https://www.maayboli.com/node/63245 भाग १
https://www.maayboli.com/node/63260 भाग २
https://www.maayboli.com/node/63275 भाग ३
https://www.maayboli.com/node/63290 भाग ४
https://www.maayboli.com/node/63311 भाग ५
https://www.maayboli.com/node/63370 भाग ६
आधीच्या भागात....
(अवनी त्याला पकडायला त्याच्या मागे जाणार तोच जेनी आणि रुपा तिला घट्ट धरून ठेवतात. पाटिल तिला समजावत असतात. तोच मोहित बंगल्याच्या दरवाजाकडे खेचलाजातो. आता तो दरवाजाच्या बाहेर जाणार तोच दारात मांत्रिक येतो आणि काही मंत्र म्हणून भस्म मोहितच्या अंगावर टाकतो. त्या क्षणी कसलातरी काळा धूर त्याच्या शरीराजवळून जाताना सगळ्यांना दिसतो. हे सर्व बघून भीतीने सर्व स्तब्ध होऊन जातात. मांत्रिक मोहितला परत रिंगणात घेऊन येतो. पाटिल काही बोलणार तेवढ्या तो त्यांना थाबवतो.)
ईथून पुढे.....
“पाटिल मला काही सांगयची गरज नाही. आत्ता जे काही घडल म्या माझ्या डोळ्यानी बघितल. मला त्या शक्तीचा अंदाज आलाय. मला फकस्त ती जागा कुठहाय ते सांगा मी बघतो सगळ. अन हो, कोनीबी त्या रिंगणा बाहेर येउ नका. नाहीतर त्यो संपलाच म्हणून समजा. आत्ता मी वेळेत ईथे पोचलो म्हणून, नाहीतर ह्यो जरा जरी दाराच्या बाहेर गेला असता तर म्या बी काही करू शकलो नसतो. लै ताकतवर हाय ती शक्ती.”
(पाटिल त्या मांत्रिकाला ती जागा सांगतात. मांत्रिक तडख बंगल्याच्या मागच्या बाजूला जातो. जोसेफ आधीच तिथे पुजा करत असतो. त्यानी त्या सोनेरी गवता जवळ चहू बाजूने लाल पिवळ्या रंगाचे धागे गुंढाळलेले असतात. त्याच्या कडील म्ंतरलेला एक खंजीर त्या गवताच्या मधोमत खुपसलेला असतो. एक क्रिस्टलच्या मण्यांची माळ त्या खंजीरावर अडकवलेली असते. त्याची पुजा चालू असताना एकवार तो त्या मांत्रिकाकडे वळून बघतो. दोघेही डोळ्यांच्या खुणेने एकमेकांशी काहीतरी बोलतात. मांत्रिकही लगेच त्याच्या झोळीतील काही सामान काढून तिथ मांडतो. दोघ जण मिळून आता पुजा करत असतात.
जोसेफच्या बाजूलाच मांत्रिक एक लाल काळ्या रंगाच कापड अंथरतो. त्यावर एक कवटी ठेवतो. त्याच्या चहूबाजूने कुंकवाच रिंगण करतो, त्याच्या आत बुक्क्याच रिंगण करतो. कवटीच्या बाजूला तो पकडून आणलेल आणि दोरीनी बांधलेल जिवंत घुबड ठेवतो. शेजारीच तो छोटा होम पेटवतो. त्या होमात तो काही मंत्र् म्हणून काळे तीळ, शिजवलेला आणि गुलाल मिक्स केलेला भात असे टाकत असतो. जस जस होमात त्या गोष्टी पडतात, आगीच्या ज्वाळा ऊंच ऊठत असतात. दोघांच्या मंत्र्त्रोच्चाराच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर दणानून जातो. त्यांच्या आवाजात पक्ष्यांचा आवाज मिसळून जातो. जंगलाच्या बाजूने जंगली कुत्री भेसूर अशा आवाजात ओरडत असतात. जशी तो मांत्रिक पुजा सुरू करतो. त्या खंजीर खुपसलेल्या जागी धुर निघु लागतो. खंजीरावरची क्रिस्टलची माळ तुटून पडते. हळू ह्ळू त्या जागी जमीनीत भेग तयार होते. त्यातून धुर आणि आग मिश्रित एक गोळा बाहेर पडतो. तो त्या रिंगणाच्या बाहेर यायला तडफडत असतो. त्याच ते रूप बघून काही क्षण जोसेफ आणि मांत्रिक घाबरतात. पुन्हा एकदा त्यांच्यात नजरानजर होते. दोघांनाही काय म्हणायचय ते न बोलताही कळत आणि तो गोळा त्याच्या भोवतीचे सर्व् पाश तोडून क्षणात हवेत विरून जातो. तेवढ्यात बंगल्यातून ओरडण्याच्या आवाज दोघांच्या कानावर पडातो. तस दोघेही मंत्र्त्रोच्चाराचा वेग वाढवतात. काही मिनीटांत ते पुजा संपवून बंगल्याच्या आत धाव घेतात.
आतील दृष्य बघून दोघेही जागीच थिजून जातात. त्यांना वाटल होत त्या पेक्शा कितीतरी पटींनी तो गोळा शक्तीशाली निघाला होता. तो गोळा हॉल मधे आखलेल्या त्या रिंगणात जाऊ पहात होता. त्याच ते आक्राळ विक्राळ रूप बघून सर्व् जण घाबरून ओरडत असतात. जोसेफ त्यांना शांत व्हायला सांगतो. मांत्रिक आणि जोसेफ मिळून त्या गोळ्याच्या बाजूला जाऊन थांबतात. एक एक करून दोघेही जण त्यांच्या हातातील मंतरलेल पाणी त्या गोळ्यावर टाकत असतात. जस जस ते पाणी त्या गोळ्यावर पडत असे काही क्षण तो गोळा बाजूला होत असे. जोसेफ आणी मांत्रिक हळू हळू त्या गोळ्याला रिंगणापासून दूर नेतात. परंतू काही केल्या तो गोळा दाराबाहेर ते घालवू शकत नाहीत. जोसेफ त्या गोळ्याला दारातच थांबवून ठेवतो. मांत्रिक त्याच्या झोळीतून काही सामान बाहेर काढून हॉल मधे मांडतो आणि पुजा चालू करतो. त्याच वेळी तो गोळा परत रिंगणाजवळ जातो. काहीतरी विचित्र् आवाज त्याच्यातून बाहेर पडत असतात. अवनी हळू हळू रिंगणाच्या बाहेर ओढली जाऊ लागते. मोहित, रुपा, जेनी, पाटिल सगळे तिला रिंगणात ओढण्याचा
प्रयत्न् करतात, पण काही उपयोग होत नाही. अवनी रिंगणाच्या बाहेर येऊन पडते.
तो गोळा आता भेसूर आवाजात हसत असतो. मोहीत अवनीला वाचवायला रिंगणाच्या बाहेर येणार तेवढ्यात जोसेफ आणि मांत्रिक एकमेकांत काहीतरी बोलतात आणि सर्वांना रिंगणातच थांबायला सांगतात. पाटिल मोहितला घट्ट धरून ठेवतात. जोसेफ आणि मांत्रिक पुन्हा पुजा सुरू करतात. अवनी आता घसरत घसरत दरवज्याजवळ जाऊन पोहोचलेली असते. तो गोळा आता दरवाज्याच्या बाहेर जातो आणि अवनीला त्याच्या सोबत ओढत बाहेर नेण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात मांत्रिक एका हातात म्ंतरलेल्या पाण्याचा कलश आणि दुसर्या हातात घुबड घेऊन दाराजवळ उभा राहतो, त्याच वेळी अवनी एकदम अंगात शक्ती आल्यासारखी उठून रिंगणाच्या बाजूला पळते. ती रिंगणात पोहोचताच जोसेफ पण मांत्रिका जवळ जाऊन उभा राहतो. त्याच्या एका हातात मंतरलेल पाणी आणि दुसर्या हातात जीज्सची छोटी मुर्ती असते. दोघेही जोरजोरात मंत्र्त्रोच्चार करतात आणि त्या गोळ्यावर एकदम ते मंतरलेल पाणी फेकतात.
ते पाणी त्या गोळ्यावर पडताच त्याच्यातून धूर बाहेर पडतो. अंगाची लाही लाही झाल्याप्रमाणे तो गोळा ओरडत जमीनीवर कोसळतो. तस तो मांत्रिक ते घुबड त्या गोळ्याच्या जवळ नेतो. तो गोळा हळू हळू त्या घुबडाच्या शरीरात जातो. काही वेळातच संपुर्ण गोळा त्या घुबडाच्या शरीरात सामावून जातो. मांत्रिक लगेचच एक काचेची मोठी बाटली बाहेर काढून त्या घुबडाला त्या बाटलीत बंद करतो. ते घुबड बाहेर येण्यासाठी झटापट करत असत. मांत्रिक त्या बाटलीच्या तोंडाला एक लाल कापड गुंडाळातो, त्यावर एक काळा धागा बांधून त्याच्या काही गाठी मंत्र् म्हणत बांधतो. हळू हळू त्या घुबडाची झटापट थांबते आणि त्या बाटलीत ते निपचीत पडते.
जोसेफ सगळ्यांना बाहेर गाडीत जाऊन बसायला सांगतो. सर्व् जण रिंगणाच्या बाहेर येतात. काही वेळासाठी हॉल मधे भयाण शांतता पसरते. रुपा, जेनी, पाटिल, मोहित सर्व् जण दाराच्या बाहेर पडतात. अवनी दाराच्या बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात, बाटलीतले घुबड जागे होते. काही केल्या अवनीला दाराच्या बाहेर पडता येत नाही. मोहित अवनीला घ्यायला दाराकडे वळतो. जोसेफ त्याला खुणेनेच तिथेच थांबायला सांगतो. नेमक काय कराव ते मोहितला कळत नाही. पण अवनीला जोसेफ आणि मांत्रिक काही होऊ देणार नाहीत या विश्वासावर तो तिथेच थांबतो.)
“ताईसाहेब ही शक्ती तुम्हाला अशी ईथून बाहेर जाऊ देणार नाही. आपल्याला हिला संपवाव लागणार आहे. काही वेळापुरत मी हिची शक्ती कमी करू शकतो. त्याच वेळात ह्या शक्तीचा नाश कसा करायचा हे देखील आपल्याला त्याच्या कडून काढून घ्यावे लागणार आहे. आता मी सांगतो तसे करा. तुम्ही अजिबात घाबरू नका. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. हे घ्या ही कवड्यांची माळ तुमच्या गळ्यात घाला.”
“मांत्रिकबुवा, माझी शक्ती या शक्ती पुढे कमी पडतीये. मी अजून जास्त् वेळ या शक्तीबरोबर नाही लढू शकत. आपल्याला हिला संपवण्याचा मार्ग् लवकर शोधायला हवा.”
“ होय मित्रा, मी आता त्याचीच तयारी करतोय. तुम्ही आता फक्त ताईसाहेबांजवळ थांबा. तुमची शक्ती त्यांच्यासाठी वापरा. तिथे तुमच्या शक्तीची गरज लागणार आहे. दोघेही जण आता या चौकोनात या.”
( दोघेही त्या चौकोनात उभे राहतात. मांत्रिक दोघांच्याही कपाळाला भस्म् लावतो. बाटलीले घुबड पुन्हा बाहेर पडण्यासाठी झटापट करू लागते. त्याच्या तोंडून मानवी आवाज बाहेर पडू लागतात.)
“ए….. सोड मला, सोड म्हणतोना, मला मोकळ कर. मला ह्या बाईचा जीव हवाय. मुक्ती हवीये मला ह्यातून, सोड मला.”
“मी तुला मुक्ती मिळवून देइल. सांग कशी मिळेल तुला मुक्ती. फक्त हीच्या जीवाला काही होता कामा नये.”
“हीचा जीव घेतल्या बिगर मला मुक्ती मिळणार न्हाई. सोड मला.”
(मांत्रिक त्याच्या हातातील भस्म् त्या बाटलीवर टाकतो, तस ते घुबड तडफडायला लागत. मांत्रिक ती बाटली ऊचलून हाडांनी बनवलेल्या चौकोनात ठेवतो. तिच्या बाजूने रक्ताचा अजून एक चौकोन बनवतो. हातात एक एक करून कापूर वडी जाळून ती त्या रक्ताच्या चौकोनाच्या चारही बाजूंवर ठेवतो. तस त्या घुबडाचे पंख जळू लागतात. ते ओरडू लागते.)
“सांग मला, तुला मुक्ती कशी मिळेल. नाहीतर मी तुला असत जाळत राहीन. तुला यातून कधीच मुक्ती मिळणार नाही. ही आग तुला त्रास देत राहील.”
“बास कर, मला ही आग सहन होत नाहीये. मी सांगतो. मला मुक्ती देण्यासाठी तुम्हाला ते सोनेरी गवत जाळाव लागेल. त्याच्या मुळ्या जिथे जमीनीत घुसल्या असतील तिथे तुम्हाला खणाव लागेल, तिथे तुम्हाला एक जाड वेटोळ झालेली अजून एक मुळी मिळेल. तिला तिथून बाहेर काढून तिला जाळाव लागेल. माझा जीव त्या मुळीत आहे.”
“ मित्रा, लवकर ताईसाहेबांना घेऊन त्या गवतापाशी जा आणि ती मुळी शोधून ईथे घेऊन या. मी याला थांबवून ठेवतो. माझी शक्ती जास्त वेळ याला थांबवु शकणार नाही. जा लवकर जा.”
(जोसेफ आणि अवनी त्या गवतापाशी येतात. दोघेही मिळुन ते गवत जाळून टाकतात. गवत जळताना त्यातून सगळीकडे दुर्ग्ंधी पसरते. लगेचच त्या काळ्या झालेल्या गवताच्या जागी जोसेफ खड्डा खणतो. अवनी माती बाजूला करते. एका फुटाच्या अंतरावर त्यांना ती वेटोळ घातलेली मुळी दिसते. जोसेफ तिला बाहेर ओढायचा प्रयत्न् करतो. ती जागची हलत नाही. जोसेफ पुन्हा हातातल्या कुदळीने तिला बाहेर काढायच प्रयन्त् करतो. पण काहीच होत नाही. अवनी सुध्दा प्रयत्न करून थकते.)
“अवनी तू ईथेच थांब. मी त्या मांत्रिकाला काही दुसरा उपाय आहे का विचारतो.”
‘ मी! एकटी इथे…. नाही नाही, मी पण येते तुझ्या बरोबर’
“अवनी हे बघ आपल्या कडे जास्त वेळ नाही. तु इथेच थांब”
( जोसेफ हॉल मधे पोहोचतो. मांत्रिक त्याची पुजा करत असतो. झाला प्रकार तो मांत्रिकाला सांगतो. तस बाटलीतल घुबड जोर जोरात हसायला लागत.)
“हे बघ, आम्हाला फसवायचा प्रयत्न् करू नकोस. तुला खुप महागात पडेल हे. बोल तुला तिथून बाहेर कस काढायच, बोल…”
(अस म्हणून मांत्रिक भस्माची भरलेली मुठ त्या बाटलीवर फेकतो. पुन्हा त्या घुबडाचे पंख जळू लागतात. ते ओरडू लागत.)
“सांगतो, सांगतो…. त्या साठी माझी बायको रुपाची मदत तुम्हाला घ्यावी लागेल. तिला मी एक मंत्र शिकवला आहे. तिने तो म्हणला की लगेच तिथुन बाहेर पडेल.”
“ तु हे खर बोलतोयस का?, जर का आम्हाला फसवायच्या प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे.”
“हो मी खर सांगतोय. ह्या आगीत अस जळण्यापेक्षा मला मुक्ती मिळालेली चालेल. तुम्ही रुपाला बोलवा.”
(जोसेफ रुपाला बोलवून आणतो.)
“धनी अव काय चालय हे. मी तुम्हाला सांगीतल हुतना, ही माणस चांगली हायेत. त्यांना तरास देऊ नका. बघितल आता काय होऊन बसलय.”
“रुपा, मी तुला मुक्तीमंत्र शिकवला होता. तु त्या गवताच्या जागी जा आणि तो मंत्र् तीन वेळा म्हण.”
“थांब रुपा, बबन्या….. तिने मंत्र म्हणल्यावर तुला मुक्ती कशी मिळेल. कुठ जाशील तू. तुला या घुबडात परत याव लागेल. मी तुला तसा आदेश देतो. जर तू माझा आदेश पाळला नाहीस तर तू असाच जळत राहशील. बोल मान्य आहे का तुला?”
“मला मान्य आहे. मी परत तुझ्याकडे येईन. मला या आगीतुन मुक्ती दे”
(रुपा आणी जोसेफ त्या गवताच्या जागी जातात. तिला शिकवलेला मंत्र ती म्हणू लागते. तीन वेळा तिचा मत्र म्हणून होताच आकाशात जोराची वीज चमकते. सगळीकडे अंधार दाटून येतो. त्या वेटोळ्यामधून वावटळ तयार होत.
अवनी, रुपा, जोसेफ दोन पावल मागे सरकात. काही वेळातच ते वावटळ आकाशाला जाऊन भिडत. हा प्रकार बघून पाटिल, जेनी, मोहित तिथे येतात. अवनी ठिक आहे हे बघून मोहीतच्या जिवात जीव येतो. त्याच वेळी घरातून काच फुटल्याच्या आणि मांत्रिकाच्या ओरडण्याचा आवाज येतो. सर्व् जण हॉलच्या दिशेने धाव घेतात. हॉल मधील द्रुष्य बघून सगळेच घाबरतात. मांत्रिकाच्या हातातून रक्त वाहत असत. घुबड ठेवलेली बाटली फुटून तिच्या काचा ईकडे-तिकडे पसरलेल्या असतात. बाटलीतल घुबड जमीनीवर रक्तबंबाळ होऊन पडलेल असत. जोसेफ मांत्रिकाला पाणी पाजतो.)
“चला, माझ काम झालय. लगेच बाहेर पडा ईथन. चला बाहेर पडा.”
“बुवा काय झाल. बबन्या…”
“पाटिल, ईथन बाहेर पडा अगोदर. चला गाडी काढा. मी सांगतो सगळ. पहिल ह्या बंगल्याला सोडा.”
“पाटिल- जोसेफ, आपण हे म्हणताहेत तस करूयात. पुन्हा कोणाच्या जीवाला धोका नको. चला मी गाडी कढतो. सगळे लगेच बाहेर या.”
(सगळे गाडीत बसतात. मोहित गाडी चालू करतो. गाडी बंगल्याच्या दरवाज्याच्या जवळ पोहोचते, तोच दरवाजा आपोआप बंद होऊ लागतो. मांत्रिक मोहितला गाडी न थांबवता बाहेर घ्यायला सांगतो. दरवाज्याला जोराची धडक देत गाडी बंगल्याच्या बाहेर पडते. सगळे जण शांत असतात. कुणीच काही बोलत नाही. तेवढ्यात पाटिल ओरडतात. सगळे जण गाडिच्या मागे बघतात. त्यांना ते वावटळ गाडीच्या मागे येताना दिसत. मांत्रिक पुन्हा मोहितला गाडी न थांबवण्याचा ईशारा करतो. त्याच्या झोळीतून एक लिंबू काढून त्याला एक टाचणी टोचून काहितरी मंत्र म्हणून तो ते लिंबू त्या वावटळाच्या दिशेने फेकतो. तस ते वावटळ काही वेळ त्या जागी थांबत. समोरच गावात शिरणारा मुख्य रस्ता दिसतो. सगळे खुष होतात. मांत्रिकाच्या म्हणण्या प्रमाणे, गाडी मुख्य रस्ताया लागली की ती शक्ती त्यांच काहिच करू शकत न्हवती. थोड अंतर पुढे जाताच अचानक गाडी थांबते. सगळे घाबरतात. जोसेफ काय झाल ते विचारतो. मोहितला पण काही कळत नाही की चालती गाडी अचानक कशी थांबली. मुख्य रस्ता फक्त हातभर लांब असतो. मांत्रिक गाडीतून कोणीही उतरू नका म्हणून सांगतो.
मगाच थांबलेल वावटळ पुढ येण्याचा प्रयत्न करत असत. काय कराव हे कोणालाच कळत नसत. मांत्रिकपण त्या शक्ती पुढे त्याची माघार घेतो. आता मात्र सगळ्यांचा धीर सुटतो. समोर मृत्यू दिसू लागतो. कसही करून त्यांना मुख्य रस्त्याला लागण जरूरी होत. शेवटी जोसेफ खाली उतरून गाडीला धक्का मारायच ठरवो. जेनी त्याला विरोध करते. पण तो तिला समजवतो. पाटिलही जोसेफची मदत करायला तयार होतात. दोघे जण खाली उतरतात आणि गाडीला धक्का मारू लागतात. गाडी थोडी पुढे सरकते.
दोघे पुन्हा धक्का मारतात. पण गाडी जागची हालत नाही. मांत्रिकही मग गाडीला धक्का द्यायला खाली ऊतरतो. तिघे मिळून गाडी ढकलु लागतात. गाडी हळू हळू पुढे जाऊ लागते. आता फक्त गाडीच चाक मुख्य रस्त्याला टेकणार तोच, तोच ते माघ थांबलेल वावटळ झपाट्याने पुढे येऊ लागत. सगळे जण घाबरतात. कोणाला काही कळायच्या आत मोहित गाडीतुन खाली ऊतरतो आणि गाडिला धक्का मरतो. एका हाताने स्टेरींग सांभाळत तो गाडी ढकलू लागतो. क्षणातच गाडीची पुढची चाक मुख्य रस्त्याला लागतात. वावटळ आता फक्त एका हाताच्या अंतरावर येऊन पोहोचलेल असत.
सगळे जण एकत्र जोर लावून गाडीला धक्का मारतात आणि एखादा चमत्कार घडावा तस गाडी मुख्य् रस्त्याला लगते आणि सुरू होते. सगळे पटकन गाडित चढतात. वावटळ आता गाडीच्या बरोब्बर मागे उभे असते. हळू हळू ते गाडीच्या बाजुने खाली झुकू लागते. मोहित गाडी वळवतो आणि मुख्य रस्त्याला गाडी पळवू लागतो. वावटळ तिथेच घुमटळत राहते. पुन्हा एकदा गाडीत शांतता पसरते. सगळे जण मागे राहिलेल्या वावटळाकडे बघत असतात. थोड्याच वेळात गाडी पाटलांच्या घराजवळ येऊन थांबते. तरीही कोणी गाडीतुन खाली उतरत नाहीत. तेवढ्यात पाटलीनबाई बाहेर येतात.)
“काय वो, काय झाल. सगळे अशे काय बसलाय. ऊतरा की गाडीतून. या बया ताईसाहेब हे वो काय? अव काय अवतार झालाय सगळ्यांचा. काय झाल बंगल्यावर?”
क्रमशः
वा...मस्त
वा...मस्त
मस्त
मस्त ..
पुढचा भाग शेवटचा असेल ना?
छानेय
छानेय
छान
छान
बाब्बो.. कभी हार कभी जीत...
बाब्बो.. कभी हार कभी जीत...
जबरी!! पुभाप्र..
जबरी!! पुभाप्र..
धन्यवाद सगळ्यांचे.
धन्यवाद सगळ्यांचे.