मी याआधीच्या अनेक लेखात माझी पार्श्वभुमी लिहीली आहे.नविन लोकांसाठी परत लिहीतो.मी शेतकरी आहे .सातार्यात राहतो.मी अल्पभूधारक शेतकरी आहे.माझ्यापुरतं मी कमावतो.आठवड्यातील पाच दिवस मी रिकामा असतो.एखादी नोकरी व कामधंदा केल्यास वेळ जाईल असे वाटल्याने एक धागा काढला होता.त्यात मी लीहील्याप्रमाणे मला सोशल फोबिया आहे.त्यामुळे सोशली इंटेंन्सीव्ह काम मला जमेल असे वाटत नाही.त्यामुळे रिकामा वेळ जावा व सत्कारणी लागावा यासाठी मी सध्या एखाद्या सामाजिक संस्थेत काम करावे असा विचार करत आहे.जेणेकरुन माझा वेळही जाईल आणि समाजाला काहीतरी मदत होईल.आणि माझा सोशल फोबिया कमी होईल हा आणिक फायदा.
तर मला अश्या NGO मध्ये काम करायचे आहे जी धार्मिक नसेल(कारण मी नास्तिक निधर्मी आहे).आठवड्यातले चार दिवस मी असे काम करु शकतो.मधेअधे स्वखर्चाने काम करायची तयारी आहे.
मला प्राण्यांसाठी काम करणार्या,जल, पर्यावरणविषयक काम करणार्या NGO's मध्ये काम करायला विशेष आवडेल.त्याच बरोबर मानसिक स्वास्थ,विज्ञान,महीला सबलिकरण,बालविकास या क्षेत्रात काम करणर्या संस्था सूचवल्या तरी चालेल.
अपेक्षा
१.सामाजिक संस्था सातारा,पुणे या भागात असावी
२.सोशल फोबिया असल्याने एकदम पब्लिक रिलेशनमध्ये काम करणे जमेल असे वाटत नाही .एकदम मोठा डोस नकोय .थोडं ॲडज्स्ट होता येईल अश्या NGO सूचवा.
धन्यवाद.
सामाजिक कार्य करायचे आहे,सामाजिक संस्था /NGO's सूचवा!!!!
Submitted by सिंथेटिक जिनियस on 17 September, 2017 - 12:29
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हर्पेन यांना संपर्क साधा
हर्पेन यांना संपर्क साधा
RSS
RSS
चौफुला ?
चौफुला ?
Alcoholics Anonymous ?
रजनीश आश्रम ?
तुम्ही स्वताच बाबा का बनत
तुम्ही स्वताच बाबा का बनत नाही ?
पैशापरी पैसा आणि तुमचे बाईबाजीचे पण स्वप्ना साकार होईल !
सिंजी उस आहे का शेतात?
सिंजी उस आहे का शेतात? गुळेकरी येतात का? किंवा शेतावर हंगामी काम करायला गडी येतात का? त्यांच्या मुलांना ते घरी सोडून जातात. शिक्षण आणि एकूणच आबाळ होते. आमच्या गावात यासाठी शाळा सुरु करण्यात आली आहे. ती लोक पाच सहा महीने गावात असतात. त्या मुलांसाठी शाळा. फुकट कुणीही मदत करायला तयार होत नाही. त्यामुळ शिक्षक वगैरे पैसे देवून आणावा लागतो. नाष्टा जेवण वगैरेचा खर्च ही शाळा करते.
शाळेतल्या मुलांना फुकट
शाळेतल्या मुलांना फुकट शिकवण्या देऊन बघा.. तुम्हाला पण समाधान आणि मुलांना पण फुकट क्लास..
वर्ल्ड फॉर ऑल डॉग चॅरिटी आहे.
वर्ल्ड फॉर ऑल डॉग चॅरिटी आहे. पुण्यात पण एक बाई डॉग चॅरिटी चालवतात शोधून लिहीते. घरीच प्राण्यांना होस्ट करणे. पपीज अॅनिमल रेस्क्यू, म्हातार्या प्राण्यांची देखभाल असे काम अस्ते. फॉस्टर पण करता येइल.
Submitted by सीमा on 17
Submitted by सीमा on 17 September, 2017 - 23:58 >> +11
तालिमसङ्घात जा
तालिमसङ्घात जा
पानपओई नाकयावर रहदाअरि नियन्त्रक व्हा