Submitted by संयोजक on 30 August, 2017 - 01:57
कविकल्पना - ४ - तुझे ते खळखळून हसणे
तर यंदाच्या गणेशोत्सवात बुद्धीच्या देवाला नमन करून मनातल्या ह्या कविला बाहेर पडू द्या.
संकल्पना अतिशय सोपी आहे. हा खेळ आहे, स्पर्धा नाही. बंधने काहीच नाहीत.
आम्ही आपल्याला कवितांसाठी काही शीर्षके देत आहोत. तुम्ही त्यावर आधारित कविता करायच्या आहेत. कवितेला फॉर्मचे बंधन नाही - मुक्त छंदापासून गझलेपर्यंत काहीही चालेल. एका आयडीने एका किंवा अनेक शीर्षकांवर किती कविता करायच्या ह्याला कसलेही बंधन नाही. शीर्षक कवितेमधे आलेच पाहिजे असा आग्रह नाही. शीर्षक रुढार्थानेच वापरायला हवे असे बंधन नाही.
थोडक्यात काय तर 'होऊ दे खर्च'
चौथे शीर्षक :
"तुझे ते खळखळून हसणे"
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Submitted by कारवी on 31
Submitted by कारवी on 31 August, 2017 - 14:26
हे एकच नंबर...
हिरवेशार डोळे नि चमकते सुळे
भीतीने गारठून पाय पडले लुळे
शक्यच नाही मी जन्मात विसरणे
तेव्हाचे, तुझे ते खळखळून हसणे
Submitted by कारवी on 31
Submitted by कारवी on 31 August, 2017 - 14:26>>>

राहुल मस्त रे
रामकृष्ण हरी - २
रामकृष्ण हरी - २
नेता नाही, नेतृत्व नाही, नाही कोणी सरदार
स्वतःच्या कष्टावर निसर्गाच्या अवक्रूपेवर शेतकरी आहे निराधार
तरीही तो हसत होता ढगा सोबत भांडत होता
त्याला बोलत होता तूच हारणार नि मी जितणार
होता तो जिद्दी फार
नाही मानली त्याने कधीच हार
मागणी नाही त्याची काही फार
योग्य भाव आणि रोख रक्कम
ओठी हसू फुलवायला एवढे पुरेसे आहे
आश्वासनाच्या यादीत हे टाकायचं राहून गेलं
त्याचं ते खळखळू हसणे तेव्हाच कुठेतरी हरवलं
नाही केली त्याने कधी कुठे तक्रार
नाही दिला कधी नशिबाला दोष
काबाड कष्टकरी
असा बाप आमचा शेतकरी
नुसताच म्हणे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ...
सगळ्या कविता मस्त.
सगळ्या कविता मस्त.
अक्षय, +१११
अक्षय, +१११
दिवसाचे दूत तुझ्यापर्यंत कधी
दिवसाचे दूत तुझ्यापर्यंत कधी पोहोचलेलेच नाहीत
रातीच्या राक्षसांचीच नजर तुझ्यावर पडत राहते
तरीही पांढर्याशुभ्र दातांनी अन् गालावरच्या खळीनं येणारं
तुझं हे खळाळतं हसणं.
तुझ्या आईवरून फिरणार्या वखवखलेल्या नजरा
तुझ्यावरूनही फिरत राहतात प्रत्येक क्षण अन् चोवीस तास
तरीही गोंडस मनानं आणि निरागस चेहर्यानं
तुझं हे खळाळतं हसणं.
अपशब्दांची बरसात असलेलं तुझं बालपण 'त्या' गल्लीत
लोकांनी नाकं मुरडून औदासिन्याच्या दगडांनी चेचून काढलेलं
आणि तरीही त्यांची कुणाचीच पत्रास नसलेलं
तुझं हे खळाळतं हसणं.
मी तुझ्यासाठी कधी काय करू शकेन खरंच माहीत नाही
पण गणेशाकडे एकच मागणी करू शकतो भरल्या कंठाने
की देवा, वाचव, फुलव, जगव, तगव
तिचं हे खळाळतं हसणं.
सुरेख! या ओळीचे वेगळेच
सुरेख! या ओळीचे वेगळेच इन्टरप्रिटेशन!
मस्त, भाचा!
मस्त, भाचा!
मस्त एकदम भाचा !
मस्त एकदम भाचा !
भाचा, एकदम टचिंग.
भाचा, एकदम टचिंग.
बाकी सर्व कविता पण सुंदर.
भाचा, एकदम टचिंग >>>>>
भाचा, एकदम टचिंग >>>>> +९९९९९९९९९९९९९९९९९
भाचा , एकदम टचिंग.
भाचा , एकदम टचिंग.
कारवी भारी!!
कारवी भारी!!
भाचा जबरदस्त!! एक नंबर. शब्द कमी पडतील.
भास्कराचार्य् मस्त्
भास्कराचार्य् मस्त् ह्रदयस्पर्शी
भाचा मस्तच
भाचा मस्तच
Pages