कमी उंचीमुळे वेरियातल्या पोरी अजूनही बाळा म्हणतात
तोंड वर करून बोलतो म्हणून सर वर्गातून बाहेर काढतात
तुमची उंची हाच तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही योग्य जाहिरात वाचताय
झटपट उंची वाढवण्यासाठी घेऊन आलोय "बट्ट्याबोळ पावडर"
पुडीपुडी न खा आणि पटीपटीनं वाढा
आमच्या ग्राहकांसाठी खास आटपाटनागरातून मृगजळ ह्या वनस्पतीपासून बनवलेली पावडर
रोज एक पुडी दुधात टाकून खा आणि वाढा
न्हवती अपेक्षीत त्याची उंची
म्हणूनच स्वप्नीलला सोडून गेली सुंगची
तुमचीही हीच गत होऊ नये यासाठी खास आमच्या तज्ञांनी अथक पफिश्रमातून ही पुडी बनवली आहे
कसला करताय विचार
उंची हमखास वाढणार
लगेच ऑर्डर देणाऱ्या आमच्या भाग्यवान ग्राहकांना मिळणार बिनमापाचा टेप अगदी मोफत संपूर्ण किट ची मूळ किंमत
₹९९ पण मायबोली गणेशोत्सवानिमित्त ₹ ढंन्ट्यानव फक्त
वापरा पावडर बट्ट्याबोळ
नाही होणार कोणताच घोळ
मायबोलीच्या मतदान काउंटरवर मिळणार आणखी भरगोस डिस्काउंट
आमचा पत्ता :- आधी पैसे पाठवा बांगला, मग शोधत बसा गल्ली, नाही सापडल्यावर बोंबलत बसा कॉलनी
इमेल आयडी :- फसलात@तावरडतबसा.कॉम
हा हा.. गणेशोत्सवात लय
हा हा.. गणेशोत्सवात लय फसवणूक चाललीय.. मस्त आहे ऍड !
भारीये!
भारीये!
भारी जाहिरात आहे ही!
भारी जाहिरात आहे ही!
बोल्ड केलेल्या वाक्यातला पंच भारी आहे.
मस्त .
मस्त .
(No subject)
भारी झालीय ऍड
भारी झालीय ऍड
बोल्ड केलेल्या वाक्यातला पंच भारी आहे.>>+११
भारी
भारी
मस्त झाली आहे
मस्त झाली आहे
लै भारी पंचेस पण जमलेत
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना