Submitted by शिवाजी उमाजी on 18 July, 2017 - 03:28
जे रास्त आहे
हर एक येथला जरा जरा व्यस्त आहे
जगण्या पेक्षा मरण थोडे स्वस्त आहे
विचारता खुशाली तुम्ही ती कुणाला
सांगेल लगेच मी पण जरा त्रस्त आहे
करतो चौकिदार निवांत आराम येथे
घालतो मालक स्वरक्षणा गस्त आहे
पैसाच गरजेला पुरेना करून नोकरी
चोर सफेदपोश येथे मात्र मस्त आहे
करूनी आत्महत्या जातो बळी येथला
ऐकुन सुध्दा हाकारे यंत्रणा सुस्त आहे
उद्याचे आम्ही करतो तयार हमाल येथे
वाहण्या ओझे दप्तरांचे जे जास्त आहे
लिहिणे का हे गैर काही वाटते येथले?
वाटले म्हणुन सांगे शिव जे रास्त आहे
©शिवाजी सांगळे, मो.+91 9545976589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सहज सोप्या शब्दांतली रचना.
सहज सोप्या शब्दांतली रचना..सुंदर..
आवडली....
व्वा.... एकदम मस्त आहे....
व्वा.... एकदम मस्त आहे....
राजेंद्र देवी
राहुल जी व राजेंद्र देवी जी
राहुल जी व राजेंद्र देवी जी आपले मन:पुर्वक आभार...