साधारणपणे ८०-९० च्या दशकातील मराठी मुलांना फास्टर फेणे माहीती नाही असे सहसा होणार नाही. अतिशय लोकप्रिय झालेला हा भा रा भागवत यांचा हा मानसपुत्र सिरीयलमधून आलेलाच पण आता चित्रपटातूनही सामोरा येत आहे. पण तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आहे तोच पुस्तकातून रंगवलेला टॉक्क करणारा बनेश फेणे. या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्या या काही आठवणी.
मला आठवते ती फाफेची आणि माझी ओळख काहीशी वेगळीच झाली होती. मी किती वर्षाचा होतो त्यावेळी लक्षात नाही पण माझे वाचन चांगले आहे पाहून बाबांनी मला फाफेचा आख्खा संच विकत आणलेला आणि ते पाहून माझे डोके फिरलेले.
माझे वाचन त्यावेळी म्हणजे चांदोबा, उडता घोडा, राजपुत्र तत्सम प्रकारातले. त्यामुळे ही कसली बोर पुस्तके आणली म्हणून मी पहिले पुस्तक उघडून लगेच बंद करून टाकले. आणि परत देऊन टाका असे सांगितले.
पण आमचे बाबा महा चतुर. त्यांनी मी दाद देत नाहीये म्हणल्यावर जेवणाच्या वेळी आईला ते पुस्तक वाचून दाखवायला सुरुवात केली. मी तरीही बधत नव्हतोच पण बन्या बाळ जन्मानंतरच हरवतं आणि सगळी गावातली लोक शोधाशोध सुरु करतात आणि तो झोळीवाला जाताना दिसतो या क्लिफहँगरवर त्यांनी वाचन थांबवले.
झाले, मी इकडे प्रचंड अवस्थ, पुढे काय झाले असेल. बाबांना विचारून झाले, आईला विचारून झाले पण दोघांनी दाद दिली नाही. आणि झक मारत मला ते पुस्तक त्यांच्याकडून हस्तगत करत वाचायला लागले.
आणि त्या दिवसापासून बन्याशी जी काय गट्टी जमली ती अद्याप टिकून आहे. माझे बालपण समृद्ध करण्यात ज्या काही पुस्तकांचा हात आहे त्यात फाफेचा मोठा वाटा आहे. त्याच्यासारखे होण्यासाठी काय काय उपद्व्याप केलेत, सायकल चालवयाच्या नादात ढोपरे फोडून घेतलीत.
मुळात त्या पुस्तकातली एकूण एक पात्रे कमालीची खरी वाटतात. बन्या, त्याचा मित्र सुभाष, माली, इनामदारांचा पोरगा, मामा मामी सगळेच. आणि काय नाहीये या सिरीज मध्ये - प्रचंड साहसे आहेत, श्वास रोखून धरायला लावणारे प्रसंग आहेत. कित्येक वेळा असे झाले आहे की आता या परिस्थीतीत बन्या काय करणार याची धपापत्या छातीने रात्रीचा दिवस करून पुस्तके वाचून काढली आहेत.
कमी जास्त असे काही नाही पण व्यक्तिगत रित्या मला सगळ्यात भावलेले ते म्हणजे नेफा आघाडीवर फाफे गेला असतो. काय जबरा डिटेलींग आहे त्या पुस्तकात. डमडम एअरपोर्ट, चोरून विमानात शिरणे, पॅराशूटने उतरणे, एकेक जवान आणि अधिकारी, नंतर जखमी झाल्यावर ती नर्स, कमांडर साहेब, चिन्यांच्या तळावर बैलाचा धुमाकुळ. मला वाटत मी २० एक वर्षापूर्वी हे वाचले असेल आणि आजही लख्ख आठवत आहे.
त्यानंतर मग चिंकू चिंपाझीवाली सिरीज, प्रतापगडावरचा भूकंप, पुण्याचा पूर, काश्मिरच्या करामती, सगळेच एकसे बढकर एक. आणि याच भारावलेपणातून भारा भागवतांचे घर शोधून त्यांना भेटायला गेलेलो.
त्यांनी इतक्या प्रेमाने स्वागत केले, खायला दिले, त्यावेळी दिवाळी होती बहुदा, दाराभोवती सुंदर सुबक रांगोळी काढलेली आणि मी जेव्हा त्यांना विचारलं की मला प्रत्यक्षात बनेशला भेटायचे आहे तेव्हा ते हसले आणि म्हणाले मलादेखील.
त्यांच्यासोबत एक फोटोही काढून घेतला होता, सापडला की डकवतो इथे.
मला आवडलेली सगळ्यात गोष्ट म्हणजे लहान मुलांसाठी असूनही बन्या कुठेही उपदेशाचे डोस पाजत नाही. तो त्याच्या कृतीतून दाखवतो की आदर्श वगैरे होण्यासाठी तुम्हाला फार काही वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत, ते बेसिकलीच असतात, ते फक्त जपावे लागतात. प्रतिस्पर्धी गटाने कितीही कट कारस्थाने केली तरी बन्या कधीच शॉर्टकट्स मारत नाही. तो नेहमीच त्याच्या कल्पक बुद्धीने आणि तुडतुड्या अंगाने धावत पळत संकटांवर मात करतो आणि इथेच त्याचे सारे यश सामावले आहे.
आणि आता मी माझा पोरगा थोडा मोठा होऊन वाचन करण्याइतका होण्याची वाट पाहतो आहे. तो वाचायला लागताच मी त्याला माझ्या या बालपणीच्या मित्राची ओळख करून देणार आहे आणि मला खात्री आहे फाफे त्याच्याही खांद्यावर हात टाकून म्हणेल
टॉक्क.
‘भा.रा. भागवत आणि लीलावती भागवत यांचे बालसाहित्यातील योगदान’ या विषयावर प्रबंध लिहून नीला धनंजय धडफळे यांनी पुणे विद्यापीठाची पीएच.डी. मिळवली आहे.
समग्र वाड्मय
क्र. नाव प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.) साहित्यप्रकार रचना मूळ लेखक
१८० अगडबंब मंडळाच्या गोष्टी उत्कर्ष प्रकाशन, पुणे - - - -
१ अंतराळ प्रवासाचे पहिले पुस्तक - - - अनुवादित -
१६ एक चमत्कारिक रात्र - - - - -
३५ गढीचा मालक - - - - -
३७ गांजलेले जीव - - - अनुवादित -
४९ चिटोर्याचा प्रताप - - - स्वतंत्र -
६६ टिल्लू नावाचा विदूषक - - - रूपांतरित -
६९ ढब्बू राजाची गोष्ट - - - रूपांतरित -
१७९ ढोरगावचा चोर उत्कर्ष प्रकाशन, पुणे - - - -
७३ तोंड मिटा मुंछासेन - - - रूपांतरित -
१७७ पुत्र असावा ऐसा गुंडा उत्कर्ष प्रकाशन, पुणे - - - -
१०४ पुनश्च खजिन्याची भेट - - - अनुवादित -
१०५ पुनश्च भेट - - - स्वतंत्र -
१०६ पृथ्वी दुभंगली राजा प्रकाशन, मुंबई - - - -
१२० बलदंड बन्यान - - - अनुवादित -
१२२ बाजीराव राजा प्रकाशन, मुंबई - - पुनर्कथित -
१३० भारत पाक युद्ध मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई - - अनुवादित -
१३५ महाभारत - - - पुनःकथित -
१४९ वीर पांडव - - - स्वतंत्र -
१५० वैतागवनांतील वाफारे काँटिनेंटल प्रकाशन, मुंबई - कथासंग्रह स्वतंत्र -
१५६ शाळेतली भुताटकी मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई - - - -
१५८ छत्रपती शिवाजी अमर चित्र कथा - कॉमिक स्ट्रिप / चरित्र पुनःकथित -
१६० सफरचंद - - - अनुवादित -
१७८ शिकंदरचा बिलंदर कुत्रा उत्कर्ष प्रकाशन, पुणे - - - -
६० जॉर्ज वॉशिंग्टन ग. पां. परचुरे प्रकाशन १९३२ चरित्र अनुवादित -
९७ पबुताईच्या गोष्टी केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, मुंबई १९४२ कथासंग्रह स्वतंत्र -
१६९ सोव्हिएटच्या समरकथा केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, मुंबई १९४३ कथासंग्रह अनुवादित -
९६ पबुताईची फ कशी झाली? केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, मुंबई १९४६ कादंबरी स्वतंत्र -
१३७ माझा विक्रम केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, मुंबई १९४६ - स्वतंत्र -
१०० पाच भावांची गोष्ट ग. पां. परचुरे प्रकाशन १९५५ चरित्र अनुवादित -
१७० हरीण बालक उर्जा प्रकाशन, मुंबई १९५५ कादंबरी अनुवादित मार्जरी किनन रॉलिंग्स्
१२५ बेन फ्रँकलिन - अमेरिकेचा गुणी शास्त्रज्ञ मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई १९५६ कादंबरी अनुवादित -
१५९ सगळं सगळं ठीक होतं मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई १९५६ - अनुवादित -
१६१ समुद्र सैतान लाखाणी बुक डेपो, मुंबई १९५६ कादंबरी स्वतंत्र -
९५ न्यायाधीशाचे अंतरंग - १९५७ - अनुवादित -
११० फार फार सुंदर शहर आशय प्रकाशन, पुणे १९५८ कथासंग्रह अनुवादित -
१५७ शिंगी नाग विदर्भ प्रकाशन, अमरावती १९५८ कादंबरी स्वतंत्र -
७४ तोचि साधु ओळखावा महाराष्ट्र प्रकाशन १९५९ चरित्र - -
७७ त्यांसी म्हणे जो आपुले महाराष्ट्र प्रकाशन १९५९ - - -
८५ देव तेथेंचि जाणावा महाराष्ट्र प्रकाशन १९५९ कादंबरी - -
६१ ज्ञान आणि मनोरंजन: भाग पहिला मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई १९६० माहितीपर स्वतंत्र -
२ अंतराळात अग्निबाण मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई १९६१ कादंबरी अनुवादित -
१५ उमलती कळी नाग विदर्भ प्रकाशन, अमरावती १९६२ क्रमित कादंबरी अनुवादित लॉरा इंगल्स वाईल्डर
५५ जगाच्या कल्याणा मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई १९६२ कादंबरी अनुवादित -
१६५ तारस बलबाचे दोन सुपुत्र लाखाणी बुक डेपो, मुंबई १९६२ कादंबरी स्वतंत्र -
३३ खरा खजिना पॉप्युलर प्रकाशन, पुणे १९६४ कथासंग्रह स्वतंत्र -
१४० मुक्काम शेंडेनक्षत्र लाखाणी बुक डेपो, मुंबई १९६४ कादंबरी अनुवादित ज्यूल व्हर्न
१६८ सूर्यावर स्वारी लाखाणी बुक डेपो, मुंबई १९६४ कादंबरी अनुवादित ज्यूल व्हर्न
९ आगे बढो फास्टर फेणे पॉप्युलर प्रकाशन, पुणे १९६५ कथासंग्रह स्वतंत्र -
५७ जवानमर्द फास्टर फेणे पॉप्युलर प्रकाशन, पुणे १९६५ कथासंग्रह स्वतंत्र -
६७ ट्रिंग-ट्रिंग-फास्टर फेणे पॉप्युलर प्रकाशन, पुणे १९६५ कथासंग्रह स्वतंत्र -
११३ फास्टर फेणेचा रणरंग उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९६५ कथासंग्रह स्वतंत्र -
११८ फुरसुंगीचा फास्टर फेणे पॉप्युलर प्रकाशन, पुणे १९६५ कथासंग्रह स्वतंत्र -
१२४ बालबहाद्दर फास्टर फेणे पॉप्युलर प्रकाशन, पुणे १९६५ कथासंग्रह स्वतंत्र -
१४६ वनस्पतींचा जादूगार मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई १९६५ कादंबरी अनुवादित -
१४ उडती छबकडी भारतीय ग्रंथ भवन १९६६ कथासंग्रह स्वतंत्र -
१२८ भटक बहाद्दर मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई १९६६ कादंबरी अनुवादित -
१४४ रॉबिन्सन आणि मंडळी रुची प्रकाशन, पुणे १९६६ कादंबरी स्वतंत्र -
९४ निळा मासा नाग विदर्भ प्रकाशन, अमरावती १९६८ - स्वतंत्र -
७६ त्यांनी पाहिलेला भारत नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली १९७० कादंबरी अनुवादित -
११ आपल्या आगगाड्यांची कहाणी नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली १९७१ कथासंग्रह अनुवादित -
३२ खजिन्याच्या बेटावर संजूराजू पॉप्युलर प्रकाशन, पुणे १९७१ कादंबरी स्वतंत्र -
७२ तैमूरलंगाचा भाला मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई १९७२ कादंबरी स्वतंत्र -
१२७ ब्रह्मदेशातला खजिना मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई १९७२ कादंबरी स्वतंत्र -
१३३ भुताळी जहाज मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई १९७२ कादंबरी स्वतंत्र -
१०८ पोस्टाच्या तिकिटांची नवलकहाणी नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली १९७३ कथासंग्रह अनुवादित -
२० ऑलिंपिक महोत्सव आणि खेळाडू नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली १९७५ कादंबरी अनुवादित -
६८ डाकूंची टोळी आणि बालवीर परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई १९७५ कादंबरी स्वतंत्र -
८२ दीपमाळेचे रहस्य मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई १९७५ कादंबरी स्वतंत्र -
१२ आरसेनगरीत जाई कादंबरी नवीन प्रकाशन, पुणे १९७७ कादंबरी रूपांतरित लुईस कॅरल
५८ जाईची नवल कहाणी मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई १९७७ कादंबरी रूपांतरित लुईस कॅरल
५६ जयदीपची जंगल यात्रा मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई १९७९ कादंबरी स्वतंत्र -
४२ घड्याळाचे गुपित इंद्रायणी प्रकाशन, पुणे १९८० कादंबरी स्वतंत्र -
१६७ सुधीरवाडी संजय प्रकाशन, पुणे १९८० कादंबरी स्वतंत्र -
३८ गालफाटूचा पराक्रम सोनसळे अॅन्ड कं., पुणे १९८२ कथासंग्रह स्वतंत्र -
४१ गुलमर्गचे गूढ आणि फास्टर फेणे उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९८२ कादंबरी स्वतंत्र -
८३ दुःख पर्वताएवढे ('ला मिझरेबल्स'चे भाषांतर) संजय प्रकाशन, पुणे १९८२ कादंबरी अनुवादित -
८९ नंदूचा यांत्रिक माणूस राजा प्रकाशन, मुंबई १९८२ कादंबरी स्वतंत्र -
१०९ प्रतापगडावर फास्टर फेणे उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९८२ कादंबरी स्वतंत्र -
१११ फास्टर फेणे टोला हाणतो उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९८२ कथासंग्रह स्वतंत्र -
११२ फास्टर फेणे डिटेक्टिव्ह उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९८२ कथासंग्रह स्वतंत्र -
११४ फास्टर फेणेची एक्स्प्रेस कामगिरी उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९८२ कथासंग्रह स्वतंत्र -
११५ फास्टर फेणेची काश्मिरी करामत उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९८२ कथासंग्रह स्वतंत्र -
१२१ बाईलचोर सोनसळे अॅन्ड कं., पुणे १९८२ - - -
१३१ भारद्वाजाची भरारी सोनसळे अॅन्ड कं., पुणे १९८३ कथासंग्रह स्वतंत्र -
३ अक्काचे अजब इच्छासत्र इंद्रायणी प्रकाशन, पुणे १९८४ कादंबरी स्वतंत्र -
३१ खजिन्याचे बेट ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस, नवी दिल्ली १९८४ कादंबरी अनुवादित -
३६ गप्प बसा मुंछासेन शकुल प्रकाशन, पुणे १९८४ कादंबरी रूपांतरित -
८० दर्याई डाकूंच्या गोष्टी इंद्रायणी प्रकाशन, पुणे १९८४ कादंबरी स्वतंत्र -
१२६ बोला बोला मुंछासेन शकुल प्रकाशन, पुणे १९८४ कादंबरी रूपांतरित -
४४ चक्रीवादळात फास्टर फेणे उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९८५ कथासंग्रह स्वतंत्र -
४७ चिंकू चिंपांझी आणि फास्टर फेणे उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९८५ कादंबरी स्वतंत्र -
४८ चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९८५ कादंबरी स्वतंत्र -
५४ जंगलपटात फास्टर फेणे उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९८५ कादंबरी स्वतंत्र -
११६ फास्टर फेणेची डोंगरभेट उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९८५ कथासंग्रह स्वतंत्र -
११७ फास्टर फेणेच्या गळ्यात माळ उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९८५ कथासंग्रह स्वतंत्र -
३४ गडावरचा खजिना उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९८६ कथासंग्रह स्वतंत्र -
३९ गिरिशिखराचे गुपित राजा प्रकाशन, मुंबई १९८६ कादंबरी अनुवादित ज्यूल व्हर्न
८६ धूमकेतूच्या शेपटावर राजा प्रकाशन, मुंबई १९८६ कादंबरी अनुवादित ज्यूल व्हर्न
९८ पळवलेल्या पोराची गोष्ट ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस, नवी दिल्ली १९८६ कादंबरी स्वतंत्र -
१७१ हर्क्युलीस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, नवी दिल्ली १९८६ कादंबरी अनुवादित -
९२ नागफणी खजिना उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९८७ कथासंग्रह स्वतंत्र -
१३६ महेश उडाला भुर्रर्रsss ज्योस्त्ना प्रकाशन, मुंबई १९८८ कथासंग्रह स्वतंत्र -
६५ टिक टॉक फास्टर फेणे उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९८९ कथासंग्रह स्वतंत्र -
१४८ विमानचोर विरुद्ध फास्टर फेणे उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९८९ कादंबरी स्वतंत्र -
१८ एका चिन्याचा जमालगोटा राजा प्रकाशन, मुंबई १९९० कादंबरी अनुवादित ज्यूल व्हर्न
१६४ साता समुद्राचा सुलतान राजा प्रकाशन, मुंबई १९९० कादंबरी स्वतंत्र -
१७३ हाजीबाबाच्या गोष्टी मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई १९९० कथासंग्रह अनुवादित -
१७४ हिंमतवान जासूद राजा प्रकाशन, मुंबई १९९० कादंबरी स्वतंत्र -
६ अद्भुत व्यक्तीच्या शोधात धाडसी वीर राजा प्रकाशन, मुंबई १९९२ कादंबरी अनुवादित ज्यूल व्हर्न
४५ चला उत्तर ध्रुवाकडे राजा प्रकाशन, मुंबई १९९२ कादंबरी अनुवादित ज्यूल व्हर्न
८७ ध्रुवाने लावले वेड राजा प्रकाशन, मुंबई १९९२ कादंबरी अनुवादित ज्यूल व्हर्न
९३ निर्जन बेटावर धाडसी वीर राजा प्रकाशन, मुंबई १९९२ कादंबरी अनुवादित -
११९ बर्फभूमीवरील बहाद्दर राजा प्रकाशन, मुंबई १९९२ कादंबरी अनुवादित ज्यूल व्हर्न
४ अक्रुधान ते पिक्रुधान राजा प्रकाशन, मुंबई १९९४ कादंबरी स्वतंत्र -
७ अलकनंदा आणि जादूगार जिन राजा प्रकाशन, मुंबई १९९४ कादंबरी स्वतंत्र -
२३ काशाची काशीयात्रा राजा प्रकाशन, मुंबई १९९४ कादंबरी स्वतंत्र -
२९ क्रिकेटची खुमखुमी जिरली अद्वैत प्रकाशन, पुणे १९९४ कथासंग्रह स्वतंत्र -
४६ चाणक्य मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे १९९४ कथासंग्रह पुनःकथित -
५० छगन सांगू लागला कृष्णा प्रकाशन, पुणे १९९४ कथासंग्रह स्वतंत्र -
५१ छगनचे चऱ्हाट चालूच कृष्णा प्रकाशन, पुणे १९९४ कथासंग्रह स्वतंत्र -
५२ छोटी मोठी यंत्रे लाखाणी बुक डेपो, मुंबई १९९४ कादंबरी अनुवादित -
७५ तोरणा कोणी जिंकला? राजा प्रकाशन, मुंबई १९९४ कादंबरी स्वतंत्र -
१०२ पिझारोचे थैमान पुरंदरे प्रकाशन, पुणे १९९४ कादंबरी अनुवादित -
१०३ पिस्तुल बॉम्बच्या कथा अद्वैत प्रकाशन, पुणे १९९४ कथासंग्रह स्वतंत्र -
१७६ भटांच्या वाड्यातील भुतावळ पुरंदरे प्रकाशन, पुणे १९९४ कथासंग्रह - चार्ल्स डिकन्स
१२९ भाग्यशाली सिक्सर अद्वैत प्रकाशन, पुणे १९९४ कथासंग्रह स्वतंत्र -
१३४ मडकोबा शब्दवेध प्रकाशन, पुणे १९९४ कथासंग्रह अनुवादित -
१४५ लाख मांजरी राजा प्रकाशन, मुंबई १९९४ कादंबरी स्वतंत्र -
१६३ सागरी चोरांवर पोरांची मात अद्वैत प्रकाशन, पुणे १९९४ कथासंग्रह स्वतंत्र -
१८१ अक्काचे अजब इच्छासत्र उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९९५ कादंबरी स्वतंत्र -
२४ किड्याने घातले कोडे परिमल प्रकाशन, औरंगाबाद १९९५ कादंबरी स्वतंत्र -
८४ दुर्मिळ तिकिटाची साहसयात्रा उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९९५ कादंबरी स्वतंत्र -
१३९ मुंबईला चक्कर उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९९५ कादंबरी स्वतंत्र -
५ अदृश्य माणूस लाखाणी बुक डेपो, मुंबई १९९६ कादंबरी अनुवादित एच्. जी. वेल्स
१३ इरावतीचा शोध मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई १९९६ कादंबरी स्वतंत्र -
२१ कंपनी चालली सूर्याकडे राजा प्रकाशन, मुंबई १९९६ कादंबरी अनुवादित ज्यूल व्हर्न
२२ काळा बाण लाखाणी बुक डेपो, मुंबई १९९६ कादंबरी स्वतंत्र -
२५ किल्ल्यातील कारस्थान लाखाणी बुक डेपो, मुंबई १९९६ कादंबरी स्वतंत्र -
२६ कॅप्टन किडचा खजिना उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९९६ कादंबरी स्वतंत्र -
५३ जंगल बुकातील दंगल त्या दंगलीतील दोन पोरे उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९९६ कादंबरी अनुवादित -
५९ जुनाट भावलीची भन्नाट कथा आणि इतर पाश्चात्य गोष्टी उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९९६ कथासंग्रह स्वतंत्र -
१७५ डाकू बनला डिटेक्टिव्ह आणि दुसर्याही काही मजेदार लोककथा उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९९६ कथासंग्रह - मॉरीस लेब्लाँ
७१ तुटक्या कानाचे रहस्य सुरेश एजन्सी, पुणे १९९६ कादंबरी स्वतंत्र -
७८ थँक्यू, मिस्टर शार्क आणि दुसर्याही काही मजेदार लोककथा उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९९६ कथासंग्रह स्वतंत्र -
७९ दर्याई डाकू शार्की आणि दुसर्याही काही मजेदार लोककथा उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९९६ कथासंग्रह स्वतंत्र -
८१ दर्यादेशची राजकन्या शांताई प्रकाशन, पुणे १९९६ कादंबरी स्वतंत्र -
१३८ मायापूरचे रंगेल राक्षस: अर्थात् अतिशक्तिमान घंटासुर व चंडासुर आणि त्यांचे बहुढंगी तर्हेवाईक मित्रगण यांच्या अद्भुत साहसांची नवलकहाणी लाखाणी बुक डेपो, मुंबई १९९६ कादंबरी रूपांतरित फ्रांस्वा रेबल
१४३ रॉबिनहूड आणि त्याचे रंगेल गडी इंद्रायणी प्रकाशन, पुणे १९९६ कादंबरी अनुवादित -
१४७ विज्ञानवेडे शास्त्रज्ञ अनुबंध प्रकाशन, पुणे १९९६ कादंबरी अनुवादित -
१६२ साखर सोंड्या आणि दुसर्याही काही मजेदार लोककथा उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९९६ कथासंग्रह स्वतंत्र -
४३ चंद्रावर स्वारी लाखाणी बुक डेपो, मुंबई १९९७ कादंबरी रूपांतरित ज्यूल व्हर्न
१०१ पाताळलोकची अद्भुत यात्रा राजा प्रकाशन, मुंबई १९९७ कादंबरी रूपांतरित ज्यूल व्हर्न
१२३ बादशाही जासूद राजा प्रकाशन, मुंबई १९९७ कादंबरी अनुवादित ज्यूल व्हर्न
१७२ हवाई हुकूमशहा राजा प्रकाशन, मुंबई १९९७ कादंबरी अनुवादित -
१९ एकांड्या बेटावरचे थरारनाट्य राजा प्रकाशन, मुंबई १९९८ कादंबरी अनुवादित ज्यूल व्हर्न
२७ कॅप्टन ग्रँट! तुम्ही कुठे आहात? राजा प्रकाशन, मुंबई १९९८ कादंबरी अनुवादित ज्यूल व्हर्न
६२ ज्यूल व्हर्नची अद्भुत सृष्टी राजा प्रकाशन, मुंबई १९९८ कादंबरी अनुवादित -
६३ झपाटलेला प्रवासी राजा प्रकाशन, मुंबई १९९८ चरित्र अनुवादित ज्यूल व्हर्न
७० तीन बलून बहाद्दर उत्कर्ष प्रकाशन, पुणे १९९८ कादंबरी अनुवादित -
१०७ पोलादपूरचा रणराक्षस राजा प्रकाशन, मुंबई १९९८ कादंबरी अनुवादित -
८ असे लढले गांधीजी मधुराज पब्लिकेशन्स, मुंबई १९९९ कादंबरी पुनर्कथित -
९९ पशुमानवाचे बेट ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रा. लि., पुणे २००० कादंबरी अनुवादित -
४० गुप्त खजिन्याचे बेट अतुल बुक एजन्सी २००३ कादंबरी अनुवादित ज्यूल व्हर्न
३० खजिन्याचा शोध उत्कर्ष प्रकाशन, पुणे २००४ कादंबरी स्वतंत्र -
१३२ भाराभर गवत उत्कर्ष प्रकाशन, पुणे २००४ कथासंग्रह - -
१६६ सिंडरेलाची मुलगी मिंडरेला (सहा छानदार परिकथा) अनुबंध प्रकाशन, मुंबई २००४ कथासंग्रह स्वतंत्र -
८८ नंदू करतो मोत्याची शिकार! राजा प्रकाशन, मुंबई २००६ कादंबरी स्वतंत्र -
९० नंदूच्या थापांचे ... गरगर फिरे विमान! राजा प्रकाशन, मुंबई २००६ कादंबरी स्वतंत्र -
९१ नंदूने रचले मनोरथ राजा प्रकाशन, मुंबई २००६ कादंबरी स्वतंत्र -
१० आनंदी आनंद गडे राजा प्रकाशन, मुंबई २००८ क्रमित कादंबरी अनुवादित लॉरा इंगल्स वाईल्डर
१७ एक होते सरोवर राजा प्रकाशन, मुंबई २००८ क्रमित कादंबरी अनुवादित लॉरा इंगल्स वाईल्डर
१४१ मूर्तीच्या शोधात मोना राजा प्रकाशन, मुंबई २००८ कादंबरी स्वतंत्र -
१४२ मोठ्या रानातले छोटे घर राजा प्रकाशन, मुंबई २००८ क्रमित कादंबरी अनुवादित लॉरा इंगल्स वाईल्डर
२८ कैद्याचा खजिना पुरंदरे प्रकाशन, पुणे २००९ कादंबरी अनुवादित -
६४ टिंग टिंग टिंगा उत्कर्ष प्रकाशन, पुणे २००९ कादंबरी स्वतंत्र -
१५१ शाब्बास शरलॉक होम्स! (भाग पहिला) उत्कर्ष प्रकाशन, पुणे २००९ कथासंग्रह अनुवादित आर्थर कॉनन डॉयल
१५२ शाब्बास शरलॉक होम्स! (भाग दुसरा) उत्कर्ष प्रकाशन, पुणे २००९ कथासंग्रह अनुवादित आर्थर कॉनन डॉयल
१५३ शाब्बास शरलॉक होम्स! (भाग तिसरा) उत्कर्ष प्रकाशन, पुणे २००९ कथासंग्रह अनुवादित आर्थर कॉनन डॉयल
१५४ शाब्बास शरलॉक होम्स! (भाग चौथा) उत्कर्ष प्रकाशन, पुणे २००९ कथासंग्रह अनुवादित आर्थर कॉनन डॉयल
१५५ शाब्बास शरलॉक होम्स! (भाग पाचवा) उत्कर्ष प्रकाशन, पुणे २००९ कथासंग्रह अनुवादित आर्थर कॉनन डॉयल
टॉक्क
टॉक्क
मस्त लिहिलयस. उपदेशाचे डोस पाजत नाही वाला परिच्छेद मस्त जमलाय.
प्रतापगडावर फाफे, गुलमर्गचे गूढ ... भारतात गेल्यावर वाचली पाहिजेत परत.
गुलमर्गचे गूढ हे बहुतेक एकच
गुलमर्गचे गूढ हे बहुतेक एकच फाफे पुस्तक मी वाचले आहे कारण ते आमच्या आत्याच्या घरी होते. बाकी आमच्या लायब्रीत फाफे नसल्याने इतर पुस्तके कधी वाचली नाहीत. गुलमर्गचे गूढ मध्ये मोहर्रमच्या मिरवणुकीत स्वतःला जखमी करतात ते वाचलेले आठवते. आमच्या मिरजेत मोहरम म्हणजे टेम्पोतून रंगीत सरबत वाटत फिरणार्यांचा दिवस एव्हडेच माहिती होते. तेच फक्त लख्ख लक्षात आहे अजून.
आणि फाफे फुरसुंगीचा. हे फुरसुंगी गाव मिरज-पुणे रेल्वे लाइनवर येते. याशिवाय हे गाव अजून कुठल्या रस्त्यावर यायची शक्यता नाही त्यामुळे फुरसुंगी स्टेशनात फाफे दिसेल असे एक-दोनदा वाटले होते (आत्या पुण्यात त्यामुळे पुस्तक नुकतेच वाचून मिरजेला परतताना फुरसुंगी लागे वाटेत )
मस्त लिहलयं ! फाफेची पुस्तके
मस्त लिहलयं ! फाफेची पुस्तके फार आवडीची होती ! पुस्तकाचा संच घ्यायचा बर्याच दिवसांपासून प्रयत्न करत होते पण आउट ऑफ प्रिंट आहे. चित्रपटाच्या निमित्त्ताने नवीन प्रिंट काढली पाहिजे
ट्टॉक्क!!!
ट्टॉक्क!!!
मस्त लिहीलंय...
बन्या उपदेशाचे डोस पाजत नाही>>+१११
मस्त लिहिलंयस, आवडलं.
मस्त लिहिलंयस, आवडलं.
लहानपणीच्या स्मृतींना उजाळा मिळाला.
थोडीफार पुस्तकं वाचली आहे
थोडीफार पुस्तकं वाचली आहे फाफेची पण फार काही आठवत नाही त्यातलं. आता वाचायची म्हटली तरी ती मजा येईल की नाही कल्पना नाही.
@र।हुल
@र।हुल, अमितव
>ट्टॉक्क!!!
एकदम चपखल / मस्त प्रतिसाद.
@आशुचँप
मस्त आठवणी जाग्या केल्यात. ते मालीचं चित्रं कोण काढायचं माहिते आहे का? त्या चित्रावर माझा क्रश होता.
बन्याचे वाचून मीही माझ्या सायकलीला "भटक भवानी" म्हणायचो.
अजय, ती चित्रं राम वाईरकरांची
अजय, ती चित्रं राम वाईरकरांची होती.
मस्त लेख, आशुचँप
मस्त लेख.
मस्त लेख.
'फास्टर फेणेची काश्मिरी करामत' वाचल्यावर मला काश्मिरला जावंसं इतकं वाटायला लागलेलं, मी प्रत्येक सुट्टीत काश्मिरलाच जाऊया असा आग्रह करत असे. (जो कधीच पूर्ण झाला नाही)
फाफे खूप जबरदस्त आहे!
फाफे खूप जबरदस्त आहे!
बालपण (पुण्यात न गेल्याने) फाफे मधून पुण्याची ओळख करत गेलं.कधी अचाट अतर्क्य तर कधी नॉर्मल वागणारा फाफे.
मला त्याचा शरद शास्त्री ला आत्महत्येपासून सोडवलेला कथाभाग आवडतो.
फाफे हा कोणतेही उपदेशाचे डोस न पाजता लहान मुलांसाठी चांगला धडा होता.लाह्न मुलाच्या सहज प्रवृत्तीने आगावु पणे करणारा.पण त्याच बरोबर सामाजिक जाणीव असलेला.
फाफे ला मराठी साहित्यात तुलना नाही.
आय बी एम ऑफिस फुरसुंगीला आहे
आय बी एम ऑफिस फुरसुंगीला आहे ऐकल्यावर अचानक काही काळापूर्वी 'आय्बीएम म्हन्जे पिन्क स्लिप' 'आयबीएम म्हणजे धोक्याचे इजरेल ऑनसाईट' वगैरे कुप्रसिद्धि ऐकुनही 'अय्या फुरसुंगी?आयबीएम ला नोकरी बघावी का' असे विचार मनात येऊ लागले होते
मस्त लिहलं आहे,
मस्त लिहलं आहे,
फाफे वर्णन लेखात व प्रतिसादां मध्ये वाचुन पुस्तकं वाचायची इच्छा आहे,
कुठे मिळतील कोणी सांगेल का?
छानच लिहिलंय! फार उच्च
छानच लिहिलंय! फार उच्च दर्जाचे बालसाहित्य आहे फाफे म्हणजे! चालू घडामोडी, इतिहास, भूगोल ह्या साऱ्या गोष्टी रंजक पद्धतीने फाफे मुळे कळल्या. मुंबई - पुणे रेल्वेमार्गावर घडणारी एक गोष्ट आहे तिच्यात एक्स्प्रेस, मालगाडी, पॅसेंजर अशा सर्व गाड्या कशा कंट्रोल करतात याचं वर्णन आहे. एकदम भारी वाटलं होतं वाचताना ते!
भा. रा. भागवत__/\__
फाफे वर्णन लेखात व प्रतिसादां
फाफे वर्णन लेखात व प्रतिसादां मध्ये वाचुन पुस्तकं वाचायची इच्छा आहे,
कुठे मिळतील कोणी सांगेल का? >> bookganga.com वर चेक करा.. कदाचित सर्व नाही पण काही फाफे पुस्तकं मिळतील तिथे..
छान. पिक्चर मध्ये तेव्हाचा
छान. पिक्चर मध्ये तेव्हाचा असा काळ कसा दाखवतील ते बघायचयं.
मला फाफे आणि 'अमिताभचे साहस' नावाची एक सिरिज होती ती पण आवडायची. २/३ मित्र असतात आणि ते दरवेळी काहीतरी जबरदस्त रहस्य उलगडून दाखवायचे.
रहस्यकथा जुन्या काळातल्या बघायला/वाचायला जास्त मज्जा का येते कुणासठाऊक.
ऋतु_निक
ऋतु_निक
सर्व फाफे इ बुक्स आणि हार्ड बुक्स बुकगंगावर थोड्या कॉस्ट मध्ये उपलब्ध आहेत
http://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bha%20Ra%20Bh...
मी सर्व इबुक्स घेतलीत फाफे सिरिज ची
तुम्हाला रेकमेन्डेड लिस्ट देते
चक्रीवादळात फास्टर फेणे
चिंकू चिंपांझी आणि फास्टर फेणे
फास्टर फेणे टोला हाणतो
फास्टर फेणेच्या गळ्यात माळ
जवानमर्द फास्टर फेणे
प्रतापगडावर फास्टर फेणे
टिक टाॅक फास्टर फेणे
ट्रिंग ट्रिंग फास्टर फेणे
काश्मिर गुलमर्ग वगैरे पण इन्टरेस्टिन्ग आहेत.
बाकि जंगलपटात फाफे मला अजिबात आवडलेले नाहीय.फाफे जरा शायनर बनलाय.
मस्त आहे लेख . फाफे आणि
मस्त आहे लेख . फाफे आणि फुरसुंगी हे इतकं घट्ट बसलेलं डोक्यात कि लहानपणी फुरसंगीत राहण्याऱ्या नातेवाईकांना फाफेच कुठे घर आहे हे विचारल्याचं आठवत
फाफेची पुस्तक रिप्रिन्ट झाली तर खरच बरं होईल
बुकगंगा वर हार्ड कॉपीज पण
बुकगंगा वर हार्ड कॉपीज पण आहेत.
१६०० ला संच आहे
फाफे म्हटलं की माझ्या चेहर्यावर एक सिली स्माईल आपोआप येतं.
फुरसुंगी चा फाफे, बिबवेवाडिला मामाचं घर असलेले शरद शास्त्रीबुवा, बाबा मोठे उद्योगपती असलेला सुभाष देसाई, सायकलिंवरुन बंड गार्डन ला जाणारे मित्र, 'आख्खा लक्ष्मी रोड लुटणार्या काकू' म्हणजे सुभाष ची आई.
फाफे च्या आईचा उल्लेख जास्त येत नाही.भाई म्हणजे बाबांचाच येतो.फुरसुंगीचे तसे आर्थिकदृष्ट्या बरे शेतकरी.
फाफे ची लांबची आत्या असलेला आक्का जाधव.
फाफे ची खटपटी बहीण माली.
फाफे मधून मला समर व्हेकेशन्स चं बालपण आठवतं.
३२४, चॅलेंज, बदाम सात, झब्बू, कॅरम, सायकल च्या रपेटी.
एखादा समर फाफे माली सुभाष बरोबर घालवायला आवडला असता.
मस्त लेख, आशुचँप. फाफे
मस्त लेख, आशुचँप. फाफे पुस्तकं आधाश्यासारखी वाचलेली आहेत.. आणी गोष्टींची अक्षरशः पारायणं केली आहेत.. ब-याच् गोष्टी, संवाद आजही लक्षात आहेत.. आणी त्यांची ऊजळणी झाली की आजही लहान होऊन त्या काळात गेल्यासारखं वाटतं.
फाफे नी काय नाही केलं.. सायकल रेस जिंकला, चोरांना पकडून दिलं, पुण्याच्या पुरात पोहला, फसव्या डिटेक्टिव्हं टोळीला पकडून दिलं, चक्कं नेफा आघाडीवर देखील गेला आणी चिनी हेरांना पकडून दिलं, विमानचोरांविरुद्ध देखील लढला.. खरच त्या वयात जी साहसं करायची खुमखुमी असते त्याची हौस फाफे मुळे भागली..
hats off to भा.रा. भागवत
चॅम्प मस्त लेख.
चॅम्प मस्त लेख.
फाफे एका नातेवाईकांच्या घरी शोधून मिळालेल्या फाटक्या पुस्तकात सापडला होता पण नंतर एकही पुस्तक मिळाले नाही..
मॅगे एकच नाव!!! बुकगंगा.
मॅगे
एकच नाव!!! बुकगंगा.
सही! बुकगंगावर आहे? बघते लगेच
सही! बुकगंगावर आहे? बघते लगेच. थँक्स अनु
आशु, क्या याद दिलायी... वो
आशु, क्या याद दिलायी... वो दिनोंकी!!! magical days of life!! माझं बालपण भारांनी भारावलेलं होतं... फाफे ची पारायणं... वाचनालयातून आणून, नंतर घरी विकत घेऊन...
भारांची बाकीची पण सर्व पुस्तकं अफाट!! भुताळी जहाज आणि ब्रम्हदेशातील खजिना तर फारच आवडीची! बाकी त्यांचे अनुवाद - wizard of the oz, Jule Verne चे अनुवाद - सर्वच बेफाट!!
तू भारांना त्यांच्या घरी जाऊन भेटलायस याबद्दल तुझा हेवा वाटतोय. एकदा कुठल्याश्या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून आल्याचे आठवतायत मला. मी त्यांची सही पण घेतलेली वाटतं... ते गेले कळलेलं तेव्हा फार वाईच वाटलेलं.
मी पण फाफे फॅन.
मी पण फाफे फॅन.
पण दुर्दैवाने मुलीला ती पुस्तकं इतकी अपील नाही होत आहेत. thea stilton, Gerenimo Stilton च्या जमान्यात ह्या पुस्तकांशी ती रिलेटच नाही करू शकते ही खंत आहे त्यातल्या त्यात गोट्या मालिका तिला दाखवली ती आवडली. फाफे चित्रपटामुळे मुलांमधे आवड निर्माण झाली तर उत्तम.
चॅम्पा मी पण वाचली आहेत ही
चॅम्पा मी पण वाचली आहेत ही पुस्तकं पण काडीमात्र काही आठवत नाही
पुन्हा वाचलं पाहिजे सगळं.
फाफे प्रचंड म्हणजे प्रचंड
फाफे प्रचंड म्हणजे प्रचंड आवडायचा. शाळेत "वाक्यात प्रयोग करा" प्रश्नाच्या प्रत्येक वाक्यात फाफे असायचा.
आमच्या इमारतीमध्ये कोणाच्यातरी घरी भा.रा.भागवत येणार होते. त्यांना बघायला मी एका गाडीच्या मागे लपून बसले होते. भेटायची आणि बोलायची काही हिंमत नव्हती. पण त्यांना बघून फारच अपेक्षाभंग झाला होता असे आठवते. ते आजोबा आहेत हे माहीती असूनही कदाचित चौकडीचा शर्ट घतलेल्या एक तुडतुडीत मुलाची अपेक्षा बहुतेक मी करत होते. कमीत कमी चौकडीचा शर्ट तरी घालायला पाहीजे होता त्यांनी.
चौकडीचा शर्ट......यस!!
चौकडीचा शर्ट......यस!!
त्यातही लाल आणि बीज चौकडीचा असला तर क्लासिक फाफे.
लहान वाला सुमित राघवन आणि फक्त सुमित राघवन.
(किंवा अगदीच कोम्प्रो मारायचा तर जस्ट मोहब्बत सिरियल आणि टारझन वंड्र कार मधला हिरो त्याच्या टीनेज मधला.)
स्टार हंट वर पैसे घालण्याऐवजी टाइम मशिन वर घाला.
मस्त लेख. मी वाचली आहेत काही
मस्त लेख. मी वाचली आहेत काही पुस्तके आणि तेव्हा खूप आवडली होती. परत वाचायला हवीत. चित्रपट कसा असेल काय माहित!!
फाफे आवडीचा व लेखही आवडला.
फाफे आवडीचा व लेखही आवडला.
मी भा. रा. भागवत यांच्या
मी भा. रा. भागवत यांच्या हस्ते एक बक्षीस स्विकारले आहे शाळेत असताना! बक्षीसापेक्षा त्यांना भेटायला मिळाले याचा आनंद मोठा होता
राय, अगदी! "भारा" वलेले बालपण होते आपले. अनुवाद किती सहज आणि सुंदर असू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे भा. रा. भागवत यांनी अनुवादित केलेली पुस्तके!
आदिती,
Pages