दिवाळी किल्ला

Submitted by अक्षय. on 16 October, 2017 - 00:33

परीक्षा आजच संपलेली
संपली अभ्यासाची कटकट
घरचेही आता करणार न्हवते
अभ्यास कर अशी वटवट

हातपाय धून जेवायला बसलो
घाईघातच जेवण सापवयला लागलो
जमली सगळी गॅंग ठरवायला प्लॅन नवा
रायगड, राजगड झाले आता सिंधुदुर्ग बनवायला हवा

खोदला छोटासा खड्डा पुरला गोल बांबू
ठेवुनी त्यावर फरशी यावर किल्ला रचू
गोल खड्ड्यामधून सोडता थोडे पाणी
दिसेल आमचा किल्ला सिंधुदुर्गावाणी

वरती उंचावर पसरट जागा त्यावर चपटा दगड
झालं तयार राजांच सिहसन बसून जिथे दिसेल पूर्ण गड
काचेच्या पट्टीने मग तयार होतील एकेक पायऱ्या
उभे राहतील मग सैनिक, स्वराज्याचं स्वप्न बघाया

संपतील जिथे पायऱ्या असतील तिथे दोन गुहा
बाजूला शिदोरीसाठी असेल शेत हिरवंगार पहा
हाळीव, मोहरी थोडं धन पीक त्यात येईल
मावळे शिवबाचे मनापासून पिकवतील

मुख्य दरवाजाला दोन उभ्या दोन आडव्या विटा लाव
बाहेर दोन कौलांचे बुरुज त्यावर चिखलाचा थर
समोर वहीच्या पुठ्ठय़ाचे दाराचे आकार कापून, रंगवून
दिंडी दरवाजा बनवायचा की होईल किल्ला संपूर्ण

असे कित्येक क्षण निसटले
ते घर तुटलं ते लहानपण संपलं
खूप प्रेमळ आठवणी देऊन गेलं
ते लहानपण हाळूच माझ्या हातून निसटून गेलं
फिरसे मुझे जिने दो जरा..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.....
खोदला छोटासा खड्डा पुरला गोल बांबू
ठेवुनी त्यावर फरशी यावर किल्ला रचू
गोल खड्ड्यामधून सोडता थोडे पाणी
दिसेल आमचा किल्ला सिंधुदुर्गावाणी

मस्त लिहलेय

मीरा बावनकर, राहुल, सायू, अंबज्ञज, पवनपरी, मेघा. आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.