवायचे आहे. जरूर पडल्यास समुपदेशन करून घ्या. सगळ नीट जाणून घेतल्यानंतर तुम्ही योग्य तो निर्णय घ्या.
यात तुमची मुलगी वयाने लहान आहे. पण जर तुमच्या बायकोलाच हे नाते मान्य नसेल तर उगाच ओढून ताणून संसार करण्यात काही उपयोग नाही.
शक्यता 1 खरी असेल तर पुरावे
शक्यता 1 खरी असेल तर पुरावे जमा करुन तुम्ही मुलीच्या कस्टडीसाठी प्रयत्न करू शकता >>>>+11111
सजेशन बद्दल धन्यवाद, आज मी
सजेशन बद्दल धन्यवाद, आज मी ताईला घरी बोलवले होते. माझ्याव्यतीरीक्त फक्त तिलाच हे ठाऊक आहे. तिने देखिल वरिल मतच सांगितले.
ती माझ्याशी निटच वागते पण असे असताना बाहेरख्यालीपणा करायची गरजच काय होती.
मला नाही माहीत हे नाते टिकेल का नाही. जरी टिकवले तरी ते पुर्वीसारखे नसेल. पण माझ्या मुलीसाठी तरी सर्वात चांगला पर्यायच मी स्वीकारेन. या प्रकरणात सर्वचजणानां त्रास होणार आहे हे नक्की.
चांगल्या समुपदेशक तसेच
चांगल्या समुपदेशक तसेच वकिलांचा सल्ला घ्या. त्यांनी अश्या अनेक केसेस हाताळलेल्या असतात व सर्व बाजूंचा विचार करून ते योग्य सल्ला देतात. कोणताही निर्णय घेताना सर्व शक्यता तपासून व शांत चित्ताने घ्या. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका, त्याने भांडणे विकोपाला जातात.
वकील शोधताना जवळच्या माणसांना विचारून त्यांचा अनुभव घेऊन निवडा. कोर्टात जाऊन अनोळखी वकील निवडू नका.
माझी ताई आणि जिजाजी दोघेही
माझी ताई आणि जिजाजी दोघेही वकील आहेत, रात्री किंवा उद्या सकाळी त्यांचा विचार कळवतील. तोपर्यंत हिची व्हॉट्सपगीरी सहन करवत नाहीये.
प्रूफस जमवून ठेवा. मुलीची
प्रूफस जमवून ठेवा. मुलीची कस्टडी आणि अलीमोनि न द्यायला उपयोग होईल.. चिडून हात उगरायला जाऊ नका.
तिच्या घरचे आणि तुमच्या घरचे सगळ्यांना एकत्र बसवा आणि परदा फाश करा... शुभेच्छा !
प्रूफस जमवून ठेवा. फक्त
प्रूफस जमवून ठेवा. फक्त लक्षात ठेवा की कायदा "अशा" केसमध्येही स्त्रीला अनुकूल असतो. कस्टडी मिळेल/ॲलिमनी वाचेल या भ्रमात राहू नका.
कोणत्याही परिस्थितीत हात उचलू नका. त्याने तुमची केस वीक होईल.
म्हणजे पहिली केस असेल तर उगाच नाते जपायचा प्रयत्न करून सर्वांचीच फरफट करू नका.>>>हे एकदम परफेक्ट लिहिले आहे. मुलगी लहान आहे. वादावादीच्या संसारात वाढावे लागणे हे मुलांसाठी कदाचित आईवडील विभक्त होण्यापेक्षा जास्त हानिकारक असावे.
ऑल द बेस्ट.
मोबाईलमध्ये हॅक करणे आणि
मोबाईलमध्ये हॅक करणे आणि गुप्तपणे फोन तपासणे हे लीगल आहे का? म्हणजे तुमच्या पत्नीची चूक आहेच पण तुम्ही केलेल्या या गोष्टीची legality तुमच्या वकील कुटुंबियांकडून तपासून घ्या. एकदा तुम्ही फोन हॅक केला म्हटल्यावर ते चॅट तरी तिनेच केलं कशावरून? तुम्हीच केलं असू शकतं ते. यात तुमच्यावर आरोप करत नाही, फक्त कायदा कसा विचार करतो ते दाखवत आहे.
बाकी पुढे काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. तुटपुंज्या माहितीवर आम्ही काहीच बोलू शकत नाही. हा जो कोण मित्र तो लग्नाआधीपासून मित्र आहे का? घरून विरोध असल्यामुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही अशी काही स्टोरी आहे का? पत्नी जॉब करते का? तो माणूस तिच्यावर दबाव आणत असेल, ब्लॅकमेल करत असेल असं आहे का? तो सिंगल आहे की विवाहित (म्हणजे तो तिच्याशी लग्न करू इच्छितो की दोघे टीपी करत आहेत?)- असे अनेक मुद्दे आहेत.
तुम्ही स्वतः चांगल्या समुपदेशकाकडे आधी एकटे जा असंही मी सुचवेन.
वादावादीच्या संसारात वाढावे
वादावादीच्या संसारात वाढावे लागणे हे मुलांसाठी कदाचित आईवडील विभक्त होण्यापेक्षा जास्त हानिकारक असावे. >> कदाचीत नव्हे नक्कीच.
या धाग्याशी संबंधित नाही पण आता यापुढे विवाहेच्छुक सर्वानी डिफॉल्ट कायदे माहित करून घेऊन, त्यातले कोणते आपल्याला मान्य आहेत, कोणते कस्टमाईझ करून मान्य आहेत, अधिकच्या कोणत्या अटी असल्यास त्यानुसार prenup करून मगच लग्न करावे.
असंच माझ्या एका मित्राबद्द्ल
असंच माझ्या एका मित्राबद्द्ल घडलं आहे..त्यानी वकिलाचा/ पोलिसाचा सल्ला घेतला होता.
जर घटस्फोट म्युचल कन्सेट्ने होत असेल तर घ्या.. पण ती शक्यता कमी आहे कारण नाहीतर बायकोने त्यालाच सांगितले असते...
ती त्यालाच दोष देत होती की त्याने तिचे व्यावसायिक करिअर बरबाद केले म्हणून तिचे ते अफेअर चालले..तिने त्यालापन असेच काहीतर दुसर्याशी चालू करायल सांगितले पण ती काडिमोड देणार नाही. बाकिच्यांना सांगितले तर रेल्वेखाली जीव देणार..
वकिलानी भारतीय हिंदू कायदा खूप किल्ष्ट आहे म्ह् णून सांगितले - बाहेरील ख्यालपणामुळे घटस्फोट मिळवणे.. वेळ, पैसा, मानसिक त्रास जास्त जातो असा केसमध्ये.. पोलिसांनी सांगितले जर ती धमकी देत असेल तर त्याने NC करावी पण त्यामुळे घरी
पोलिस येतील आणि त्याच्या घरी ते इतरांना कळेल.
अशा अनैतिक संबंधामध्ये दोघ्याना मज्जा घ्यायची असते.. एकमेकांची Responsibility नाही.. म्हणून त्यांना ते लपून करायचे असते..जर दुसर लग्न करुन केले तर ते Roution life होईल...
तुम्ही सर्वानीं दिलेले सल्ले
तुम्ही सर्वानीं दिलेले सल्ले जरूर लक्षात ठेवेन.
त्रास होतोय पण तडकाफडकी पाऊले उचलून नंतर त्रास होईल.
मोबाईलमध्ये हॅक करणे आणि गुप्तपणे फोन तपासणे हे लीगल आहे का?> माझ्या माहिती प्रमाणे लिगल नाही आहे, माझ्याकडे आत्ता असलेले प्रुफ कोर्टात पुरावा म्हणुन सादर नाही करता येणार.
मी निल - तुमचा स्वभाव संशयी
मी निल - तुमचा स्वभाव संशयी आहे का?. कधी कधी संशयी मन उगाच राईचा पर्वत करते. तुमच्या पत्निचे तिच्या मित्राशी संबंध नसतीलही. तिला मित्र नसतीलही. तिने चॅट केले नसेलही मग डिलीट करण्याचा प्रश्न येतो कुठे? हे सर्व तुमच्या मनाचे खेळ नाहीत अशी तुमची खात्री आहे का?. तुमच्या संशयी स्वभावाला कंटाळून तर ती माहेरी गेली नाही ना?
तुम्हाला कधी कुणी मानसोपचार घ्या असा सल्ला दिला आहे का?. सगळे लोक तुमच्या विरूद्ध आहेत असे तुम्हाला वाटते का? असे असेल तर आधी मानसोपचार करून घ्या.
मला तुमच्यावर टीका करायची नाहीये पण अशीही एक वेगळी शक्यता असू शकते म्हणून लिहिले. ही शक्यता नाही अशी तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तिकडून खात्री करून घ्या.
असे काही नसेल तर ठिक आहे मग वर दिलेल्या अनेक सल्ल्यांमधून तुम्हास योग्य असा निवडा.
अहो विक्रमसिंग, त्यांनी
अहो विक्रमसिंग, त्यांनी लिहिलाय की हॅकिंग सॉफ्टवेर ने त्यांना दिसलाय ते ---:
काल रात्री तिच्या त्या मित्रासोबत ती चाट करत होती आणि माझा संशय खरा ठरला. त्यांचे अफेअर आहे. ते एकमेकांना गलिच्छ असे मेसेज पाठवतात. स्वःताचे प्रायव्हेट फोटो शेअर करतात.
अहो विक्रमसिंग, त्यांनी
अहो विक्रमसिंग, त्यांनी लिहिलाय की हॅकिंग सॉफ्टवेर ने त्यांना दिसलाय ते ---:>> नक्की का.
अस कुठल सॉफ्टवेर असत?
नक्की का.
नक्की का.
अस कुठल सॉफ्टवेर असत?
>>>
नेमका हाच प्रश्न मलाही पडलेला. धागाकर्त्यावर अविश्वास दाखवायला म्हणून नाही तर उत्सुकता म्हणून. आणि हे उपलब्ध होणे माझ्या आवाक्यातील असेल तर कुठे वापरता येईल असाही विचार करून झाला.. फक्त माझी दुसरीच पोस्ट असल्याने त्याण्च्या जेन्युईन प्रॉब्लेमचा धागा दुसरया विषयावर जाऊ नये म्हणून हे विचारायचे टाळले.
@ऋन्मेऽऽष@, विक्रमसिंग असे
@ऋन्मेऽऽष@, विक्रमसिंग असे कोणतेही सॉफ्टवेअर वापरण्याची वेळ कुणावरही येऊ नये. तरी तुम्हाला हवेच असेल तर गुगल ची मदत घ्या,
आज माझ्या वकिलानां भेटलो, त्यानीं जी स्टॅटर्जी सांगितलेय तिचा वापर करायला सुरवात केलाय. त्याचा ईफेक्ट देखिल जाणवायला लागलाय.
हा प्रॉब्लेम असा आहे कि शेअर करण्यासाठी कुणीतरी हवे असते पण एखाद्याशी व्यक्तीगतरित्या बोलायला कठीण देखिल जाते.
म्हणुन मला मायबोलीची मदत घ्यावीशी वाटली. अर्थात त्याने मदतच झालेय
मला वाटते आता माझ्यापुरता तरी ऑनलाईन साठी हा विषय ईथेच थांबवावा. धन्यवाद सर्वांचे
त्यानीं जी स्टॅटर्जी
त्यानीं जी स्टॅटर्जी सांगितलेय तिचा वापर करायला सुरवात केलाय. >> कोणती स्टॅटर्जी?
अर्थात तुमची ईच्छा असेल तरच सांगा
हो एक्चुअली.मलाही उत्सुकता
हो एक्चुअली.मलाही उत्सुकता लागलीय. कोणती स्ट्रॅटेजी जी आज सांगितली आणि आजच ईफेक्टही जाणवू लागलाय..
नील राव,
नील राव,
सर्व व्यवस्थित होईल.शुभेच्छा.बाकी तुम्ही वकिलाकडे मदत घेतायच.हा मार्ग नीट वर्क करेल अश्या सदिच्छा.
तुमच्या मुलीची समस्या खूप
तुमच्या मुलीची समस्या खूप महत्वाची आहे. तिची काळजी तुमची पत्नी कशी घेत आहे ते बघा.. तुमच्या बायकोचे आणि तिच्या मित्राचे काय प्रकारचे संबंध आहेत हे कमी महत्वाचे आहे जर ती तुमच्या मुलीची नीट काळजी घेत असेल आणि तुमच्या कडे काही अवास्तव पैसे, मालमत्ता, बेकायदेशीर किंवा अनैतिक आचरण याची मागणी करत नसेल तर.
स्त्रीवादाचा हा मूलभूत विचार अगदी नक्की मनात धरा कि स्त्रीविषयी पुरुषांना जो पझेसिव्हनेस वाटतो तो त्यांच्या अहंकारामुळे वाटतो त्यातून कोणाचेही भले होत नाही.. अगदी हीच धारणा सर्व संतांनीही सांगितली आहे.. भारतीय न्यायालय सुद्धा स्त्रियांना पती सोडून इतरांशी संबंध ठेवण्याचा कायदेशीर अधिकार देते. त्यामुळे अशा बाबतीत पुरुषांनी पत्नी हे आपली मालमत्ता समजू नये. . हा विचार सांगणे खूप सोपं आहे पण आचरणात आणणे खूप अवघड आहे.. त्यातच तुमचे हित आहे. क्वचित काही आदर्श पत्नी असतील आणि त्यांच्या पतींना अशा तत्वज्ञानाचा आधार न घेता आनंदात जीवन घालवता आले असेल परंतु हे अपवाद आहेत. जसा जसा समाजात स्त्रीवाद, व्यक्ती स्वातंत्र्य, आत्मसन्मान ही मूल्ये अजून पसरतील तसा अधिकाधिक व्यक्तींना या कालातीत तत्वांच्या सत्यतेचा अधिकाधिक प्रत्यय येत जाईल.
आवश्यक वाटल्यास कायदेशीर सल्ला घ्या पण त्यातून तुमचे लग्न मोडणे सोडून काही सकारात्मक घडणार नाही..
समज देऊन बघा. व पुन्हा
समज देऊन बघा. व पुन्हा नव्याने संसार करा. भांडून काय उपयोग नसतो.
(अचानक हे विबासं धागे कसे काय?)
π यांच्याशी सहमत.
π यांच्याशी सहमत.
एक वर्ष होऊन गेलं हो.
एक वर्ष होऊन गेलं हो.
पुढं काय झालं, सद्य परिस्थिती काय हे माहीत तरी आहे का?
<भारतीय न्यायालय सुद्धा
<भारतीय न्यायालय सुद्धा स्त्रियांना पती सोडून इतरांशी संबंध ठेवण्याचा कायदेशीर अधिकार देते. त्यामुळे अशा बाबतीत पुरुषांनी पत्नी हे आपली मालमत्ता समजू नये. >
अननसपंत, विबासं वाल्या प्रत्येक धाग्यावर हे मौक्तिक सांडत असल्याने लिहावे लागत आहे.
भारतीय दंडविधानाचे कलम ४९७ (जे सर्वोच्च न्यायालयाने आता रद्दबातल ठरवले आहे), त्यानुसार कुणा पुरुषाने कुणा विवाहीत स्त्रीशी तिच्या संमतीने, परंतु तिच्या पतीच्या संमतीशिवाय शरीरसंबंध ठेवले, तर तो पुरुष गुन्हेगार ठरत असे. या कलमाखाली स्त्रीला गुन्हेगार मानले जात नसे. त्या स्त्रीच्या पतीच्या मालकीच्या संपत्तीचा उपभोग अन्य पुरुषाने घेतला हा त्याचा गुन्हा. तो पती तक्रार करू शके.
तेच एखाद्या विवाहित पुरुषाने अन्य स्त्रीशी शरीरसंबंध ठेवले, तर पत्नीने दंडविधानाखाली तक्रार करायची सोय नव्हती.
हे विरोध आणि विबासं हा क्रिमिनल अफेन्स मानायची गरज नाही, या भूमिकेतून न्यायालयाने हे कलम रद्द ठरवले.
याचा अर्थ विवाहित स्त्रीला किंवा कोणालाही विबासं ठेवायची मुभा दिली असा होत नाही. तो क्रिमिनल अफेन्स ठरला नाही, तरी घटस्फोटाचे कारण ठरूच शकतो
भरत तुम्ही दिलेल्या माहिती
भरत तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद हे थोडे विषयांतर होत आहे आणि या बाबतीत नक्की माहिती फार नाही. परंतू लिहीणे आवश्यक वाटले. विबासं ठेवणार्या पुरुषाला दोषी धरले जाते आणि स्त्री ला नाही याचाच अर्थ असे संबंध ठेवण्याचा अधिकार स्त्रीला आहे. अशा वेळी अशा स्त्रीचा पती घटस्फोट मागणे सोडून काहीही करू शकत नाही त्याव्यतिरिक्त त्या स्त्रिला कोणतीही शिक्षा नाही. त्यामुळे हा अनेक स्त्रियांसाठी लग्न मोडायचा सर्वात सोपा मार्ग आहे.
त्यामुळे दुसर्या पुरुषाशी संबंध ठेवणार्या स्त्रिचा संग सोडणे हाच पुरूषांसाठी सर्वात योग्य मार्ग आहे.
'स्त्री चंचल आहे' हे खर का खोट हा मुद्दा वेगळा परंतू या धर्म धारणेला धरून वागणे यातच पुरुषांची मानसिक शांती आणि हित आहे.
तुम्ही धड काहीच वाचलेले नाही
तुम्ही धड काहीच वाचलेले नाही किंवा सोयीचं तेवढं वाचल़ंय.
१. विबासं क्रिमिनल ठरणं, हेच मुळात अयोग्य असल्याने ते कलम रद्द ठरलःय.
२ विवाहित स्त्री ही तिच्या नवऱ्याच्या मालकीची वस्तू असल्याने त्याच्या मर्जीशिवाय तिचा भोग घेणारा पुरुष त्या नवऱ्याचा गुन्हेगार ठरत असे. विवाहितेला भादंवित शिक्षा नव्हती हे बरोबर. कदाचित तिला व्यक्तीपेक्षा वस्तू मानणे हे कारण असावे.
३ एखाद्या विवाहित पुरुषाने अविवाहित किंवा नवरा नसलेल्या स्त्रीशी संबंध ठेवले, तर तोही भादंवित गुन्हा ठरत नसे. म्हणजे पत्नीलाही पतीला शिक्षा करायची सोय नव्हती.
आता दोघेही एकाच पातळीला आलेत. दोघांनाही घटस्फोटाचा मार्ग मोकळा आहे.
विवाहित पुरुषाने विबासं ठेवायला हरकत नाही, पण विवाहित स्त्रीला मात्र आहे, असं तुम्ही सुचवताय, असं तुमच्या काही पोस्ट्स वाचून वाटतंय.
भरत मला वाटतय तस नसेलही,
भरत मला वाटतय तस नसेलही, टाईम्स आणि सकाळ वाचून माझ अस मत बनल आहे
मला माफ करा पण एका ताईंनी
मला माफ करा पण एका ताईंनी अशाच विषयावर सल्ला मागितला आहे. पाठोपाठ हा विरुद्ध लिंगी समस्येचा धागा आला. कदाचित स्त्री ला समजुतीने घ्या असे सांगणारे पुरूषाला कसे सल्ले देतात हे पाहण्याचा विचार आहे कि काय असे वाटावे. अर्थात तसे नसेल ही आशा आहे.
अशा विवाहबाह्य संबंधांमधे मुलांचे हाल होऊ नयेत या साठी दोघांना त्याचे धोके वेळीच ओळखता यायला हवेत आणि एकाला माफ करायला यायला हवे. अशा वेळी तुझ्या जागी मी असतो/ते अशा प्रकारचे युक्तीवाद समेटावर येण्यापासून रोखण्यास मदत करत असतात. सामंजस्य आणि जोडीदाराप्रमाणेच् चुकीचे वागण्याचा हक्क यात दक्षिण उत्तरेचा वाद आहे..