" आबा '' आगरी व्यक्तिरेखा

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 2 October, 2017 - 23:06

आबा

मे मयन्याच्या सुट्या लागल्या व्हत्या. मी, भालचन , विलास न चारपाच पोरा देवलाशी बेसलू व्हतू. जेवान झाला का म्होटी मानसा घरानुच नयतं वटीवं निजाची. आजूसला कय लवकर निज यावाची नय. मं तो आमच्यावच नजर ठेवून रावाचा. ‘’ काय केरतंस र बेमट्या? जा जा एमायडीशीन कंचे कंपनीन जा मयनाबं.... तवरच शे दोनशे रुपाये गवतील .... निस्ता उनारक्या काय केरतंस? ‘’
आजुसचा प्रवचन चालू झाला का मी समजुन जावाचू.... आता आया थांबाला नको. भालचन सुदक येच टायमाला जेवूनशी बांचोलीवं वावलीचे झाराखनी थांबलेला आसाचा. मं मी, विलास, रोयदास, आजुक दोगं तिगं जमाचू नं बांचोलीवं नय तं गावदेवीचे देवलाशी जावाचू. तया एक तं कांडोला जमा कराचू नय तं पायरीचे झारावली पायरा. मीठ मसाला कोनी तरी न्हेलेलाच आसाचा. पायराना मीठमसाला लावून जीभ टिखटान लासंपर्यंत पायरा खावाचू. कांडोलाचा सालपट केरला का तो गोला मस्त शेंगदान्यासारखा टेस्टी लागाचा. मयनाबं आमचा योच पोग्राम सुटी खपतफर आसाचा.

ते दिवशी आयसंच देवलाशी बेसलू व्हतू . मारवाड्याचे बाजुला रावाला आयलेली भाबी भालचनला डोला मेरतं आयसा रोयदास सांगीत व्हता नं ती चकनीच हाय आयसा भालचन त्याला समजवीत व्हता. विलास नं मी गोला केलेली कांडोला खात व्हतू नं विवेक रान्नीचे झाराखाली मुतत व्हता. रोयदासची खीखीखी चालूच व्हती नं तवर्‍यान आबा आयला. आबा आमचेच मित्राचा सोम्याचा बापूस. आगरान मांडोलीचे कामाला जावाचा नं बाकी टाईम रास दारु पिवून टाईट आसाचा . जगान कया बी ज्याला तरी कोपरी नं लंगोट योच त्याचा ड्रेस आसाचा. सपेत माखल्यासारखी कोपरी नं लाल लंगोट घेतलेला आबा नाक्यावं, देवलान, आगरावं, दारुचे अड्ड्यावं, तल्यावं , माज घेतल्यावं न्हावे खारीन आयसा कया नं कया दिसाचाच. एके ठिकानी कवाच जास्त थांबाचा नय .... फक्त देवलाशी आयला म्हजे आबाचा तास दोन तास मुक्काम ठरलेला. दारु पिवून टाईट आसाचा म्हनून कोनूच आबाला सीरीयसली झ्यावाचं नय. जो तो ‘’ आबा डबा “ बोलून टिंगलीत रावाचा. आबा पन जास्त थांबाचा नय कया पन देवूल म्हंजे आबाचा हक्काचा कोपरा व्हता.

आबा आयला नं देवलाचे बाजुलाच आंब्याचे झाराखनी बेसला. कानानशी इरी केरली नं कोपरीचे खिशानशी हात घालून पेटी. इरी पेटेवली.... दोन तीन मस्तपैकी झरकं मेरलं ..... घसा वला झाल्यावं खाकखुक केला नं पके जोरान खाकरुन बाजुलाच थुकला. तोंडावची लाल डावे हाताशी बाजुला करीत रोयदासला साद घेतली. ... , ‘’ आमचा सोम्या नय आयला?’’
वारीत व्हतु त्याला.... मक्शी येन म्हनून बोल्ला. म आमी आयलू पुरं. रोयदास बोल्ला ...

‘’ बरा झाला , आया नय तो . नय तं मना एक मिनिट नसता बेसू दिला. आता म्होटा झाला नं तो..... सातवीन जेला. लंगोट घेतलेले बापासची लाज वाट्टंय त्याला आता. जरा कया दिसलू का आंगावं रोकतंय ..... ‘’ आया काय केरतंस? जा घरा’’ . आरं मी याचा बापूस हाव का यो माजा? येच लंगोटान लपवूनशी याचे साठी खारीनशी माजंचं मासं, करपाली, शेंगटखाद्या, बूईस हानाचू. मी कोड्डा भात खावाचू पन सोम्याला बाव दिला नय आयसा एकबी दिवस नसंल.... न यो बटकीचा माझावं रोकतं .....

इरी वरता वरता आबा कय नं कय भाकत व्हता न आखरं भालचन नं रोयदासची फिरकी चालूच व्हती.

इरी खपली तयसा उरलेला थोटूक आबानी परत कानावं चरेवला नं तयाच आंब्याचे झाराखनी डोक्याशी टुवाल झेवून पसारला. पाच स मिंटानूच आबाचा घोराचा आवाज येवू लागला. दुपारी टाकलेली गावठीची आरदी बाटली नं सुकटीशी झालेला जेवान.... आबाला मस्त झोप लागली.

सुटीन कोनशी तरी क्रिकेटची मॅच झेवाला पायजे .... विलासनी एक नवीनूच टॉपीक सुरु केला नं सगलं मॅचीवच बोलाला लागलं. गावानचे पोरानशी मॅच नय झेवाची .... सगलं भानगरी केरतान. भास्करला हंपायर ठेवला का तो आउट देयच नय. ..... मागचे टायमाला नंबरान मॅच झाली व्हती. ... सतीश किल्लेर रन आउट व्हता .... आरदे क्रीजमदे व्हता तरी त्याला भासरनी आउट नव्हता दिला. म रास भानगरी झाल्या. दोनी साइटचे पोराइ पकी वादावादी केली ..... मॅच तं पूर्न झालीच नय ...पन माजी नवी बॅट कोनी चोरली..... विलास.... मी.... रोयदास.... भाल्या .... आमची मॅचीवं चर्चा सुरु झालती नं तवर्‍यान सोम्या आयला.

बापासला बगून त्याचा डोकाच फिरला.

बाबा.... अय बाबा. तू आया झोपलंस? आयनी आख्खे गावान बगला तुला. काकासचे ...... दारुचे अड्ड्यावं ...... लासला तं तल्याव पन जेलती... बुरलास बिरलास का काय म्हनून बगाला..... नं तू आया झोपलंस? उठ पयले......
सोम्या तोंडाला येल ते बोलंत व्हता नं बापासचा घोरना वारतंच व्हता. शेवटी सोम्यानी वैतागून देवलानचे गारक्यानशी पानी हिनला नं आबाचे तोंडावं मेरला.

आबा खरखरा जागा झाला. लाल तांबूस डोलं चोलीत आबानी सोम्याला बगला...... न एक शब्द पन न बोलता तरातरा उठून घराकरं चालाला लागला.

आबानी देवूल , बांचोली, वराचा झार मागं टेकला....

पावला भसाभस टाकीत तो गावान चालला व्हता ..

आबा गावान शिरंपर्यंत आमी त्याचेच करं बगीत व्हतू.......

-- डॉ. कैलास गायकवाड

( संपूर्ण आगरी भाषेतील ‘’जतर’’ या आगामी कादंबरीतून )

शब्दार्थ :

बांचोली : नेरुळ गावातील एका मैदानाचे नाव
झार : झाड
वटीवं : ओटीवर ( ओसरीवर )
सुदक : सुद्धा
भालचन : भालचंद्र
रोयदास : रोहिदास
कांडोल : कांडोळ ( एका झाडाचे नाव )
लासंपर्यंत : चटका बसेपर्यंत
इरी : विडी
पेटी: काडेपेटी
रोकतंय : ओरडतो
किल्लेर : क्लिअर
लासला : शेवटी ( लास्टला )
जतर : जत्रा

Group content visibility: 
Use group defaults

छान लेख.
हल्ली कांडोळचे वृक्ष फार बघायला मिळत नाही. बालपणी जंगलात जायचो तेव्हा ह्या वृक्षाच्या आकाराची व रंगाची भीती वाटायची,परंतू कांडोळ्या गोळा करून सोलून खायला जाम मजा यायची.

नेरुळ गावाच्या बाजूस पुरातन गावदेवी मंदिर आहे. या मंदिराजवळ एक कांडोळवृक्ष आहे. माझ्या मामाचे कल्याणजवळ गाव आहे तिथेही दाट जंगलात हा वृक्ष आढळतो .

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

ज्याम भारी लिवलंय दादुस. कादंबरीसाठी शुभेच्छा.

मीठ मसाला कोनी तरी न्हेलेलाच आसाचा.

"न्हेलेलाच " ह्या जागी "हेनलेला" असावा असे वाटते