सूर्योदय म्हणजे एक नवी पाहाट, जीवनात आलेल्या अंधःकारावर मात करून नवीन वाट काढणे म्हणजे सुर्योदय, तसा मी उसर्रा या खेड्या गावातील जन्म मात्र नागपुरात झाला, पण लहानच मोठं, प्राथमिक शिक्षण, हे गावातच झालं, जन्म नागपूरला होण्याचं कारण म्हणज आई हि नाशिक ची, बाबा नागपुरातले आई बाबा हे दोघेही नोकरीकवर बाबा हे बस डेपो मध्ये इन्चार्गे होते आणि आई हि आरोग्य विभागात नर्स होती, मी २ वर्गात असताना बाबांचा अपघाती मृत्यू झाला. तेव्हा दुःखातील अ आणि ब देखील कळत नव्हते, बाबाच प्रेम कधी मिळालेच नाही कारण त्यांना कधीच घरी बघितलं नाही, माझं संगोपन हे आईनेच केले, पण ती रात्र कधीच विसरणार नाही जेवा आईला समजल कि बाबाचा मृत्यू झाला तेव्हा रात्रभर उशीचा सहारा घेऊन आई रडत बसली होती.
मला तितकस काही कळत नव्हतं पण उशीचा ओला झालेला काठ माझ्या गालाला शिवत होता, तेव्हा मला कळत होत कि आई मूस मूस रडत आहे म्हणून,माझं लहान मनाला झेपल्या सारखं नव्हतं , आई रडत आह म्हणून , मी पण रडत होतो , सकाळ झाली बास्केट भरली आणि नागपूरच्या दिशेने निघालो, पण ती बायको म्हणून आणि मी मुलगा म्हणून जो अधिकार होता तो अधिकार तिला पण आणि मलापण नाही मिळाला , कारण तिच्या ठिकाणी हक्काची कुणी दुसरी बायको , आणि नावाचा कुणी दुसराच मुलगा होता . तिथे होत असलेला तो सगळा प्रकार माझ्या डोक्याचा वरचा होता , पण डोळे पुसत पुसत तो बघत होतो , गेल्या पावली पारत आलो , कुणी आईच कुंकू पुसलं नाही , किंवा कुणी तीच्या बांगड्या फोडल्या नाही ती तशीच उधार मनानी , दुखी मनानी हे काम स्वतःच करीत होती , फुटलेल्या बांगड्या मी जमा करत होतो , आणि पाण्यानी माखलेले डोळे आपल्याच हातानी पुसत होतो .
रात्र कुठे घालवली हे मला ठाऊक नाही पण दुसऱ्या दिवशी पार्ट जाताना,आईच्या फुटलेल्या बांगड्या वाटेत आलेल्या नदीमध्ये बस मधून फेकून दिल्या हे मला ठाऊक आहे, ना बाप मेला म्हणून माझी टक्क्ल करण्यात आली, ना बापाचे फुल घेऊन रामटेकला गेलो की तेरवी केली, हे केलं म्हणून मला कधीच आठवत नाही कारण तस काही झालंच नाही. मी कधीच आजी-आजोबा, दादि- दादाजी, मामा- मामी काका-काकू, भाऊ-बहीण याच प्रेम कधीच पाहिलं नाही, मला मिलाच नाही , अथवा ते माझ्या नशिबातच नव्हतं.
आई - बाबाच प्रेम विवाह होत (आई ला १ बहीण व १ भावू आणि तिची आई व तिचे बाबा असा तिचा परिवार होता, बाबाच तितकस मला ठाऊक नाही पण बाबा व एक बहीण म्हणजे आत्या असे परिवार) आईच्या घरच्यांना ते मान्य नवत, तरी आईने जबरदस्तीने लग्न केलं त्यामुळे त्यांच्याशी तिच नातं तुटलं आई पुन्हा तिच्या आईच्या घरी गेली नाही , तशी आई खूप जिद्दी आणि तापट स्वभावाची ( आई नोकरीवर होती त्यामुळे देखील कदाचित तिलाच कोणाची गरज भासली नसावी ) आता बाबाच्या घरच तिला ठाऊक होत किंवा नाही हा मला नाही माहीत, बाबानी आईला कधीच त्यांच्या घरी नेलं नाही किंवा नेलं या बद्दल मला काहीही एक माहिती नाही. जेव्हा बाबा मरण पावल तेव्हा आम्हला बाबाच आधीच लग्न झालं होत हे कळल, निदान मला तरी त्या नंतरच समजलं, आईला कदाचित हि लग्ना नंतरच माहित झाली असावी. त्यामुल आईच आणि बाबाचं खूप ताडयाकच भांडण झालं होत. बाबानी आईवर त्यांच्या कमाईचा १ रुपया देखी खर्च केला नाह किंवा नसावा. मला तर १ कपडा काय खाऊ देखील आणला नाही.
बाबाच आधी जिच्याशी लग्न झाला होत तिला सांगाडा मान मिळत होता, कारण ती हक्काची होती म्हणून कदाचित, तिला मी मावशी म्हणून हाक मारायचो, मला तेव्हा तितकस काही काळात नव्हतं. तीला २ मूल आणि दोन मुली होत्या, कित्येक दा बाबा आमच्या इथून त्यांच्या साठी तेल तिखट तांदूळ घेऊन जात होते, (मरण्याच्या अगोदर)हे आईच कधी बोलता बोलता सांगत होती, ते माझ्या पेक्षा मोठेच होते, त्यानंतर आईच आणि त्याचे खूप वाद झाले, पण सगडा अधिकार तिलाच होता. आम्ही फक्त छत नसलेल्या दार नसलेल्या भीतीच्या आत उभे होतो, हळू हळू वेळ निघून गेला मी थोडा मोठा होत गेलं तस तस मला बरेच काही समजत गेलं.
आईनेच माझं पालन पोषण केलं आइची माया दाखवून बापाचा राग दाखून मला मोठं केलं..तिने संपूर्ण आपले आयुष्य माझ्या वर लुटून दिल... माझं शिक्षण, माझं लग्न,, आपल्या सांगड्या जबाबदाऱ्या तिने मोट्या धाडसाने पार पडल्या,,
व माझ्या जीवनात एक सूर्योदय निर्माण केला.....
सुर्योदय ...
Submitted by प्रफुल कापसे on 9 October, 2017 - 06:51
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिरियस्ली भारी लिहिलय आवडल पण
सिरियस्ली भारी लिहिलय आवडल पण लेखनातील चुकांमुळे विरस होतो थोडा
शुद्धलेखनातील चुकांमुळे रसभंग
शुद्धलेखनातील चुकांमुळे रसभंग होतोय...
पु.ले.शु.