लागणारा वेळ:
४५-६० मिनिटे
साहित्य
२५० ग्राम उकळलेली/शिजवलेली रताळी
१०० ग्राम उपवासाची भाजणी
५-६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
अर्धा चमचा जिरेपूड
चवीप्रमाणे साधे/सैंधव मीठ
आवश्यकतेनुसार तूप किंवा तेल
कृती
१. प्रथम उकळलेल्या/शिजवलेल्या रताळ्यांची साल काढून घ्यावी.
२. एका परातीत/बाउलमध्ये साल काढलेली रताळी कुस्करून एकजीव करून घ्यावी.
३. आता एकजीव केलेल्या रताळ्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरेपूड, चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करावे.
४. वरील मिश्रणात सामावेल तशी उपवासाची भाजणी घालत जाऊन, मिश्रणाचा एकसंघ गोळा होईपर्यंत मळावे.
५. मळलेल्या मिश्रणाचे लिम्बापेक्षा किंचित मोठे गोळे करावे आणि पोळपाटावर प्लास्टिक टाकून त्यावर थोडे तूप/तेल लावून थालीपीठ थापावे (दिलेल्या मिश्रणाचे ६-७ थालीपीठ होतील).
६. गरम तव्यावर तूप/तेल टाकून थालीपीठ दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावे.
७. गरम गरम थालीपीठ शेंगदाण्याच्या चटणीसोबत खायला द्यावे.
प्रमाण
६-७
टीप
१. कुकरमध्ये ४ शिट्यात रताळी छान मऊसर शिजतात.
२. हिरव्या मिरचीचे प्रमाण कमी करून मीरेपूड सुद्धा घालू शकता.
३. उपवासाला कोथिंबीर व आले खात असल्यास तेही घालू शकता.
४. इंडक्शन कुकटोप वर बनवल्याने मला जास्त वेळ लागला, कदाचीत गॅसवर कमी वेळ लागेल. शिवाय मी रताळी शिजवायचा वेळही गृहीत धरला आहे.
५. शेंगदाणा चटणी: २-३ चमचे शेंगदाणा कूट, ३ मोठे चमचे दही, चवीनुसार सैंधव/साधे मीठ व किंचित साखर घालून मिश्रण फेटून घ्यावे. एका भांड्यात जराश्या तुपाची फोडणी करून, १ चमचा जिरे टाकावे. जिरे तडतडल्यावर २ मिरच्यांचे तुकडे टाकून, फोडणी मिश्रणात ओतून घावी आणि परत एकदा चांगले फेटून घ्यावे.
माहितीचे स्रोत
अनेक. मात्र मी माझ्या सोयीस्कर व सोपे पडतील असे बदल करून घेतले. एका कृतीत तर चक्क हळद टाकताना बघितलं, कोणत्या प्रांतात उपवासाला हळद चालते, कुणास ठाऊक.
उपवासाचे रताळ्याचे थालीपीठ
Submitted by राहुल बावणकुळे on 11 August, 2017 - 05:21
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे क्रुती. नेहमीच्या
छान आहे क्रुती. नेहमीच्या भाजणी मध्ये रताळ घालून करून पाहिन. आणि रताळी शिजवण्या ऐवजी भाजून .
कोल्हापुर/सांगली साईडला हळ्द असते बरेचदा खिचडीत.
छान !
छान !
मस्त प्रकार!
मस्त प्रकार!
काल साबुदाण्याच्या थालीपीथात
काल साबुदाण्याच्या थालीपीथात रताळी - बटाट्याऐवजी घालून केली. छान लागली. साखरेची गरज पडली नाही.