Submitted by शिवाजी उमाजी on 7 September, 2017 - 07:14
कॉकटेल
झुडपात कधी बनात ती प्रसवते पहा ना
फुटतो आहे काट्यांचा बाभळीस पान्हा
धाडले होते पूतनेस कंसाने घात करण्या
स्तनपान करोन गोकुळात वाढला कान्हा
चमत्कार आहे पहा निसर्गाचा येथे कसा
शकून देताना येतो म्हणे काक पाव्हणा
ग्रह दहावा जरी म्हटले कोणी जावयासी
लग्नानंतर खरा भाव खातो मात्र मेव्हणा
मटण रश्या सोबत भाकरी चाले घाटावरी
साथ देई कोकणात छान मऊसुत घावणा
© शिवाजी सांगळे
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29470/new/#new
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मला गझल आवडली शिवाजी..
मला गझल आवडली शिवाजी..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आशय छान आहे.
सगळेच शेर आवडले.
फक्त पहिल्या शेरात >> भाभळीस >> च्या ऐवजी बाभळीस हवे आहे का?
गझलेचे काही विशेष नियम असतील आणि त्यात काही असे बदल अपेक्षित असतील तर नाही माहिती.
त्या केस मध्ये तुम्ही लिहिलेलं बरोबर असेल मग.
धन्यवाद दक्षिणाजी,
धन्यवाद दक्षिणाजी,
आपण सुचविलेली दुरूस्ती रास्त आहे.
अपेक्षित दुरूस्ती केली आहे.
अपेक्षित दुरूस्ती केली आहे.