गटग (झक्की - मुंबईकर भरत भेट )
अखंड महाराष्ट्र दौर्यावर आलेले श्री झक्की हे लवकरच मुंबईत येणार येणार अशी आवई काही दिवस मुंबईतल्या काही बा फ वर उठत होती. विशेषतः पुणा दौरा गाजवून आलेले श्री झक्की हे प्रत्यक्षात कशे असतील असे कुतुहल बर्याच मुंबईकर मायबोलीकरांच्या मनात होते. आपले मुंबईतले मायबोलीकर चि. कुलदीप ह्यांना दिनांक १४/०३/२००९ रोजी श्री झक्की हे ठाण्यात असतील अशी खबर लागली आणि त्यांनी ती तात्काळ व्यवस्थापक श्री इंद्रा ह्यांच्याकडे पोहोचवली. इंद्रदेवांनी आपले पूर्ण कौशल्य पणाला लावून ती खबर समस्त मायबोलीकरांकडे पोहोचवली आणि श्री झक्की ह्यांना भेटण्याची सुवर्ण संधी आम्हा मायबोलीकरांना उपलब्ध झाली.
.
ठीक संध्याकाळी ६.४० वाजता मी गटग चे ठीकाण गडकरी रंगायतन ठाणे येथे पोहोचता झालो. प्रवेशद्वारापाशी आल्यावर स्कॅनींग मशीन बघून श्री झक्कीना भेटण्यासाठी किती ही तपासणी असे आश्चर्य करत आत प्रवेश करते झालो. मशीन बिचार मूग गिळून गप्प राहील. आत पोहोचल्यावर एक घोळका दिसला. जरा जवळ जाऊन पाहील्यावर श्री घारु अण्णा, चेतना, नील-वेद, आनंद अशी ओळखीची मंडळी दिसली. ही सर्व मंडळी चक्राकार उभी असल्याने आत (म्हणजे चक्राच्या आत) श्री झक्की असतील अशी मनात आशा पल्लवीत झाली. पण चक्रात कुणीच नव्हत. त्यामूळे थोडासा हीरेमोड झाला.तेवढ्यावेळात चि. कुलदीप, अमर कुलकर्णी, किशोर मुंढे अश्या माझ्यासाठी नविन मायबोलीकरांशी ओळख झाली. त्या तिघा नवोदितांच्या डोळ्यात मला पाहून ' श्री झक्की' ते हेच असा भाव दिसला. पण मी तात्काळ 'तो मी नव्हेच' असा खुलासा केला. आणि त्यांना तो पटल्यासारखा दिसला. इतक्यात समोरच्या रस्त्यावर एक गृहस्थ दिसले. हेच 'श्री झक्की' अशी बहुतेक मा बो करांची समजूत झाली. आणिक दोन तीन गॄहस्थांना पाहून असाच काहीसा समज मा बो करांचा झाला. मीराबाईंना जसा प्रत्येक ठीकाणी कॄष्ण दिसत होता अगदी तसाच भ्रम मा बो करांना होऊन त्यांना प्रत्येक मध्यमवयीन मनुष्याच्या चेहेर्यात श्री झक्की दिसत होते.
.
साधारण सातच्या सुमारास श्री झक्की आज येणार का नाही अशी चर्चा मायबोलीकरांमध्ये चालू असताना एक टोपी वाले गृहस्थ येताना दिसले. त्यांनी टोपी घातली असल्यामूळे ते झक्की नसावेत असा बहुतेक मा बो करांचा समज झाला. पण मा बो करांच्या अगदी निकट येऊन त्यांनी आपल्या डोक्यावरील टोपी काढली आणि समस्त मायबोलीकरांना श्री झक्की ह्यांचे दर्शन झाले. पुण्यातील वाडेश्वराचा अनूभव लक्षात घेऊन मा बो करांनी कोपर्यातील एक टेबल निवडून त्याभोवती खूर्च्यांचा फेर धरला. मग श्री घारु अण्णा आणि श्री झक्की ह्यांच्यात 'विचारा तुम्ही सांगतो आम्ही' असा खेळ रंगला. घारु अण्णांच्या प्रत्येक सवालाला श्री झक्की ऐका..... असे म्हणून अगदी खुसखुशीत जवाब देत होते. कुण्या एका नादान मायबोलीकराने त्यांना तुम्ही अमेरीकेत कधी आणि कसे गेलात असा प्रश्न विचारला आणि श्री झक्की ह्यांनी एक दिर्घ श्वास घेतला आणि त्याहून दीर्घ असा उछ्श्वास सोडला. आता श्री झक्की हे अमेरीकेच्या स्वातंत्र्यलढ्यापासून अगदी बोस्टन टी पार्टी पासून सांगायला सुरूवात करणार की काय अशी भिती काही जुन्या जाणत्या मा बो करांच्या मनात उभी राहीली पण श्री. झक्की ह्यांनी १९६० सालापासून आपले 'दादरचे दिवस' पासूनची हकीकत सांगायला सुरूवात केल्यावर बर्याच माबो करांनी (आधी श्री झक्की ह्यांनी उत्तर देताना जितका दीर्घ उछ्श्वास सोडला होता त्याही पेक्षा दीर्घ असा ) निश्वास सोडला. कुणीतरी झक्कींच्या लग्नाला किती वर्ष झाली असा 'कळीचा' प्रश्न उपस्थीत केल्यावर श्री झक्की ह्यांनी नकळतपणे जेंव्हापासून कळायला लागलय तेंव्हापासून ती स्त्री माझी पत्नी आहे असे सांगीतले. आणि वर हे माझ्या पत्नीला सांगू नका अशी कळकळीची विनंती केली. मध्येच श्री झक्कींना ३-४ फोन येउन गेले. त्यांनी ते प्रश्नकर्त्यांचे नसून घरन होते असा तात्काळ खुलासा केला.
.
तितक्यातच कुणाला तरी खान पान (संकष्टी होती आज ) करण्याची आठवण झाली आणि लागलीच घारु अण्णांनी आज काय मिळेल अशी पृच्छा केली. थांबक्याने (वेटरने) मिसळ , कटलेट आणि बटाट वडा असा तीहेरी मेनू सादर केल्यावर, घारुअण्णांनी मिसळ आणि कटलेटवर फुली मारली. मग बटाट वड्याची ऑर्डर एकट्या घारुअण्णांनी सर्वानूमते दिली (अनूमती दिली म्हणजे काय द्यावीच लागली). तसेच थांबक्याला बटाट वड्याबरोबर लाल चटणी वेगळी आण अशी मौलिक सुचना केली. ती ऐकून 'येथे बहुदा चटणी ही बटाट वड्याच्या आतच घालून देत असावेत' अशी शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली पण मी त्या पालीला 'त्या काव्य झुरळांसारखच' उडवून लावल. श्री घारु अण्णा, किशोर आणि अमर ह्यांचा उपवास असल्यामूळे त्यांनी 'रफल्स लेज' ची ऑर्डर दिली आणि ते खातखातच 'लेज' उपवासाला चालते का नाही अशी गहन चर्चा केली. बटाट वड्यांची ऑर्डर देताच चि. रीना हीने प्रवेश केला आणि ती लांबूनच मायबोलीकरांशी बोलत आली. आणखी थोडी जवळ आल्यावर तीने ती मायबोली करांशी बोलत नसून प्रत्यक्षात तिच्या 'तिकडच्या होणार्या स्वारींशी' बोलत होती असा खुलासा केला आणि थोडासा लाजल्याचा अभिनय करून आपल लग्न ठरल्याची बातमी दिली. हे कळताच घारु अण्णांनी तात्काळ तिला संसार उपयोगी असे काही सल्ले दिले. ते तीने निमूटपणे ऐकून घेतले. इतक्यात श्री झक्कींना तिची दया येऊन त्यांनी लागलीच हजेरी बूक काढून सगळ्यांची हजेरी (कागदावर) घेतली. चि. कुलदीप ह्याने आपले नाव मराठीत लिहीण्यास असामर्थ्य दर्शवल्यावर आता बहुदा त्याला अंगठे (स्वतःच्या पायाचे ) धरुन उभे रहावे लागते असे आम्हास वाटले. पण श्री झक्की ह्यांनी 'शेम शेम' असे म्हणून केवळ शाब्दिक मार चि. कुलदीप ह्याला दिला. चहापान झाल्यावर मी माझ्या साखरपुड्याची बर्फी सगळ्यांना वाटली. तेंव्हा चि. रीना हीच्या होऊ घातलेल्या साखरपूड्याची बर्फी आताच का वाटली जातेय अशी कुत्सीत विचारणा काही मा.बो करांनी केली आणि ती माझ्या सा.पु ची बर्फी आहे असे कळल्यावर माझे अभिनंदन केले आणि मला शुभेच्छा दिल्या.
.
चित्रपटाच्या शेवटाला जसा पाहुणा कलाकार प्रवेश करतो (आठवा लगे रहो मुन्ना भाई मधला अभिषेक बच्चन) अगदी तसाच प्रवेश 'धुम स्टाईल मध्ये किरू ह्याने केला आणि ' लिंबू टींबू नाम तो सुना होगा' असा धोबी पछाड श्री झक्की ह्यांना टाकला. पण श्री झक्की ह्यांनी अनेक पावसाळे पाहीले असल्यामूळे त्यांनी किरु ला तात्काळ ओळखले. ग ट ग च्या शेवटी घारु अण्णा ह्यांई प्रत्येक मा बो करा करून ५० रुपये टोल वसूल केला. काही इरसाल मायबोलीकरांनी हे 'श्री झक्की ह्यांना भेटण्याचे तिकीट आहे का काय?' अशीही विचारणा केली. पण घारु अण्णांनी त्याकडे दूर्लक्ष केले. कार्यक्रमाच्या शेवटी चि. रीना हीने आपल्या 'तिकडच्या स्वारींशी' समस्त मा बो करांची ओळख करुन दिली. निघताना श्री झक्की ह्यांनी 'बराक ओबामा' ह्यांच्या वतीने समस्त माबो करांना अमेरीकेला यायचे जाहीर आमंत्रण दिले. आणि माबो करांनी आता पासपोर्ट काढायला हरकत नाही असे म्हणून ते आमंत्रण हसत हसत स्वीकारले. तर असा हा गटग नेहेमीसारख्या उत्साहात हसत खेळत, एकमेकांना कोपर खळ्या मारत यशस्वी रीत्या पार पडला.
ग ट ग ला उपस्थीत राहून तो यशस्वी करणार्या मा बो करांना खुप खुप धन्यवाद
समाप्त
मजा केलेली
मजा केलेली दिसतेय मुंबईकरांना. झक्कींना कोणच्याशा कवितेचा अर्थ कळल्याखेरीज ते मुंबईत पाऊल ठेवणार नव्हते म्हणे. कोणी सांगितला मग अर्थ शेवटी
वा वा!
वा वा! मुंबईकरांनासुध्धा मिळाला म्हणायचा झक्कींच्या भेटीचा अलभ्य लाभ! प्रकाशचित्रे कुठे आहेत?
बाकीच्या मेंबरांनीसुध्धा 'त्यांच्या त्यांच्या नजरेतून गटग' वृतांत जरूर टाकावा.
फोटु फोटु
फोटु फोटु
केड्या
केड्या माजा अजून एक ग ट ग ठाण्यात भरूनय चुकलाच मा रे!

गटग
गटग पार्ल्यात न होता ठाण्यात झालं तर!!!!
केदार सापु
केदार सापु बद्दल अभिनंदन. वृत्तांत मस्तच. फोटो कुठेत?
अर्रर्रर्
अर्रर्रर्र..... मिसलं की मी......
--
I’m not sure what’s wrong… But it’s probably your fault...
जाईजुइ,
जाईजुइ, मनी, पार्ल्यात येणार आहे की मी. पार्ले बीबी वर जाऊन बघा.
<<श्री झक्की ह्यांनी 'शेम शेम' असे म्हणून केवळ शाब्दिक मार चि. कुलदीप ह्याला दिला.>>
कुलदीप, तुम्ही रागावला नाहीत ना?
(म्हणजे मी शेम शेम म्हंटल्याबद्दल नाही, पण केदार ने ते जगजाहीर केले म्हणून! }
अमेरिकेतल्या राजकारणात पैसे खाल्ल्याबद्दल लाज नसते, पण तसे कुणि दुसर्याने सांगितले तर वाईट, शिस्तहीन, समजतात तसे. तर तुम्ही केदारवर शिस्तभंगाचा आरोप ठेऊ शकता!
व्वा! वृ.
व्वा! वृ. छान आहे की! केदार मला तू चि. केलस? का रे?
कुलदीप, तुम्ही रागावला नाहीत >>> झक्की, आता काय उपयोग रागावून?
आता तुम्ही तुम्ही करण सोडल नाहीत तर खरच रागावीन.
शिस्तभंगाचा आरोप ठेऊ शकता!>>> पण कारवाई कोण करणार?
प्रकाशचित्रे कुठे आहेत?>> प्रकाशने चित्रे ह्यांच्याकडे छापायला दिली आहेत!
गटग पार्ल्यात न होता ठाण्यात झालं >> पार्ल्यातही होणारे! केदार खास पूर्वतयारीसाठी ठाण्यात आला होता!
*********************

कंपून कंपूत सार्या कंप माझा कंपला... पुढच्या ओळी सुचल्यावर कंपीन!
छान केदार.
छान केदार. मस्तच वॄत्तांत.
चानच
चानच केदार.. मस्त व्रु.. अन पटकन लिहिलास..
मस्त
मस्त वृत्तांत!!
माबोवर लग्नाचा मौसम आलाय!!! केदार अन रीना चे हार्दीक अभिनंदन!!
वृत्तांताचे फोटो टाका प्लिज.
कुणाचं
कुणाचं लग्न?
फोटो फोटो
फोटो फोटो >>>> आनंद , इन्द्रा कुठे आहात ?????
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
अरे वा
अरे वा छानच.
किर्या नेहेमीप्रमाणे उशीरा आला ना?
केदार, अरे
केदार, अरे एवढीचजणं आली गटगला? महिला मंडळापैकी फक्त चि. रीनाच आली? चि. कुलदिप कुठे रहातो म्हणे? मी समजत होते की तो पुण्याला रहातो.
चि.सौ.का. रीनाचे अभिनंदन.
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
अग
अग अश्विनी, चेतना होती की. १०-१२ जण होते (म्हणजे भरपूर जण होते की )
.
एस आर के, पन्ना : धन्यवाद
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
ऐ(न) वे(ळी)
ऐ(न) वे(ळी) ए(काच) ठि(काणी) मधी ठळक वैशिष्टे...
१. झक्कींची 'परत' भेट, मनोगत, विदेशी सल्ले...
२. मुंबई, ठाणे, नमुं आणि डोंबिवली करांची उपस्थीती...
३. झक्कींची झेड् सिक्युरीटी...
४. उपासकर्यांची उपासमारी...
५. केदारची बर्फी....मस्तच
६. सगळयांचे कॅमेरे घरी पुजेला ठेवलेले...
७. घारूअण्णांची सक्तीची वसूली...
८. किरूच्या 'धूम२'चे झक्कींनी धुडकावलेले आमंत्रण...
९. अभिरिनाची ओळख...
आणि केदारचा वृत्तांत
इंद्रा,
इंद्रा, मोबाईलवर तरी काढायचेस फोटो. दुधाची तहान ताकावर
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
(No subject)
धन्यवाद
धन्यवाद नील. तो बाजूला चि. कुलदिप आहे का? अजून पण असतील तर टाक ना !
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
अश्विनि,
अश्विनि, अगं मी दोन तीनच फोटो काढले... आणी मग मला जावे लागले... त्यातल्या त्यात हा एक फोटो बरा आलाय... तो टाकलाय...
अग तो ग ट ग
अग तो ग ट ग अगदी आयत्या वेळेला म्हणजे शनिवारी सकाळीच ठरला. सगळे जण हापीस मधून आले. त्यामूळे कुणीच तयारीत नव्हत
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
ओ.के ओ.के.
ओ.के ओ.के. तुम्ही सगळ्यांनी हे जमवलंत हेच खूप झालं.
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
अरे वा....
अरे वा.... छान एवेएठी..... मी नाही हजर राहू शकले. खरंतर झक्कींना भेटायची फार इच्छा होती. असो, जमलं तर पार्ले एवेएठी ला जाईन.
रीना, अभिनंदन!!
अरे व्वा!
अरे व्वा!
झाल वाटत सुपरफास्ट जीटीजी!
गुड
कोण कोण आलेल त्याची यादी अन सविस्तर वृत्तान्त येऊद्यात अजुन!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
We all are born
We all are born stangers
Strangers become friends
Friends turn into lovers
Lovers for friends forever !
Time for you to decide...
Which way you wana go !
Shevti mi hi Mumbaikar... Hope you guys accept with with the same good spirit you have accepted your other fraternity.
झक्कींनी
झक्कींनी पार्ल्यातील एका टपरीवरच्या चहावाल्याला पत्ता विचारला तेव्हा त्याने `कटिंग' पाहिजे का असे विचारले तेव्हा झक्कींना पडलेला प्रश्न? येथे उभ्या-उभ्या कसे 'कटिंग' करणार. ह.ह.पु.वा.
प्रारंभी तेलकट म्हणुन नकार देण्यार्या वड्यांचा मोह झक्कींना आवरता आलाच नाही. शेवट केदारने दिलेल्या पार्ल्यातील प्रसिद्ध बर्फीने सगळ्याचे तोंड गोड केले. यातही मी शंका काढलीच, उपवासाला चालेल का? परंतु घारुअण्णा, अमोलने सांगितले व केदारने आग्रह केल्यावर मलाही माझा मोह आवरेनासा झाला. धन्यवाद केदार.
बर्फी
बर्फी चालते उपवासाला
बाळ सागरा
बाळ सागरा ही कविता विभागात टाक बघू पटकन!
अश्विनि, अगं मी दोन तीनच फोटो काढले...त्यातल्या त्यात हा एक फोटो बरा आलाय>>> व्वा! झक्कींच्या प्रतिभातेजानं (दीप झाकाळला गेलाय खरा!
) सार आसमंत कस झळाळून गेलय नं!
तर मंडळी अन् केदारबुवा, (नविन थ्रेड न काढता) इथच मी माझा अन् झक्कींमधला मूक संवाद टिपायचा प्रयत्न करीन! (थोडा वेळ लागेल ह्याला)
*********************

कंपून कंपूत सार्या कंप माझा कंपला... पुढच्या ओळी सुचल्यावर कंपीन!
Pages