Submitted by सुप्रिया जाधव. on 29 July, 2017 - 00:35
एक पाखरू उडते आहे
वार्यासोबत लढते आहे
घर केव्हाचे गळते आहे
तुला उशिरा कळते आहे
राहू दे कोळ्याचे जाळे
घर त्याचेही बनते आहे
ह्या बोटीला छिद्र असावे
पाणी कुठून शिऱते आहे ?
पावसात कामावर आली
तापाने फणफणते आहे
चिऱा पाडल्या दंशाभवती
तरिही का विष भिनते आहे ?
उलट दिशेने पोहत जा तू
प्रयत्न कर ना... जमते आहे
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कमी शब्दात रचना.
कमी शब्दात रचना.
चिऱा पाडल्या दंशाभवती
तरिही का विष भिनते आहे ?
हे छान
मस्तच!
मस्तच!
जबरदस्त....
जबरदस्त....
(नेहमीप्रमाणे) झ का स
(नेहमीप्रमाणे) झ का स