कविकल्पना - १ - पैलतीर

Submitted by संयोजक on 24 August, 2017 - 01:28

कविकल्पना - १

कधी तरी श्रावणातल्या अवचित संध्याकाळी एखाद्या चुकार क्षणी पावसाची सर भिजवून जाते अन नकळत आपण
'श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षणात फिरुनि ऊन पडे' गुणगुणून जातो. ही त्या कविचीच किमया.
'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते' ह्यावर आपल्या विटा चढवल्या नसतील असा मराठी माणूस विरळाच असेल. चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळ्यांपासून स्फूर्ती घेऊन अगदी चारोळी नाही तर तिरोळी नाही तर 'बे'दाणा बनवायचा तरी प्रत्येकाने कधी ना कधी प्रयत्न केलला असतो.
तर यंदाच्या गणेशोत्सवात बुद्धीच्या देवाला नमन करून मनातल्या ह्या कविला बाहेर पडू द्या.

संकल्पना अतिशय सोपी आहे. हा खेळ आहे, स्पर्धा नाही. बंधने काहीच नाहीत. आम्ही आपल्याला कवितांसाठी काही शीर्षके देत आहोत. तुम्ही त्यावर आधारित कविता करायच्या आहेत. कवितेला फॉर्मचे बंधन नाही - मुक्त छंदापासून गझलेपर्यंत काहीही चालेल. एका आयडीने एका किंवा अनेक शीर्षकांवर किती कविता करायच्या ह्याला कसलेही बंधन नाही. शीर्षक कवितेमधे आलेच पाहिजे असा आग्रह नाही. शीर्षक रुढार्थानेच वापरायला हवे असे बंधन नाही.
थोडक्यात काय तर 'होऊ दे खर्च'

पहिले शीर्षक : पैलतीर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणखी जायचे किती खोलवर सांग
लागतो कधी का कुठे मनाचा थांग
राहिला दूरवर ऐल दोन देहांचा
भोवरा भोवतो तरी कसा मोहांचा?

ऐल म्हणजे इथे
पैल म्हणजे तिथे
मार्गक्रम आयुष्याचा
सांधला दोन शब्दांमधे

>>>पाहुनि खवळलेल्या डुक्कराला
बाहुबली म्हणाला देवसेनेला,
सखे जरा धर धीर
मी मारणार पैला तीर ..<<<
Lol Lol

पैलतीरी तीची सोबत व्हावी
जरी आज मला ती न भेटली

ऐलतीरावर रांगा लावी
एका शिक्क्यासाठी
पैलतीरीचे वैभव सारे
मृगजळ डोळा दाटी

जन्मलो, रांगलो, डुंबलो तिथें म्हणून
ऐलतीरच माझा, हा तर एक बहाणा
क्षितीजाच्या माझ्या आड येतो म्हणून
पैलतीरच तर माझा पहिला निशाणा

ऐलतीरावर उभे सोयरे
द्याया शुभकामना
प्रवास पुढचा सुखकर व्हावा
हीच सदिच्छा मना!

मी एकटी ....

एल तीरावर मी एकटी
पैलतीर त्याला नाही
समोर पसरला अथांग दर्या
साजणाचा पत्ता नाही

परतुनी आले सारे
अजून तो आला नाही
रात्रीचा चंद्र देतसे
तो येईल याची ग्वाही

रंग हळदीचा अन मेंदीचा
अजून उतरला नाही
स्वप्नांचे जहाज बुडाले
साजणाचे तारू वाचले का नाही ?

बघत बसते खुणा वाळूतल्या
निरखीत असते लाटांनाही
नकोत रत्ने मज सागरा
का साजण माझा परत देत नाही ?

राजेंद्र देवी

पैलतीर

जिवनाच्या पैलतीरी मी आज
एकटाच ऊभा आहे ॥धृ॥
घडल्या घटनांकडे मी आता
तटस्थ पाहतो आहे ॥१॥

काळजीचा भार का अजूनी
खोलवर वाहतो आहे ?
भोगिली सगळी माया तरी
मोहात अजूनही आहे ? ॥२॥

निसटलेले धागे मी आज
का जुळवतो आहे ?
नसूनही हातांत काही का
मनांत जोडतो आहे ? ॥३॥

अंधूक क्षितिजा पल्याड काही
शाश्वत दिसते आहे
शोध घेण्यास गुढ अज्ञेयाचा
अंतरी आसुसलो आहे ॥४॥

जिवनाखेरी मी प्रांजळ काही
कबुली देतो आहे
शेवटल्या श्वासाला अस्फुट हसू
समाधान मागतो आहे ॥५॥

―₹!हुल / २५.८.१७

प्रवाहच बदलत गेले सारे
कुठले तीर अन कुठले तट?
आता वाहणे वाऱ्याबरोबर
अन पोहत राहणे विनाअट!

पोहणार दिशाहीन असे कुठवर
असेल मनी अपेक्षित किनारा
ओलांडूनी हा प्रवाह सारा
असेल पल्याड एकची निवारा
पैलथडी त्या घेता विसावा
चैतन्याचा सहवास लाभावा
―₹!हुल/२५.८.१७

पैलतीरी त्या उजाडताच सुरु होतो माझा दिवस
व्हीसी, वेबेक्स सुरु होती आणि इमेलींचा पडतो खच
निवडून चिवडून उत्तरे देता सरुन जाते मध्यानरात
डोळा भरुन झोप घेउन पहाटेपहाटे येतो घरात

कुणीतरी असावं
फ़ुलांसारख फ़ुलणारं
फ़ुलता फ़ुलता सुगंध दरवळणारं
अंधारात सोबत देणारं
आपल्या मनात रमणारं
पैलतीरी साद घालणारं
कुणीतरी असावं...

या तीराहुन त्या तीरीचे दिसती रम्य नजारे
तिथे पोहोचता जाणीव होते केवळ भ्रम हे सारे
सोडुनि आलो जिथल्या वाटा, जिथले रम्य किनारे
तिथेही होती अशीच हिरवळ अन असेच हळवे वारे

मी मारली उडी
नदीत
विहीरीत
पाण्यात
प्रेमात
आर्ची कडे बघत
पैलतीरी

दुर कुठे नदीकिनारी
मन माझे घेई भरारी
वाळूवरती पैल-तीरी
बागडे धुंद प्रेमलहरी

मनमौजी उनाड मी
तूच सखे,एक सोबती
प्रेमगीत गाण्यास तू
स्वरसुरांची दे संगती

शांत काळोख्या राती
पडले नभी टिपूर चांदणे
झगमगले वाळवंट सारे
हर्षले मनी प्रेम देखणे

―₹!हुल/२५.८.१७

वास्तवाच्या गडद जाणिवेच्या
ऐलतीरावरती मी जगत आहे
येथले जगणे सुसह्य होण्यास
पैलतीरी सुखावणारा भास आहे
―₹!हुल/२५.८.१७

फ्रीज साफ केला केला, कचरा कुंडी रिकामी केली
दार खिडक्या नीट बंद केली. तीन तीन दा चेक पण केली
टायमर वाले दिवे , अलार्म सिस्ट्म पण चालू केली

बॅगा गाडीत भरलेल्याच होत्या, मुलांना दामटून बसवलं
तिकिटं पासपोर्ट सगळं परत कितव्यांदा तरी तपासलं

एअरपोर्टवर गाडीची चावी
सोडायला आलेल्या मैत्रिणीच्या हातात देताना काळजात काही तरी हललं

चेकिन झालं तशी ताबडतोब गोइंग होम फार द समर स्टॅट्स पण टाकलं फेसबूकवर .

वेटिंग एरियामधून अट्लांटिकचा कोपरा दिसतो बारकासा
तिथे उतरताना अरबी समुद्राच्या किनार्‍याकडे कडेने जाईल विमान
तिथून निघताना परत डझनावरी फोटो टाकून
'ग्रेट व्हेकेशन! रेडी टू हेड बॅक होम ' स्टेट्स टाकणार आपण
आणि याच अटलांटिकच्या कोपर्‍यात उतरणार

जिथे जाईन तिथेच माझं होम !
कस्ला ऐल तीर आणि पैल तीर !!

नदीच्या ओसाड पैलतीरावरी
एका तापलेल्या भग्न दुपारी
निष्पर्ण वठलेल्या पिंपळावरी
दिसली हडळ एक घाबरवणारी
Lol

मस्त!

(शोनू हळूच त्यात 'निर्विघ्नं'ची झायरात करते आहे. Proud )

नाते ते असेच जडले होते जे अनोळखी
जरी होते किनारे वेगवेगळे तरी लाट ती माणुसकीची
लाटेत असा विरघळलो जसा मीही त्यातलाच एक पाखरू
क्षण असे आले जीवनात जे कधी न मी विसरणार
असाच प्रत्येक किनाऱ्यावर नाती मी जोडणार

Pages