कविकल्पना - १ - पैलतीर

Submitted by संयोजक on 24 August, 2017 - 01:28

कविकल्पना - १

कधी तरी श्रावणातल्या अवचित संध्याकाळी एखाद्या चुकार क्षणी पावसाची सर भिजवून जाते अन नकळत आपण
'श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षणात फिरुनि ऊन पडे' गुणगुणून जातो. ही त्या कविचीच किमया.
'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते' ह्यावर आपल्या विटा चढवल्या नसतील असा मराठी माणूस विरळाच असेल. चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळ्यांपासून स्फूर्ती घेऊन अगदी चारोळी नाही तर तिरोळी नाही तर 'बे'दाणा बनवायचा तरी प्रत्येकाने कधी ना कधी प्रयत्न केलला असतो.
तर यंदाच्या गणेशोत्सवात बुद्धीच्या देवाला नमन करून मनातल्या ह्या कविला बाहेर पडू द्या.

संकल्पना अतिशय सोपी आहे. हा खेळ आहे, स्पर्धा नाही. बंधने काहीच नाहीत. आम्ही आपल्याला कवितांसाठी काही शीर्षके देत आहोत. तुम्ही त्यावर आधारित कविता करायच्या आहेत. कवितेला फॉर्मचे बंधन नाही - मुक्त छंदापासून गझलेपर्यंत काहीही चालेल. एका आयडीने एका किंवा अनेक शीर्षकांवर किती कविता करायच्या ह्याला कसलेही बंधन नाही. शीर्षक कवितेमधे आलेच पाहिजे असा आग्रह नाही. शीर्षक रुढार्थानेच वापरायला हवे असे बंधन नाही.
थोडक्यात काय तर 'होऊ दे खर्च'

पहिले शीर्षक : पैलतीर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जगण्याच्या प्रवाहात मी
सोडूनी दिले काही किनारे
शोधण्याच्या नादात 'आपले'
विसरूनी गेलो यातना देणारे
―₹!

तुझ्या खळाळ हास्याच्या लाटेवर
फक्त गटांगळत राहीलो मी
मारलीच नाही एकही बुडी खोलवर
अन शोधलाच नाही कधी तळ
ना माझा राहीलो ना तुझा झालो
ना गवसलो ना हरवलो
शीड तुटलेल्या होडी सारखा
ना इस पार ना उस पार!

वर्गात आम्ही बसत होतो शेजारी
मी ऐलतीरावर, ती पैलतिरावरी
खेळ नजरांचा मनमुराद खेळलो
शेवटल्या दिवशी मनोमन रडलो
―₹!

बाप्पा...

तू ऐलतीर माझे,तू पैलतीर माझे...
मध्यात वाहताहे,मन बेफिकीर माझे!
—सत्यजित

बेमालूम मिसळून गेलय आता
अल्याडच्या पुण्यात पल्याडच पुणं
कुणीच नाही उरल वाढीव
अन कुणीच नाही राहील उणं
धोतरं गेली पगड्या गेल्या
वाडे झाले भुईसपाट
इतिहासाच्या विटा विकून
नावे केले काही फ्लॅट
जुनीपानी खोडं आता फ्रेमबंद झाली
शिकून सवरून नवी पिढी दूरदेशी गेली
राहता राहीली मधली पिढी इ-सोशल झाली
बघता बघता पेठ सारी आता ग्लोबल झाली

आणखी जायचे किती खोलवर सांग
लागतो कधी का कुठे मनाचा थांग
राहिला दूरवर ऐल दोन देहांचा
भोवरा भोवतो तरी कसा मोहांचा?>> अहा! काय सुंदर सुरवात केलीय स्वाती उपक्रमाची! अप्रतिम.

या तीराहुन त्या तीरीचे दिसती रम्य नजारे
तिथे पोहोचता जाणीव होते केवळ भ्रम हे सारे
सोडुनि आलो जिथल्या वाटा, जिथले रम्य किनारे
तिथेही होती अशीच हिरवळ अन असेच हळवे वारे >> वा वा! स्वरूप मस्त.
बाकीही कविता छान आहेत पण या विशेष आवडल्या.

संयोजक, खेळ शब्दांचा वर सुचवलंय तेच इथे ही सांगते २ नम्बर धागा / कल्पना सुरु केल्यावर १ नम्बर धागा बंद करता येइल का?

पैलतीर
बारच्या एका टेबलावर मी मित्रासोबत ,
आणि माझा बॉस त्याच्या बॉससोबत ........

तिकडच्या टेबलावर " प्लीज अ‍ॅप्रुवल द्या सर "
इकडे "भेंडी तू आधी तूझा फोन बंद कर"

तिकडे होता शिष्टाचार , इकडे मनसोक्त बाजार
मद्याच्या नशेत इकडे मनामनांचा शृंगार

तो तिकडच्या तिरावर हातभर अंतरावर
मी त्याच्याकडे बघूनसुद्धा दूर्लक्ष करत माझ्या तंत्रावर

त्याचा बॉस निघून जातो त्याला एकट सोडून
मी मात्र ताठ बसतो माझे मित्र जोडून

फार एकटा झाला होता मोठा मोठा होताना
कुठली नाती कुठले मित्र सारा तोटा होताना

झेपायच नाय कदाचित असं पैलतीर काळं
चार सोबती घेवूनच भक्कम आपलं जाळं

ऐलतीरावर, पैलतीरावर
वाडया वस्त्यांचा वावर
मधून वाहे सरिता खळखळ
खरेच निर्मोही तीचे जळ

Pages