काही दिवसांनपूर्वी फेसबुकवर लेख वाचला हर्षद शामकांत बर्वे, यानी लिहलेला जर ही कथा तुम्हाला आवडली तर याचे सर्व श्रेय यांना जाते.
ती आणि तो प्रेमात पडले, ती अवघी अठरा वर्षाची होती आणि तो चोवीसचा, आंधळ प्रेम म्हणतात न तसे. दोन वर्षात त्यांनी लग्न देखील केले. लग्नाला थोड़ा विरोध झाला पण दोघेही खंबीर होते. पहिली चार वर्षे एकदम मजेत गेली. आशीष कौमुदीवर अफाट प्रेम करायचा आणि कौमुदीपण. आशीष आणि कौमुदी त्यांच्या मित्रसमुहात मस्त रमायचे आणि तूफ़ान धमाल मस्ती चालत असे. यथाअवकाश ते दोन मुलांचे आईबाप झाले आणि आयुष्याच्या एका पर्वास प्रारंभ झाला, बच्च्यांच्या बाललीला बघतांना, त्यांच्याशी खेळतांना, ABCD म्हणतांना दिवस कसा जायचा हे कौमुदीला कळत नव्हते. आशीष पण आता नव्या उमेदिनी कामाला लागला होता. सकाळी नवास गेलेला आशीष अकरानंतर घरी येत असे, सुट्टी असा काही प्रकार नव्हताच. कष्टाला फळ लागत होती,घर झाल, गाडी झाली, सगळ कस स्वप्नवत.
-नवे ऑफिस घेतो आहोत आपण
-अभिनंदन, पण व्यवस्थित पूजा वगरे नक्की करायची
-अर्थात
आशिषचे स्वतःचे ऑफिस झाले. आता कामाला दुप्पट वेग आला होता. रात्रीचा दिवस केला तरी काम संपत नव्हती. कौमुदीपण जॉईन होवू शकली असती पण बच्चे आडनिड्या वयात होती. पेपरात जाहिराती गेल्या आणि पाच सहा नव्या दमाचे अभियंते आशिषला जॉईन झाले. या नव्या फौजेत अंजू पण होती. दिसायला खास, गोरा वर्ण, साच्यातून काढलेला बांधा आणि मुख्य म्हणजे अफाट ब्रीलीयंट. नवीन दमाची फौज आणि आशिषची स्किल्स याच मस्त सिंक झाल. काम पटापट आवरू लागली. बघत बघता कंपनीचा टर्न-ओवर तिप्पट झाला. आज आशिष आनंदात होता. त्याला UKच्या कंपनीकडून मोठे काम मिळाले होते.
-सहा महीने UKत रहावे लागेल
-बाप रे
-पण काम मोठे आहे, पैसे पण मस्त
-बघ तूच विचार कर, माझ्याकडून आडकाठी नाही
बरीच खलबत झाली आणि आशीष आपली चार लोकांची टीम घेवून UKला रवाना झाला. त्यात अंजू पण होती.बघता बघता सहा महीने गेले, काम पूर्ण झाल. आशीष आणि त्याची टीम भारतात परत आली. कौमुदीनी आशीषच सगळ्याच फ्रंटवर जोरदार स्वागत केले. पण कुठेतरी तीला अपेक्षित प्रतिसाद मिळला नाही.
-काही बिनसले आहे का
-नाही ग, जस्ट स्ट्रेस, सहा महीने भारी गेले
-आता जास्त दगदगीची काम घेवू नकोस
-येस, काही दिवसात सगळ व्यवस्थित होईल
आशीषनी मस्त पैक्की आठ दिवस सुट्टी घेतली होती. भरपूर वेळ तो पोरांना, बगीच्याला,संगीताला देत होता.
-काय झाले आहे आशीष, लक्ष नाही तुझे माझ्याकडे
-अग सांगितले न, थकलो आहे, खुप स्ट्रेस झाला आहे
-अरे स्ट्रेस्सबस्टर म्हणून रात्र रात्रभर जागवायचा तू मला, मला नको सांगुस,
-अस काही नाही, येतात फॉर्टीज़ मध्ये मूड स्विंग्स, बर चहा तर कर
-बर
-आणि ते सैलरी वाउचर आले का, सहया करा मालकिण बाई
-सकाळी देवुन गेला आहे, करते संध्याकाळी
संध्याकाळी कौमुदीला टाळून परत आशीष पोरांबरोबर खेळायला गेला. मग सिनेमा आणि झोप. आता मात्र कौमुदीच्या मनात शंकेची पाल चुक्चुकायला लागली. जगाची पर्वा न करता कुठेही तीला मीठी मारणारा आशीष आज धड़ जवळ यायला तयार नव्हता. नेमके काय झाले असेल याची तिला आता चिंता वाटू लागली होती. अस्वस्थ मनानी तीनी या कुशीवरून त्या कुशीवर होत रात्र काढली. सकाळी उठायला उशीर झाला होता. चहासाठी ति फ्रीज उघडायला गेली आणि तिला तिथे स्टिकी मिळाली.
-अर्जंट कामासाठी दिल्लीला जातो आहे, दोन दिवसात परत येईन. पगाराचे चेक्स सह्या करून पाठवून दे
आता मात्र कौमुदीचे डोक काम करेनास झाल. मुलांना शाळेत पाठवून ती तडक ऑफिसला आली.
-पाटणकर, या महिन्यात बारा लाखांच्या ऐवजी साडेतेरा लाख कसे काय पगाराचे
-मैडम, त्या अंजूला आपण दीडलाख रुपये उचल देतो आहे.
-व्हाट अन्ड व्हाय
-कार साठी
-अरे नेमके सुरु काय आहे
-मला विशेष माहित नाही पण काहीतरी गडबड आहे हे नक्की. रमा तुम्हाला जास्त माहिती देवू शकेल, ती पण होती न UK टिममध्ये
-ओके, बघते मी
-पगाराचे चेक्स,
-अंजूचा सोडून सगळ्यांचे साईन केले आहेत. तुम्ही मला आत्ता UK प्रोजेक्ट ची कॉस्टशीट आणि एक्सपेन्सेस शीट पण द्या
रमाला दुपारी घरी ये अस सांगून कौमुदी घरी निघाली. मुख्य सिग्नलवर पण नेमका घात झाला. आशीष आणि अंजूला तिनी हातात हात घालून समोरच्या फ़ाइवस्टार हॉटेल मध्ये शिरतांना पाहिले होते. आता शंका पक्क रूप घेत होती.
-रमा, ये ग, जेवूया
-नाही मैडम डब्बा आत्ताच खाल्ला आहे
-रमा, UKत नेमके काय झाले याची मला माहिती हवी आहे
-प्रोजेक्ट छान झाला,
-रमा, तुला नेमेके माहित आहे मी काय विचारते आहे ते, आशीष अंजू मध्ये काय झाल
-मैडम सगळच झाल, दे शेयर्ड रूम फॉर सिक्स मंथ्स
रमाचे हे शब्द कौमुदीच्या कानात गरम शिश्यासारखे पडले. हातानीच इशारा करत तिनी रमाला जायला सांगितले. दुसऱ्या दिवशी रात्री साडेअकरा वाजता आशीष घरी आला. कौमुदी इलेक्ट्रिक शेगडी घेवून बाहेर बगिच्यात बसली होती.
-अग अर्जंट बोलवले मीटिंगला, जावे लागले, तुला त्रास नको म्हणून नाही उठवले
-इतकी वर्षे नाही अस वाटलं तुला कधी
-अग, बदलतो आहे मी, तुला त्रास कमी द्यावा म्हणून, आलोच चेंज करून
-बस पाच मिनिट
-ओके बोला
कौमुदीनी फाईल बाहेर काढली. ती फाईल त्यांच्या प्रेमपत्रांची होती. डेटवाईज जपलेली ती सगळी पत्रे बघून आशीष थबकला. शेगडीच्या कॉईल्स लालबुंद झाल्या होत्या.
-हे पहिले पत्र आहे आशीष जे मी जाळते आहे. हे मी रात्रभर बसून लिहिले होते
-अग पण का
लालबुंद झालेले डोळे आणि थरथरणारे ओठ सांभाळत कौमुदी म्हणाली
-मला माहित आहे तू आता अंजूच्या प्रेमात पडला आहेस. मी काल तुम्हाला दोघांना बघितले. तुमची सगळी प्रकरणे UKतली मला जगानी ओरडून सांगितली. आता मला तुझी फक्त पंधरा मिनिट हवी आहेत
-कौमुदी
-एक चकार शब्द बोलू नकोस, काय कमी राहिली रे माझ्या प्रेमात, जे तू शाररिक सुखात वाहून गेलास. तिथे हि मी बेस्ट होतीच. दम तुझाच पुरायचा नाही.
-चुकल माझ
-हे दुसरे पत्र आहे आशीष जे मी लपून लिहिल होत. आपल्या प्रेमाची कुणकुण आईला लागली होती म्हणून
-हे तिसरे पत्र जे वाचून तू मला म्हणला होतास, क्या लिखते हो
-हे चवथे पत्र ज्यात मी लिहिले होते आईने कसे मारले मला
ती पत्र जाळत राहिली आणि तो जिवंत असून जळत राहिला. क्षणिक मोहाची किंमत मोजण्याची बारी आता आशीषची होती.
-हे शेवटचे पत्र, जे मी तुला लग्नाच्या आधल्या दिवशी लिहील होत. कदाचित तू वाचाल नसशील म्हणून तुला दोन ओळी मी परत वाचून दाखवते. "आशीष तू मला सुखात ठेव अथवा दुख्खात मी तुझीच राहीन. पण एक वचन तू मला आज दे कि माझ्याशिवाय यापुढे तुझ्या आयुष्यात कोणी येणार नाही". आज तू तुझे वाचन तोडले आणि मी तुझी साथ. घटस्पोट वगरे तर होईलच पण तू काय गमवले आहे हे जेंव्हा तुला कळेल तोवर फार उशीर झालेला असेल. पोरांना मी काय सांगायचे ते सांगीन.पण मला तू असा सहजासहजी सोडू शकणार नाहीस. हे सगळ करतांना तू विसरलास कि तुझ्या नावावर काही नाही. हि किल्ली घे त्या दोन खोल्यांच्या घराची जे तू स्वतः घेतले होतेस. यापेक्षा जास्त मी तुला जास्त काही देवू शकत नाही. अगदी तुझे आई-बाबा देखील नाही.
सही...मस्त कथा..आवडली..
सही...मस्त कथा..आवडली..
यापेक्षा जास्त मी तुला जास्त काही देवू शकत नाही. अगदी तुझे आई-बाबा देखील नाही. +१११
Nice i liked
Nice i liked
चांगली आहे पण नवीन नाहीय काही
चांगली आहे पण नवीन नाहीय काही
कथा छान आहे
कथा छान आहे
प्रसाद तुमची (तुम्ही लिहलेली) कथा वाचायला जास्त आवडेल
कथा आवडली .
कथा आवडली .
last line saglyat bhari
last line saglyat bhari
अप्रतिम.......
अप्रतिम.......
छान..
छान..
Awsome
Awsome
@ अक्षय दुधाळ >>> नक्कीच
@ अक्षय दुधाळ >>> नक्कीच लवकरच टाकेन.
हे सगळ करतांना तू विसरलास कि
हे सगळ करतांना तू विसरलास कि तुझ्या नावावर काही नाही. हि किल्ली घे त्या दोन खोल्यांच्या घराची जे तू स्वतः घेतले होतेस. यापेक्षा जास्त मी तुला जास्त काही देवू शकत नाही. >> आयत्या बिळावर....