बॉलीवूड, हिरोईन्स आणि त्यांचे चित्रपटातील स्थान !

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 September, 2017 - 17:20

चित्रपट हे समाजाचा चेहरा असतात. आज समाजात स्त्रियांचे काय स्थान आहे याचाही ते आरसा असतात. समाज बदलत चालला आहे, तर त्यानुसार आरसाही बदलने गरजेचे होते. पण तरीही तो चकचकीत होण्यापलीकडे काही होत नव्हते. आणि आज कोणीतरी तो फोडायला एक दगड मारला आहे.

कंगना राणावत नाम तो सुना ही होगा !

तिचा हा लेटेस्ट विडिओ पहा ... नुसते बघू नका, सोबत शब्द न शब्द ऐका.. ईंटरेस्टींग आहे !

AIB feat. Kangana Ranaut - The Bollywood Diva Song
https://www.youtube.com/watch?v=a9ggjCbv5ck

हा विडिओ तिच्या जुन्यापुराण्या धाग्यातही टाकता आला असता. पण तो धागा सध्या तिच्या वैयक्तिक वादांवर रंगला आहे, आणि मला या विषयावर स्वतंत्र चर्चा अपेक्षित आहे.

पुरुषांच्या या बॉलीवूडी जगात एखाद्या अभिनेत्रीला केवळ ऑब्जेक्ट बनून न राहता आपले स्वतंत्र नाणे खणखणीत वाजवायचे असेल तर निव्वळ कलागुण अंगात असणे पुरेसे नाही, तर त्यासोबत बंडखोरीही तितकीच गरजेची आहे. प्रियांका चोप्राच्या अंगात अफाट टॅलेंट असूनही तिला कित्येकदा नाईलाजाने का होईना शोभेची बाहुली आणि जंगली बिल्ली बनावे लागले. कंगनाने मात्र आता हे शक्यच नाही म्हणत एक खणखणीत संदेश दिलाय. चित्र कधी बदलेल कल्पना नाही, पण ज्यांची ईच्छा आहे त्यांना तिने एक मार्ग दाखवलाय. तुर्तास तिला स्वत:ला त्यावर चालण्यासाठी ऑल द बेस्ट !

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिकडे कभी हां कभी ना धाग्यावर आधी लोकांना ऊत्तरं द्या मग हा नवीन धाग्याचा साळसूदपणा करा ऋन्मेष साहेब.
लोकांचे प्रेम हवे असेल तर जबाबदारीही घ्यायला शिका.

या धाग्याचा विषय तरी आपण 'ही हू मस्ट नॉट बी नेमड' कडे जाणार नाही याची सर्वांनी क्रूपया काळजी घ्यावी ही विनंती... Wink

{{{ पुरुषांच्या या बॉलीवूडी जगात एखाद्या अभिनेत्रीला केवळ ऑब्जेक्ट बनून न राहता आपले स्वतंत्र नाणे खणखणीत वाजवायचे असेल तर निव्वळ कलागुण अंगात असणे पुरेसे नाही, तर त्यासोबत बंडखोरीही तितकीच गरजेची आहे. प्रियांका चोप्राच्या अंगात अफाट टॅलेंट असूनही तिला कित्येकदा नाईलाजाने का होईना शोभेची बाहुली आणि जंगली बिल्ली बनावे लागले. }}}

प्रियांकाला करावे लागले म्हणून प्रत्येकीलाच असेच करावेच लागेलच असेच नाहीच. उदाहरणार्थ - विद्या बालन, कंकणा सेन शर्मा यांनी नेहमीच चित्रपटात समर्थ स्थान असलेल्या भुमिका केल्यात आणि त्याकरिता त्यांना कंगणाप्रमाणे कुणावर चिखलफेकही करावी लागली नव्हती.

मला वाटते हा चॉईस आहे पण तो चॉईस येण्यासाठी आधी काही काळ टुकार भूमिका कराव्याच लागतात..
पैसे कमावणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे, कोणतीही नवीन ऍक्टरेस( वा ऍक्टर) करियर च्या सुरुवातीलाच असले सशक्त रोल्स मिळवू शकत नाही..

च्रप्स तुम्ही म्हणत आहात ते पुरुष कलाकारांनाही लागू आहेच. पण एकदा आपले नाणे खणखणीत वाजवूना दाखवल्यावरही बरेच जणींनी दुय्यम बनून राहणे आनंदाने पसंद केले आहे... अगदी त्यात आपली माधुरी दिक्षित सुद्धा आली. आणि जुही चावला, श्रीदेवी या सुपर्रस्टार म्हणून गणल्या गेलेल्या अभिनेत्रीही आल्या.

वर कोंकणा सेन शर्मा आणि विद्या बालन यांचाही उल्लेख आलाय. त्यात कोंकणा सेन शर्मा मला कधीही हिरोईन मटेरीअल वाटली नाही. विद्या बालन येस्स, पण तिने प्रस्थापितांना धडक न देता आपली वेगळी चूल थाटली.

बरेचदा मला वाटते जुन्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईटच्या जमान्यात नर्गिस आणि वहिदा सारख्या हिरोईनी निव्वळ शोभेच्या बाहुल्या वाटायच्या नाहीत जितके आज बहुतांश चित्रपटात वाटतात.

हिरोईन आपल्या नावावर पिक्चर चालवू शकते आणि पब्लिकला थिएटरात खेचू शकते अशी हि पाहिलीच वाटतेय.

हिरोईन आपल्या नावावर पिक्चर चालवू शकते आणि पब्लिकला थिएटरात खेचू शकते अशी हि पाहिलीच वाटतेय.>>>>>> विद्या बालन पण होती तशी. कहानी, थोडाफार डर्टी पिक्चर.
मला कंगना आवडत नाही. तिच्यासाठी पिच्चर बघावा असं तर कधीच वाटणार नाही. कंगनासाठी लोक एखादा पिच्चर बघायला जातात हे माझ्यासाठी आश्चर्यकाराक आहे. तिच्या नावावर पिच्चर चालतात आणि ती पब्लिक्ला थेटरात खेचु शकते ही तर अतिशयोक्ती वाटते. असो.

सस्मित, डर्टी पिक्चर हा विद्या बालनच्या नावावर नाही कोणी बघायला गेले तर तो डर्टी पिक्चर होता म्हणून बघायला गेले.

कंगणा आपल्याला आवडत नाही म्हणून समजणे कठीण अन्यथा तिचा असा फॅन क्लब तयार होतोय की तिच्यासाठी बघायला जावे.

तिला सूट होणारया हटेल्या भुमिका असलेले चित्रपट खास तिच्यासाठी येत्या दोनचार वर्षात बनतील बघा. जे या आधी कोणत्या हिरोईनबाबत झाले नव्हते.

तिला सूट होणारया हटेल्या भुमिका>>>>>>>
मला तर फक्त एक ती हरयाणवी स्पोर्ट्सवूमन होती तवेम२ मधे ती जर्राशी हटके वाटलेली.
नैतर जी मेन लीड कंगना होती ती अक्षरशः भैताड वाटलेली. प्लीज नोट भैताड कॅरेक्टर.
क्वीन पण काही खास अपील झाला नाही. अगदी जबरदस्त अ‍ॅक्टींग केलीये असं जराही वाटलं नाही.
हा सुरुवातीच्या गॅंगस्टर मधे वेगळी वाटलेली कंगना. थोडीफार आवडली ही होती.
नैतर रंगून, दाकुरानीचा कुठलातरी असे पिच्चर बघणं दुरच. ती पिच्चरच्या ट्रेलर मधुनच पुरते मला. Happy

डर्टी पिक्चर हा विद्या बालनच्या नावावर नाही कोणी बघायला गेले तर तो डर्टी पिक्चर होता म्हणून बघायला गेले.>>>>> हो. असेल. पण विद्याने तिचं काम नेहमीप्रमाणे चोख केलेलं.

कंगणा आपल्याला आवडत नाही म्हणून समजणे कठीण अन्यथा तिचा असा फॅन क्लब तयार होतोय की तिच्यासाठी बघायला जावे.>> असेल ब्वा. Uhoh कारण माझ्या आजुबाजुला, फॅमिली/फ्रेंड सर्कलमधे, कंगना मला भारी आवडते, काय जबरदस्त अ‍ॅक्टींग करते, कंगनाचा अमुक पिच्चर येतोय मी बघणारच, मी कंगनाचा / ची फॅन आहे असं बोलणारं कुणी नाहीये अजुनतरी म्हणुन मी खरंच समजु शकत नाहीये. Happy

तिला सूट होणारया हटेल्या भुमिका असलेले चित्रपट खास तिच्यासाठी येत्या दोनचार वर्षात बनतील बघा. जे या आधी कोणत्या हिरोईनबाबत झाले नव्हते.>>>> बनुदेत की. मी बघायला जाण्याची शक्यता फारच कमी. ना के बराबर.

एका एका ओळीला चार चार ओळींचे उत्तर Happy

सस्मित, काम चोख आहे की आणखी काही याचा ईथे प्रश्न नाही. तसेच कंगणा अभिनेत्री म्हणून माझ्याही आवडीची नाही.
पण एक ते जे असते ना आपल्या नावावर पब्लिक खेचणे, या गोष्टीचा मी फॅन आहे. हिरोईनींमध्ये अभावानेच आढळते, पण तिच्यात ते आहे आणि ईथून वाढत जाईल.
बाकी ते जे काही असते ते सलमान मध्येही आहे, पण तो देखील मला फारसा आवडत नाहीच.

एका एका ओळीला चार चार ओळींचे उत्तर >> अरे आम्ही पण लिहावं की नाही कधी Happy
आपल्या नावावर पब्लिक खेचणे> मला हेच पटलं नाहीये अजुन Happy
आता बास करते. Happy

वर