Submitted by र।हुल on 15 September, 2017 - 15:15
जगण्याच्या लढाईत तुटला
कधी लुकलुकलेला तारा
पोटापाण्यासाठी झाला
माझ्या बुद्धीचा कोंडमारा ॥धृ॥
पाठीवरले ओझे सरस्वतीचे
खुंटीवरती जाऊनी विराजले
नाजूक कोवळे हात माझे
लोखंड उचलूनी जडावले ॥१॥
स्वप्नं निरागस आशेची
डोळ्यांदेखत कुस्करली
गालांवरती ओघळणारी
आसवं सुकूनी स्थिरावली ॥२॥
हात धरूनी चालणारे
जिवलग सोबती दुरावले
बोल लावती जळणारे
आप्त स्वकीय निर्ढावले ॥३॥
दु:खावेगाला भरती येई
दिसता शाळेत जाणारे
अस्वस्थ मनी हैराण होई
विचार येती 'पोखरणारे' ॥४॥
भूक पोटाची भागवताना
उपासमार बुद्धीची झाली
स्वार्थी जिवन जगताना
कोमल संवेदना हरवली ॥५॥
अंधारलेले भविष्य सारे
कुणी भेटेल का सावरणारे
शब्दअक्षरे पुन्हा शिकविणारे
फुटतील का नव्यानं धुमारे ॥६॥
[अपुर्ण]
―₹!हुल/१५.९.१७
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आवडली...
आवडली...
सुंदर !
सुंदर ! मर्मभेदी आहे .
छान
छान
सुंदर...
सुंदर...
सुंदर..
सुंदर..
मेघाजी, दत्तात्रय जी, पंडितजी
मेघाजी, दत्तात्रय जी, पंडितजी, सायुरीजी, अक्षयजी प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!
राहुल, "कोमल संवेदना हरवली
राहुल, "कोमल संवेदना हरवली "हे तुमच्यासारख्या कवीने म्हणावे?
उलट अतिशय संवेदनशीलपणे व "आत्मैव आत्मनो बंधु: " या स्वयंसिद्ध मार्गाने तुमची वाटचाल होतेय असं मला आपल्या लेखनावरून वाटतंय.
अनंतजी, माझ्या वाटचालीच्या
अनंतजी, माझ्या वाटचालीच्या आपल्या टिप्पणीबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद
"कोमल संवेदना हरवली" >>
कवितेचा नायक हा शिक्षणापासून दुरावल्यानंतर स्वार्थी बनला आणि त्यादरम्यान त्याच्यामधील समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आधीच्या तुलनेत काहीशी कमी झाली असं म्हणायचं आहे.
राहुलजी... एकदम मस्त...
राहुलजी... एकदम मस्त...
[अपुर्ण] ?...
धन्यवाद राजेंद्रजी
धन्यवाद राजेंद्रजी
अपुर्ण?>>> काहीतरी लिहायचं बाकी राहिलंय अजून म्हणून..
सुंदर ! मर्मभेदी आहे .>> +१
सुंदर ! मर्मभेदी आहे .>> +१ खुप सुंदर लिहिता
खूप छान. आवडली
खूप छान. आवडली
धन्यवाद मंगेश, बीएस.
धन्यवाद मंगेश, बीएस.
या गाण्याला छान चाल लावता
या गाण्याला छान चाल लावता येईल....
रॉक सॉन्ग छान बनू शकते.
(No subject)
चांगली आहे, पण अपुर्ण ????
चांगली आहे,
पण अपुर्ण ????
धन्यवाद vb
धन्यवाद vb
काही लिहीणं बाकी आहे म्हणून अपुर्ण लिहिलंय मी.
सुंदर...
सुंदर...
धन्स परी.
धन्स परी.