https://www.maayboli.com/node/63952 ------> गडदुर्गा - श्री पट्टाई देवी
https://www.maayboli.com/node/63966 ------> गडदुर्गा - जाखमाता, किल्ले मोरगिरी (२)
====================================================================================================
कोरीगड (कोराईगड) हा लोणावळा परिसरातील प्रसिद्ध गिरीदुर्ग, पर्यटक तसेच ट्रेक्कर दोघांचा लाडका. चढाईच्या सोप्या श्रेणीत येणाऱ्या ह्या किल्ल्यावर भटक्यांची नेहमी वर्दळ असते.
गडावरील पुरातन गुहा किल्ला प्राचीन आहे असे सांगतात तर गडफेरी करता येण्यासारखी तटबंदी, तोफा इतिहासाची साक्ष देतात. गडमाथा हे एक भले मोठे पठार असून पठारावर तोफा व तटबंदी सह गुहा, तळे आणि काही पाण्याची टाकी सुद्धा आहेत. पठारावर गडस्वामीनी श्री कोराई देवीचे सूंदर राऊळ आहे. स्वयंसेवी संस्थानी गडाचा आणि देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून कायापालट केला आहे. मंदिरासमोरील दीपमाळ देखणी व लक्षवेधी आहे. कोराई देवीची मूर्ति साधारण ४फुट उंच असून येथे नित्यनैमिक पूजा होते व देवीला साज श्रृंगार चढविलेला असतो. मनमोहक अश्या प्रतिमेसमोर ध्यानस्थ बसलेले असताना मिळालेली मनःशांति ही अवर्णनीय आहे.
गडावर कोराई देवीच्या मंदिरासोबतच श्री विष्णु आणि सुखकर्ता गणेशाचेही मंदिर आहे.
मोक्याच्या जागेवर असलेल्या किल्ल्यावरुन लोणावळा परिसरातील नागफणी (Duke's nose), तुंग, तिकोना, ईत्यादि किल्ल्यासह सहारा ऍम्बीवैलीचा नजारा दिसतो.
थोडे नशीब दिमतीला असेल तर ऍम्बीवैलीच्या छोटेखानी धावपट्टी वर एखादे विमान उतरताना सुद्धा दिसू शकते.
~ विराग
हा हि भाग आवडला.
हा हि भाग आवडला.