आपल्यातल्या अनेकांना फोटोग्राफीची हौस असते. काहीजणांसाठी तो एक छंदही असतो. सुदैवाने तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे हा छंद पूर्वीसारखा महागाचा राहिला नाही. आपल्यातले अनेकजण "मला एकदा नीट फोटोग्राफी शिकायची आहे" असं म्हणतात पण अनेक कारणांमुळे ते राहून जातं. आणि स्वतः प्रयोग करून शिकताही येतं पण इतरांनी केलेल्या त्याच त्याच चुका करून आपल्याला शिकता आलं तरी त्यात भरपूर वेळ आणि पैसे वाया जाऊ शकतात. कुणीतरी गुरु भेटला तर हे शिकणं सोपं होतं. पण त्या गुरुची वेळ, आपली वेळ, जाण्यायेण्यातला वेळ हे नेहमीच जुळून येतंच असं नाही.
युडेमी या वेबसाईटवर असलेला एक अत्यंत लोकप्रिय, ऑनलाईन फोटोग्राफी शिकण्याचा कोर्स ,३१, ऑगस्ट २०१७ मध्यरात्रीपर्यंत , ९५ टक्के सवलतीवर , म्हणजे फक्त $१० मधे उपलब्ध आहे. सहसा या कोर्सची फी $२०० असते. एकदा नावनोंदणी ३१, ऑगस्टच्या आत केली की लगेचच कोर्स घेतला पाहिजे असे नाही. व्हिडीयो कोर्स असल्यामुळे आयुष्यात तुमच्या सोयीने कधीही, तुम्हाला जमेल त्या वेगाने कोर्स पूर्ण करता येईल.
थोडक्यात हे एक पुस्तक घेण्यासारखे आहे. पण पुस्तकापेक्षा कितितरी जास्त फायदे यात आहेत. मल्टिमिडीया कोर्स असल्याने काही गोष्टी जे व्हिडीयो दाखवू शकतो ते पुस्तकात कधीच शक्य होत नाही, इंटरॅक्टीव असल्याने प्रश्न विचारता येतात, इतर विद्यार्थ्यांबरोबरीने शंकानिरसन करता येते.
या कोर्समधे आतापर्यंत जगभरातून 1,05,776 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे.
हा कोर्स गेल्या महिन्यात काही दिवस सवलतीच्या दरात होता. अनेक मायबोलीकरांनी सवलतीचा फायदाही घेतला. या महिन्यात तो पुन्हा सवलतीच्या दरात उपलब्ध आहे.
या कोर्सचा अभ्यासक्रम खालील प्रमाणे आहे. कोर्सची सगळी व्याख्याने इंग्रजी भाषेत आहेत.
Introduction to the Course : 4 Lectures
Drop Auto - Understand Exposure : 13 Lectures
Photography Basics : 9 Lectures
Drop Auto - Focus, Depth of Field & Low Light Photography : 9 Lectures
Composition - Shoot Better Photos : 12 Lectures
Creative Compositions : 9 Lectures
Live Demonstrations - Real & Raw Hands-On Photography - 8 Lectures
Quick Tips for Better Photography - 8 Lectures
Lighting - How to light your photos - 17 Lectures
Using Stabilization - Tripods, Monopods, more? - 6 Lectures
Long Exposure Photography - 10 Lectures
Smartphone Photography - Take better photos, the selfie way! - 9 Lectures
Purchasing a Camera & Additional Equipment - 13 Lectures
Lenses - Diving deep into lens types and styles - 11 Lectures
Photo Editing in Lightroom - 26 Lectures
Photo Editing in Photoshop - 5 Lectures
Editing Photos in iPhoto - 6 Lectures
Editing Photos in PhotoDirector - 6 lectures
Make Money with Photography - 13 lectures
Selling your Photographs - Where to sell, licensing tips, and more! - 9 Lectures
Wedding Photography - 4 Lectures
Canon Camera Overview & Settings - 10 Lectures
Nikon Camera Overview & Settings - 6 Lectures
Sony Camera Overview - 6 Lectures
Fuji Camera Overview -1 Lecture
Conclusion -2 Lectures
एकूण व्याख्याने : २३२
शिक्षक : Phil Ebiner, Sam Shimizu-Jones, Video School Online Inc
नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी
Bestselling Courses-Photography Masterclass: Your Complete Guide to Photography
फक्त हाच कोर्स नाही तर युडेमी वरचे सगळ्याच विषयांवरचे कोर्सेस ३१ ऑगस्ट २०१७ मध्यरात्रीपर्यंत , $१० मधे उपलब्ध आहेत
इतर विषयांवरचे कोर्सेस इथे पाहता येतील
(युडेमी या संस्थेद्वारे प्रायोजीत मजकूर. तुम्ही पैसे भरून नोंदणी केली तर नोंदणी फी मधला काही हिस्सा मायबोलीला मिळेल. त्यासाठी वरील लिंकवरूनच नावनोंदणी करा)
गेल्या महिन्यात मायबोलीवर
गेल्या महिन्यात मायबोलीवर UDEMYच्या फोटोग्राफी कोर्सबद्दल माहिती दिसली आणि उत्सुकतेने ती वाचली. कोर्स ऑनलाईन होता आणि किंमतही खूप सवलतीत होती. मुळात मला फोटोग्राफीची आवड आहे, त्यात गेल्यावर्षीच DSLR घेतला. थोडंसं मॅन्युअल वाचून वापरून पाहिला. पण बर्याच वेळा ऑटो सेटींग्सवर. त्यात कायम फोन जवळ असल्याने मुद्दाम कॅमेरा घेऊन जाणे फारसं होत नाही. म्हणून हा कोर्स चाळून तर बघू असं वाटलं.
आतापर्यंत मी अश्या प्रकारचा कोर्स पाहिला नव्हता. TO Do / Unleashed प्रकारातली पुस्तकं वाचली आहेत. ब्लॉग्स / साईट्सवर माहीती वाचली आहे. पण या कोर्समध्ये ज्या सोप्या पधद्तीने एक एक फिचर समजवाल आहे त्यामुळे कोर्स पूर्ण करायला प्रोत्साहन मिळालं.
मला आवडलेल्या गोष्टी:
१. माझ्या वेगाने आणि वेळेनुसार मला कोर्स पूर्ण करता आला.
२. प्रत्येक भाग / चाप्टर हा मुद्देसूद आणि वेळेत संपणारा होता. लोकांचा कमी होत चाललेला Attention Span लक्षात घेउन ही मांडणी करण्यात आलेली आहे.
३. पानभर माहिती वाचण्याएवजी प्रत्यक्ष व्हिडीयो पाहिल्यामुळे concept समजायला तत्काळ मदत. त्या त्या फिचरचे आधी आणि नंतरचे फोटो देखील दाखवत असल्याने मुद्दा सहज समजत होता.
४. झालेल्या भागाची चाचणी. आपण फोटो काढून असाईनमेंट सादर करणे. त्याला मिळणारा प्रतिसाद.
या सर्व मुद्द्यांमुळे हा कोर्स मला आवडला आणि तत्काळ अजून ३/४ कोर्स मी रजीस्टर केले.
धन्यवाद... लिंक शेर केलेली
धन्यवाद... लिंक शेर केलेली आहे मित्रांना...