कैरी कांदा लोणचे

Submitted by Adm on 14 March, 2009 - 11:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ मध्यम आकाराच्या कैर्‍या,
२ मध्यम आकाराचे कांदे,
१ चमचा तिखट,
१ लहान वाटी गुळ
चवी प्रमाणे मिठ

क्रमवार पाककृती: 

पार्ल्याक्वांच्या आग्रहामुळे आईला विचारून ही पाककृती यो.जा.टा. आहे. Happy
१. कैर्‍या आणि कांदे सालं काढून किसुन घ्यावे.
२. गुळ आणि दोन्हीचा कीस एका भांड्यात घालून ठेवून द्यावा.
३. थोड्यावेळाने गुळ विरघळून त्याला भरपूर पाणी सुटतं.
४. नंतर त्यात लाल तिखट आणि मीठ घालून नीट ढवळून घ्यावं.
लगेच खाललं तरी चालतं किंवा रात्रभर ठेवून दिलं की चांगल मुरतं.

वाढणी/प्रमाण: 
एक वाडगा भरून होतं
अधिक टिपा: 

१. तिखटाचा रंग एकदम लाल असला तर लोणच्याला मस्त रंग येतो.
२. हे लोणचं एकदम रसरशीत आणि आंबट-गोड लागतं, तिखटामुळे चांगली चव येते. शेवटी शेवटी सगळा रस संपून जातो आणि किंचित ओलसर चोथा उरतो. हा चोथा आमटीत घातला की आमटीला छान स्वाद येतो.
३. फ्रिज मधे १५ दिवस टिकतं. पण तेव्हडे दिवस उरतच नाही. Happy
४. मार्च एप्रिल मधल्या पहिल्या हंगामच्या ताज्या आणि कोवळ्या कैर्‍या वापरून केल्या तर एकदम मस्त चव येते.

माहितीचा स्रोत: 
आज्जी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपी..
पांशामो ऑनः आज्जीची रेसिपी आईला विचारुन अडमने पोस्ट केली...वा... Wink
>>>>हा चोथा आमटीत घातला की आमटीला छान स्वाद येतो,पहिल्या हंगामच्या ताज्या आणि कोवळ्या कैर्‍या वापरून केल्या तर एकदम मस्त चव येते.
ही आईच्या तोंडची वाक्य जशीच्या तशी इथे उतरली आहेत. हो की नाही अडम? पांशामो ऑफ.

कैर्‍या ..हम्म्म्म. इथे कधी मिळणार आम्हाला. नुसते पाककृती वाचुन समाधान मानावे लागणार बहुदा. इथे कधी कधी कच्च्या कैर्‍या मिळतात चायनीज दुकानात पण त्याची साल फार जाड असते आणि त्या आंबट तर मुळीच नसतात.
बाकी पाकृ एकदम सोपी आणि सुटसुटीत आहे. Happy

रुनी, इथे इंडियन स्टोअरवाल्या कैर्‍या? त्या फार आंबट नसतात हे खरं. क्वचित कधीतरी छोट्या आकाराच्या मिळतात पण एरवी खूपच मोठ्या.

सायो.. हो... आईने सांगितलं तसं टाईप केलय.. no value add.. Happy

रेसिपी वाचुनच तोंडाला पाणी सुटलय. अडम धन्यवाद. नक्की करुन बघेन. अधीक टीपा नं.३ एकदम बरोब्बर!

यात आपली नेहेमीची मोहोरी, हिंग, मेथ्या ची फोडणी गार झाल्यावर घातली तर अजूनच उत्तम लागते.
कधी बदल म्हणून रेडिमेड कैरी लोणचं मसाला पण घालून चांगले लागते.

छान आहे रेसिपी. आधी अशीच मग फोडणी घालून करुन बघेन. कैर्‍या आहेत. रुनी, सध्या इन्डियन ग्रोसरीमध्ये आल्यात बघ कैर्‍या. या दिवसात येतात.

('पार्ल्याक्वांच्या आग्रहामुळे आईला विचारून ही पाककृती यो.जा.टा. आहे- हे तिथे नको रे, IMO)

*****************************************************
कुणास कळतो सर्व पसारा? तरी शहाणा त्यास म्हणावे -
ज्याला कळते - सगळे त्याच्या कळण्यासाठी नसते काही

आमच्याहीकडे असंच करतात फक्त वरून मेथ्याची फोडणी आणि लोणचं न म्हणता कैरी कांद्याची चटणी म्हणतात. Happy

रात्री नेमक्या कै-या आणलेल्या असल्यामुळे लगेच करुनही झाली,कृती पोस्ट करून या चटणी/लोणच्याची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद adm Happy

हो, खोबरे घालून पण करतात ती चटणी. मी कान्दा नाही घातला कधी.

*****************************************************
कुणास कळतो सर्व पसारा? तरी शहाणा त्यास म्हणावे -
ज्याला कळते - सगळे त्याच्या कळण्यासाठी नसते काही

मी नुसती कैरी किसून त्यात गूळ घालून वरुन मेथ्यांची फोडणी घालते. छान लागते तीही.

कैरी कांद्याची चटणी म्हणतात >> हो. बहुतेक मराठवाड्यात चटणीच म्हणतात. रुनी मायकल्स नाही का तुमच्या कडे. तिकडे मेक्सीकन कैर्‍या असतात.

बरोबर केदार, श्यामली. एकदम मस्तं लागते.
गुळामुळे ह्या ची पण चव चांगली लागत असेल. Happy

आमच्याकडे आता भरपूर कैर्‍या आहेत. प्रभातफेरीहून येता येता, दहा बारा तोडून येतो. स्थानिक लोक कच्च्या कैर्‍या खात नसल्याने, मला कुणी प्रतिस्पर्धी नाही.
तर मी पण हा प्रकार करुन बघितला, छान लागला, पण पाणी जरा जास्तच सुटले. ते मी दहिभातावर घालुन खाल्ले.

टक्कु का काय म्हणतात ते हेच का? Happy

नाही तक्कु वेगळा, त्यात कांदा नसतो.

सायोनारा
कैर्‍या आंबट असतील तर खीसुन झाल्यावर त्यातला रस पीळुन काढुन घ्यायचा म्हणजे आंबट पणा कमी होइल.

हे लोणचं/चटणी लै भारी लागतं.. ब्रेडला लावून खायला पण बेस्ट.. ट्रेकला वगैरे हमाखास नेण्याचा आयटम.. (असल्या लोणच्यांना मी जिवंत लोणची म्हणतो.. म्हणजे ही टिकवून वगैरे ठेवायला ममीफाय करत नाहीत म्हणुन.. फ्लॉवर-मटार घालून पण असलं एक जिवंत लोणचं करतात)

याचाच एक अजून झणझणीत प्रकार (सौजन्य- सुमॉ). चांगली आंबट कैरी आणि कांदा तुकडे करून थोडा गूळ, ३-४ तिखट हिरव्या/लाल मिरच्या आणि जिरं, मीठ घालून मिक्सीतून काढायचे. सही लागतात.

फ्लॉवर-मटार घालून पण असलं एक जिवंत लोणचं करतात>>>
भाज्यांचं लोणचं रे, सही लागतं. त्यात गाजरही घालतात, मस्त करकरीत फोडी लागतात.

या कैरी-कांदा लोणच्यात कांदा अवश्य घालावा. गूळाची आणि जनरल हवेत जी उष्णता असते, ती कांद्याने कमी होते. काही जण कच्चा कांदा खायला नाखुश असतात, म्हणून या युक्त्या.. फ्रीजमधले गारगार खायलाही मस्त लागते..
-----------------------------------
Its all in your mind!

>>या कैरी-कांदा लोणच्यात कांदा अवश्य घालावा
हो ना, नाहीतर कसलं ते 'कैरी-कांदा' लोणचं! Light 1

तेच की Lol
वर तूच लिहिलंस ना, मी कांदा घालत नाही, म्हणून तुलाच सांगितलंय मी ते Wink
-----------------------------------
Its all in your mind!

फोटो अपलोड झालाय. पण इथे दिसत नाही. काय करु?

"जिवंत लोणचे", लै भारी राव !!!

ते मी दहिभातावर घालुन खाल्ले. >>>> दिनेश, त्या पाण्यातच भात कालवावा आणि वर थोडे दही किंवा आमटी घालावी.. Happy

ब्रेडला लावून खायला पण बेस्ट >>>> टण्या अगदी अगदी..!!

ही चटणी उन्हाळ्यात घरी रोजच केलेली असते. ऊन बाधत नाही ही खाल्ल्याने.
मी हॉस्टेलवर असताना नेहेमी करायचे. त्यामुळे माझ्या मैत्रिणी अजुनही म्हणतात.. अल्पनाको सिर्फ चटणी (अच्छी) बनाना आता है.

उद्याच करायला पाहीजे, गरम चपाती अन हे खूप मस्त लागते. बरीच वर्षे झाले खावून. पण काय आहे ना इथे कुठे त्या आंबट गोड कैर्‍या मिळतात. ... Sad

बरे सरके(srk), फोटो टेम्प्टींग आहे.

मागील आठवड्यात 'आ.सा.ख.' मध्ये दाखवले होते टक्कु. मलाही पहिल्यांदा तेच आठवले. पण त्यात कंदा नव्हता.
................................
माझे जगणे होते गाणे...

आपले नेहमीचे कांदे न घालता ह्यात पांढरेकांदे घालावेत. उन्हाळा अजिबात बाधत नाही.

कैरीचा झटपट टक्कू करण्यासाठी कैरी किसून त्यात मीठ, लाल तिखट आणि हिंग घालून जरा वेळ बाजूला ठेवायचं. दहा मिनीटांनी त्याला किंचीत पाणी सुटल्यावर त्यात कच्चं तेल मिसळायचं.. आणि खाऊन टाकयाचं.. Happy स्लरर्रप.... केपी, कसली आठवण करून दिलीस रे.. आज कैर्‍या घेऊन जायला हव्या..

तोण्डाला पाणी सुटले एकदम!!!! आज कैर्‍या घेऊन जायला हव्या.

Pages