'कासव' या चित्रपटाचा शुभारंभाचा खेळ गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७ रोजी पुण्याच्या सिटिप्राइड कोथरूड चित्रपटगृहात संध्याकाळी साडेसहा वाजता आयोजित केला आहे.
चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवर या खेळाला उपस्थित राहणार आहेत.
मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या चित्रपटांच्या शुभारंभाच्या खेळांना मायबोलीकर उपस्थित असतात. त्याप्रमाणे 'कासव'च्या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.
या खेळाची काही तिकिटं आपल्याकडे आहेत.
या खेळास उपस्थित राहू इच्छिणार्यांनी कृपया chinmay@maayboli.com या पत्त्यावर इमेल पाठवावी अथवा ९९७०८४२४०५ या नंबरवर संपर्क साधावा. इमेलीत कृपया आपला दूरध्वनी क्रमांकही कळवावा.
एका मायबोलीकराला एकच तिकीट मिळेल, याची कृपया नोंद घ्यावी.
या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहून नेहमीप्रमाणेच मायबोलीकर या खेळाबद्दल व चित्रपटाबद्दल भरभरून लिहितील, ही खात्री आहे.
धन्यवाद , मेल अन फोन ,
धन्यवाद , मेल अन फोन , दोन्हीवर संपर्क केला आहे .
ई-मेल पाठवली आहे.
ई-मेल पाठवली आहे.